Dream- Marathi Story | स्वप्न | Marathi Katha

देशातील सर्वात मोठ्या वेड्यांच्या दवाखान्याला देशमुखांनी भेट दिली. तेव्हा एका खोलीकडे हात करुन डॉक्टर म्हणाले, ” साहेब, येथे या खोलीत विमान चालविण्याचे, ते वेगाने पळविण्याचे स्वप्न पाहणारे वेडे आहेत.” देशमुखांनी उत्सुकतेने खिडकीतून आत पाहिले तर त्यांना तेथे कोणीही दिसेना. तसे त्यांनी डॉक्टरांना विचारले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, ” साहेब, ते सर्व वेडे खोलीतच आहेत. कदाचित पलंगाखाली झोपून, आपण विमानाच्या खालीच झोपलो आहोत, अशी कल्पना करुन विमान दुरुस्त करत असतील.”

आपण सामान्य माणसेही असेच कल्पनांचे, मनोरथांचे विमान पळविण्याच्या आहारी गेलो आहोत. परंतु त्या खोलीत जसे वेडे दिसत नव्हते, तसाच स्वतःचा वेडेपणाही आपल्याला दिसत नाही.

1 thought on “Dream- Marathi Story | स्वप्न | Marathi Katha”

Leave a Comment