Va Pu Kale Quotes In Marathi | व. पु. काळे सुविचार | Va Pu Kale Marathi Suvichar

Va Pu Kale Quotes In Marathi

अश्रू कितीही प्रामाणिक असले तरीही भूतकाळ परत आणण्याची ताकत त्यांच्यात नसते.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

काळ फक्त माणसाच वय वाढवतो, आठवणीना वार्धक्याचा शाप नसतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीकोनातून आपण स्वताला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. कारण, आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

गैरसमज हा कॅन्सर सारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला पोहोचल्यावर तो आपलं स्वरूप प्रकट करतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

ज्या माणसाला विचारांची सोबत आहे त्याला कोणतही अंतर लांब वाटत नाही. एकदा विचारांची साखळी सुरु झाली कि, त्या साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं.कोणत्या रस्त्याने गेलं कि शॉर्टकट पडतो, इतकच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंद करायचं असतं.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

पारिजातकाचं आयुष्य लाभलं तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच …..

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

जिवंतपणी मरण अनुभवायचं असेल तर माणसाने प्रेम करावं कारण प्रेमात आणि मरणात “स्व” उरत नाही.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात ..मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

अंधारातल्या प्रवासासाठी आपण कायम कुणाचातरी हात शोधत असतो आणि आपलाही हात असाच कुणालातरी हवा असतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत . इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं .

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

समोरच्या चालत्या बोलत्या माणसाशी जितकं छान वागता येईल तितकं छान वागायचं. आपल्यामुळे दुसऱ्याच आयुष्य दु:खी होत नाही एवढ माणूस नक्की सांभाळू शकतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

काही स्पर्श शेवटच्या श्वासापर्यंत साथ करतात.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो.

– व. पु. काळे


Va Pu Kale Quotes In Marathi

पोरगी म्हणजे एक झुळूक अंगावरून जाते अमाप सुख देवून जाते …पण धरून ठेवता येत नाही.

– व. पु. काळे


मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

Leave a Comment