Places to visit in Aurangabad औरंगाबाद जवळ आवर्जून भेट देण्याजोगी प्रमुख ठिकाणे

औरंगाबाद शहर (Aurangabad City) हे महाराष्ट्र राज्यात स्थित आहे, जे प्राचीन काळापासून फतेहनगर आणि संभाजीनगर म्हणून ओळखले जात होते. औरंगाबाद हे नाव मुघल शासक औरंगजेब ह्यांच्या नावाने प्रेरित आहे, ज्याचा शब्दशः अर्थ ‘सिंहासन बांधले’ असे आहे. लोकसंख्येत, औरंगाबाद हे महाराष्ट्रातील पाचवे सर्वात मोठे शहर आहे. या शहरात अनेक भव्य आणि बारीक कोरलेले दरवाजे स्थित आहेत जसं की दिल्ली गेट, काळा दरवाजा, रंगीत दरवाजा, पैठन गेट इत्यादि. नेत्रदीपक, शानदार आणि सुंदर दरवाज्यांच्या उपस्थितीमुळे हे शहर ‘गेट्स ऑफ सिटी’ म्हणून देखील प्रचलीत आहे. औरंगाबाद येथील विख्यात अजिंठा आणि एलोरा लेणी, बीबी का मकबरा इं अशा अनेक ऐतिहासिक स्मारकांनी औरंगाबाद घेरलेले आहे, ज्यामुळे त्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी (Tourism Capital of Maharashtra) म्हणूनही ओळखले जाते. सध्या औरंगाबादची लेणी, बीबी का मकबरा, पाणबुडी व इतर ऐतिहासिक इमारती येथे आकर्षणाची केंद्रे बनली आहेत.

औरंगाबादचा इतिहास History of Aurangabad in Marathi

औरंगाबाद इतिहासात, 3 ते 13 शतकांच्या मध्ये आलेल्या अनेक वळणांचे साक्षीदार आहे, जो वेळोवेळी सातवाहन (Satavahanas), वाकाटक (Vakatakas), बादामीचे चालुक्य वंश, त्यानंतर ऐश्वर्यशाली यादव वंश, मुगलचा समृद्ध वंश, मराठ्यांना ब्रिटिश राजवटीखाली अधीन झाले. मलिक अंबर ह्यांनी सन 1910 साली औरंगाबाद शहराची “खिडकी” या नावाने स्थापना केली. पण मलिक अंबर ह्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या मुलगा फतेह खान याने ‘फतेहनगर’ असं या शहराचे नाव बदलले. मुघल साम्राज्याच्या काळात सम्राट औरंगजेब याने या शहराला मुगल साम्राज्याचे प्रभावी राजधानी म्हणून घोषित केले आणि शहराचे नाव बदलून औरंगाबाद असे ठेवले. औरंगजेबच्या मृत्यूनंतर, शहराचे सौंदर्य वाढवण्यासाठी त्यांचे मंत्री निजाम-उल-मुलुख असफ (Nizam-ul-Muluk Asaf Jah) यांनी अनेक राजवाडे, उद्याने, मशिदी शहरात उभारल्या.

औरंगाबादची सर्वसाधारण माहिती General Information of Aurangabad in Marathi

राज्य – महाराष्ट्र

स्थानिक भाषा – मराठी (Marathi), उर्दू (Urdu), दखनी (Dakhni), हैदराबादी उर्दू (Hyderabadi Urdu)

स्थानिक वाहतूक – टेम्पो, रिक्षा, ऑटो, बस

वेषभूषा – औरंगाबादमधील लोकं आज देखील प्रत्येक उत्सव, सण, कला प्रदर्शन इत्यादि असल्यास पारंपारिक पोशाख परिधान करतात. पुरुष धोतर-शर्ट फेटा (Petha) बरोबर कॉंटनची पगडी आणि महीला साडया नेसतात. तरुण मुले आणि मुली जीन्स, टी-शर्ट, कॅप्रि इत्यादी घालतात.

अन्न आणि पेय – औरंगाबादमधील अनेक खास स्थानिक पदार्थ पर्यटकांना फार आवडतात. औरंगाबादमध्ये येणारे पर्यटक येथील बाजारपेठेत स्थानिक पदार्थांची चव घेऊ शकतात. हे शहर सुगंधित पुलाव आणि बिरयानी तसेच मुघलई व हैदराबादी व्यंजनांसाठी ओळखले जाते. याशिवाय, पर्यटक दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, चाइनीज पदार्थांसह तसेच फास्ट फूडचा आनंद घेऊ शकतात.


औरंगाबादमध्ये भेट देण्याची कही प्रमुख ठिकाणे/ Top 10 Places to Visiti in Aurangabad

बीबी का मकबरा: हा मोगल सम्राट औरंगजेबचा मुलगा, आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलेला मकबरा आहे. औरंगाबाद येथे बांधलेल्या एका भव्य महालात औरंगजेबाची पत्नी राबिया दुर्रानी, हिची कबर आहे.

अजंता लेणी: शहरापासून 99 किमीच्या अंतरावर आपल्या पर्यटन आणि वारसा क्षेत्रासाठी एक ठळक वैशिष्ट्य आहे. संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक वारसा प्रदर्शनांच्या यादीत ह्या लेणींनी स्थान प्राप्त केले आहे आणि जर तुम्ही औरंगाबादमध्ये असाल तर या लेणीला नक्की भेट द्या.

दौलताबाद किल्ला: सोडून दौलताबादकडे निघालात की दूरूनच उंच मिनार आपले लक्ष वेधून घेतो. बाहेरून अतिशय आकर्षक आणि आतून आश्चर्यचकीत करणारा पिरॅमडच्या आकाराचा टेकडीवर वसलेला हा किल्ला मध्ययुगीन काळातला आहे हे आज पाहून पटणार नाही

एलोरा लेणी: आणखी एक जागतिक वारसाहक्क म्हणजे एलोरा लेणी, आणि आपण औरंगाबादमध्ये असताना हे ठिकाण नक्कीच पहावे. येथील शिल्पकला, भव्य आणि सुंदरपणे तीन धर्माचे घटक प्रस्तुत करतात.

ग्रिसनेश्वर मंदिर, एलोरा :एलोरा लेणीपासून एक किमी लांब पल्ल्याचा, 18 व्या शतकात महाराष्ट्रातील भगवान शिवच्या पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आणि भारतातील 12 पैकी एक, या शहरात आहे.

औरंगाबाद लेणी: औरंगाबाद लेणी ही औरंगाबाद शहरातील बीबी का मकबरापासून उत्तरेला सुमारे दोन किलोमीटर अंतरावर आहे. ही एक बौद्ध लेणी असून डोंगरात खोदलेली आहे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment