Information about Maharashtra in Marathi | महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक तथ्य आणि महत्वाची माहिती
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन झाले. म्हणूनच १ मे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण ३६ जिल्हे आहेत. मराठी ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो.
- राजधानी: मुंबई
- उपराजधानी: नागपूर
- चतुःसीमा: पूर्व – छत्तीसगड, पश्चिम – अरबी समुद्र, दक्षिण – गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर – दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
- क्षेत्रफळ: ३,०७, ७१३ चौ. किमी.
- एकूण वनक्षेत्र: ६४०७८ चौ. किमी.
- हवामान: उन्हाळा ३९* ते४२*, हिवाळा ३४* ते १२*, पावसाळा जून ते सप्टेंबर
- पर्वत रांगा: सातपुडा,सह्याद्री – (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.)
- सर्वात उंच शिखर: कळसूबाई – १,६४६ मीटर
- प्रमुख नद्या: नर्मदा,तापी : (उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण), वैणगंगा: ( पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा.), गोदावरी:( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती), भीमा: (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना.), कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.), कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.
महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक तथ्य
- महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे सुसंस्कृत राज्य आहे, जिथे 50 टक्के लोक केवळ शहरात राहतात आणि त्यापैकी 30 टक्के मुंबई आणि पुणे या शहरात राहतात.
- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार लेक हे उल्का जमिनीवर पडल्यामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे भारतातील एकमेव तलाव आहे.
- जगातील सर्वात मोठा कांदा बाजार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी जगभरातील अर्ध्या कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो.
- भारतातील सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहेत, ज्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे आभारी आहोत कारण त्यांनी 300 हून अधिक किल्ले महाराष्ट्रात बांधले होते.
- भारतातील सगळ्यात जास्त पाण्याचे धरण हे महाराष्ट्रा मध्ये आहेत पण दुखद गोष्ट अशी कि बहुतेक धरण हे कोरडे पडलेले आहेत.
- महाराष्ट्र हे भारताचे एकमेव राज्य आहे ज्यामध्ये 2 महानगर आहेत, एक मुंबई आहे आणि दुसरा पुणे.
- महाराष्ट्रातील नागपूर हे एक असे शहर आहे जी कोणत्याही राज्याची राजधानी नाही तरीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची एक शाखा येथे आहे.
- शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरवात केली होती.
- भारतात सगळ्यात पहिला चित्रपट नाशिक जिल्ह्यातील दादासाहेब फाळके यांनी बनविला होता.
- पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.
- महाराष्ट्रातील नवापुर रेल्वे स्थानक अर्धा गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.
- महाराष्ट्रची सीमा भूतान, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, मंगोलिया, पनामा, कुवेत, आयर्लंड, ओमान, फिजी, लक्झेंबर्ग अशा अनेक देशांपेक्षा मोठी आहे.
- आशियातील सगळ्यात पहिली रेल्वे महाराष्ट्र मध्ये धावली होती, ही रेल्वे 16 एप्रिल 1853 रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान धावली गेली होती.
- भारतातील सर्वात मोठे औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात आहे, भारतातील एकूण औद्योगिक उत्पादनापैकी 25% एकट्या महाराष्ट्रात होते.
- मुंबईमध्ये शेकडो मोठ्या कंपन्या आहेत, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
- महाराष्ट्राला हिंदी चित्रपटांचा केंद्र म्हणतात. बहुतेक चित्रपट तारे मुंबई मध्येच राहतात.
- शिवाजी महाराजांनी जिल्हाधिकारीची प्रथा सुरू केली, नंतर ब्रिटिशांनी ही पद्धत बदलली.
- मुंबई मध्ये दररोज 75 लाख लोक प्रवास करतात म्हणजे जवळजवळ स्विट्झर्लँड देशाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढे लोक रोज प्रवास करतात.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.
हे देखील वाचा