Benefits of eating Tomato in Marathi | टोमॅटो खाण्याचे फायदे आणि त्यातील औषधी गुण

आज आपण टोमॅटो चे फायदे व त्याचे औषधी गुण जाणून घेऊयात. टोमॅटो मुळे आपले अनेक आजार बरे होण्यास मदत होते.

1) कॅन्सर पासून बचाव: टोमॅटो मध्ये एन्टी ओक्सिडेंट गुण असतात. जे आपल्या शरीरात कॅन्सर पसरवणाऱ्या सेल्स ची वाढ होऊन देत नाही. जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपला शरीर निरोगी आणि सुरक्षित राहील. कारण टोमॅटो च्या आत असे गुण असतात जे आजार पसरवणाऱ्या जीवनुंशी लढतात आणि आपल्या शरीरात इम्यून सिस्टीम म्हणजेच आपली रोग प्रतिकारक शक्ती मजबूत करतात.

2) रक्ताचे उचित संचार: जर आपण रोज एक टोमॅटो खात असाल तर आपल्या शरीरात वाहणारा रक्त योग्य प्रकारे कार्य करतो. जर आपण टोमॅटो खात नसाल तर त्याचा सूप बनवून पिऊ शकता तसेच भाजी मध्ये त्याचा उपयोग करू शकता. आपल्या शरीरातील रक्त संचारन योग्य प्रकारे चालेल. आपला रक्त अजून लाल गडद होईल.

tomato1 Marathi varsa

3) डोळ्यांसाठी उपयुक्त: जर आपल्याला डोळ्यांच्या संबंधी काही समस्या असतील तर आपण टोमॅटो चे रोज सेवन करा आपल्याला फायदा होईल. आणि आपल्या डोळ्यांची नजर चांगली होईल व आपले डोळे अधिक सुंदर दिसतात. टोमॅटो मध्ये विटामिन A व विटामिन C दोन्ही भरपूर प्रमाणात असतात आणि हे डोळ्यांसाठी खूप फायदेमंद असतात.

4) सांधेदुखी वर गुणकारी: टोमॅटो मध्ये केरोटीन नावाचे एक तत्व असते. जो आपल्या शरीरातील वेदना दूर करण्यासाठी मदत करतो. जर आपल्याला सांधेदुखी चा त्रास असेल किंवा संधिवात असेल आणि हे आजार जर आपल्याला दूर करायचे असतील तर रोज टोमॅटो चे सेवन करायला सुरवात करा. कारण यात असलेले औषधी गुण आपला साधेदुखी सारखा आजार दूर करण्यास मदत करेल.

tomato2 Marathi varsa

5) वजन कमी करण्यासाठी: टोमॅटो मध्ये पाण्याची मात्रा भरपूर असते आणि टोमॅटो मध्ये फायबर हि उचित मात्रेत असतो. तर आपण रोज टोमॅटो चा सेवन करत असाल तर आपला वजन कमी होण्यास मदत होईल आणि आपण निरोगी व तंदुरुस्त राहाल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रोल ची मात्रा वाढली असेल तर वाढलेले कोलेस्ट्रोल कमी करण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा तसेच आपण टोमॅटो चा सलाड हि बनवू शकता.

6) पोटातील जंत: जर आपल्याला पोटा संबंधी समस्या असतील किंवा आपल्या पोटात जंत झाले असतील तर टोमॅटो कापून त्यात हिंग घालून त्याचे सेवन करा, आपल्याला फायदा होईल. किंवा कच्चा टोमॅटो कापून त्यात काळी मिरी पावडर टाकून 2 ते ३ दिवस याचे सेवन करत असाल तर हे आपल्यासाठी लाभदायी ठरेल. आणि आपल्याला gas ची समस्या होणार नाही. तसेच अस्वस्थ व अतिसार सारख्या समस्या देखील होणार नाहीत.

तर आपल्याला समजलेच असेल टोमॅटो हा किती गुणकारी आहे व यात किती औषधी गुण आहेत आणि आयुर्वेदात हि याच्या बद्दल लिहिले आहे. आपण स्वतःला तंदुरुस्त व निरोगी ठेवण्यासाठी रोज टोमॅटो चे सेवन करा.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment