Treatment on sore throat in Marathi | घश्यातील खवखव दूर करण्याचे उपचार

आपल्या शरीरात काही ना काही बदलाव होतात. हे बदलाव जास्त करून वातावरणात आलेल्या बदलावामुळे होतात. उदा. पोटा संबंधी आजार, सर्द्दी, खोकला, गळया संबंधी आजार होतात. यात गळ्यात काटा रुतल्या सारखे दुखणे, खव खव, आवाज बसणे इत्यादी समस्या होतात.

घश्याची खवखव दूर करण्यासाठी बरेच उपचार आहेत. बऱ्याच वेळा आपण अशा आजारांकडे दुर्लक्ष करतो. पण अशाने आपल्याला अनेक गंभीर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. असे आजार कोणत्याही वयात होऊ शकतात. ज्यांच्या मध्ये रोग प्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना असे आजार होतात, तसेच लहान मुलांना, ज्यांना एलर्जी लवकर होते त्यांना व जे लोक धुम्रपान करतात त्यांना अशा लोकांना घशा संबंधी आजार होतात.

गळ्यात खवखव होण्याची कारणे

आपल्या घश्यात दोन्ही बाजूला टॉन्सिल्स असतात जे किटाणू, जीवाणू तसेच व्हायरस ला आपल्या गळ्यात जाऊन देत नाही. पण बऱ्याच वेळा हे टॉन्सिल्स संक्रमित होतात याला टॉन्सिलाइटिस म्हणतात. यामुळे घश्यातील दोन्ही बाजूचे टॉन्सिल्स गुलाबी व लाल रंगाचे दिसतात. हे थोडे मोठे व लाल होतात, काही वेळा याच्यावर सफेद रंगाचे ठिपके दिसतात. घश्याचे इन्फेक्शन जास्त करून व्हायरस व bacteriya मुळे होतो. घश्यामध्ये खवखव ही सगळ्यानाच कधी ना कधी होते, खवखव झाल्याने घश्यात दुखणे, काहीतरी टोचल्या सारखे वाटणे, अन्न गिळायला त्रास होणे, घशाला कोरड पडते. टॉन्सिलाईटीस चे संक्रमण हे योग्य देखभाल आणि एन्टीबायोटीक औषध घेतल्याने बरे होत. पण याचा त्रास जेंव्हा वाढतो तेव्हा diphtheria नामक आजारामुळे अजून समस्या वाढते. याच्यावर काही घरगुती उपचार आहेत.

जेव्हा हे संक्रमण स्तेरपटोकोकस हिमोलीटीस नामक bacteriya मुळे होतो. तेंव्हा हा संक्रमण हृदय आणि किडणीत पसरू लागतो तेंव्हा धोकादायक आजार होऊ शकतो. व्हूपिंग कफ (whooping cough) च्या मुळे घश्यात खवखव व डांग्या खोकला होउ शकतो. जो बराच काळ राहू शकतो. तसेच न्युक्लोसीस नावाच्या व्हायरस मुळे घश्यात खवखव होते. ह्या आजाराचे लक्षण घश्यात खवखव याच्या व्यतिरिक्त ताप येणे, डोकेदुखी, अशक्तपणा येऊ शकतो. सार्वजनीक ठिकाणी असे आजार जास्त करून होतात आणि त्याच्या मुळे घश्यात खव-खव, ताप, मांसपेशींमध्ये वेदना, सर्द्दी आणि तोंडात सफेद डाग होऊ शकतात.

घरगुती उपचार

जर घश्यात आपल्याला जळण होत असेल किंवा सारखा खोकला होत असेल तर साध्या पाण्याने गरारा करा. जर याच्याने फरक पडत नसेल तर पाण्यात मीठ टाकून थोडा उकळून घेऊन, हे पाणी कोमट झाल्यावर याने गरारे करा. अशावेळी कोणतेही थंड पदार्थ व थंड पेय घेऊ नका. असे केल्याने आपल्याला आराम मिळेल. असे करून देखील फरक पडत नसेल तर एक कप पाण्यात ४ -५ काळी मिरी आणि तुळशी ची पाने टाकून त्याचा काढा बनवा आणि हे हळू हळू प्या आणि असे आपण दिवसातून २ – ३ वेळा केलेत तर आपल्याला आराम मिळेल, आपला ताप हि जाईल व कफ तयार नाही होणार.

जर कोणाला ताप येत असेल आणि घश्यात बऱ्याच दिवसान पासून खवखव होत असेल तर आल, वेलची आणि काळी मिरी एकत्र करून चहा बनून प्या आणि दिवसातून दोन वेळा तरी या चहाचे सेवन केलेत तर आपल्याला खूप आराम मिळेल. त्याच बरोबर यात जीवाणूरोधक गुण असतात. हा चहा पिल्याने आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

Vinegar ला एक उपयोगी औषध मानले जाते. कोमट पाण्यामध्ये vinegar मिसळून त्या पाण्याने गरारे केल्याने घश्याचे आजार दूर होतात. काळी मिरी आणि २ बदाम यांचा चूर्ण बनउन याचे सेवन केल्याने गळ्याचे रोग बरे होतात. अर्धा ग्राम तुरटी कमीत कमी एक मिनीटान पर्यंत तोंडात ठेवा आणि त्याचा रस प्या, यामुळे घश्याची खवखव दूर होईल. जर असे आपण दोन तीन वेळा करत असाल तर २ – ३ तासातच आपला घसा साफ होईल, आणि कफ जाईल. असे केल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने बडीसोप खा, असे सकाळी केल्याने आपल्याला आराम मिळेल. महत्वाचे म्हणजे अशा वेळी धूम्रपान करू नका आणि तिखट व तेलकट तसेच थंडगार पदार्थाचे सेवन करू नका.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment