Side effect of continuous air conditioner on health in Marathi | सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान

आपल्याला कदाचित माहित नसेल, AC मध्ये सतत राहिल्या मुळे आपल्याला याचे खूप दुष्परिणाम होतात. बऱ्याच प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागू शकते. खास करून गर्मी च्या दिवसात लोक गर्मी पासून वाचण्यासाठी पंखा, कुलर चा वापर करतात. पण तरीही गर्मी पासून आपल्याला सुटकारा मिळत नाही, म्हणून लोक AC चा वापर करतात. आजकाल फक्त AC चा वापर ऑफीस किंवा हॉटेल मध्ये नाही तर कार व घरा घरा होत आहे. तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी देखील AC चा वापर होतो.

पण आपल्याला कदाचित माहित नसेल AC च्या सतत वापराणे किती दुष्परिणाम होतात. तसेच आपण वेगवेगळ्या आजारांना देखील आमंत्रण देतो. यामुळे आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

सतत AC मध्ये काम करण्याचे नुकसान
आपण जेंव्हा AC रूम मध्ये काम करतो तेंव्हा आपल्याला बाहेरील तापमाना बद्दल माहिती नसते. AC रूम मध्ये बाहेरील हवा आत येत नाही, दरवाजे बंद ठेवावे लागतात. ज्यामुळे आपल्या शरीराला नैसर्गिक हवा मिळत नाही. जेंव्हा आपण AC रूम मधून बाहेर पडतो तेंव्हा बाहेरील तापमान वेगळे असते. या बदलेल्या तापमानामुळे आपल्याला सर्दी, खोकला, ताप होऊ शकतो.

AC चा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या डोक्यावर होतो, ज्या मुळे जास्त डोकेदुखी होते. आपली डोके दुखी ची समस्या वाढते. AC मध्ये सतत काम केल्याने रक्ताभिसरण वाढते. म्हणजे आपल्या शरीरात जे रक्त वाहते त्याच्या गतीत अंतर पडतो. ज्यामुळे स्नायू मध्ये ताण पडतो, तसेच आपले डोके जड जड वाटते आणि कमजोरी वाटते व आळसपण वाढतो.

जे लोक सतत AC मध्ये असतात त्यांना AC ची सवय लागते व त्यांना त्वचे संबंधी समस्या होतात. जसे त्वचा शुष्क व डेड स्कीन सेल्स सारख्या समस्या होतात. AC ची थंड हवा यासाठी कारणीभूत असते. AC च्या थंड हवे मुळे शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे आपली त्वचा कोमेजते. त्वचे सोबत केसांच्या देखील समस्या होतात. आणि आपले केस पांढरे व्हायला लागतात. तसेच आपल्याला त्वचे संबंधी रोग होतात. सतत AC मध्ये काम करणे हे आपल्या केसांसाठी व त्वचे साठी हानीकारक आहे.

जर आपण contact लेन्स वापरात असाल तर आपल्याला डॉक्टर ने AC मध्ये जास्त वेळ काम करण्यास मनाई केली असेल. कारण अशावेळी डोळे दुखायला लागतात, कारण सतत AC मध्ये काम करण्यामुळे contact लेन्स आपल्या डोळ्यांना चिकटतात. ज्यामुळे डोळ्यात आग होते आणि यामुळे डोळ्यातून पाणी येतो व इतर डोळ्यांच्या समस्या होतात. डोळे लाल होणे, डोळे दुखणे म्हणून AC मध्ये जास्त काळ राहु नका.

जर आपण सांधे दुखी पासून ग्रस्त असाल तर याचे कारण आपल्या शरीराचे तापमान असू शकत. शरीरात उचित मात्रेत गर्मी असणे आवश्यक असते. सतत AC च्या थंड हवेमुळे आपल्या शरीराच्या तापमानावर याचा परिणाम पडतो यामुळे आपल्याला सांधे दुखी सारख्या समस्या होतात. आपली हाडे आखडतात, जास्त करून ढोपे दुखतात. हे आपल्याला सामान्य वाटत असेल पण बऱ्याच वेळा हे आजार गंभीर रूप धारण करतात व आपल्याला संधिवात देखील होऊ शकतो. खास करून वृद्ध माणसांना AC मध्ये सतत राहणे धोकादायक आहे. AC ची थंड हवा आपल्या शरीरातील रक्ताला प्रभावित करते यामुळे हृदयाला आपले काम करायला अडथळे येतात. यामुळे हृदयाच्या समस्या वाढतात. म्हणून AC मध्ये सतत राहू नये.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment