मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi mhani with meaning 2024

Marathi mhani with meaning | मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ 2024

Marathi mhani with meaning: मराठीत बऱ्याच अशा म्हणी आहेत कि ज्या काळाच्या ओघात विसरून चाललेल्या आहेत. या लेखात मी मला माहीत असलेल्या सर्व Marathi Mhani वाचकांसाठी उपलब्ध करत आहे. तुम्हालाही जर एखादी म्हण माहीत असेल व ती इथे दिलेली नसेल तर कृपया comment मध्ये नोंदवा.

जर का तुम्हाला Marathi Mhani Collection pdf  मध्ये download करायचे असेल तर मी Marathi Mhani List पोस्ट च्या अगदी खाली एक Marathi Mhani Download Link खाली दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही Marathi Mhani pdf download करू शकता. या पोस्ट मधील बऱ्याच म्हणी MPSC, Talathi Exam तसेच Police Bharti मध्ये विचारल्या जातात. तर तुम्ही जर का एखाद्या परीक्षेची तयारी करत असाल तर या Marathi mhani वर नक्की एकदा नजर टाका.

Marathi Mhani List / Marathi Mhani with Meaning 2024

Marathi mhani collection
Marathi mhani collection

⇒ जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
अंगी पूर्ण बाणलेल्या सवयी जन्मभर जात नाहीत.

⇒ जी खोड बाळा ती जन्म काळा
जन्मजात अंगी असलेले गुण किव्हा दुर्गुण जन्मभर जात नाहीत.

⇒ जाळात राहून माशाशी वैर कशाला
“समाजात ज्यांच्या सोबत राहायचे आहे त्यांच्याशी शत्रुत्व करू नये.”.

⇒ केळीवर नारळी अन घात चंद्रमौळी
अत्यंत गरीब परिस्थिती असणे.

⇒ ज्याचे कुडे त्याचे पुढे
दुसऱ्याचे वाईट इच्छिनाऱ्याचेच वाईट होते .

⇒ गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मग मोडून खाल्ली
एखाद्या गोष्टीचा उपयोग आपल्या अपेक्षेप्रमाणे झाला तर ठीक,नाहीतर त्याचा अन्य तर्हेने उपयोग करणे.

⇒ तोबरयाला पुढे, लगमला मागे
फायद्याचा वेळी पुढे पुढे, कामाच्या वेळी मात्र मागे मागे .

⇒ अती केला अनं मसनात गेला
कुठलीही गोष्ट मर्यादित करावी , अन्यथा तिचा शेवट होतो .

⇒ अती राग भिक माग
जास्त राग केल्याने आपलेच नुकसान होते.

⇒ दुष्काळात तेरावा महिना
आधीच संकटात असताना आणखी संकट येणे.

⇒ आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड
स्वतः च स्वतः चे नुकसान करून घेणे.

⇒ आरोग्य हीच धनसंपत्ती
आरोग्य हीच मनुष्याची सर्वात मोठी संपत्ती आहे.

⇒ ऐकावे जनाचे करावे मनाचे
लोकांचे मत जाणून घेऊन आपल्या मनाला पटेल तेच करने.

Marathi Mhani Ani Tyanche Arth 2024

Marathi mhani with meaning
Marathi mhani with meaning

⇒ आ‌ई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही
बाजूने अडचणीची स्थती निर्माण होणे.

⇒ घर पहावे बांधून, लग्न पहावे करून
अनुभवाने माणूस हुशार होणे.

⇒ आली अंगावर, घेतली शिंगावर
जश्यास तसे उत्तर देणे.

⇒ अपुऱ्या घड्याला डबडब फार
विद्वत्ता नसताना उगीव्ह बढाया मारणे.

⇒ असेल हरी तर दे‌ईल खाटल्यावरी
सगळ्या गोष्टी आयते मिळण्याची अपेक्षया करणे.

⇒ चढेल तो पडेल
ज्याची नुकसान सोसण्याची तयारी असते, तोच शेवटी यशस्वी होतो. प्रयत्न करणाराला एखाद्या वेळी अपयश हे यायचेच.

⇒ कुठे जशी भोग तर तुझ्यापुढे उभा
ज्या संकटाला आपण भितो तेच संकट आपल्यापुढे उभे राहते.

⇒ चिंती पार ते येई घरा
दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा केली कि आपलेच वाईट होते.

⇒ एक घाव दोन तुकडे
त्वरित निर्णय घेणे.

⇒ कडू कारले तूपात तळले, साखरेत घोळले तरी ते कडूच
मुळचीच वाईट असणारी गोष्ट कितीही चांगली करण्याचा प्रयत्न केला, तरी ती चांगली होत नाही.

Marathi Mhani With Meaning 

Marathi mhani list
Marathi mhani list

⇒ गाढवाला गुळाची चव काय
मूर्ख माणसाला चांगल्या गोष्टीचे महत्व कळात नाही.

⇒ गाड्याबरोबर नळयाची यात्रा
एकमेकांशी संबधित असलेल्या गोष्टींपैकी एकाची जी स्थिती तीच दुसऱ्याची स्थिती होते.

⇒ गाढवापुढे वाचली गीता
मुर्खाला कितीही उपदेश केला, तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही.

⇒ अघळ पघळ अन घाल गोंधळ.
“मोठमोठ्या गोष्टी करणारा व्यक्ती कामात आळशी असतो.”

⇒ अचाट खाणे अन मसणात जाणे.
“वाजवीपेक्षा जास्त जेवण करीत राहिले तर आपल्याच तब्येतीवर वाईट परिणाम होतो.”

Famoud Marathi Mhani with Meaning

Funny marathi mhani
Funny Marathi mhani

⇒ अटकाव नाही तेथे धुडगूस.
“जेथे प्रतिबंध नाही तेथे गोंधळ होतो.”

⇒ अटक्याचा सौदा आणि येरझारा चौदा.
“एखाद्या छोट्या कामासाठी उगीचच जास्त मेहनत करावी लागणे.”

⇒ अठरा विश्व दारिद्र.
अतिशय गरिबी.”

⇒ अडक्याची भवानी, सापिकेचा शेंदूर.
“क्षुल्लक गोष्टीसाठी भरमसाठ खर्च.”

⇒ अती उदार तो सदा नादार.
“आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च केला कि सतत आर्थिक चणचण निर्माण होते.”

⇒ अढिच्या दिढि सावकाराची शिडी.
“अडलेला माणूस सावकाराच्या पाशात सापडतो.”

⇒ अस्तुरीचा बात अन इडयाले नको काथ.
मोठ्यांच्या गप्पाच अधिक असतात.”

⇒ असेल ते मितवा, नसेल ते भेटवा.
“जे सहज मिळत असेल त्याला नकार देणे व मिळण्यासारखे नसेल त्याची इच्छा धरणे.”

⇒ असे साहेब किती, सांमटीत हिंडे राती.
“नावाचे साहेब कितीतरी असतात पण त्यांचा काही उपयोग नसतो.”

⇒ असून नसून सारखा.
“असला किंव्हा नसला तरी काही फरक पडत नाही.”

⇒ असून अडचण नसून खोळंबा.
“जर सोबत असेल तर तरी त्रास आणि नसेल सोबत तरी त्रास.”

⇒ असतील मुली तर पेटतील चुली.
” संतती असल्यास हिस्सेवात होतीलच.”

⇒ अल्प बुद्धी, बहु गर्वी.
“कमी बुद्धीच्या मनुष्यास गर्व अधिक असतो.”

⇒ अर्धी टाकून सगळीकडे धावू नये.
“संबध वस्तू मिळेल या आशेवर अर्धी मिळत असेल तर ती टाकू नये.”

⇒ अरे माझ्या कर्मा, कुठे गेला धर्मा!
“आपण चुका करून वर दैवाला दोष देण्यात काय अर्थ आहे.”

⇒ अपमानाची पोळी, सर्वांग जाळी.
“स्वाभिमानी माणूस स्वतःचा अपमान कधीही सहन करीत नाही. “

⇒ अन्नाचा मारलेला खाली पाही नि तलवारीचा मारलेला वर पाही.
“सौम्यपणाने मनुष्य वश करता येतो पण उद्धटपणाने तो आपला शत्रू बनतो.”

⇒ आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे
स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे

Marathi Mhani in Marathi 2024

Marathi mhani ani artha
Marathi mhani ani artha

⇒ आपली पाठ आपणास दिसत नाही
स्वतःचे दोष स्वतःला कधीच दिसत नाहीत.

⇒ आजा मेला नातू झाला
एखादे नुकसान झाले असता, त्याच वेळी फायद्याची गोष्ट घडणे.

⇒ आत्याबाईला जर मिशा असत्या तर
नेहमी एखाद्या कामात जर तर या शक्यतांचा विचार करणे.

⇒ आपल्याच पोळीवर तूप ओढणे
फक्त स्वतःचाच तेवढा फायदा साधून घेणे.

⇒ आलिया भोगासी असावे सादर
तक्रार व कुरकुर निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे.

⇒ आवळा देऊन कोहळा काढणे
आपला स्वार्थ साधण्यासाठी एखाद्या व्यक्तीला लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.

⇒ आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही
अनुभवाशिवाय शहाणपण नसते.

⇒ आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन
दुसऱ्याचे नुकसान करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.

⇒ आधीच तारे, त्यात गेले वारे
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.

⇒ आधीच मर्कट तशातही मद्य प्याला
आधीच करामती व त्यात मद्य प्राशन केल्याने अधिकच विचित्र परिस्थिती निर्माण होते.

⇒ अडक्याची अंबा आणि गोंधळाला रुपये बारा
मुख्य गोष्टीपेक्षा अनुषंगिक गोष्टींचाच खर्च जास्त असणे.

⇒ आग रामेश्वरी, बंब सोमेश्वर
रोग एकीकडे, उपाय भलतीकडे.

⇒ आयजीच्या जीवावर बायजी उदार
दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे.

⇒ आग खाईल तो कोळसे ओकेल
जशी करणी तसे फळ

⇒ आठ पूरभय्ये नऊ चौबे
खूप निर्बुद्ध लोकांपेक्षा चार बुद्धिमान पुरेसे.

⇒ आधणातले रडतात व सुपातले हसतात
संंकटात असतानाही दुसर्‍याचे दुःख पाहून हसू येते.

⇒ इकडे आड तिकडे विहीर
दोन्ही बाजूंनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे.

⇒ इच्छा परा ते येई घरा
आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येणे.

⇒ इच्छिलेले जर घडते तर भिक्षूकही राजे होते
इच्छेप्रमाणे सारे घडले तर सारेच लोक धनवान झाले असते.

⇒ इन मीन साडेतीन
एखाद्या करण्यासाठी अगदी कमीत कमी लोक हजर असणे.

हे देखील वाचा:

 Marathi Suvichar Collection जबरदस्त प्रेरणादायक सुविचार मराठी मध्ये

 Best Marathi Ukhane | बेस्ट मराठी उखाणे

⇒ ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो
जन्मास आलेल्याचे पालन पोषण होतेच.

⇒ उथळ पाण्याला खळखळाट फार
अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो.

⇒ उंदराला मांजर साक्ष
ज्याचे एखाद्या गोष्टीत हित आहे त्याला त्या गोष्टीबाबत विचारणे व्यर्थ असते किंवा एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे.

⇒ उचलली जीभ लावली टाळ्याला
दुष्परिणामाचा विचार न करता बोलणे

⇒ उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
अतिशय उतावीळपणाचे वर्तन करणे.

⇒ उठता लाथ बसता बुक्की
प्रत्येक कृत्याबद्दल आदर घडविण्यासाठी पुन्हापुन्हा शिक्षा करणे.

⇒ उडत्या पाखराची पिसे मोजणे
अगदी सहज चालता – चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे.

⇒ उतावळी बावरी (नवरी) म्हातार्‍याची नवरी
अति उतावळेपणा नुकसान कारक असतो.

⇒ उद्योगाचे घरी रिद्धी – सिद्धी पाणी भरी
जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते.

⇒ उंबर पिकले आणि नडगीचे (अस्वलाचे) डोळे आले
फायद्याची वेळी येणे; पण लाभ न घेता येणे.

⇒ ऊराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे
अतिशय हलाखीची स्थिती.

⇒ उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी
प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.

⇒ उकराल माती तर पिकतील मोती
मशागत केल्यास चांगले पीक येते.

⇒ उखळात डोके घातल्यावर मुसळाची भीती कशाला?
एखादे कार्य अंगावर घेतल्यानंतर त्यासाठी पडणाऱ्या श्रमांचा विचार करायचा नसतो.

⇒ उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती?
जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.

⇒ उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक
एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पहावी लागते.

⇒ उधारीची पोते, सव्वा हात रिते
उधारीने घेतलेला माल नेहमीच कमी भरतो.

⇒ उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे
श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग हाजी हाजी करणारेही येतातच.

⇒ उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे
येते वेळी ताठ मानेने यावे आणि जातेवेळी खाली मान घालून जाणे.

⇒ उसाच्या पोटी कापूस
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी संपत संतती.

⇒ ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये
कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये.

⇒ एका माळेचे मणी
सगळीच माणसे सारख्याच स्वभावाची असणे.

⇒ एका हाताने टाळी वाजत नाही
दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही.

⇒ एक ना धड भाराभर चिंध्या
एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था.

⇒ एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी
दुसऱ्याच्या अडचणींचा विचार न करता त्यातही स्वतःचा फायदा पाहण्याची दृष्टी ठेवणे.

⇒ एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये
दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

⇒ एका पिसाने मोर होत नाही
थोड्याश्या यशाने हुरळून जाणे

⇒ एका खांबावर द्वारका
एकाच व्यक्तीवर सर्व जबाबदाऱ्या असणे.

⇒ एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला
एका व्यक्तीपासून अनेक ठिकाणी उपद्रव होणे.

⇒ एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य

⇒ एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.

⇒ ऐंशी तेथे पंचाऐंशी
अतिशय उधळेपणाची कृती.

⇒ ऐरावत रत्न थोर | त्यासी अंकुशाचा मार |
मोठ्या व्यक्तीला यातनाही तेवढ्यात असतात.

⇒ ओळखीचा चोर जीवे न सोडली
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा भयंकर असतो.

⇒ ओढ फुटो (तुटो) किंवा खोकाळ फुटो/ शेंडी तुटो की तारंबी तुटो
कोणत्याही परिस्थितीत काम तडीस नेणे.

⇒ ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे?
सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.

⇒ औटघटकेचे राज्य
अल्पकाळ टिकणारी गोष्ट.

⇒ करावे तसे भरावे
जशी कृती केली असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळणे.

⇒ कर नाही त्याला डर कशाला ?
ज्याने काही गुन्हा किंवा वाईट गोष्ट केली नाही, त्याने शिक्षा होण्याचे भय कशाला बाळगायचे ?

⇒ करीन ते पूर्व
मी करेन ते योग्य, मी म्हणेन ते बरोबर अशा रीतीने वागणे.

⇒ करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते
काही गोष्टी केल्या तरी नुकसान होते नाही केल्या तरी नुकसान होते.

⇒ करुन करुन भागला, देवध्यानी लागला
भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपुजेला लागणे.

⇒ कणगीत दाणा तर भिल उताणा
गरजेपुरते जवळ असले, कि लोक काम करत नाहीत किंवा कोणाची पर्वा करत नाहीत.

⇒ कधी तुपाशी तर कधी उपाशी
सांसारिक स्थिती नेहमी सारखी राहत नाही.

⇒ कशात-काय-अन-फाटक्यात-पाय
वाईटात आणखी वाईट घडणे

⇒ काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही
रक्ताचे नाते मोडू तोडू म्हणता तुटत नाही.

⇒ काडीचोर तो माडीचोर
एखाद्या माणसाने क्षुल्लक अपराध केला असेल तर त्याचा घडलेल्या एखाद्या मोठ्या अपराधाची संबंध जोडणे.

⇒ काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती
गोष्टींचा प्रभाव तेवढ्यापुरताच असतो.

⇒ का ग बाई रोड (तर म्हणे) गावाची ओढ
निरर्थक गोष्टींची काळजी करणे.

⇒ कानात बुगडी, गावात फुगडी
आपल्या जवळच्या थोड्याशा संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे.

⇒ काल महिला आणि आज पितर झाला
अतिशय उतावळेपणाची वृत्ती.

⇒ काकडीची चोरी फाशीची शिक्षा
अपराध खूप लहान; पण त्याला दिली गेलेली शिक्षा मात्र खूप मोठी असणे.

⇒ काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही
जे काम भरपूर पैसा आणि होत नाही, ते थोड्याश्या अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता महत्त्वाची ठरते.

⇒ कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते
पूर्वग्रहदूषित दृष्टी असणे.

⇒ मल्हारी माहात्म्य
नको तिथे नको ती गोष्ट करणे.

⇒ काना मागुन आली आणि तिखट झाली
श्रेष्ठ पेक्षा कनिष्ठ माणसाने वरचढ ठरणे.

⇒ कामापुरता मामा
आपले काम करून घेईपर्यंत गोड गोड बोलणे.

⇒ कावळा बसला आणि फांदी तुटली
परस्परांशी कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे

⇒ काखेत कळसा गावाला वळसा
जवळच असलेली वस्तू शोधण्यास दूर जाणे

⇒ काप गेले नी भोके राहिली
वैभव गेली अन फक्त त्याच्या खुणा राहिल्या

⇒ कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

⇒ काळ आला; पण वेळ आली नव्हती
नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे.

⇒ कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात
चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा मूर्खपणा करणे.

⇒ कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा
दुसऱ्याच्या स्वाधीन झालेला माणूस आपली मते विसरतो; आपल्या ताब्यात आलेल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.

⇒ कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे
मूळचा स्वभाव बदलत नाही.

⇒ कुडी तशी फोडी
देहा प्रमाणे आहार किंवा कुवतीनुसार मिळणे.

⇒ कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
स्वार्थासाठी केवळ दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचे नुकसान करणे.

⇒ केस उपटल्याने का मढे हलके होते ?
जेथे मोठ्या उपायांची गरज असते तेथे छोट्या उपायांनी काही होत नाही.

⇒ केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले
एखाद्या गोष्टीचा लाभ घेताना गंमत वाटते मात्र पैसे देताना जीव मेटाकुटीस येतो.

⇒ कोळसा उगाळावा तितका काळाच
वाईट गोष्टीबाबत जितकी चर्चा करावी तितकीच ती वाईट ठरते.

⇒ कोल्हा काकडीला राजी
लहान लहान गोष्टींनी खुश होतात.

⇒ कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी
चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला

⇒ कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी
महान गोष्टींबरोबर शुल्लक गोष्टींची तुलना करणे.

⇒ खऱ्याला मरण नाही
खरे कधीच लपत नाही.

⇒ खर्चणार्याचे खर्चते आणि कोठावळ्याचे पोट दुखते
खर्च करणार्‍याचा खर्च होतो ; तो त्याला मान्य ही असतो; परंतु दुसराच एखादा त्याबद्दल कुरकुर करतो.

⇒ खाऊ जाणे तो पचवू जाणे
एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास ही समर्थ असतो.

⇒ खान तशी माती
आई-वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे.

⇒ खायला काळ भुईला भार
निरूपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो.

⇒ खाई त्याला खवखवे
जो वाईट काम करतो त्याला मनात धास्ती वाटते.

⇒ खाऊन माजावे टाकून माजू नये
पैशाचा, संपत्तीचा गैरवापर करू नये.

⇒ खोट्याच्या कपाळी गोटा
खोटेपणा वाईट काम करणाऱ्यांचे नुकसान होते.

⇒ गरज सरो, वैद्य मरो
एखाद्या माणसाची आपल्याला गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे.

⇒ गळ्यात पडले झुंड हसून केले गोड
गळ्यात पडल्यावर वाईट गोष्टी सुद्धा गोड मानून घ्यावे लागते.

⇒ ग ची बाधा झाली
गर्व चढणे

⇒ गरजेल तो पडेल काय
केवळ बडबडणार्या माणसाकडून काही घडत नाही.

⇒ गरजवंताला अक्कल नसते
गरजेमुळे अडणार्‍याला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते.

⇒ गर्वाचे घर खाली
गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते.

⇒ गळ्यातले तुटले ओटीत पडले
नुकसान होता होता टळणे.

⇒ असतील शिते तर जमतील भूते
एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्याभोवती माणसे गोळा होतात

⇒ असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ
दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो

⇒ अडला हरी गाढवाचे पाय धरी
एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील अडचणीच्या वेळी दुर्जन माणसाची विनवणी करावी लागते

⇒ अतिशहाणा त्याचा बैल रिकामा
जो मनुष्य फार शहाणपणा करायला लागतो त्याचे मुळीच काम होत नाही

⇒ अति तेथे माती
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसान कारक असतो

⇒ अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे
दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.

⇒ अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज
गरजवंताला अक्कल नसते

⇒ अंगावरचे लेणे, जन्मभर देणे
दागिन्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि ते जन्मभर फेरीत बसायचे.

⇒ अंत काळापेक्षा मध्यान्हकाळ कठीण
मरण्याच्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना अधिक दुःखदायक असतात.

⇒ अंधारात केले, पण उजेडात आले
कितीही गुप्तपणे एखादी गोष्ट केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच

⇒ अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे
नाव मोठे लक्षण खोटे

⇒ अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अशक्यकोटीतील गोष्टी

⇒ अती झाले अन आसू आले
एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की ती दुःखदायी ठरते

⇒ अतिपरिचयात अवज्ञा
जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो

⇒ अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे
कृत्य एकाचे त्रास मात्र दुसऱ्यालाच

⇒ अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास
अन्न न खाणे;पण त्यात मन असणे

⇒ अपापाचा माल गपापा
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.

⇒ अर्थी दान महापुण्य
गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.

⇒ आईची माया अन् पोर जाईल वाया
फार लाड केले तर मुले बिघडतात

⇒ आधी पोटोबा मग विठोबा
प्रथम पोटाची सोय पाहणे, नंतर देव – धर्म करणे

⇒ आपलेच दात आपलेच ओठ
आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

⇒ आयत्या बिळावर नागोबा
एखाद्याने स्वतःकरिता केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेण्याची वृत्ती असणे.

⇒ आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे
अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे

⇒ आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला
ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो, तो दोष आपल्या अंगी असणे

⇒ आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
मुळातच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत त्यांच्या आळशी वृत्तीला पोषक, अवस्था निर्माण होणे.

⇒ आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं
एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.

⇒ आंधळ्या बहिर्यांची गाठ
एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणार्‍या दोन माणसांची गाठ पडणे.

⇒ अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी ?
चूक स्वतःच करून ती मान्य करावयाची नाही, उलटी ती दुसऱ्याच्या माथी मारून मारून मोकळे व्हायचे.

⇒ अडली गाय फटके खाय
एखादा माणूस अडचणीत सापडला, की त्याला हैराण केले जाते.

⇒ आपला हात जगन्नाथ
आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते.

⇒ असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा
अनुकूलता असेल तेव्हा चैन करणे आणि नसेल तेव्हा उपवास करण्याची पाळी येणे.

⇒ अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का ?
कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते.

⇒ अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप
अतिशय उतावळेपणाची कृती.

⇒ अती खाणे मसणात जाणे
अति खाणे नुकसानकारक असते.

⇒ अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.

⇒ अवचित पडे, नि दंडवत घडे
स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे.

⇒ अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे
एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू.

⇒ अंथरूण पाहून पाय पसरावे
आपली ऐपत, वकूब पाहून वागावे.

⇒ अंगापेक्षा बोंगा मोठा
मूळ गोष्टींपेक्षा अनुषांगिक गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.

⇒ नाव देवाचे आणि गाव पुजाऱ्याचे
देवाच्या नावाने स्वार्थ जपणे.

⇒ नाक दाबले, की तोंड उघडते
एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला, की चुटकीसरशी ताबडतोब हवे ते काम करून घेता येते.

⇒ नागव्यापाशी उघडा गेला, सारी रात्र हिवाने मेला
आधीच दरिद्री असणाऱ्याकडे मदतीला जाणे.

⇒ नागिन पोसली आणि पोसणाराला डसली
वाईट गोष्ट जवळ बाळगल्या वर ती कधी ना कधी उलटतेच

⇒ नाकापेक्षा मोती जड
मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे

⇒ नाचता येईना अंगण वाकडे
आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे

⇒ नावडतीचे मीठ आळणी
आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट किती चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते

⇒ निंदकाचे घर असावे शेजारी
निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात

⇒ नेसेन तर पैठणी (शालू) च नेसेन, नाही तर नागवी बसेन
अतिशय हटवादीपणाची वर्तन करणे

⇒ पळसाला पाने तीनच
सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे

⇒ पडलेले शेण माती घेऊन उठते
एखाद्या चांगल्या माणसावर काहीतरी ठपका आला आणि त्याने किती जरी निवारण केले तरी त्याच्या चारित्र्यावर थोडा का होईना डाग हा पडतोच

⇒ पदरी पडले पवित्र झाले
कोणती गोष्ट एकदा स्वीकारली कितीला नाव ठेवणे उपयोगाचे नसते

⇒ पायाची वाहन पायीच बरी
मूर्ख माणसाला अधिक सन्मान दिला तर तो शेफारतो.

⇒ पाचामुखी परमेश्वर
बहुसंख्य लोक म्हणतील तेच खरे मानावे

⇒ पाप आढ्यावर बोंबलते
पाप उघड झाल्याशिवाय राहत नाही

⇒ पाची बोटे सारखी नसतात
सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात

⇒ पायलीची सामसूम चिपट्याची धामधूम
जिथे मोठी शांत असतात तेथे छोट्यांचा बडेजाव असतो

⇒ पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे
अनुभव घेतल्याशिवाय शहाणपण येत नाही

⇒ पाहुनी आली आणि म्होतुर लावून गेली
पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे

⇒ पी हळद नि हो गोरी
कोणत्याही बाबतीत उतावळेपणा करणे

⇒ पुत्र मागण्यास गेली भ्रतार नवरा घालवून आली
फायदा होईल म्हणून जाणे परंतु नुकसान होणे

⇒ पुढच्याच ठेच मागचा शहाणा
दुसऱ्याच्या अनुभवावरून मनुष्य काही बोध घेतो व सावधपणे वागतो

⇒ पुढे तिखट मागे पोचट
दिसायला फार मोठी पण प्रत्यक्षात तसे नसणारे

⇒ पै दक्षिण लक्ष प्रदक्षिणा
पैसा कमी काम जास्त

⇒ पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी
स्वतः जवळच असणारी वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे

⇒ पोर होईल ना व सवत साहिना
आपल्याकडून होत नाही व दुसऱ्यालाही करू द्यायचे नाही

⇒ फासा पडेल तो डाव राजा बोलेल तो न्याय
राजाने दिलेला न्याय मनाविरुद्ध असला किंवा चुकीचा असला तरी तो मानावा लागतो

⇒ फुले वेचली तिथे गोवर्या वेचणे
जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे

⇒ फुल ना फुलाची पाकळी
वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा पुष्कळ कमी देणे

⇒ फुटका डोळा काजळाने साजरा करावा
आपल्या अंगचा जो दोष नाहीसा होण्यासारखा नसतो तो झाकता येईल तितका झाकावा

⇒ बडा घर पोकळ वासा
दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव

⇒ बळी तो कान पिळी
बलवान मनुष्य इतरांवर सत्ता गाजवितो

⇒ बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना
निरुपयोगी गोष्ट

⇒ बाप से बेटा सवाई
वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार

⇒ बाप तसा बेटा
बापाच्या अंगचे गुण मुलात उतरणे

⇒ बावळी मुद्रा देवळी निद्रा
दिसण्यास बावळट पण व्यवहारचतुर माणूस

⇒ जारात तुरी भट भटणीला मारी
काल्पनिक गोष्टीवरुन भांडण करणे

⇒ बारक्या फणसाला म्हैस राखण
ज्याच्या पासून धोका आहे त्याच्याकडे संरक्षणाची जबाबदारी सोपविणे

⇒ बुडत्याला काडीचा आधार
घोर संकट काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्त्वाची ठरते

⇒ बैल गेला आणि झोपा केला
एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते

⇒ बोलेल तो करेल
काय केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही

⇒ बोडकी आली व केस कर झाली
विधवा आली अन लग्न लावून गेली

⇒ भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी
एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक फायदा घेण्याचा प्रयत्न करतो

⇒ भरवशाच्या म्हशीला टोणगा
ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे

⇒ भित्यापाठी ब्रह्मराक्षस बिद्री
व्यक्ती काही कारण नसताना भीत असते

⇒ भिंतीला कान असतात
गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहात नाही

⇒ भीड भिकेची बहीण
उगाच मनात भीती बाळगून आपण एखाद्याला नकार देऊ शकलो नाही तर शेवटी आपणावर भीक मागण्याची पाळी येणे

⇒ भीक नको पण कुत्रा आवर
एखाद्याच्या मनात नसले तर त्याने मदत करू नये परंतु निदान आपल्या कार्यात अडथळा आणू नये अशी स्थिती

⇒ भागीचे घोडे की किवणाने मेले
भागीदारीतील या गोष्टीचा लाभ सर्वच घेतात काळजी मात्र कोणीच घेत नाही

⇒ मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये

⇒ मनात मांडे पदरात धोंडे
केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती

⇒ मनी वसे ते स्वप्नी दिसे
ज्या गोष्टींचा आपण सतत ध्यास लागलेला असतो ती गोष्ट स्वप्नात दिसणे

⇒ नाही पण जण्याची तरी असावी
एखादी वाईट कृत्य करताना म्हणाला काही वाटले नाही तरी जगाला काय वाटेल याचा विचार करावा

⇒ मन जाणे पाप आपण
केलेले पाप दुसऱ्याला कळाले नाही तरी ज्याचे त्याला ते माहीत असतेच

⇒ मन राजा मन प्रजा
हुकुम करणारे आपले मनच ते पाळणारे ही आपली मनच असते

⇒ माणकीस बोललं, झुणकीस लागलं
एकाला बोलणे अन् दुसऱ्या लागणे

⇒ मामुजी मेला अन् गांव गोळा झाला
क्षुल्लक गोष्टीचा गवगवा करणे

⇒ मांजरीचे दात तिच्या पिल्लाला लागत नाही
आई वडिलांचे बोलणे लेकराच्या हिताचेच असते

⇒ मानेवर गळू आणि पायाला जळू
रोग एकीकडे उपाय भलतीकडे

⇒ मारुतीची शेपूट
लांबत जाणारे काम

⇒ मुंगीला मिळाला गहू कुठे नेऊ अन् कुठे ठेवू
छोट्याशा गोष्टींनीही हुरळून जाणे

⇒ मुंगीला मुताचा पूर
लोकांना लहान संकट ही डोंगराएवढी वाटते

⇒ मुलाचे पाय पाळण्यात दिसतात
लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते

⇒ मूर्ख लोक भांडते वकील घरी बांधते
मूर्खांचे भांड अन् तिसऱ्याचा लाभ

⇒ म्हशीला मणभर दूध
मेल्यावर गुणगान करणे

⇒ म्हातारीने कोंबडे लपविले म्हणून उजडायचे राहत नाही
निसर्ग नियमानुसार ज्या घटना घडायच्या त्या घडतातच म्हशीचे दुध काढतांना आधी आचळाला दूध लागावे लागते फायदा उचलण्यासाठी आधी थोडी खुशामत करावी लागते

⇒ यथा राजा तथा प्रजा
सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात

⇒ या बोटाची थुंकी त्या बोटावर करणे
बनवाबनवी करणे

⇒ रे माझ्या मागल्या
ताक कण्या चांगल्या एखाद्याने केलेला उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे

⇒ ये रे कुत्र्या खा माझा पाय
आपण होऊन संकट ओढवून घेणे

⇒ रंग जाणे रंगारी
ज्याची विद्या त्यालाच माहीत

⇒ रात्र थोडी सोंगे फार
कामे भरपूर पण वेळ थोडा असणे

⇒ रडत राऊत रडत राव घोड्यावर स्वार
इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे

⇒ रामाशिवाय रामायण कृष्णाशिवाय महाभारत
मुख्य गोष्टीचा अभाव

⇒ राईचा पर्वत करणे
मूळ गोष्ट अगदी क्षुल्लक असता तिचा विपर्यास करून सांगणे

⇒ राज्याचे घोडे आणि खासदार उडे
वस्तू एकाची मिजास दुसऱ्याची

⇒ रोज मरे त्याला कोण रडे
तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही

⇒ लग्नाला वीस तर वाजंत्री ला तीस
मुख्य कार्य पेक्षा गौण कार्यालाच खर्च अधिक लष्कराच्या भाकर्‍या भाजणे बिन फायद्याचा आणि निरर्थक उद्योग करणे

⇒ लकडी दाखविल्या शिवाय मकडी वळत नाही
धाका शिवाय शिस्त नाही

⇒ लग्नाला गेली आणि बारशाला आली
अतिशय उशिराने पोहोचणे

⇒ लंकेत सोन्याच्या विटा
दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो

⇒ लाज नाही मला कोणी काही म्हणा
निर्लज्ज मनुष्य दुसऱ्याच्या टीकेची पर्वा करत नाही

⇒ लेकी बोले सुने लागे
एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे

⇒ लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण
लोकांना उपदेश करायचा पण स्वता मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही

⇒ वळणाचे पाणी वळणावर जाणे
निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणार

⇒ वरातीमागून घोडे
योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे

⇒ वारा पाहून पाठ फिरविणे
परिस्थिती पाहून वर्तन करणे

⇒ वाहत्या गंगेत हात हात धुणे किंवा आपल्या तव्यावर पोळी भाजून घेणे
सर्व साधने अनुकूल असली की होईल तो फायदा करून घेणे

⇒ वासरात लंगडी गाय शहाणी
मूर्ख माणसा अल्पज्ञान असणारा श्रेष्ठ असतो

⇒ वाघ म्हटले तरी खातो आणि वाघोबा म्हटले तरी खातोच
वाईट व्यक्तीला चांगली म्हंटले किंवा वाईट तरी त्रास द्यायचा तो देणारच

⇒ विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर
गरजेपुरते गोष्टी घेऊन फिरणे

⇒ विशी विद्या तिशी धन
योग्य वेळेत योग्य कामे केली की त्यावरून कर्तुत्वाचा अंदाज बांधता येतो

⇒ विचाराची तूट तेथे भाषणाला उत
मूर्खांच्या गर्दीत नेहमी नुसती बडबड असते

⇒ विश्वासही ठेवला घरी चारी सुना गरवार करी
विश्वासघात करणे

⇒ तितका संताप
कामाचा पसारा जितका अधिक तितकी जबाबदारी अधिक असणे

⇒ शहाण्याला शब्दाचा मार
शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते

⇒ शितावरून भाताची परीक्षा
वस्तूच्या लहान भागावरून त्या संपूर्ण वस्तूची परीक्षा होती

⇒ शेरास सव्वाशेर
चोरावर मोर एकाला दुसरा वरचढ भेटणे

⇒ शेजी देईल काय आणि मन धायेल काय ?
शेजारणीने एखादा पदार्थ सढळ हाताने करून दिला तरीच मनाची तृप्ति होऊ शकत नाही

⇒ शेजीबाईची कढी, धावधाव वाढी
एकाची वस्तू घेऊन दुसऱ्यावर उपकार दाखविणे

⇒ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
चांगल्या च्या पोटी चांगल्याच गोष्टी येतात

⇒ घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे
अडचणीत आणखी भर पडण्याची घटना घडणे

⇒ घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात
एखाद्यावर प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारे त्याच्याशी वाईटपणे वागू लागतात.

⇒ घरोघरी मातीच्या चुली
एखाद्या बाबतीत सामान्यता सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे.

⇒ घर ना दार देवळी बिर्हाड
शिरावर कोणती जबाबदारी नसलेली व्यक्ती.

⇒ घडाई परिस मडाई जास्त
मुख्य गोष्टीपेक्षा आनुषंगिक गोष्टींचा खर्च जास्त असणे.

⇒ घेता दिवाळी देता शिमगा
घ्यायला आनंद वाटतो तर द्यायच्या वेळी मात्र बोंबाबोंब.

⇒ घोडे कमावते आणि गाढव खाते
एकाने कष्ट करावे व निरुपयोगी व्यक्तीने त्याचा गैर फायदा घ्यावा.

⇒ चवलीची कोंबडी आणि पावली फळणावळ
मुख्य गोष्टीपेक्षा देखभालीचा खर्च जास्त असणे.

⇒ चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे
प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच.

⇒ चार जणांची आई बाजेवर जीव जाई
जबाबदारी अनेकांची असेल तर काळजी कोणीच घेत नाही.

⇒ चिंता परा येई घरा
दुसऱ्याचे वाईट चिंतित राहिले, कि ते आपल्यावरच उलटते.

⇒ चिखलात दगड टाकला आणि अंगावर शिंतोडे घेतला
स्वतःच्याच हाताने स्वतःची बदनामी करून घेणे.

⇒ चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर भागुबाई
घरात तेवढा शूर पणाचा आव आणायचा पण बाहेर मात्र घाबरायचे.

⇒ चोर सोडून संन्याशालाच फाशी
खर्या अपराधी माणसाला सोडून निरपराधी माणसाला शिक्षा देणे.

⇒ चोराच्या उलट्या बोंबा
स्वतः गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे.

⇒ चोरावर मोर
एखाद्या गोष्टीच्या बाबतीत दुसऱ्याला वरचढ ठरणे.

⇒ चोरांच्या हातची लंगोटी
ज्याच्याकडून काही मिळण्याची आशा नसते त्याच्याकडून थोडेतरी मिळणे.

⇒ चोराची पावली चोराला ठाऊक
वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

⇒ चोराच्या मनात चांदणे
वाईट कृत्य करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल की काय अशी सतत भीती असते.

⇒ चालत्या गाडीला खीळ
व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचण निर्माण होणे.

⇒ जशी देणावळ तशी धुणावळ
मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.

⇒ जळतं घर भाड्याने कोण घेणार ?
नुकसान करणाऱ्या गोष्टीचा स्वीकार कोण करणार ? बुडत्या बँकेचा पुढल्या तारखेचा चेक कोण घेणार ?

⇒ जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही
बाह्य देखाव्याने माणूस ज्ञान होत नाही.

⇒ जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे
दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते.

⇒ जीत्या हुळहुळे आणि मेल्या कानवले
जितेपणी दुर्लक्ष करायचे व मेल्यावर कोड कौतुक करायचे.

⇒ जेवेण तर तुपाशी नाही तर उपाशी
अतिशय दुराग्रहाचे किंवा हटवादीपणाची वागणे.

⇒ जे न देखे रवि ते देखे कवी
जे सूर्य पाहू शकत नाहीत ते कवी कल्पनेने पाहू शकतो.

⇒ जो गुळाने मरतो त्याला विष कशास ?
जिथे गोड बोलून काम होते तिथे जालीम उपायांची गरज नसते.

⇒ ज्या गावच्या बोरी, त्या गावच्या बाभळी
एकच स्वभाव असलेल्या माणसाने एकमेकांची वर्मी काढण्यात अर्थ नसतो, कारण एकाच ठिकाणची असल्याने ते एकमेकांना पुरेपूर ओळखतात.

⇒ ज्याच्या हाती ससा, तो पारधी
ज्याच्या हाती वस्तू असते त्याला त्याविषयीचे कर्तृत्व बहाल केले जाते, म्हणजेच एकाचे कर्तृत्व; पण ते दुसऱ्याच्या नावे गाजणे.

⇒ ज्याचे करावे बरे तो म्हणतो माझेच खरे
एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो.

⇒ ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी
जो आपल्यावर उपकार करतो त्या उपकारकर्त्याचे स्मरण करून गुणगान गावे.

⇒ झाकली मूठ सव्वा लाखाची
व्यंग नेहमी झाकून ठेवावे.

⇒ टाकीचे घाव सोसल्यावाचुन देवपण येत नाही
कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण येत नाही.

⇒ डोळ्यात केर आणि कानात फुंकर
रोग एका जागी व उपचार दुसऱ्या जागी.

⇒ ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही, पण गुण लागला
वाईट गुण मात्र लवकर लागतात म्हणजेच वाईट माणसांच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो.

⇒ ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा
वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.

⇒ तळे राखील तो पाणी चाखील
ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.

⇒ तरण्याचे कोळसे, म्हातार्‍याला बाळसे
अगदी उलट गुणधर्म दिसणे.

⇒ तट्टाला टूमणी, तेजीला इशारत
जी गोष्ट मूर्खाला शिक्षेने ही समजत नाही ती शहाण्याला मात्र फक्त इशाऱ्याने समजते.

⇒ ताकापुरते रामायण
एखाद्याकडून आपले काम होईपर्यंत त्याची खुशामत करणे.

⇒ तीन दगडात त्रिभुवन आठवते
संसार केल्यावरच खरे मर्म कळते.

⇒ तीथ आहे तर भट नाही, भट आहे तर तीथ नाही
चणे आहेत तर दात नाहीत, दात आहेत तर चणे नाहीत.

⇒ तुकारामबुवांची मेख
न सुटणारी गोष्ट

⇒ तू दळ माझे आणि मी दळण गावच्या पाटलाचे
आपले काम दुसऱ्याने करावे आपण मात्र लष्कराच्या भाकरी भाजाव्यात.

⇒ तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले
मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे.

⇒ तेरड्याचा रंग तीन दिवस
कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते.

⇒ तोंड दाबून बुक्क्यांचा मार
एखाद्याला विनाकारण शिक्षा करणे आणि त्याला त्याबद्दल तक्रार करण्याचा मार्ग मोकळा न ठेवणे.

⇒ तोबऱ्याला पुढे, लगामाला पाठीमागे
खायला पुढे कामाला मागे.

⇒ थेंबे थेंबे तळे साचे
दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.

⇒ थोरा घराचे श्वान सर्व ही देती मान
मोठ्या माणसांचा आश्रय हा प्रभावी ठरतो, असा आश्रय घेणाऱ्याला कारण नसताना मोठेपणा दिला जातो.

⇒ दगडापेक्षा वीट मऊ
मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरतो.

⇒ दस की लकडी एक्का बोजा
प्रत्येकाने थोडा हातभार लावल्यास सर्वांच्या सहकार्याने मोठे काम पूर्ण होते.

⇒ दहा गेले, पाच उरले
आयुष्य कमी उरणे.

⇒ दात कोरून पोट भरत नाही
मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून काही उपयोग होत नाही.

⇒ दाम करी काम, बिवी करी सलाम
पैसे खर्च केले की कोणतेही काम होते.

⇒ दाखविलं सोनं हसे मुल तान्हं
पैशाचा मोह प्रत्येकालाच असतो. पैशाची लालूच दाखविताच कामे पटकन होतात.

⇒ दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत
एक गोष्ट अनुकूल असली तरी तिच्या जोडीला आवश्यक ती गोष्ट अनुकूलन नसणे.

⇒ दिल चंगा तो कथौटी में गंगा
आपले अंतःकरण पवित्र असल्यास पवित्र गंगा आपल्याजवळ असते.

⇒ दिव्याखाली अंधार
मोठ्या माणसातदेखील दोष असतो.

⇒ दिल्ली तो बहुत दूर है
झालेल्या कामाचा मानाने खूप साध्य करावयाचे बाकी असणे.

⇒ दिवस बुडाला मजूर उडाला
रोजाने व मोलाने काम करणारा थोडेच स्वतःचं समजून काम करणार ? त्याची कामाची वेळ संपते ना संपते तोच तो निघून जाणार.

⇒ दुरून डोंगर साजरे
कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते; परंतु जवळ गेल्यावर तिचे खरे स्वरूप कळते.

⇒ दुभत्या गाईच्या लाथा गोड
ज्याच्या पासून काही लाभ होतो, त्याचा त्रासदेखील मनुष्य सहन करतो.

⇒ दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते; पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही
दुसऱ्याचा लहानसा दोष आपल्याला दिसतो; पण स्वार्थामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष जात नाही.

⇒ दुधाने तोंड भाजले, कि ताकपण फुंकून प्यावे लागते
एखाद्या बाबतीत अद्दल घडली, की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे.

⇒ देश तसा वेश
परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन.

⇒ देव तारी त्याला कोण मारी ?
देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

⇒ देखल्या देवा दंडवत
सहज दिसले म्हणून चौकशी करणे.

⇒ देणे कुसळांचे घेणे मुसळाचे
पैसे कमी आणि काम जास्त.

⇒ देवा दंडवत
एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे.

⇒ दैव देते आणि कर्म नेते
नशिबामुळे उत्कर्ष होतो; पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते.

⇒ दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी
नशिबात नसल्यास जवळ आलेली संधी सुद्धा दूर जाते.

⇒ दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला
नशिबाने मिळणे परंतु घेता न येणे

⇒ दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई
नशिबावर अवलंबून असणारे उपाशी राहतात तर उद्योगी पोटभर खातात.

⇒ दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी
दोन गोष्टीवर अवलंबून असणाऱ्या चे काम होत नाही.

⇒ दृष्टीआड सृष्टी
आपल्या मागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे.

⇒ धर्म करता कर्म उभे राहते
एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

⇒ धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी
कोणत्याच कामाचे नसणे.

⇒ धार्याला (मोरीला) बोळा व दरवाजा मोकळा
छोट्या गोष्टीची काळजी घेणे परंतु मोठी कडे दुर्लक्ष करणे.

⇒ धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या
गुंड व आडदांड लोकांचे काम होते तर गरिबांना यातायात करावी लागते.

⇒ नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने
दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एक सारख्या अनेक अडचणी येतात

⇒ नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये
नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.

⇒ न कर्त्याचा वार शनिवार
एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबबीवर ते टाळतो.

⇒ नऊ दिवस
कोणत्याही गोष्टीचा नवीन पणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्त्व नाहीसे होणे.

⇒ नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे
केलेला उपदेश निष्फळ ठरणे. पालथ्या घड्यावर पाणी ओतण्याचा प्रकार. उपदेशाचा शून्य परिणाम होणे.

⇒ नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे
एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे

⇒ नाकापेक्षा मोती जड
मालकापेक्षा नोकर शिरजोर असणे

⇒ नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा
नाव मोठे लक्षण खोटे.

⇒ हातघाई वर येणे
“उतावीळ होणे.”

⇒ हातात कंकण बांधणे
“प्रतिज्ञा करणे.”

⇒ हातपाय हलविणे
“काहीतरी प्रयत्न करणे.”

⇒ हातापाया पडणे
“विनवणी करणे”

⇒ हव्यास धरणे
“उत्कट इच्छा धरणे”

⇒ हुतात्मा होणे
“उच्च ध्येयायासाठी बलिदान करणे.”

⇒ हायसे वाटणे
“समाधान वाटणे.”

⇒ अंग टाकणे
“अगदी कृश होणे.”

⇒ अंग धरणे
“बाळसे धरणे.”

⇒ उरात धडकी भरणे
“अतिशय भीती वाटणे.”

⇒ उरी फुटणे
“मनाला सहन न होण्यासारखा धक्का बसणे.”

⇒ हात ओला करणे
“जेवायला घालणे”

⇒ हात पसरणे
“याचना करणे”

⇒ हात गगनाला पोहोचणे
“गर्व होणे.”

⇒ हात टाकणे
“मारणे”

⇒ हात मारणे
“ताव मारणे, फायदा करून घेणे.”

⇒ हात चालणे
“पैसा मिळणे”

⇒ हात देणे
” मदत करणे.”

⇒ हरभऱ्याच्या झाडावर चढविणे
“खोटी स्तुती करणे.”

⇒ हात आखडता घेणे
“देण्याचे प्रमाण कमी करणे.”

⇒ हातपाय गाळणे
“नाउमेद होणे.”

⇒ हाडे खिळखिळी करणे
“अतिशय त्रास देणे.”

⇒ सोक्षमोक्ष लावणे
“शेवट करणे.”

⇒ संगनमत करणे
“एकमेकांशी बेत ठरविणे”

⇒ हातावर तुरी देणे
“फसवून पळून जाणे”

⇒ हातावर शीर घेणे
“जीवावर उदार होणे”

⇒योगक्षेम चालविणे
“चरितार्थ चालविणे”

⇒ रक्ताचे पाणी करणे
“अतिशय श्रम करणे.”

⇒ रामराम ठोकणे
“कायमचा निरोप घेणे”

⇒ रामायण लावणे
“लांबड लावणे”

⇒ राम नसणे
“अर्थ नसणे”

⇒ रेवडी उडविणे
“फजिती करणे”

⇒ रंग दिसणे
“संभव असणे”

⇒ लाचार होणे
“निरुपाय होऊन शरण जाणे.”

⇒ लांडगेतोड करणे
“शत्रूवर तुटून पडणे.”

⇒ वाचनाला जागणे
“दिलेला शब्द पाळणे.”

⇒ वाण पडणे
“कमी पडणे.”

⇒ वाघाचे कातडे पांघरणे
“मुद्दाम ढोंग करणे.”

⇒ वेसन घालणे
“मर्यादा घालणे”

⇒ वेड लागणे
“नाद लागणे”

⇒ वेड घेऊन पेडगावास जाणे
“मुद्दाम ढोंग करणे.”

⇒ वनवास भोगणे
“हालअपेष्टा भोगणे”

⇒ वाटेला जाणे
“खोडी काढणे.”

⇒ विकोपास जाणे
“अतिरेक होणे, मर्यादेबाहेत जाणे.”

⇒ विधिनिषेध न बाळगणे
“कसलाच धरबंद नसणे.”

⇒ विरंगुळा मिळणे
“मन रमणे, समाधान वाटणे.”

⇒ शब्द खाली पडू न देणे
“मनाप्रमाणे वागणे.”

⇒ शंभर वर्षे भरणे
“नाशाची वेळ येणे.”

⇒ शिकस्त करणे
“खूप प्रयत्न करणे.”

⇒ शोभा होणे
“फजिती करणे.”

⇒ सही फिरणे
“प्रतिकूल वेळ येणे.”

⇒ सळो कि पळो करून सोडणे
“अतिशय त्रास देणे.”

⇒ सतीचे वाण घेणे
“अतिशय अवघड गोष्ट करण्याची जबाबदारी स्वीकारणे.”

⇒ साखर पेरणे
“गोड गोड बोलून आपलेसे करण्याचा प्रयत्न करणे.”

⇒ तोंडात साखर घालणे
“आनंदाने तोंड गोड करणे.”

⇒ सोन्याचा धूर निघणे
“खूप संपत्ती असणे.”

⇒ स्वर्ग दोन बोटे उरणे
“गर्व होणे.”

⇒ रसातळाला जाणे
“नाश होणे.”

⇒ राम नसणे
“अर्थ नसणे.”

⇒ माणसे जोडणे
“माणसे आपलीशी करणे.”

⇒ मानगुटीस बसणे
“अगदी पिच्छा पुरविणे.”

⇒ मागमूस नसणे
“ठावठिकाणा नसणे.”

⇒ मिंधे बनणे
“लाचार बनणे.”

⇒ मुभा असणे
“परवानगी असणे, मोकळीक असणे.”

⇒ मुसंडी मारणे
“एकदम धडक मारणे.”

⇒ मृत्युच्या दाढेत लोटणे
“मरण जवळ करणे.”

⇒ राम म्हणणे
“मरणे.”

⇒ मिशीला पीळ देणे
“बढाई मारणे.”

⇒ मुठीत ठेवणे
“ताब्यात ठेवणे.”

⇒ मूठमाती देणे
“शेवट करणे.”

⇒ मांजराच्या गळ्यात घंटा बांधणे
“अशक्य गोष्ट करू पाहणे.”

⇒ मिशांना तूप लावणे
“उगीच ऐट करणे.”

⇒ बाजार आटोपणे
“सर्वकाही संपणे.”

⇒ बाजारच्या भाकरी भाजणे
“दुसऱ्याच्या उठाठेवी करणे.”

⇒ बाहुलीप्रमाणे नाचविणे
“आपल्या तंत्राप्रमाणे वागविणे.”

⇒ भिडेला बळी पडणे
“आग्रहापुढे मान तुकाविणे.”

⇒ भिक घालणे
“जुमानणे.”

⇒ भिकेचे डोहाळे लागणे
“दारिद्रीपणाने वागणे.”

⇒ मन जाणे
“इच्छा होणे.”

⇒ मनात भरणे
“पसंत पडणे.”

⇒ मन खाणे
“मनाला टोचणी लागणे.”

⇒ मनातल्या मनात जळणे
“जळफळणे.”

⇒ मान ताठ ठेवणे
“अभिमानाने जगणे, बोलणे.”

⇒ मनात मांडे खाणे
“मनोराज्य करणे.”

⇒ मन घालणे
“लक्ष देणे.”

⇒ माती करणे
“नाश करणे.”

⇒ माशा मारीत बसणे
“कसातरी वेळ घालविणे.”

Marathi Mhani va Tyanche Arth

⇒ पाणी मुरणे
“भानगड असणे.”

⇒ पाणी दाखविणे
“कर्तबगारीची जाणीव करून देणे.”

⇒ कोणाचा पायपोस कोणाच्या पायात नसणे
“अंदाधुंदी असणे.”

⇒ तोंडाला पाणी सुटणे
“आशा उत्पन्न करणे.”

⇒ बोलाफुलाची गाठ पडणे
“सहजासहजी एकवेळ येणे.”

⇒ बोटे मोडणे
“चडफडणे.”

⇒ बारा वाजणे
“नाश करणे.”

⇒ बलिदान करणे
“प्राण अर्पण करणे.”

⇒ बिमोड करणे
“नायनाट करणे.”

⇒ बेभान होणे
“आवेश अनावर होणे.”

⇒ पोटात शूळ उठणे
“मत्सर वाटणे.”

⇒ पोट बांधणे
“उपाशी राहणे.”

⇒ पाठीमागे भुंगा लावणे
“एकसारखा त्रास देणे.”

⇒ पायरीला पाय लावणे
“दर्जा सोडून वागणे.”

⇒ पराचा कावळा करणे
“एखादी गोष्ट फुगवून सांगणे.”

⇒ दुवा देणे
“भले म्हणणे.”

⇒ दु:ख वेशीला टांगणे
“संकटे लोकांपुढे मांडणे.”

⇒ दगाबाजी करणे
“विश्वासघात करणे.”

⇒ दुधात साखर पडणे
“आनंदात आणखी आनंदाची भर पडणे.”

⇒ दात घशात उतरविणे
“पराभव करणे.”

⇒ दगडाखाली हात सापडणे
“अडचणीत येणे.”

⇒ दगडाला शेंदूर फासणे
“उगीचच एकाद्याला महत्व देणे.”

⇒ दु:खावर डागण्या देणे
“दु:खी माणसाला टोचून बोलणे.”

⇒ धूळ चारणे
“मान-भंग करणे.”

⇒ धुळीस मिळणे
“नाश होणे.”

⇒ धावे दणाणने
“फार भीती वाटणे.”

⇒ धाब्यावर बसविणे
“बाजूस सारणे.”

⇒ धूळ खात पडणे
“वाया जाणे.”

⇒ नाक उंच करून बोलणे
“अभिमानाने बोलणे.”

मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ

⇒ ताव मारणे
“भरपूर खाणे.”

⇒ तोंड सोडणे
“वाटेल तसे बोलणे, उपशब्द बोलणे.”

⇒ तोंड वासून पाहणे
“आश्चर्याने पाहणे.”

⇒ तोंडाला कुलूप लावणे
“गप्प बसणे.”

⇒ तोंडचे पाणी पळणे
“खूप भीती वाटणे.”

⇒ तोंडात मारून घेणे
“पश्चाताप होणे.”

⇒ तोंड काळे करणे
“निघून जाणे.”

⇒ तोंडत शेण घालणे
“समाजात छी: थू होणे.”

⇒ तोफेच्या तोंडी देणे
“संकटात लोटणे.”

⇒ तोंडघशी पाडणे
“विश्वासघात करणे.”

⇒ तुपाच्या आशेने उष्ट खाणे
“फायद्यासाठी अपमान सहन करणे.”

⇒ तंबी देणे
“धाक घालणे.”

⇒ थंड फराळ करणे
“उपाशी राहणे.”

⇒ थैमान घालणे
“धिंगाणा घालणे.”

⇒ दात पाडणे
“फजिती करणे.”

⇒ टाळूवरून हात फिरवणे
“पूर्ण वाटोळे करणे.”

⇒ टाळूवरचे लोणी खाणे
“खरा फायदा उपटणे.”

⇒ टक्केटोणपे खाणे
“चांगल्या वाईट अनुभवांनी शहाणे होणे.”

⇒ टेंभा मिरविणे
“बडेजाव दाखविणे.”

⇒ टिवल्याबावल्या करणे
“कसातरी वेळ घालविणे.”

⇒ ठाण मांडणे
“निर्धार करणे.”

⇒ डोके खाजाविणे
“युक्ती शोधणे.”

⇒ डोके देणे
“धीराने तोंड देणे.”

⇒ डोके भडकणे
“संतापणे.”

⇒ डोक्यावर बसणे
“फाजील मान देणे.”

⇒ डोक्यात भरविणे
“भरीस घालणे.”

⇒ डोळ्यावर धूर येणे
“सत्तेचा अगर संपत्तीचा गर्व होणे.”

⇒ डोळे उघडणे
“पश्चाताप होणे.”

Famous Marathi Proverbs In Marathi

⇒कोंबडे झुंजवणे
“भांडण लावून मजा पाहणे.”

⇒काळजाचे पाणी होणे
“अतिशय घाबरणे.”

⇒कोंड्याचा मांडा करणे
“आहे त्यातून चांगले निर्माण करणे.”

⇒खस्ता खाणे
“कष्ट करावे लागणे.”

⇒खडे फोडणे
“व्यर्थ दोष देणे.”

⇒खापर फोडणे
“दोष देणे.”

⇒खनपटीस बसणे
“एखाद्या गोष्टीच्या मागे सारखे लागणे.”

⇒खाल्ल्या घराचे वासे मोजणे
“एखाद्याने केलेले उपकार न स्मरणे.”

⇒खिसा गरम करणे
“पैसा मिळवणे.”

⇒गय करणे
“अपराध्यास सोडून देणे, क्षमा करणे.”

⇒गळ घालणे
“आग्रह धरणे.”

⇒गयावया करणे
“काकळूतीस येणे.”

⇒गहजब करणे
“फार बोभाटा करणे.”

⇒गळ्यातला ताईत होणे
“अत्यंत प्रिय होणे.”

⇒ग्रहण सुटणे
“काळजी नाहीसी होणे.”

⇒गाढवाचा नांगर फिरवणे
“पूर्ण वाटोळे करणे.”

⇒गंगेत घोडे न्हाणे
“काम तडीस जाणे.”

⇒गाई पाण्यावर येणे
“रडायला येणे.”

⇒घर बसणे
“एखाद्या कुटुंबाचा पूर्ण नाश होणे.”

⇒घरावर तुळशीपत्र ठेवणे
“घराची आशा सोडणे.”

⇒गुजराण करणे
“कसेतरी पोट भरणे.”

⇒घर धुवून नेणे
“घरातील बहुतेक वस्तू नेणे.”

⇒घोडे मारणे
“आगळीक करणे.”

⇒घोडा मैदान जवळ येणे
“कसोटीची वेळ जवळ येणे.”

⇒चटका बसणे
“दु:ख होणे.”

⇒चकार शब्द न काढणे
“काहीही न बोलणे.”

⇒चटणी होणे
“नाश होणे.”

⇒चीज करणे
“सार्थक करणे.”

⇒चौदावे रत्न दाखविणे
“खूप मार देणे.”

⇒छक्केपंजे करणे
“हातचलाखीने फसवणे.”

⇒छाती फाटणे
“भयंकर घाबरणे.”

⇒जीवनयात्रा संपणे
“मृत्यू पावणे.”

⇒जीव मेटाकुटीस येणे
“फार त्रास होणे.

⇒जीव टांगणे
“काळजीत पडणे.”

⇒जिवाचे रान करणे
“खूप कष्ट करणे.”

⇒जीभ चावणे
“चापापणे.”

⇒जिवाची मुंबई करणे
“चैन करणे.”

⇒जीव भांड्यात पडणे
“काळजीतून मुक्त होणे.”

⇒जिभेला हाड नसणे
“वाटेल तसे बोलणे.”

⇒जीव लावले
“लळा लावणे.”

⇒जेरीस आणणे
“शरण यायला भाग पाडणे.”

⇒झाडा देणे
“परिणाम भोगणे.”

⇒झुंबड उठणे
“गर्दी होणे.”

⇒ पायाशी लोटांगण घालणे
“शरण येणे.”

⇒ पादाक्रांत करणे
“जिंकणे.”

⇒ पोटाशी धरणे
“ममतेने वागविणे.”

⇒ मन मोठे करणे
“उदारपणा दाखविणे.”

⇒ मन विरघळणे
“दया उत्पन्न होणे.”

⇒ मन मोडणे
“मनाविरुद्ध वागणे “

⇒ मान टाकणे
“निर्बल होणे.”

⇒ मान तुकवणे
“ऐकणे.”

⇒ प्राण कंठाशी येणे
“जीव कासावीस होणे.”

⇒ प्राण पणाला लावणे
“जीवावर उदार होणे, मृत्यूची परवा न करणे.”

⇒ हाडाला खिलणे
“पक्का होणे.”

⇒ तोंड दाखवणे
” भेटणे, समोर येणे.”

⇒ तोंड लागणे
“सुरवात होणे.”

⇒ तोंडपाटीलकी करणे
“काहीही कृती न करता नुसती बडबड करणे.”

⇒ दातओठ खाणे
“अतिशय संतापणे”

⇒ दातखिळी बसणे
“गप्प बसणे, निरुत्तर होणे.”

⇒ दात विचाकणे
” याचना करणे.”

⇒ नजरेत भरणे
“आवडणे”

⇒ देह कारणी लावणे
“चांगल्या कामासाठी देह झिजवणे.”

⇒ देहभान हरपणे
“स्वतः ला विसरून जाणे “

⇒ नाक खाली ठेवणे
“गर्व नाहीसा होणे.”

⇒ नाक ठेचणे
“खोड मोडणे.”

⇒ पाठीस लागणे
“एकसारखा पिच्छा पुरवणे.”

⇒ पाय काढणे
“निसटणे”

⇒ पायांनी चालत येणे
“विनाकष्ट प्राप्त होणे”

⇒ काळजाने ठाव सोडणे
” धीर खचणे.”

⇒ गळ्याला तात लावणे
“फार मोठ्या संकटात लोटणे.”

⇒ गळा मोकळा करणे
“संकटातून मोकळे करणे.”

⇒ गळी उतरणे
“मनावर बिंबणे “

⇒ छातीचा कोट करणे
“धैर्याने तोंड देणे. “

⇒ जीभ चाटणे
“आशाळभूतपणे पाहणे.”

⇒ जिभेवर असणे
“पूर्णपणे माहित असणे.”

⇒ जीव लावणे
“माया लावणे.”

⇒ जीवावर बेताने
“जीव धोक्यात येणे.”

⇒ जीवाची तमा न करणे
“प्राणाची परवा न करणे.”

जर का तुम्हाला Marathi Mhani Collection pdf मध्ये download करायचे असेल तर त्या साठी लिंक खाली दिलेली आहे.

Click Here to Download Marathi Mhani Pdf

तर मग मित्रांनो तुम्हाला या Marathi mhani with Meaning पोस्ट मधील म्हणी कशा वाटल्या, कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला या Marathi Mhani तुमच्या मित्रांसोबत शेअर करायच्या असतील तर खाली दिलेल्या Facebook तसेच Whatsapp बटनावर क्लिक करून शेअर करू शकता.

जर एखादी म्हण चुकली असेल किव्हा तुम्हाला अजून Marathi Mhani या पोस्ट मध्ये जोडायच्या असतील तर तुम्ही आमच्या अधिकारीक ई-मेल [email protected] या ई-मेल वर पाठवू शकता आम्ही तुम्ही नमूद केलेल्या New Marathi Mhani आमच्या वेबसाईटच्या मार्गे हजारो लोकांपर्यंत पोचवू.

हे देखील वाचा

MPSC Previous Year Question Paper in Marathi

Best Marathi Ukhane for Female

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi mhani with meaning 2024”

  1. एवढया साऱ्या म्हणी ज्यात बऱ्याच प्रथमच वाचल्या ,ज्या की एखद्य म्हणीच्या पुस्तकात देखील वाचल्या नाही त्या इथे एकत्र वाचायला मिळाल्या त्याबद्दल तुमचे खूप आभार

    Reply

Leave a Comment