बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane | Ukhane in Marathi | Ukhane for Girls & Boys
Best Marathi Ukhane list: आपल्याकडे लग्नात किव्हा एखाद्या सणासुदीला उखाणा घेणे कि खूप सामान्य बाब झाली आहे. आणि जर का तुम्ही नवविवाहित असाल तर मग उखाणा घेतल्या शिवाय तुमचे नातेवाईक तुमची वाट सोडणारच नाही. म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत Marathi Ukhane List, या लिस्ट मध्ये आम्ही डोहाळे जेवणाच्या उखाण्यांपासून नवीन आणि मॉडर्न उखाण्यांपर्यंत सगळ्या प्रकारचे उखाणे दिलेले आहेत. तुमच्या सोयीनुसार यातील एक तरी उखाणा नक्की लक्षात ठेवा.
Marathi Ukhane (मराठी उखाणे) is a very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage traditions i.e. ‘Ukhane’ takes place in All part of Maharashtra. In this tradition bride or Groom introduces her Spouse by taking his/her name in some poetic Marathi language. If you have any other unique “Best Marathi Ukhane”, please submit to us with via the Comment Section. We would like to share those best ukhane in our upcoming videos with your name. Here we have collected all types of Marathi ukhane list at one place.
Marathi Ukhane For Female 2024
सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी
रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास,
——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात
हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत
—— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत
एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली,
—— रावांची सारी माणसे मी आपली मानली
सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण,
—— रावांचे नाव घेते —— ची सून
काढ्यात काढा पाटणकर काढा,
—— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा
अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना
सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
नवरीचे उखाणे
देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश
—– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश
अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती
झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची,
—– राव सुखी रावो हीच आस मनाची
सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
—— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात
जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
—— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद
शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता,
—— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता
Naming ceremony in Marathi | बाळाचे बारसे
Marathi Ukhane for Male
जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजुक फुले,
…. नी दिली मला दोन गोड मुले.
झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ………. – ………. ची जोडी.
तडजोड हा मंत्र आहे दोन पिढ्यांना जोडणारा पूल
…ना आवडते गावठी गुलाबाचे फुल.
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल
…………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग
सुखी आहे संसारात सौ ….. च्या संग !!!!!
दासांचा दासबोध आहे अनुभवाचा साठा
….चे नाव घेतो तुमचा मान मोठा !!!!!
Ukhane in Marathi for Boy
दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
…… चे नाव घेतो ….. रावान् चा पठ्ठा.
दुर्वाची जुडी वाहतो गजाननाला
सौ…..सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला !!!!!
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
देवळाला खरी शोभा कळसा ने येते
….. मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
देवा जवळ करतो मी दत्ताची आरती
…. माझ्या जीवनाची साराथी
देवाच्या देव्हाऱ्यात फुलांना प्रथम स्थान
सौ…..ने दिला मला पतिराजांचा मान !!!!!
देवाला भक्त करतो मनोभावे वंदन
…. मुळे झाले संसाराचे नंदन.
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती
माझी आणि सौ…..ची अखंड राहो प्रीती !!!!!
⇒ हा दिवस आहे आमच्या करिता खास,
…..ला देतो गुलाब जामुन चा घास.
Modern Ukhane In Marathi | आधुनिक उखाणे
इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा…
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा
बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला…
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?
तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल…
__ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!
रोज ___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…
मग उखाणा घेताना ___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?
Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले
सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
___आहे, माझ्या Life चा Server
उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग …
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग
माझं नाव घेताना __करते Blush…
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush
दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते…
__च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते
बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून
आजघर माजघर, माजघराला नाही दार
——– रावांच्या घराला मात्र विंडोज 10
डोहाळे-जेवणाच्या प्रसंगी घ्यायचे उखाणे | Dohale Jevan Ukhane in Marathi
⇒ मावळला सूर्य, चंद्र उगवला आकाशी;
——— रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.
⇒ माझ्या सासर – माहेरची , लोकं सारी हौशी;
———- रावां चं नाव घेते डोहाळाच्या दिवशी.
⇒ हिमालयावर पडतो बर्फाचा पाऊस;
———- रावांचे नाव घेते सासरच्यांनी केली हौस
⇒ मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल;
———- रावां चं नाव घेते आता जड झाले पाउल.
⇒ मायेच्या माहेरी डोहाळे-जेवणाचा घाट,
———- रावां चे नाव घेते, केला थाटमाट
⇒ आई-वडील प्रेमळ, तसे सासू-सासरे;
———- रावां चं नाव घ्यायला डोहाळे जेवणाचं कारण पुरे.
⇒ तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले;
———- रावां चं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.
⇒ घाट घातला तुम्ही पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे ;
———- रावांच्या प्रेम झुल्यावर घेते मी हिंदोळे
⇒ पहाटे वेलीवर फुलतात फुले गोमटी;
——– रावांचे नाव घेते भरली माझी ओटी.
⇒ वसंत ऋतूच्या आगमनाने धरती ल्याली माझी ओटी;
——– रावांचं नाव घेते डोहाळे जेवण आहे आज.
⇒ कुबेराच्या भांडारात हिरे-माणिकांच्या राशी;
——– रावांनी आणला शालू डोहाळे जेवणाच्या दिवशी.
⇒ फुटता तांबड पूर्वेला, कानी येते भूपाळी;
——– रावांचे नाव घेते डोहाळे जेवणाच्या वेळी.
Funny Ukhane In Marathi | नवरीचे विनोदी उखाणे
निळे निळे डोंगर हिरवे हिरवे रान,
गणपतरावांचा आवडता छंद म्हणजे सतत मदिरापान
शिडीवर शिडी बत्तीस शिडी
गणपत राव ओढतात विडी न मी लावते काडी
कालच पिक्चर पाहिला त्याचे नाव सायको,
मनोहरपंतांचे नाव घेते गणपतरावांची बायको
शिसवाचा पलंग, मखमलीची गादी अन मऊ मऊ उशी,
मी गेले ——– रावांपाशी तर राव म्हणतात आज एकादशी
यमुनेच्या तीरावर, कृष्ण वाजवितो मुरली…
__ आल्यापासून, सॅलरी कधी नाही पुरली
लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
… तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?
कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त…
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त
उखाणा घेते मी, खूपच Easy …
___राव असतात नेहमी, कामामध्ये Busy
ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस…
__तू मला, सुपरवूमन वाटतेस
माझ्या Life मध्ये, __भेटली Luckily…
कोणी काही बोलले तर, करते माझी वकिली
बिर्याणी हवी सारखी, नको वरण भात…
__च्या हॉटेल प्रेमाने, पोटाची लागलीये वाट
मुरेल तितका होतो Tasty, प्रेमाचा मुरांबा…
___ चिडते तेव्हा भासते, ditto जगदंबा
कॅन्टीन, हॉटेलला ठोकला मी राम राम…
__च्या हातचं जेवण, आवडते मला जाम
उन्हाळ्यात हवा, गार गार ऊसाचा रस…
__चाच विचार, माझ्या मनी रात्रंदिवस
पाहताच___ला, जीव झाला येडापीसा…
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा
Marathi Chavat Ukhane | मराठी चावट उखाणे 2024
***रांवाची थोरवी मी सांगत नाही
कितीही प्याले रिचवले तरीही ते कधीही झिंगत नाहीत !!
सचिन च्या बॅटला करते नमस्कार वाकून
***** रांवाचे नाव घेते पाच गडी राखून!!
पावाबरोबर खाल्ले अमुल बटर…
***चे नाव घ्यायला कुठे अडलय माझ खेटर
चांदिच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्नच नाही झाले तर नाव कसे घेऊ
अंगणात पेरले पोतेभर गहू
लिस्ट आहे खुप मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
आंब्यात आंबा हापुस आंबा अन,
आमची **** म्हणजे जगदंबा
साखरेचे पोते सुई ने ऊसवले,
**** ने मला पावडर लाऊन फसवले
चांदिच्या परातीत केशराचे पेढे
आमचे हे सोडुन बाकी सगळे वेडे.
नाही नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चूका,
***** चे नाव घेतो, द्या सगळयाजणी एक एक मुका.
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
टेनिसच्या मैदानात आहे माझा FOUR HAND
शोएबच नाव घेते , नवरा माझा SECOND HAND.
यशोमती मैया से बोले नंदलाला
*** च नाव घेतो ,लाईफ झिंगालाला
___सोहळ्याला सर्वजण झाले, आनंदाने जॉईन….
___माझा हीरो, नी मी त्याची हिरॉईन
गाडीत गाडी डेक्कन क्वीन…
___आहे, सेल्फी क्वीन
Ghas Bharavatanache Ukhane In Marathi | घास भरवितानाचे उखाणे 2024
भरल्या पंक्तीत उदबत्तीचा वास,
—- रावांना भरविते जलेबीचा घास
दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
—– रावांना भरविते मी —– चा घास
उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ,
—– तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ
जाई – जुईच्या फुलांचा मधुर सुटतो वास,
—–रावांना देते मी —– चा घास
भाद्रपद महिन्यात गणपती बसवितात शाडूचा,
—– ला घास भरविते लाडूचा
कृष्ण कन्हैयाला लागला राधेचा ध्यास,
—– रावांना भरविते मी —- चा घास
भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्रांची,
—– रावांना घास देते, पंगत बसली मित्रांची
अभिमान नाही संपतीचा, गर्व नाही रूपाचा,
—– रावांना घास भरविते वरण, भात, तुपाचा
अंबाबाईच्या देवळात बिरवली आरसा,
—- रावांना खाऊ खालते अनारसा
कृष्णाच्या बारीला राधेचा ध्यास,
—- रावांना भरविते मी —- घास
सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
—- रावांना भरविते मी —— चा घास
महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
—- रावांना भरविते मी —— चा घास
सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून —- रावांना भरविते —— चा घास
Lagnasathiche Navin Ukhane In Marathi | लग्नासाठीचे नवीन व सोपे उखाणे
एक होती चिऊ एक होती काऊ,
……..रावांचे नाम घेते काय काय खाऊ
शिडीवर शिडी बत्तीस शिडी,
……..राव ओढतात विडी अन मी लावते काडी
तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……..रावांशी केले लग्न, आता आयुष्याची वाट
विडाच्या पानात पावशेर कात,
……..रावांच्या कमरेत घातली गाढवाने लात
चांदीच्या ताटात ठेवले होते गहू,
लग्न झालेच नाही तर नाव कशे घेऊ
साठ्यांची बिस्किटे ,बेदेकारंचा मसाला,
……..नाव घ्यायला आग्रह कशाला
हाताने कराव काम मुखाने म्हणावे राम,
……..रावांचे चरण हेच माझे चारधाम
सागवानी पेटीला सोन्याची चूक,
……..रावांच्या हातात कायद्याचे बुक
चांदीचा पात सोन्याचे ठसे,
……..राव बसले आंघोळीला सोन्यावाणी दिसे
Ukhane for festivals In Marathi | सणांचे पारंपारिक उखाणे
नववर्षाच्या शुभारंभ करिता येतो पाडवा ;
_____ रावांच्या सहवासात लाभो सदैव गोडवा
श्रावणाच्या हिरव्या साजाने सृष्टी आहे सजली;
_______ रावांच्या सुखासाठी मंगळागौर मी पुजली
श्रावण सरला, वाजत गाजत गणपती आले दारात
_______ रावांचे नाव घेऊन आणते गौरी घरात
तीलगुळाच्या देवघेवीनं दृढ प्रेमाचं जुळतं नातं;
_______ रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत
रूप गुण संपदेच्या जोडीला हवं चारित्र्य ;
______ रावांच्या नावात आहे पावित्र्य
स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी ;
______ रावांचे नाव घेते गौरी पूजनाच्या वेळी
कुबेराच्या भंडारात हिरे- मानकांच्या राशी
_______ रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी
चंद्र मराठीत, चाँद हिंदीत , इंग्रजीत म्हणतात मून
——– रावांचे नाव घेते मी _______ सून
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
_______ रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
महाविष्णूच्या मस्तकावर डोलत असतो शेष
_______ रावांचे नाव घेऊन करते मी गृहप्रवेश
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ;
______ रावांची आई जशी माझी दुसरी माउली
इंग्रजी भाषेत पाण्याला म्हणतात वॉटर
______ रावांचे नाव घेते, आहेत ते डॉक्टर
घातली मी वरमाळा, _______ रावांच्या गळी
थरथरला माझा हात; चढली लज्जेची लाली
Marathi Ukhane for Female | Griha pravesh Ukhane
⇒ सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,
…… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
⇒ रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट
⇒ हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात
⇒ लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…
….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल
⇒ जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज…
….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज
⇒ माहेरी साठवले, मायेचे मोती…
….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती
⇒ ….. ची लेक झाली, ….. ची सून…
….. च नाव घेते, गृहप्रवेश करून !
⇒ नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात
⇒ नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…
….. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.
⇒ हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
……….रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी
Funny Marathi Ukhane Vinodi Ukhane | Comedy Ukhane in Marathi
खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका
कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी
गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका
सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी
पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.
Best Marathi Ukhane for Female | छान छान मराठी उखाणे
दही, दूध, तूप आणि लोणी…
…….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी
मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण,
शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण
पण हळुच सांगते कानात,
…….. राव आहेत माझे जीव की प्राण.
सोन्याच्या ताटात खडीसाखरेची वाटी,
…….. रावांचा नाव घेते सात जन्मासाठी
आभाळ भरले चांदण्यांनी, चंद्र मात्र एक
…….. रावांचे नाव घेते …….. ची लेक
पाच वर्षांचा संसार पण प्रत्येक दिवस गोड,
तिन्ही सांजेला मनाला लागे …….. रावांची ओढ.
एका वर्षात महिने असतात बारा,
…….. रावांच्या नावातच सामावलं आहे आनंद माझा सारा.
बसली होती दारात, नजर गेली आकाशात ……..
…….. रावांचा फोटो माझ्या भारताच्या नकाशात
रिम झिम झरती श्रावण धारा धरतीच्या कलशात
…….. रावांचे नाव घेते राहू द्या लक्षात.
प्रसंगानुरूप येते परमेश्वराची आठवण
…….. रावांच्या हृदयात अमृताची साठवण
तुळशीची करते पूजा, शंकराची करते आराधना
…….. रावांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वराला प्राथर्ना.
मंगल दिनी मंगल कार्याला आंब्याच्या पानांचा बांधतात तोरण
…….. रावांचे नाव घायला …….. च कारण
तांब्याच्या पळीवर नागाची खून,
…….. रावांचा नाव घेते…….. ची सून.
आई वडीलांच्या वियोगाचे दुःख ठेवून मनात..
हसतमुखाने प्रवेश केला मी …….. रावांच्या जीवनात.
नीलवरणी आकाशात शोभते चंद्राची कोर
…….. राव सारखे पती मिळाला भाग्य लागतं थोर.
बकुळीची फुले सुकली तरी हरवत नाही गंध ……..
…….. रावासाठी माहेर सोडले तरी राहतील मनात स्म्रुतिबंध
पेटी वाजे तबला वाजे मंजुळ वाजे बासरी
…….. रावांच्या सप्तसुरांना साथ मिळाली हसरी
तिरंगी झेंड्यावर अशोकचक्राची खूण,
…….. नाव घेते …….. ची सून
बागेत फूल गुलाबाचे
माझ्या मनात नाव …….. रावांचे .
दिन दुबळ्याचे गहाणे परमेश्वराने ऐकावे
…….. रावानं सारखे पती मिळाले आणखी काय मागावे
एक दिवस अचानक आला एक घोडेस्वार
श्वेत रंगी घोड्यावर …….. रावच होते ते जादूगार
सुंदर माझे घर त्यात …….. रावांचा मधुर स्वर
दोघे मिळून फुलवतोय संसाराचा भरभरुन बहर.
सत्यावनासाठी सवित्रिने यमाचा पुरविला पिच्छा,
सात जन्म …….. राव माझे पति राहो हीच माझी इच्छा.
खाण तशी माती …….. राव माझे पती
आणि मी त्यांची सौभाग्यवती
सागरात सरिता जीवनात ज्योती
…….. राव माझे पती मी त्यांची सौभाग्यवती
लहान मुले असतात खुप गोजिरवाणी,
…….. राव माझे संग्राम अन मि त्यांची देवयानी
गुलाबाचे फुल मधोमध असते पिवळे,
…….. राव दिसतात कृष्णा सारखे सावळे
येत होती जात होती, घडाळ्यात पाहत होती,
घडाळ्यात वाजले एक …….. रावांचे नाव घेते …….. ची लेक.
आपुलकी असेल तर जीवन सुदंर
संदेशाची आवड असेल तर मोबाइल सुंदर
फुले असेल तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल तर चेहरा सुंदर
…….. रावांनबरोबर च सगळी नाती मनापासुन जपते म्हणुन सासर सुंदर
लेक लाडकी कुणाची, आईबापाची
सुन कुणाची, सासू सासरे ची
राणी कुणाची …….. रावांची
साजुक तुपाच्या करते पुरया, टाकते पाट करते ताट
…….. राव बसले जेवायला समया लावते तिनशे साठ
Jeshth Nagrik Marathi Ukhane | जुन्या पिढीचे खास उखाणे
प्रेमाच्या टॉनिकने होई, तब्येत लगेच बरी
__ मुळे कळली मला, जगण्याची जिद्द खरी
बघता बघता __ सोबत 50 वर्षे लोटली
रोज बघतो स्वप्नात, सकाळी __भेटली
हसत खेळत संसाराची, वर्षे सहज लोटणार
__सोबत मी वयाची, शंभरी गाठणार
म्हातारपणी काठी बनली, माझी साथीदार
__मुळे मिळाला माझ्या, जीवनाला आधार
__ च्या गोळ्या घेऊन, तोंड होते कडू
__इतकी गोड जणू, मऊ बेसनाचा लाडू
वय झालं, टक्कल पडलं, पोटही सुटलं
__वरचं प्रेम, तरी अजिबात नाही आटलं
औषधं आपली सुरूच असतात, दिवाळी असो वा होळी
__रावांना भरवते प्रेमाने, __ची गोळी
माझ्या सुंदर हास्यामागे __चाच हात
__चा लाडू खाता खाता, तुटला की हो दात
__मुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरु
हसत खेळत आम्ही आता __टूर करू
आजोबा झालो तरी, मी अजूनही हिरो दिसतो
तुमच्या आजीकडे प्रेमाने, एक टक बघत बसतो
केस झाले पांढरे, तरी मिशी अजून काळी
माझ्या संसारवेलीचे __राव माळी
थोडं चाललं तरी, दुखतात गुढग्याच्या वाट्या
__मुळे तरलो आजवर, झेलीत सुख दुःखाच्या लाटा
झाले आता वय, जवळ आली साठी
शंभरी नक्की गाठेन, __चे प्रेम असता पाठी
Marathi Ukhane For Haladikunku and Mangalagaur | हळदीकुंकू व मंगळागौर साठीचे उखाणे
अथांग वाहे सागर संथ चालते होडी
परमेश्वर सुखी ठेवो …..नी माझी जोडी
मंगळागौरी आशिर्वाद दे..येऊ दे भाग्या भरती,
….च्या उत्कर्षाची कमान राहू दे चढती..!
एमेघ मल्हार रंगताच श्रावणसर कोसळते,
….. नावाने मंगळागौर सजवते.
निलवर्ण आकाशात चमकतो शशी
….नाव घेते मंगळागौरी पूजनाच्या दिवशी.
सासर आहे छान, सासू आहे होशी,
…. चे नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी
सौभाग्यवतीचे अलंकार म्हणजे काचेचे चुडे,
….. रावांचे नाव घेते मंगळागौरी पुढे
हिरव्या हिरव्या रानात चरत होते रानात ,
—– रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच कारण !
Sasu Suneche Best Marathi Ukhane | सासू सुनेचे खास उखाणे
यमुनेच्या डोहात पडे ताजमहालाची सावली ,
—– रावांची आई जशी माझी दुसरी आई
चंद्र मराठीत , चांद हिंदीत ,आणि इंग्रजीत म्हणतात मून
—– रावांचे नाव घेते मी माझ्या सासूबाईंची लाडकी सून
बहिणीसारख्या नणंदा , भावासारखे दीर ,
—- रावांचे नाव घ्यायला मन माझे अधीर
सासूबाई माझ्या प्रेमळ,सासरे माझे दयाळू
— राव तर आहेत अतिशय दयाळू
सासूबाई आहेत प्रेमळ , जाऊबाई आहेत हौशी
—- रावांचे नाव घेताना होते मला ख़ुशी
कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल
—— रावांचं नावं घेते, सांगा बरे प्रिन्स दादानं आर्ची आन परश्याला का मारलं ?
चांदीच्या ताटात गाजराचा हलवा
….. रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा.
चांदीचे जोडवे पतीची खूण,
…. रावांचे नाव घेते …. ची सून
Best Marathi Ukhane For Pooja | पूजेसाठीचे काही खास मराठी उखाणे
हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
__च्या दिवशी, दारावर बांधले तोरण
__रावांचे नाव घ्यायला, कशाला हवे कारण?
उगवला सूर्य, मावळला शशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
__ची आरास, सर्वांना पडली पसंत
__रावांमुळे फुलला, जीवनी वसंत
__च्या दिवशी दरवळे, वाळ्याचे अत्तर
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमीच तत्पर
__पुढे मांडले, प्रसादाचे ताट
__मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट
__पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी
__रावांचे नाव घेते, __ च्या दिवशी
_च्या समोर, ठेवले केशरी पेढे
__रावांचे नाव घ्यायला, कसले हो आढे-वेढे
__च्या पुढे, फुलांचे सडे
__रावांचे नाव घ्यायला, मी नेहमी पुढे!
__पुढे लावली, समईची जोडी
__ मुळे आली, आयुष्याला गोडी
__ची पूजा, मनोभावे करते
__रावांसाठी, दीर्घायुष्य मागते
__समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी
__ रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
आला आला __चा, सण हा मोठा
__राव असताना, नाही आनंदाला तोटा
मोत्यांची माळ, सोन्याचा साज
__ रावांचे नाव घेते, __ आहे आज
सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी
__रावांचे नाव घेते, __च्या दिवशी
इज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
….. चे नाव घेते …. च्या दिवशी
दत्तदिगंबराला औदुंबराची सावली, पूजेच्या दिवशी नाव घेते,
……. रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.
आईवडील आहेत प्रेमळ, सासूसासरे आहेत हौशी,
…. चं नाव घेते बारशाच्या दिवशी
New Marathi Ukhane For Bride | Navarisathiche Latest Marathi Ukhane
बारीक मणी घरभर पसरले,
…… साठी माहेर विसरले
लवर्षाऋृतूत वरूणराजाने केली बरसात,
….. चे नाव घेण्यास केली मी सुरूवात.
गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
…….. रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी.
यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब
—– चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब
कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून,
…. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून
नव्या नव्या शालुचा पदर सांभाळताना मन माझे भांबावते
….. च्या साथीने नव जीवनाचे स्वप्न मी रंगवते
शेल्या शेल्याची बांधली गाठ,
…….नाव मला तोंडपाठ.
हातावरची मेंदी देते आयुष्याला अर्थ नवा,
…. रावांना घास घालायला वेळ कशाला हवा..!
सप्तस्वरांची उधळण गायकाच्या सुरेल गाण्यात..सप्तरंगाची पखरण..चित्रकाराच्या कुशल कुंचल्यात..
सात जन्माची सुरवात सप्तपदीच्या सातपावलात .. रावांची पत्नी म्हणून धन्य झाले जगात..!
लग्नाचे बंधन घातले मंगळसूत्र,
……….चे नाव घेऊन आयुष्याचे सुरु झाले नवे सत्र.
चांदीच्या ताटाभोवती रांगोळी काढली मोरांची,
—– रावांच नाव ऐकायला गर्दी जमली मैत्रिणींची / पाहुण्यांची.
वाट जीवनाची झाली सुखद आनंदी
…. च्या सवे चालते मी सप्तपदी… !!
कराडला आहे कृष्णा कोयनेचा घाट
…. नाव घेते बांधते……… च्या लग्नाची गाठ.
नाव घ्या नाव घ्या म्हणता, नाव तरी काय घ्यायचे,
…….रावांना शेवटी अहोच म्हणायचे.
सासरी आले तरी माहेरचे विसरता येत नाही अंगण,
………. रावांचे नाव घेते सोडते मी कंकण.
हळद असते पिवळी, कुंकू असते लाल,
…. रावांची मिळाली साथ झाले जीवन खूशहाल.
गावठी गुलाबाला सुगंध सुवास,
…. रावांना भरवते श्रीखंडपुरीचा घास.
मोह नसावा पैश्याचा, गर्व नसावा रूपाचा,
…. बरोबर संसार करीन सुखाचा.
वय झाले लग्नाचे लागली प्रेमाची चाहूल,
…. रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
तर मग मित्र आणि मैत्रिणींनो कसे वाटले मग Best Marathi Ukhane list च्या लेखात दिलेले उखाणे. कंमेंट मध्ये नक्की च सांगा. आणि जर तुमचे लग्न ठरले असेल तर आतापासूनच उखाणे पाठ करायला सुरवात करा. कारण लग्न असो कि पूजा घरातील लोक उखाण्यांशिवाय आपल्याला पुढे जाऊच देणार नाही.
अजून उखाणे बघा
Modern Marathi ukhane for female
Marathi Ukhane For Naming Ceremony
1 thought on “250+ बेस्ट मराठी उखाणे | Best Marathi Ukhane list | Ukhane in Marathi 2024”