Affiliate Marketing मधून पैसे कसे कमवतात? | What is Affiliate Marketing in Marathi

Affiliate Marketing काय आहे आणि त्यातून पैसे कसे कमवतात? | What is Affiliate Marketing in Marathi

What is Affiliate Marketing in Marathi: Affiliate Marketing कसे काम करते आणि यातून पैसे कसे कमवतात याविषयी तुमच्या मनात खूप सारे doubt असतील. आज आम्ही याविषयी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहोत. आजचे युग हे computer, internet आणि online shopping / marketing चे आहे.

Online Shopping चा सध्या ट्रेंड सुरू आहे. हे सध्या अधिकाधिक प्रसिद्धीला येत असल्याने लोक आता ऑनलाइन व्यापार करण्यावर जोर देत आहेत. त्यामुळे लोक आता स्वतः e-commerce site आणि blogs बनवून पैसे कमवत आहेत.

जे लोक भरपूर वेळेपासून online business करत आहेत त्यांना affiliate marketing विषयी नक्कीच माहिती असेल. अनेक ब्लॉगर्स सध्या असे आहेत जे त्यांच्या ब्लॉग मध्ये याचा वापर करत आहेत मात्र अनेक ब्लॉगर असे देखील आहेत जे affiliate marketing चा वापर ब्लॉग मध्ये करत नाही. याचे अनेक कारण असू शकतात जसे की त्यांना affiliate marketing विषयी माहिती नसेल किंवा त्यांना संभ्रम असेल की आपण या affiliate marketing चा वापर आपल्या ब्लॉग मध्ये करू शकतो का? Affiliate link दिल्याने फायदा होईल का आणि ते योग्य असेल का?

आज या लेखाच्या माध्यमातून मी तुम्हाला affiliate marketing काय असते? याविषयी माहिती देणार आहोत. या लेखाच्या माध्यमातून ज्या ब्लॉगर्स ला थोडीफार माहिती आहे ते ब्लॉगर्स याचा वापर करून सहज त्यांच्या कमाई मध्ये वाढ करू शकतात. ज्यांना affiliate marketing विषयी बिलकुल माहिती नाहीये ते ब्लॉगर्स देखील या लेखाच्या माध्यमातून affiliate marketing विषयी जाणून घेऊन याचा त्यांच्या ब्लॉग मध्ये वापर करू शकता.

तुम्हाला हा लेख पूर्ण वाचावा लागेल जेणे करून तुमचे Affiliate Marketing विषयी असणारे सर्व doubts क्लिअर होऊन जातील. तर मग वेळ न घालवता चला सुरू करूयात….

एफिलियेट मार्केटिंग काय आहे? | What is Affiliate Marketing in Marathi

What is Affiliate Marketing in Marathi
What is Affiliate Marketing in Marathi

एफिलियेट मार्केटिंग हा एक असा रस्ता आहे ज्याच्या माध्यमातून एक ब्लॉगर कोणत्याही एका कंपनीच्या प्रोडक्ट ला त्याच्या वेबसाईटच्या माध्यमातून विकून कमिशन कमवू शकतो. तुम्हाला जे काही कमिशन मिळणार आहे ते प्रोडक्ट वर अवलंबून असणार आहे. म्हणजे प्रोडक्ट जर फॅशन आणि लाइफस्टाइल या कॅटेगरी मधील असेल तर कमिशन जास्त मिळेल आणि इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट असेल तर त्यावर कमी प्रमाणात कमिशन मिळते.

कोणत्याही प्रकारचे प्रोडक्ट तुम्हाला प्रमोशन करायचे असेल तर तुमच्या वेबसाईटवर एक चांगल्या प्रकारे ट्राफिक असणे गरजेचे आहे. कमीत कमी 5000 daily visitors असतील तर मग तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. जर तुमची वेबसाईट नवीन असेल आणि त्यात कमी visitors असतील तर मग एखाद्या product ची ऍड तुमच्या ब्लॉग वर लावून देखील तुम्हाला होणारा फायदा हा तितका जास्त नसेल.

त्यामुळे हेच योग्य असेल की affiliate products तेव्हाच तुमच्या ब्लॉग मध्ये प्रमोट करा जेव्हा तुमच्या ब्लॉग वर चांगल्या प्रमाणात visitors येत असतील.

Online पैसे कमविणे सोपे आहे का? | How to earn money online in marathi

एफिलियेट मार्केटिंग कसे काम करते? | How Affiliate Marketing Works in Marathi

या प्रश्नाचे उत्तर जे लोक online field शी जोडून आहेत त्यांच्यासाठी जाणून घेणे खूप गरजेचे आहे. ते जर affiliate start करू इच्छित आहेत तर मग त्यांना affiliate marketing काम कसे करते याविषयी जाणून घेणे खूप गरजेचे असते. जर एखादी product based कंपनी किंवा organization त्यांचे products विक्री वाढवू इच्छित असेल तर मग त्यांना त्यांच्या products ला promote करायचे असते. त्यासाठी मग त्यांना त्यांचा एक affiliate प्रोग्रॅम सुरू करायचा लागतो.

Affiliate Marketing हा व्यवसाय पूर्णपणे कमिशन बेसीस वर चालतो. जेव्हा कोणी एखादा व्यक्ती मग तो blogger किंवा एखाद्या वेबसाईट चा owner असेल तर तो या affiliate program ला जॉईन करतो, तेव्हा ती कंपनी किंवा organization त्याला ब्लॉग वर किंवा वेबसाईटवर प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी बॅनर किंवा लिंक देत असते. याशिवाय त्या blogger ला त्याच्या blog वर किंवा website वर त्याला बॅनर वेगवेगळ्या जागांवर लावायचा असतो.

जर एखाद्या ब्लॉग वर किंवा वेबसाईटवर जास्त प्रमाणात visitors येत असतील तर मग त्यातील काही लोक त्या प्रोडक्ट वर नक्की क्लीक करतील. अनेकदा ते लोक प्रोडक्ट जरी खरेदी करत नसतील तरी देखील त्या साईट वर जाऊन sign up तरी करतात. काही Product Based कंपनी यासाठी तुम्हाला कमिशन देतात तर काही कंपनी या product विक्री केल्यानंतर मग कमिशन देतात.

एफिलियेट मार्केटिंग विषयी काही महत्वपूर्ण संकल्पना

Affiliate marketing मध्ये खालील काही terms वापरल्या जातात. या संकल्पना म्हणजेच terms जाणून घेणे आपल्याला गरजेचे असते. चला तर मग अशाच संकल्पना विषयी जाणून घेऊयात.

1. Affiliates: Affiliates त्यांना म्हणले जाते जे व्यक्ती कोणत्या तरी affiliate program ला जॉईन होतात. हे लोक त्या कंपन्यांच्या products ला आपल्या source वर म्हणजेच blogs वर किंवा websites वर promote करतात. हा व्यक्ती कोणीही असू शकतो.

2. Affiliate Marketplace: काही अशा कंपनी आहेत ज्या वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये Affiliate Programs offer करत असतात. त्या साईट्स ला affiliate marketplace म्हणून ओळखले जाते.

3. Affiliate id: हा एक unique id असतो जो sign up केल्यानंतर आपल्याला मिळतो. Affiliate program जो तुम्ही जॉईन करतात त्यानुसार तुम्हाला एक Unique ID दिली जाते. यातून तुम्हाला SALES विषयी माहिती मिळण्यासाठी मदत होते. या ID च्या माध्यमातून तुम्ही तुमचे Affiliate Account मध्ये login करू शकता.

4. Affiliate Link: या त्या लिंक असतात ज्या Affiliate ला product promotion करण्यासाठी लिंक देतात. या लिंक्स वर क्लीक करूनच मग visitors product पेज वर पोहोचतात. जिथे जाऊन ते एखादे प्रॉडक्ट खरेदी करू शकतात. या लिंक्स च्या माध्यमातून Affiliate programs मध्ये होणारे सेल्स ट्रॅक केले जातात.

5. Commission: एक यशस्वी सेलिंग झाल्यानंतर जी amount त्या सेल करणाऱ्या ब्लॉगर ला किंवा affiliate ला दिली जाते त्याला कमिशन म्हणतात. ही रक्कम affiliate ला प्रत्येक सेल नुसार दिली जाते. ही रक्कम सेल च्या काही टक्के असू शकते. ही रक्कम एक तर त्या सेलच्या काही टक्के असू शकते किंवा त्याच्यावर काहीतरी एक ठराविक रक्कम देण्यात येते. याविषयी संपूर्ण माहिती ही terms and conditions मध्ये दिलेली असते.

6. Link Clocking: Affiliate लिंक्स या लांब आणि दिसायला वेगळ्या असतात. त्यामुळे एखाद्या URL शॉर्टनर चा वापर करून त्या शॉर्ट केल्या जातात. यालाच लिंक क्लॉकिंग म्हणतात.

7. Affiliate Manager: काही Affiliate Programs मध्ये affiliate च्या मदतीसाठी आणि त्यांना सल्ला देण्यासाठी काही व्यक्ती नियुक्त केले जातात त्यांना affiliate manager म्हणतात.

8. Payment Mode: Payment कसे भेटेल याच्या पद्धतीला payment mode असे म्हणतात. या माध्यमातून तुम्हाला Commission दिले जाणार आहे. वेगवेगळे affiliate वेगवेगळे modes offer करत असतात. यामध्ये cheque, wire transfer, PayPal इत्यादी Payment Mode असतात.

9. Payment Threshold: Affiliate marketing मध्ये affiliates ला कमिशन दिले जाते. हे काही minimum payment ठरलेले असते. Affiliate ला हे payment एका threshold नंतर मिळते. म्हणजे तितके पैसे त्याच्या affiliate अकाउंट मध्ये आल्यानंतर तो payment modes च्या माध्यमातून खात्यात घेऊ शकतात.

एफिलियेट मार्केटिंग मधून पैसे कसे कमवतात? | How To Make Money From Affiliate Marketing in Marathi

How To Make Money From Affiliate Marketing in Marathi
How To Make Money From Affiliate Marketing in Marathi

आजच्या घडीला ब्लॉगिंग मध्ये affiliate मार्केटिंग चा वापर करून अनेक ब्लॉगर्स लाखो रुपये कमवत आहेत. Affiliate marketing हा ब्लॉगिंग मधून पैसे कमविण्याचा एक सर्वात चांगला मार्ग आहे. Affiliate मार्केटिंग मधून कमाई करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही एका affiliate program सोबत जोडले जायचे आहे.

रेजिस्टर केल्यानंतर त्या affiliate network द्वारे मिळालेल्या ads आणि products तुमच्या ब्लॉग मध्ये ऍड कराव्या लागतात. आपल्या ब्लॉग वर येणारे visitors जेव्हा त्या ad वर क्लीक करून product विकत घेतात तेव्हा आपल्याला कंपनीच्या मालकाकडून कमिशन मिळते.

इथे हा प्रश्न निर्माण होतो की तुम्हाला affiliate program कोणती कंपनी ऑफर करत आहे. तर याचे उत्तर हे आहे की internet वर अनेक अशा Companies आहेत ज्या affiliate प्रोग्रॅम आपल्याला ऑफर करतात. यापैकी काही खूप फेमस देखील आहेत ज्यामध्ये amazon, flipkart, snapdeal आणि godaddy यांचा समावेश होतो.

अशा प्रकारे अनेक कंपन्या affiliate program आपल्याला ऑफर करतात. यामध्ये तुम्ही फक्त signup किंवा रजिस्टर करून जोडले जाऊ शकतात. या कंपन्यांच्या उत्पादनाची लिंक आपल्या वेबसाईटवर ऍड करून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकतात. Affiliate program साठी signup करायचे असेल तर तुम्हाला कंपनीला काहीही pay करण्याची गरज नसते. सर्व काही फ्री असते.

कोणत्या कंपनी affiliate program ची सर्व्हिस देतात याचे उत्तर तुम्हाला गुगल च्या माध्यमातून मिळेल. यासाठी तुम्हाला गुगल सर्च करावा लागेल. समजा तुम्हाला affiliate program amazon विषयी माहिती हवी असेल तर गुगल वर कंपनी नाव म्हणजे amazon आणि पुढे affiliate search केल्यास तुम्हाला फायदा होईल. ती कंपनी जर तुम्हाला affiliate प्रोग्रॅम देत असेल तर तो डेटा तुम्हाला गुगल वर मिळेल. तुम्ही सहज मग त्या affiliate प्रोग्रॅम सोबत जोडले जाऊ शकतात. कोणत्याही affiliate program सोबत जोडले जाण्याच्या आधी एकदा त्यांच्या terms and conditions वाचून घेत जा.

Affiliate Program मधून Payment कसे मिळते?

How to earn money from Affiliate Program
How to earn money from Affiliate Program

हे प्रत्येक affiliate program वर अवलंबून असते की ते त्यांच्या affiliates ला payment देण्यासाठी कोणता mode निवडतात. जवळपास सर्व प्रोग्रॅम हे payment साठी Bank Transfer किंवा PayPal यांचाच वापर करतात. Affiliate marketing मध्ये काही अशा terms वापरल्या जातात ज्यांच्यावर आधारित मग युझर ला पेमेंट दिले जाते.

1) CPM (Cost Per 1000 Impressions): ही अशी रक्कम असते जी merchant म्हणजेच प्रोडक्ट चा मालक affiliate म्हणजेच ज्याने प्रोडक्ट ची जाहिरात केली त्याने लावलेल्या ads वर 1000 view आल्यानंतर देत असतो. हे payment merchant कडून त्या affiliate ला देण्यात येते.

2) CPS (Cost Per Sale): ही रक्कम त्या affiliate ला तेव्हाच मिळते जेव्हा blog चे visitors ते प्रॉडक्ट खरेदी करतात. जितके जास्त लोक प्रोडक्ट विकत घेतील त्यानुसार merchant कडून affiliate ला कमिशन मिळते.

3) CPC (Cost Per Click): Affiliate च्या ब्लॉग वर लावलेल्या advertising, text, banner वर visitors ने click केल्यानंतर कमिशन मिळते.

आपण Affiliate marketing आणि Google Adsense चा वापर एक सोबत करू शकतो का?

याचे उत्तर आहे हो! Affiliate marketing मधून आपण google adsense च्या तुलनेत खूप कमी कालावधीत जास्त पैसे कमवू शकतो. Google adsense च्या terms च्या विरुद्ध हे नक्कीच नाहीये कारण हे legal आहे. तुम्ही आरामात तुमच्या ब्लॉग मध्ये या दोन्ही गोष्टींचा वापर करू शकता.

Google Adsense चे approval मिळविण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते. मात्र affiliate marketing मध्ये तितकी मेहनत घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेक bloggers affiliate marketing मधून पैसे कमविण्यासाठी पुढे येत आहेत. जितके जास्त product तुमच्या ब्लॉग मधून सेल होत असतील तितकी जास्त तुम्हाला इनकम होणार आहे.

तुमच्या ब्लॉग शी निगडित जर तुम्ही ads लावत असाल तर तुम्हाला यातून चांगला फायदा होईल. सांगायचा उद्देश हा आहे की जर तुमचा ब्लॉग gadgets विषयी आहे तर मग त्याच्याशी निगडित affiliate ads तुम्ही त्यावर लावाव्यात. यातून ब्लॉग च्या ads वर क्लीक करण्याचे चान्स वाढतील आणि खूप जास्त फायदा होईल.

Popular Affiliate Marketing sites कोणत्या आहेत?

Internet वर खूप साऱ्या affiliate marketing companies आहेत मात्र आज मी तुम्हाला काही popular आणि best कंपनी विषयी सांगणार आहे जे तुम्हाला जास्तीत जास्त commission देतील. कोणत्याही affiliate प्रोग्रॅम ला जॉईन होण्याच्या आधी तुम्हाला त्या प्रोग्रॅम संबंधीत सर्व माहीत मिळवायची असते. तुम्हाला जर त्या कंपनीच्या affiliate मार्केटिंग प्रोग्रॅम विषयी जाणून घ्यायचे असेल तर मग तुम्ही सहज गूगल सारख्या सर्च इंजिन वर company च्या नावाच्या समोर affiliate program टाकल्यास तुम्हाला त्या कंपनीच्या रिझल्ट विषयी माहिती मिळेल.

Best Affiliate Marketing Sites
1. Amazon Affiliate
2. Snapdeal Affiliate
3. Clickbank
4. Commission Junction
5. eBay

Affiliate Marketing sites ला जॉईन कसे करतात?

जर आपण affiliate marketing sites ला join करत असाल तर तुम्हाला ही प्रोसेस करायला जास्त मोठी प्रोसेस नाहीये. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो केल्यानंतर तुम्ही affiliate income सुरू करू शकता. इथे आम्ही तुम्हाला amazon affiliate कसे जॉईन करायचे याविषयी सांगतो आहे. सर्वात आधी तर तुम्हाला ज्या कंपनीचा affiliate प्रोग्रॅम जॉईन करायचा आहे त्यांच्या affiliate page वर जायचे आहे. जसे तुम्हाला amazon affiliate जॉईन करायचे असेल तर यासाठी नवीन अकाउंट सुरू करावे लागेल. इथे तुम्हाला अनेक महत्वपूर्ण गोष्टी भरायच्या आहेत.

  • Name
  • Address
  • Email Id
  • Mobile Number
  • Pan Card details
  • Blog/ website URL (इथे तुम्ही कंपनीचे products promote कराल)
  • Payment Details (जिथे तुमची सर्व कमाई पाठविली जाते)

सर्व माहिती ठीक भरल्यानंतर जेव्हा तुम्ही register करता तेव्हा कंपनी तुमचा ब्लॉग किंवा वेबसाईट चेक करून तुम्हाला confirmation mail सेंड करतात. Register केल्यानंतर तुम्ही जेव्हा login करता तेव्हा तुमच्या समोर एक डॅशबोर्ड येईल. इथे तुम्ही तुमचा dashboard बघून त्यातून एखादे प्रोडक्ट निवडून त्याची ad आणि लिंक कॉपी करून घेऊ शकता. हीच लिंक तुम्हाला आता कुठे तरी पाठवायची आहे जेणेकरून लोक त्यावर क्लिक करून पुढे ते product विकत घेतील आणि तुम्हाला कमिशन मिळेल.

Affiliate Program जॉईन होण्याच्या आधी घ्यायची काळजी

जेव्हा कधी तुम्हाला affiliate program join करायचा असतो किंवा एखाद्या Affiliate network मध्ये enroll व्हायचे असेल तर खालील गोष्टींचे भान तुम्हाला ठेवायचे आहे.

  • त्यात कोणत्या प्रकारे banners उपलब्ध आहेत
  • Promotional matter मध्ये काय सुविधा आहेत
  • Affiliate Control Panel आहे किंवा नाही
  • Minimum Payout किती आहे
  • Payment method काय काय आहेत
  • Tax form लागतो की नाही

या सर्व फॅक्टर्स विषयी आधीच माहिती असणे कधीही चांगले आहे. यातून तुम्हाला अनेक गोष्टी जाणून घ्यायला मदत होईल. तुम्हाला यातून हे decide करायला मदत होईल की तुमचा ब्लॉग एखादे प्रोडक्ट प्रमोट करण्यासाठी तयार आहे की नाही. उदाहरण म्हणून तुम्ही जर एखादे सिझनल प्रोडक्ट सिलेक्ट करत असाल आणि त्याचा minimum payout $1000 आहे तर मग तुमचे त्या सिझन मध्ये तेव्हडे रुपये कमावून झाले नाही तर मग तुमचे payment अनेक दिवस अडकून पडेल. त्यामुळे मग तुम्हाला याविषयी आधीच माहिती घ्यायला हवी.
Bonus Tip- तुम्ही जर एखाद्या Famous Brand सोबत जोडलेले असाल तर मग त्या ब्रँड च्या जाहिराती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. हा तुमच्या affiliate marketing साठी एक advantage ठरू शकतो.

FAQ on Affiliate Marketing in Marathi

Q. एका वेबसाईट वर Affiliate Marketing आणि ad network जसे की Adsense वापरता येते का?

A. हो नक्कीच करता येते. Affiliate Marketing आणि Ad Network या दोन्हीना एक सोबत वापरता येते. अनेक लोकांना affiliate मार्केटिंग मधून ad network च्या तुलनेत जास्त पैसे कमवतात येतात.

Q. Affiliate Marketing मध्ये blog किंवा वेबसाईट असणे गरजेचे आहे का?

A. हे तसे अगदी गरजेचे कारण नाहीये मात्र जर तुमच्याकडे ब्लॉग किंवा वेबसाईट असेल तर affiliate marketing मधून पैसे कमविण्याचा सर्वात मोठा आणि चांगला पर्याय आहे. इथे तुम्हाला visitors आणण्याची गरज नसते. Visitors ब्लॉग वर स्वतःहून येतात आणि तुम्हाला इनकम होऊ शकते.

Q. सर्व कंपनी आणि organizations affiliate program offer करतात का?

A. सर्व कंपनी affiliate program देतात की नाही हे थोडे कठीण आहे. परंतु जवळपास सर्व मोठ्या कंपन्या हे प्रोग्रॅम ऑफर करतात. तुम्हाला जर एखाद्या कंपनीच्या affiliate प्रोग्रॅम विषयी जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला फक्त गुगल वर company name आणि affiliate search करायचे आहे. तुम्हाला सर्व काही माहिती search result मध्ये मिळून जाईल.

Q. Affiliate Marketing सोबत जोडण्यासाठी कोणता खास कोर्स करावा लागतो का?

A. नाही. तुम्हाला फक्त या लेखात सांगितलेल्या गोष्टींविषयी माहिती असायला हवी. तुम्हाला आमच्या वेबसाईटवर याविषयी अधिकाधिक माहिती नक्कीच मिळेल.

Q. Affiliate program जॉईन करण्यासाठी काही fee लागते का?

A. सध्याचे सर्व प्रोग्रॅम जॉईन करण्यासाठी फ्री असतात. जरी कोणी तुम्हाला पैशांची मागणी करत असेल तर मग त्या प्रोग्रॅम ला जॉईन करूच नका. कारण हे असे प्रोग्रॅम फेक असू शकतात. Affiliate program हे पूर्णपणे फ्री असतात.

Q. आपण Affiliate Marketing मधून किती पैसे कमवू शकतो?

हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्ही किती चांगल्या प्रकारे काम करतात. तुमच्या ब्लॉग वर किती visitors येतात आणि तुम्ही त्यांना तुमच्या program कडे कसे आकर्षित करतात यावर तुमची इनकम अवलंबून असते. तुम्ही जितके जास्त sales करता त्यानुसार तुम्हाला कमिशन देखील मिळते.

Q. Affiliate Program मध्ये Payment योग्य प्रकारे आले नाही तर आपल्याला काय करायला हवे?

तुम्हाला जर payment विषयी काहीही अडचण आली तर मग तुम्हाला त्या affiliate कंपनीच्या support team सोबत contact करायचा आहे. कंपनीच्या अनेक पॉलिसी असतात ज्या सतत बदलत असतात आणि त्यामुळे मग कधी कधी affiliates चे payment थांबविले जाते. तुम्हाला यात चिंता करायची गरज नसते कारण पेमेंट उशिरा मिळेल मात्र नक्की मिळेल.

Conclusion – Affiliate marketing meaning in marathi

तर मित्रांनो What is Affiliate Marketing in Marathi या लेखामधून तुम्हाला Affiliate Marketing बद्दल संपूर्ण माहिती समजली असेल व यामधून पैसे कसे कमावता येतात हे देखील समजले असेल. जर तुमच्या काही शंका असतील तर खाली कंमेंट करून सांगा. मी तुमच्या शंकांचं लवकरात लवकर निरसन करेन.

हे देखील वाचा.

गुगल वरून पैसे कसे कमवतात?

फेसबुक वरून पैसे कसे कमवता येतात?

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment