आपल्या नवीन Blog वर ट्रॅफिक कशी वाढवायची? | How to Increase Blog Traffic in Marathi

आपल्या नवीन Blog वर ट्रॅफिक कशी वाढवायची? | How to Increase Blog Traffic in Marathi

How to Increase Blog Traffic in Marathi: तुम्हाला तुमच्या blog post किंवा वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्राफिक आणायची  आहे का ? तुम्हाला असे वाटते का की तुम्ही जी पोस्ट लिहिता त्या पोस्टवर निरंतर ट्राफिक येत राहावे? तर आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला ब्लॉग पोस्ट पब्लिश केल्यानंतर प्रमोट करण्याच्या 10 पद्धती येथे सांगणार आहे, त्यामुळे हा लेख शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो तुम्ही तुमच्या वेबसाईटवर कितीपण quality content लिहा, पण जर त्यावर ट्राफिक येत नसेल तोपर्यंत तुम्ही earning करू शकत नाही. जर तुम्ही एक नवीन ब्लॉगर असाल तर अशा परिस्थितीमध्ये ब्लॉगला google च्या पहिल्या पेजवर रँक करणे थोडे कठीण काम आहे. या परिस्थितीमुळे बरेचसे ब्लॉगर चिंतेत असतात की ब्लॉग पोस्ट पब्लिश केल्यानंतर त्याला गुगल वरती रँक कसे करावे किंवा प्रमोट कसे करावे.

ब्लॉगला promote करण्यासाठी बऱ्याचशा पद्धती वापरल्या जातात ज्यामधील काही Paid आहेत तर काही तुम्ही फ्री मध्ये वापरू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. तर मग चला तर जाणून घेऊ की How to Increase Blog Traffic in Marathi.

आपल्या नवीन Blog वर ट्रॅफिक कशी वाढवायची
आपल्या नवीन Blog वर ट्रॅफिक कशी वाढवायची

Blog post published केल्यानंतर त्यास प्रमोट कसे करावे ? आपल्या ब्लॉग वरती ट्राफिक कसे वाढवावे ?

How to Start a Blog in Marathi

तुम्हाला तुमच्या ब्लॉगला किंवा वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्रॅफिक प्राप्त करण्यासाठी, वेबसाईटच्या रँकिंग ला त्या स्थानापर्यंत पोहोचवावे लागेल जिथे खूप जास्त यूजर एकत्र येतात, जसे की सोशल मीडिया साईट्स इत्यादी. आता मी तुम्हाला एक-एक करून ब्लॉग ला प्रमोट करण्याच्या पद्धती सांगणार आहोत.

1. Social networking sites

Social networking sites वर आपल्या वेबसाईटला प्रमोट करून ट्राफिक वाढवा

कोणत्याही प्रकारचा ब्लॉग किंवा वेबसाईटला प्रमोट करण्यासाठी Social networking sites हे एक उत्तम साधन आहे. यामुळे तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक निश्चितच वाढवू शकता. तुमच्या वेबसाईट वरती ट्राफिक वाढवण्यासाठी काही महत्वपूर्ण सोशल मीडिया साइट्स खाली दिलेल्या आहेत :-

1) Facebook: आजकाल फेसबुक बद्दल कोणाला माहिती नाही, फेसबुक हे खूप फेमस सोशल मीडिया साइट्स पैकी एक आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की वेबसाईटवर पाठवण्यात येणार एकूण Referral ट्राफिक फेसबुक वरून पाठवण्यात येते. बऱ्याचशा ब्लॉगरचं असं मत आहे की, आपली पोस्ट पब्लिश केल्यानंतर फेसबुक वर शेअर करणेच पुरेसे आहे, पण या व्यतिरिक्त एक अशी रणनीती आहे जी वापरून तुम्ही तुमचे ट्राफिक दुप्पट किंवा तिप्पट वाढवू शकता.

सर्वप्रथम आपल्या visitors साठी वेगवेगळे Blog Group बनवा. आणि आपल्या audience साठी Blog च्या संबंधित चर्चा करा. जेवढे जास्त मेंबर्स तुमच्या ब्लॉग वर असतील, तेवढे मेंबर्स तुम्ही group मध्ये पोस्ट शेअर केल्यानंतर तुमच्या ब्लॉग वर येतील. तसेच Facebook वर असे बरेच ग्रुप्स तुम्हाला मिळून जातील, जे तुमच्या ब्लॉग शी संबंधित असतील. तुम्ही त्या ग्रुपच्या मेंबर्सला तुमच्या blog ला join होण्यासाठी request करू शकता, आणि अशाप्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या ग्रुपला वाढवू शकता. यानंतर एक लिंक त्या ग्रुप वर शेअर केल्यानंतर तुमच्या वेबसाईटवर खूप सारे युजर्स visit करतील.

Group मध्ये user engagement कायम असणे हे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या ब्लॉग शी संबंधित attractive post लिहू शकता, त्याचबरोबर त्या पोस्टमध्ये लिंक add करा जेणेकरून तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक मिळेल.

तुम्ही फेसबुक ग्रुप शिवाय एक Facebook Page देखील बनवू शकता. आणि त्या ठिकाणी तुम्ही नियमितपणे एक नवीन पोस्ट लिंक सोबत शेअर करत रहा. तुमच्या page चे जेवढेपण followers असतील त्यांना त्या page च्या संबंधित नोटिफिकेशन प्राप्त होईल आणि आपल्या इच्छेनुसार ते post च्या लिंक वर क्लिक करून पूर्ण पोस्ट वाचू शकतील.

2) Twitter: आपल्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवण्यासाठी Twitter देखील एक खूप मोठे स्रोत आहे. तुम्ही लिहिलेल्या नवीन ब्लॉग पोस्टवर ट्राफिक वाढवण्यासाठी Twitter ची मदत घेऊ शकता. इथे सुद्धा तुम्ही तुमच्या पोस्टला नियमितपणे शेअर करून आपल्या ब्लॉगवर users ची engagement क्रिएट करू शकता. खाली आम्ही तुम्हाला काही महत्त्वपूर्ण Twitter techniques सांगणार आहोत ज्याचा उपयोग करून तुम्ही ट्राफिक वाढवू शकता.

आपल्या Niche शी संबंधित हॅशटॅग चा उपयोग करा. अधिक conversion साठी ट्विटर कार्ड सेट करा. Visitors आणि आपले followers यांच्यासोबत नेहमी संभाषण करत रहा. यासाठी तुम्ही त्यांना प्रश्न उत्तरे विचारू शकता किंवा एखादा पोल क्रिएट करून त्यांचे मत विचारात घेऊ शकता.

3) Pinterest: Pinterest एक विज्युअल सोशल बुकमार्किंग वेबसाईट आहे, जर तुमच्या post मध्ये चांगले ग्राफिक्स असतील तर तुम्हाला याची मदत होऊ शकते. सर्व हॅशटॅगच्या सोबत Pinterest आपल्या pins वाढवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या पोस्टवर रेफरल ट्राफिक पाठवण्यासाठी Pinterest group board हा एक उत्तम पर्याय असू शकतो. आपल्या Niche शी संबंधित एक उत्तम बोर्ड निवडा आणि वेबसाईट मध्ये वापरलेला मीडिया URL सोबत Pinterest वर शेअर करा.

4) LinkedIn: LinkedIn users आपल्या आवडीनुसार पोस्ट वाचणे पसंत करतात. जर तुम्ही या नेटवर्क साइटवर तुमच्या ब्लॉग पोस्ट शेअर करता तर तुम्ही वास्तविक रित्या टार्गेटेड ट्राफिक प्राप्त करू शकता. आपल्या ब्लॉग पोस्टला जास्तीत जास्त targeted visitors सोबत शेअर करण्यासाठी तुम्ही LinkedIn चा उपयोग करू शकता.

Social Traffic vs. Search Traffic

2. Newsletter subscriber

Newsletter subscriber ला ईमेल करून ब्लॉगची ट्राफिक वाढवा: तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक प्राप्त करण्यासाठी दुसरा सर्वात चांगला पर्याय आहे तो म्हणजे email newsletter. तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती एक email subscription widget लावून आपल्या Audience ला ई-मेलच्या माध्यमातून new post प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करायला सांगू शकता. यामुळे तुम्हाला असा फायदा होईल की तुमच्या वेबसाईटच्या newsletter ला तोच सबस्क्राईब करेल ज्याला खरोखरच तुमची वेबसाईट व त्यातील आर्टिकल्स वाचण्यामध्ये रुची आहे. जर कोणी तुमच्या न्यूज लेटर ला सबस्क्राईब केले असेल तर याचा अर्थ हा होतो की खरोखरच त्या व्यक्तीला तुमचे नवीन आर्टिकल वाचण्यामध्ये इंटरेस्ट आहे. यामुळे तुम्ही पोस्ट केलेले ब्लॉग आर्टिकल पूर्ण वाचली जाण्याची खात्री आहे त्याचबरोबर तुमचे आर्टिकल शेअर करण्याची संभावना देखील वाढेल.

आपल्या इमेल सबस्क्राईबरला newsletter पाठवण्यासाठी mailchimp किंवा Jetpack email subscription widget सारख्या ऑटो रिस्पॉन्सर चा उपयोग करू शकता.

3. Quora च्या माध्यमातून ब्लॉगला प्रमोट करून ट्रॅफिक वाढवा

Quora, question and answers network: तुमचा ब्रँड आणि authorization दाखवण्यासाठी Quora हे एक अप्रतिम माध्यम आहे. तुमच्या ब्लॉग पोस्ट वरती ट्राफिक वाढवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता. Quora हे एक ॲप्लिकेशन आहे, जिथे हजारो लेखक आणि लाखो वाचक आहेत. Quora वर दर महिन्याला 1.5 मिलियन युजर्स व्हिजिट करतात. या प्लॅटफॉर्मवर असे लोक येतात जे आपल्या मनातील प्रश्न विचारतात, त्याचबरोबर त्यांना माहिती असलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देतात. तुम्ही सुद्धा Quora चे active user बनून  तुमच्या ब्लॉगशी संबंधित असलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. तुमच्या ब्लॉगला प्रमोट करण्यासाठी तुम्ही उत्तराच्या खाली तुमच्या Blog चे URL देखील टाकू शकता, पण ज्या पोस्टमध्ये गरज असेल तिकडेच युआरएल टाका, गरजेपेक्षा जास्त URL पोस्टमध्ये ऍड केल्यास, तुमचे उत्तर हटवले जाऊ शकते. तुमचा मुख्य उद्देश प्रश्न कर्त्याला उत्तर देणे हा आहे, ना की backlink प्राप्त करणे, हे देखील ध्यानात असणे गरजेचे आहे. खाली आम्ही तुम्हाला Quora च्या माध्यमातून आपल्या ब्लॉक पोस्टला प्रमोट करण्याच्या काही पद्धती शेअर करत आहोत.

1) तुमच्या कीवर्डशी संबंधित क्वेरी शोधण्यासाठी Quora सर्च बारचा वापर करा.

2) संबंधित प्रश्नांवर, आकर्षक उत्तरे लिहा आणि या उत्तरांमध्ये तुमच्या ब्लॉगची लिंक टाका.

3) आवश्यक असल्यास पोस्ट च्या संबंधित एखादा फोटो अपलोड करा.

4) जेव्हा तुम्ही ब्लॉग पोस्ट प्रकाशित करता तेव्हा Quora वर तुमच्या विषयाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देण्याची सवय लावा.

4. YouTube

YouTube च्या माध्यमातून ब्लॉगला प्रमोट करून ट्राफिक मिळवा: आजच्या काळामध्ये करोडो लोक youtube चा वापर करतात. YouTube हे एक खूप लोकप्रिय व्हिडिओ सर्च इंजिन झालेलं आहे. या प्लॅटफॉर्मवर जवळपास सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आणि ट्युटोरियल उपलब्ध आहेत. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही YouTube च्या माध्यमातून देखील तुमच्या ब्लॉग पोस्टवर ट्राफिक आणू शकता. युट्युब हे google नंतर दुसरे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. YouTube ला दर महिन्याला पाच बिलियन हून अधिक लोक सर्च करतात. तुम्ही युट्युब वरती आपल्या ब्लॉगशी संबंधित ट्युटोरियल सर्विस व्हिडिओ बनवून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ब्लॉग ची लिंक टाकू शकता. जर तुमच्या YouTube वर सबस्क्राईबची संख्या वाढली तर तुम्ही फक्त वेबसाईट वरूनच नाही तर युट्युब मॉनिटायझेशन थ्रू देखील पैसे कमवू शकता.

आपल्या ब्लॉगशी संबंधित व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला थोडेफार ऑडिओ विडिओ एडिटिंग जमणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतःला व्हिडिओमध्ये आणणार असाल तर तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा व माइक असणे गरजेचे आहे.

5. Guest post

Guest post च्या माध्यमातून आपल्या ब्लॉगला प्रमोट करून ट्राफिक वाढवा: Guest Post मध्ये तुम्ही दुसऱ्याच्या वेबसाईटवर जाऊन आपली ब्लॉग पोस्ट प्रकाशित करता. जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटचे प्रमोशन करायचा आहे तर तुम्ही एखाद्या प्रचलित वेबसाईटच्या ओनर ला कॉन्टॅक्ट करून Guest post बद्दल रिक्वेस्ट करू शकता. त्यांच्या वेबसाईटवर As a Guest post एखादे आर्टिकल प्रकाशित करून तुम्ही ट्राफिक मिळवू शकता. यामध्ये एखादा प्रचलित वेबसाईट ओनर त्याच्या वेबसाईटवर तुमचे ब्लॉग आर्टिकल पोस्ट करतो, त्याचबरोबर तुमच्या website ची लिंक दिली जाते. जिथून वाचक तुमच्या वेबसाईटला व्हिजिट करतात. याद्वारे देखील तुम्ही तुमच्या वेबसाईटवर ट्राफिक वाढवू शकता.

Conclusion

आजच्या या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला ब्लॉक पोस्ट पब्लिश केल्यानंतर त्यास प्रमोट कसे करावे, त्याचबरोबर तुमच्या वेबसाईटवर अधिकाधिक ट्राफिक कसे प्राप्त करावे, इत्यादी बद्दल माहिती सांगितली. जर तुम्ही वरील पद्धती वापरून बघाल तर नक्कीच यशस्वी व्हाल.

जर हा लेख तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर या आर्टिकलशी संबंधित तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मार्फत आम्हाला नक्की कळवा.

धन्यवाद

हे देखील वाचा

How to Write SEO Friendly Article in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment