Blogger vs WordPress Which one is Best in Marathi: कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडावा?

Blogger vs WordPress Which one is Best in Marathi | कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडावा?

Blogger vs WordPress Which one is Best in Marathi: Blogging करण्यासाठी आपल्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत परंतु आपल्याकडे दोन असे प्लॅटफॉर्म आहेत त्यावरून आपण सहज आपला ब्लॉग आणि कंटेंट मॅनेज करू शकतो. तेव्हा मग आता प्रश्न उभा राहतो की हे दोन प्लॅटफॉर्म कोणते आहेत? तर Blogger आणि WordPress हे ते दोन प्लॅटफॉर्म आहेत. ब्लॉगिंग करत असताना या दोन प्लॅटफॉर्म पैकी आपण कोणता प्लॅटफॉर्म निवडावा? Blogger की wordpress? या प्रश्नाचे आज आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात.

जे ब्लॉगिंगला सुरुवात करत असतात ते शक्यतो Blogger म्हणून Blogspot सोबत जातात आणि पुढे जाऊन थोडे यश मिळत गेले की ते wordpress कडे शिफ्ट होतात. याचा अर्थ असा होत नाही की ब्लॉगस्पॉट किंवा ब्लॉगर हे इतके चांगले नाही. परंतु आपण असे म्हणू  शकतो की आपल्याला जास्त कंट्रोल हवा असेल आणि आपल्याला आपले काम जास्तीत जास्त सोपे करायचे असेल तर आपण wordpress कडे जातो. आजच्या काळात देखील खूप सारे मोठे ब्लॉग्स हे देखील blogger वर आहेत त्यामुळे तुम्ही ब्लॉगर सोबत जास्त फॅमिलियर झाले असाल आणि ब्लॉगर च वापरायचं असेल तर काही अडचण नसते.

Blogger vs WordPress कोणता प्लॅटफॉर्म ब्लॉगिंगसाठी बेस्ट आहे?

सुरुवातीला आपण ब्लॉगर विषयी जाणून घेऊयात आणि सोबतच वर्डप्रेस ला देखील हात घालूयात. ब्लॉगर हा गुगल कडून मिळणारा प्लॅटफॉर्म असून यावर आपण पूर्णपणे फ्री मध्ये ब्लॉग तयार करू शकतो. परंतु यात तुमच्याकडे स्वतःचा होस्टिंगवर अधिकार देखील नसतो. WordPress विषयी बोलायचे झाले तर WordPress चे दोन व्हर्जन आहेत. यातील WordPress.org हे फ्री असून WordPress.com साठी तुम्हाला होस्टिंग घ्यावी लागते. आज आपण WordPress.org विषयी बोलणार नाहीये आपण wordpress म्हणालो की तिथे होस्टिंग घेऊन वापरावी लागणारी wordpress.com विषयी आपण सर्व काही जाणून घेणार आहोत.

Ownership (मालकी हक्क)

Blogger विषयी सांगायचे झाले तर ब्लॉगर हे गुगलचे प्रोडक्ट् आहे हे तुम्हाला माहिती असेलच परंतु Blogger ची सुरुवात Pyra Labs यांनी केली होती परंतु 2003 मध्ये गुगलने Blogger खरेदी केले. याला Blogger.com किंवा Blogspot.com म्हणून ओळखतात. याची सर्व स्क्रिप्ट किंवा डेटा हा पूर्णपणे गुगल कडे असतो आणि त्यामुळे तुम्ही त्याचे सर्व्हर हे access करू शकत नाही.

याविषयी सांगायचे झाले तर इथे तुम्ही गुगल अकाउंट ओपन केले की तुम्ही त्याच्या माध्यमातून अनेक ब्लॉग सुरू करू शकतात. परंतु जर तुमचा आयडी गुगल चा आहे, तुमचा ब्लॉग सर्व्हर त्यांचे आहे तर गुगल कधीही तुमचे अकाउंट सहज बंद करू शकते अंक तुम्ही त्यांच्या विरोधात जास्त काही करू शकत नाही. म्हणजे आपण असे म्हणू शकतो की आपला ब्लॉग हा गुगलच्या हातात असतो आणि आपण त्याचे फक्त नावापुरते मालक असतो.

WordPress मध्ये तुम्हाला एखाद्या hosting ला खरेदी करून त्यावर wordpress software इंस्टॉल करावे लागते. तुम्ही स्वतः तुमच्या ब्लॉगचे इथे मालक असतात आणि तुम्हाला हवे ते तुम्ही इथे करू शकता. तुमची साईट आणि तिचा डेटा हा पूर्णपणे तुमच्याकडे असतो आणि त्यामुळे तुम्ही कधीही जाऊन तुमची साईट दुसऱ्या होस्टिंग वर देखील transfer करू शकता.

Control (कंट्रोल)

Blogger वर असलेला ब्लॉग मॅनेज करणे खूप सोपे असते कारण यात जास्त customization करता येत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला जे काही करता येते ते सुटसुटीत दिलेले आहे. परंतु यात तुम्ही तुम्हाला जे हवे आहे ते स्वतःच्या पद्धतीने ऍड करू शकत नाहीत. तुम्हाला जे काही ऑप्शन दिलेले आहेत त्यातच तुम्हाला काम करावे लागेल. यात तुम्हाला HTML, CSS आणि JAVASCRIPT जर जमत असेल तर तुम्ही यात Template वैगेरे थोडेफार बदलु शकता.

WordPress विषयी बोलायचे झाले तर हे Open Source Software आहे. Open source software चा अर्थ असा होतो की यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे तसे बदल करू शकतात आणि याची एक community असते जी तुमचे काम अधिक सोपे करण्यासाठी काम करत असते. यामध्ये तुम्ही ब्लॉग तर बनवू शकतातच परंतु एखाद्या कंपनीसाठी लागणारी वेबसाईट देखील यात बनवणे पूर्णपणे शक्य आहे.

WordPress मध्ये तुम्हाला theme तर भेटतात परंतु यामध्ये तुम्हाला खूप सारे plugins देखील मिळतात. हे plugin वापरून तुमचे काम अधिक सुलभ होते आणि यात तुम्हाला एक समजेल की जी गोष्ट तुम्हाला blogger सोबत प्रत्येक पोस्ट मध्ये जाऊन बदलावी लागते त्या गोष्टी तुम्ही WordPress च्या माध्यमातून एका plugin ने काही clicks मध्ये करू शकतात.

Design आणि Look

Blogger साठी तुम्हाला रेडिमेड काही templates मिळतात आणि त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग ला हवा तसा लूक देऊ शकता. सध्या मार्केट मध्ये आपल्याला खूप सारे वेगवेगळे template बघायला मिळतात ज्यांचा वापर ज्याला काही कोडींग जमत नाही तो देखील सहज वेबसाईटवर करू शकतो. यामध्ये तुम्हाला एक Layout ऑप्शन मिळते ज्याच्या माध्यमातून तुम्ही कोडींग कडे न जाता सहज आपल्या वेबसाईट मध्ये बदल करू शकता.

Blogger साठी देखील अनेक फ्री आणि विकत templates मिळतात. हे Templates आधी पासूनच दिसायला चांगले असतात आणि यात तुम्हाला अनेक नवनवीन फीचर्स देखील मिळतात.

WordPress ब्लॉग साठी देखील आपल्याला फ्री आणि पैसे देऊन विकत template मिळतात त्यांना theme म्हणतात. तुम्हाला इथे ब्लॉग बनवायचा असो किंवा एखादी वेबसाईट बनवायची असेल सर्व कामांसाठी अनेक premium theme आहेत ज्या तुम्ही विकत घेऊ शकता आणि त्या तुमच्या वेबसाईटवर टाकू शकता. Blogger वर तुम्हाला theme मध्ये जास्त काही बदल हे करता येत नाहीत परंतु WordPress मध्ये तुम्हाला हवे तसे हवे ते बदल तुम्ही करू शकता.  त्यामुळे एकदा ब्लॉगिंग मध्ये आल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला WordPress हे जास्त आवडायला लागते यात काही शंका नाही.

Security (सुरक्षितता)

Google स्वतःच्या सर्व्हिस रन करण्यासाठी जे server वापरतो त्यावर तुमचा ब्लॉगर ब्लॉग हा असतो. त्यामुळे ते कधी डाऊन होतील का ही शंका नसतेच. तुम्हाला इथे गुगलची सुरक्षा मिळत असल्याने blogger वर असलेला ब्लॉग हॅक होण्याचे प्रमाण कमी असते. याशिवाय तुम्हाला पुढे wordpress मध्ये कळेल की त्यांची होस्टिंग ही काही लिमिटेड युझर्स हँडल करू शकते परंतु ब्लॉगर वर तुम्ही एका वेळी कितीही युझर्स आले तरी तो ते हँडल करत असतो आणि त्याला काहि मर्यादा नसते.

सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र wordpress जास्त असुरक्षित आहे. याची सुरक्षितता तुम्हाला स्वतःला सांभाळावी लागते. जर तुम्ही एखाडी छोटी होस्टिंग वापरत असाल तर तुम्हाला येणारी ट्राफिक हँडल करणे त्याशिवाय साईट डाऊन जाणे अशा समस्यांचा सामना करावा लागू शकतो. WordPress मध्ये तुम्ही जे plugin टाकता त्यातून साईट हॅक होण्याचा धोका असतो. यामुळे WordPress वापरत असताना स्वतःच्या साईटची सिक्युरिटी देखील स्वतःला सांभाळावी लागते.

Conclusion

Blogger VS WordPress कोणते बेस्ट आहे?

सांगायचे झालेच तर दोन्ही प्लॅटफॉर्म हे ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच आहेत कारण त्यांचे कार्य हे ज्याच्या त्याच्या प्लॅटफॉर्म साठी मर्यादित आहेत. सुरवात करत असताना आपण blogspot वरच करावी असे मी म्हणेल कारण हे फ्री तर आहेच परंतु खरा SEO आणि इतर ज्या काही अडचणी असतात ज्यातून आपण घडतो त्या आपल्याला Blogger मधून कळतात. WordPress पासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता परंतु अडचण एकच असते की तिथे तुम्हाला बऱ्याच गोष्टी या रेडिमेड मिळतात आणि त्यामुळे तुम्हाला खरच आपला ब्लॉग कसा रँक होतोय हे समजून घेता येत नाही. हा तोटा जरी असला तरी देखील सुरुवातीपासून यश मिळण्याच्या संधी WordPress सोबत जास्त आहेत.

WordPress हा प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग साठी blogger vs wordpress मध्ये बेस्टच आहे, यात काही शंका नाही. परंतु सुरुवात करायची असेल आणि तुम्हाला blogger वर काम करून यश मिळत असेल तर त्यात पुढे जाण्यास देखील काही हरकत नाही!

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment