Mutual fund for long term investment in Marathi | म्युच्युअल फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी योग्य आहे की नाही?

Mutual fund for long term investment in Marathi | म्युच्युअल फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी योग्य आहे की नाही?

Mutual fund for long term investment in Marathi: आजच्या घडीला दुसऱ्या इतर गुंतवणूकी पेक्षा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली जात आहे. कारण याद्वारे गुंतवणूकदारांना अधिक नफा मिळतो आहे. हे सर्व बघून आणि टीव्ही वर जाहिराती बघून तुम्हाला देखील हा प्रश्न पडत असेल की म्युच्युअल फंड सही है?

आजच्या आर्टिकल मध्ये आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड योग्य आहे की नाही या विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत. याद्वारे तुम्हाला म्युच्युअल फंड विषयी उपयुक्त अशी सर्व माहिती मिळेल आणि तुम्ही योग्य प्रकारे म्युच्युअल फंड निवडू शकता.

म्युच्युअल फंड योग्य आहे की अयोग्य?

म्युच्युअल फंड विषयी आपण सर्व जण दररोज काही न काही गोष्टी ऐकत असतो. आपल्याला असे वाटत असेल की म्युच्युअल फंड शेअर बाजार सारखा आहे आणि त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी नुकसान होईल अशी भीती वाटत राहते. आज आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड योग्य आहे का याविषयी सांगणार आहोत.

बचतीची सवय

म्युच्युअल फंड मुळे तुमच्यामध्ये बचत करण्याची सवय निर्माण होते. यामध्ये गुंतवणूक करणारे लोक प्रत्येक महिन्याला त्यांच्या दैनंदिन खर्चातून एक रक्कम काढून ठेवत असतात. आपण म्युच्युअल फंड मध्ये 500, 1000 किंवा 2000 यासारख्या छोट्या रक्कम पासून देखील गुंतवणूक करू शकतात. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या खिशावर एकाच वेळी जास्त ताण पडत नाही आणि तो व्यक्ती जास्तीत जास्त काळ गुंतवणूक करत राहतो.

भविष्यात येणाऱ्या आर्थिक संकटांवर उपाय

जर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एखाद्या आर्थिक संकटांवर मात करायची असेल तर आजपासूनच एका चांगल्या ठिकाणी एक ध्येय ठेवून गुंतवणूक करायला सुरुवात करा. अशा प्रकारे हळू हळू आणि एका ध्येयाकडे चालत जाण्याचा मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक होय. तुम्हाला भविष्यातील खर्च जसे की लग्न, मुलांचे शिक्षण, घर घेणे, कार खरेदी करणे, इत्यादी साठी भविष्यात म्युच्युअल फंड द्वारे वेळेला पैसा मिळेल.

व्याजावर व्याज मिळते

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे कारण यामध्ये तुम्हाला गुंतवणूक केलेल्या पैशांवर जे व्याज मिळते त्या व्याजावर देखील व्याज मिळत जाते. जर तुम्ही म्युच्युअल फंड च्या SIP स्कीम मध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला या मार्गाने खूप चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतो. जेव्हा तुम्ही मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला कंपाउंडिंग इंटरेस्ट चा लाभ मिळू शकतो.

टॅक्स मध्ये बचत

म्युच्युअल फंड मध्ये अशा अनेक स्कीम आहेत ज्यामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करून टॅक्स मध्ये बचत करू शकतात. जर तुमच्या बँकेत पैसे आहेत आणि तुम्ही त्यावर टॅक्स देऊ इच्छित नाहीत तर तुम्हाला तो पैसा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करायला काही हरकत नाही.

तुमचे पैसे घेऊन कोणी पळून जाणार नाही

म्युच्युअल फंड कंपन्या या भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (SEBI) आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया (AMFI) सारख्या एजन्सी द्वारे चालविले जाते. त्यामुळे पैसे घेऊन फरार होणे यासारख्या समस्या तुम्हाला होणार नाहीत.

म्युच्युअल फंड हाऊस चालविण्याचे लायसन्स हे बँकांना जसे लायसन्स दिले जाते तसेच दिले जाते. त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे.

जास्त नफा

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा मुख्य हेतू हा इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त नफा मिळविणे असतो. यातून मिळणारा रिटर्न हा शेअर मार्केट, एक्सपोजर आणि म्युच्युअल फंड के फंड मॅनेजर यावर अवलंबून असतो.

म्युच्युअल फंड मध्ये शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म जशी तुम्ही गुंतवणूक करणार असाल त्यानुसार तुम्हाला जो काही टॅक्स लागेल त्यातून तुमच्या रिटर्नवर जास्त काही प्रभाव पडत नाही. हे म्युच्युअल फंड जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहेत कारण यातून लॉंग टर्म साठी जास्तीत जास्त रिटर्न हा मिळतो.

धोक्यापासून बचाव

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपण गुंतवणूक केलेली रक्कम म्युच्युअल फंड मॅनेजर कडून वेगवेगळ्या स्टॉकस मध्ये गुंतवली जाते. त्यामुळे एखाद्या स्टॉक मध्ये लॉस झाल्याने त्यातून आपले पैसे सगळे बुडण्याचा धोका कमी होतो.

कर्ज घेण्याची आवश्यकता नाही

समजा एखादा गुंतवणूकदार 10 वर्षांपासून एका म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत आहे आणि त्याला जास्तीत जास्त लाभ मिळत आहे. परंतू आता त्या गुंतवणुकदाराला आपल्या मुलांना परदेशात शिक्षणासाठी पाठवायचे आहे. शिक्षण कर्ज आणि यासारख्या अनेक कर्जांवर त्याला 12% किंवा त्याहून अधिक व्याज द्यावे लागणार आहे. हे गृह कर्जापेक्षा जास्त मोठे आहे.

परंतु जर असे झाले की त्या व्यक्तीला कर्ज घ्यायची गरजच पडली नाही तर? त्यांना फक्त हेच करावे लागेल की ते ज्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत होते त्यातून पैसे काढून घ्यावे. तोच पैसा ते मुलांच्या शिक्षणासाठी वापरून कर्जाचे व्याज भरण्यापासून मुक्ती मिळवू शकतात.

 

म्युच्युअल फंड मध्ये तुमचा पैसा सुरक्षित आहे का?

100% हो! जेव्हा कधी एखादी दुसरी म्युच्युअल फंड कंपनी एका कंपनीचे अधिग्रहण करते तेव्हा त्या कंपनीच्या सर्व योजना देखील स्वतःच्या हातात घेते. जर ते कोणत्याही अधिग्रहित योजनेला बंद करू इच्छित असतील तरी ते सध्याच्या NAV अनुसार गुंतवणूकदारांना पैसे परत करते.

 

कमीत कमी रकमेची गुंतवणूक

म्युच्युअल फंड यासाठी देखील योग्य आहे कारण यामध्ये ते गुंतवणूकदार देखील गुंतवणूक करू शकतात ज्यांच्याकडे मोठी रक्कम गुंतवणूक करण्यासाठी नसते. म्युच्युअल फंड मध्ये SIP ही सुविधा दिलेली आहे आणि यामध्ये तुम्ही 500 रुपयांपासून आपल्या इच्छेनुसार किती पण रक्कम गुंतवणूक करू शकतात.

म्युच्युअल फंड मध्ये कमी रिस्क असते

जर गुंतवणूकदार म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करू इच्छित असेल तर रिस्क काही प्रमाणात कमी होते. याशिवाय जर तुम्ही एखाद्या स्टॉक मध्ये किंवा कंपनीत पैसा गुंतविला तर त्या कंपनीच्या बुडण्याचा सोबत तुमचा पैसा देखील बुडेल.

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड चा सर्वात मोठा फायदा हा होतो की इथे तुमचा पैसा हा वेगवेगळ्या कंपन्यामध्ये गुंतविला जातो. यासोबत तुमचा पैसा हा वेगवेगळ्या स्टोकस आणि बॉण्ड मध्ये फंड मॅनेजर द्वारे लावला जातो.

याद्वारे गुंतवणूकदाराणा हा फायदा मिळतो की एका कंपनीत किंवा स्टोक मध्ये लावलेला पैसा जरी बुडाला तरी त्याचा तोटा हा दुसऱ्या म्युच्युअल फंड स्कीम मधून कंपनी रिकव्हर करून गुंतवणूकदाराला देते.

SIP चा अर्थ काय होतो?

SIP चा अर्थ Systematic Investment Plan होतो. याला मराठीत व्यवस्थित गुंतवणूक योजना असे म्हणले जाते. यामध्ये तुम्ही आठवड्याला, महिन्याला किंवा सहा महिन्यांना पैसे गुंतवू शकता. यामध्ये स्वतःहून गुंतवणूक होण्याचा एक पर्याय देखील असतो.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक SIP ने करावी की One Time Only करावी?

हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुमच्याकडे पैसे किती आहेत. तुमच्याकडे जास्त पैसे असतील तर तुम्ही One Time Only मध्ये गुंतवणूक करावी आणि कमी पैसे असतील तर SIP हा पर्याय निवडावा.

Conclusion | आज आपण काय शिकलो?

आम्हाला आशा आहे की आपल्याला म्युच्युअल फंड योग्य आहे की अयोग्य? हा लेख नक्की आवडला असेल. या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच म्युच्युअल फंड योग्य आहे की नाही आणि यात गुंतवणूक करणे कसे योग्य आहे याविषयी माहिती मिळाली असेल. आमचा प्रयत्न हाच असेल की वाचकांना म्युच्युअल फंड विषयी संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून त्यांना इतर ब्लॉग्स किंवा वेबसाईटवर जाण्याची गरज भासणार नाही.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “Mutual fund for long term investment in Marathi | म्युच्युअल फंड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी योग्य आहे की नाही?”

Leave a Comment