म्युच्युअल फंडाचे 12 फायदे | Benefits of Mutual Fund in Marathi

म्युच्युअल फंडाचे 12 फायदे | Benefits of Mutual Fund in Marathi

Benefits of Mutual Fund in Marathi: म्युच्युअल फंडचे फायदे काय आहेत? सध्याच्या काळात म्युच्युअल फंडच्या अनेक चांगल्या स्कीम्स आहेत त्यामुळे लोक म्युच्युअल फंड कडे आकर्षित होत आहेत व  त्यामुळे अधिकाधिक लोक म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याच्या विषयी जाणून घेऊ इच्छित आहेत.

या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंड च्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. यातून तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून त्याचा फायदा घेऊ शकतात. चला तर मग सुरू करूयात आणि या विषयावर जाणून घेऊयात.

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | Mutual Fund Tips in Marathi

आता तुम्हाला जर म्युच्युअल फंड विषयी माहिती असेल तर मग आता म्युच्युअल फंड मधून होणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊयात.

1. अनेक योजनांचे लाभ

सेबी(Securities and Exchange Board of India) द्वारे म्युच्युअल फंड च्या अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्यांना इक्विटी, डेट, हायब्रीड, यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. इक्विटी फंड च्या माध्यमातून गुंतवणूकदार वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करु शकतात. हा सर्वात जास्त जोखिम असलेला फंड आहे परंतू यातून मिळणारा रिटर्न देखील खूप जास्त असतो.

डेट फंड हा कमीत कमी जोखीम असलेला आहे असे म्हणतात. कारण याद्वारे ट्रेजरी बिल्स , कॉर्पोरेट बॉण्ड आणि सरकारी व्यवस्थेत गुंतवणूक केली जाते. हायब्रीड फंड हे जवळपास इक्विटी सारखेच असतात. अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही फायदा घेऊ शकतात.

2. गुंतवणुकीत विविधता

म्युच्युअल फंड अंतर्गत शेअर, बॉण्ड किंवा स्टॉक सारखे अनेक क्षेत्र येतात. यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात तुम्ही गुंतवणूक करू शकतात. इथे गुंतवणूकदार आपल्या बजेट अनुसार शेअर अथवा फंड खरेदी करू शकतात.

3. कमी किंमतीत चांगले पर्याय

म्युच्युअल फंड कमीत कमी गुंतवणुकीत गुंतवणूक करणाऱ्यांना अनेक सुविधा भेटतात. यामुळे गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची गरज नसते. गुंतवणूकदारांना कमीत कमी गुंतवणुकीत देखील एक चांगला रिटर्न यातून मिळू शकतो.
याचा आणखी एक फायदा हा आहे की तुम्ही तुमच्या बजेट अनुसार जवळपास 500 ते 1000 रुपये इतक्या कमी SIP पासून सुरुवात करू शकता. म्हणजेच यासाठी तुम्हाला जास्त पैसे असण्याची देखील गरज नसते आणि काही वर्षानंतर तुम्हाला मोठा फायदा देखील मिळतो.

4. पॉवर ऑफ कंपाउंडिंग सुविधा

इतर गुंतवणुकीपेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणूक करणाऱ्यांना एक चांगला रिटर्न देत असते. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवण्याकदार जितके जास्त कालावधी साठी गुंतवणूक करणार आहेत त्याच प्रमानात त्यांना रिटर्न तितक्या जास्त वेगाने वाढून मिळतो. यामध्ये गुंतवणूकदारांना पॉवर ऑफ कंपाउंडिंग ही सुविधा मिळत असते.

5. सोपी आणि सोयीस्कर ठिकाणावरून गुंतवणूक

म्युच्युअल फंड च्या माध्यमातून गुंतवणूकदार सहज कोणत्याही एका विश्वसनीय अँप किंवा म्युच्युअल फंड वेबसाईटच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रिया ही इतर गुंतवणुकीच्या प्रक्रियेपेक्षा खूप सोपी आहे.
सध्याच्या काळात अनेक असे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत ज्यांच्या माध्यमातून तुम्ही सहज एखादा म्युच्युअल फंड खरेदी करू शकतात. यामध्ये तुम्हाला ट्रॅकिंग, रिटर्न आणि ग्रोथ यांची माहिती देखील घेऊ शकतात. सध्याच्या काळात ऑनलाईन सगळे काही होत असल्याने म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणे भरपूर सोपे झाले आहे.

6. रिसर्च आणि एनालिसिस साठी लागणार वेळ कमी होतो

जर एखादा गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असेल तर त्याला बाजारात होणाऱ्या चढ उतार बघण्याची गरज कमी असते कारण हे सर्व म्युच्युअल फंड चालविणारे बघत असतात. तुम्हाला त्यासाठी काही analysis करावे लागत नाही आणि त्यासाठी मग तुमचा वेळ देखील वाचतो. फक्त एकदा निवेश केल्यानंतर 6 महिने किंवा 1 वर्षानंतर तुमच्या पोर्टफोलिओ विषयी जाणून घेत जा.

7. एक सुरक्षित गुंतवणुकीची गॅरंटी

म्युच्युअल फंड वर सेबी पूर्णपणे लक्ष देऊन असते. यातून तुम्हाला मिळणाऱ्या योजना आणि सर्व म्युच्युअल फंड विषयी माहिती यावर सेबीचे नियंत्रण असते. SEBI वेळेनुसार अनेक नवीन नवीन योजना देखील घेऊन येत असते. म्युच्युअल फंड सेबी द्वारे प्रमाणित आहे. त्यामुळे सेबी कडे नियंत्रण असल्याने तुम्ही गुंतवणूक करत असलेली रक्कम पूर्णपणे सुरक्षित असते.

8. पैसे काढण्यासाठी सोपी प्रक्रिया

म्युच्युअल फंड द्वारे गुंतवणूक केलेली रक्कम गुंतवणूकदार गरज पडल्यास सहज काढू शकतात. इतर गुंतवणुकीच्या ऑपशन मध्ये गुंतवणुकीचा कालावधी पूर्ण न झाल्यास तुम्ही पैसे काढू शकत नाही. परंतु म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला हवे असतात तेव्हाच पैसे काढण्याची सुविधा मिळते. त्यामुळे गरज असताना तुम्हाला पैसे मिळणार नाहीत ही समस्या उद्भवत नाही. ही रक्कम गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात 2 ते 3 दिवसात जमा करून दिली जाते. पैसे तुम्हाला कधीही काढता येत असल्याने अनेक लोकांना गुंतवणूक करण्यासाठी म्युच्युअल फंड चांगले वाटते.

9. ऑफिशियल सुविधांचा लाभ

गुंतवणूक करणाऱ्यांनी गुंतवणूक केल्यानंतर त्यातील काही रक्कम ही सुविधा देण्यासाठी कट करण्यात येते. ही रक्कम गुंतवणूकदाराचे पोर्टफोलिओ मेंटेन करण्यासाठी म्युच्युअल फंड मॅनेजर कडून घेण्यात येते. हे सर्व म्युच्युअल फंड मॅनेजर या क्षेत्रात एक्सपर्ट असल्याने गुंतवणूकदाराला ते एक चांगला रिटर्न देण्याचा प्रयत्न करतात.

तुमच्याकडून घेण्यात येणाऱ्या या रक्कमेच्या बदल्यात तुम्हाला अनेक ऑफिशियल सुविधा दिल्या जातात. कधी कधी अशा सुविधांचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येऊन म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करत असतात. त्यामुळे मग त्यांचा मॅनेजमेंट खर्च वाचतो आणि त्यांना अधिकाधिक फायदा होतो.

10. प्रशासकीय नियमांचे पालन

सर्व म्युच्युअल फंड कम्पनी त्यांच्या गुंतवणूकदारांना योग्य ते कागदपत्र देतात जेणेकरून त्यांना सर्व काही प्रशासकीय कागदपत्रे देता येतील. पुढे काहीही प्रशासकीय अडचणी गुंतवणूक करणाऱ्याला येणार नाहीत याची ते काळजी घेतात. यामध्ये मग वेळोवेळी गुंतवणूकदाराला NET ASSET VALUE (NAV) आणि त्यांच्या पोर्टफोलिओ खात्याची माहिती पाठविली जाते.

11. आपले लक्ष्य प्राप्तीसाठी मदत

एखाद्याचा गुंतवणूक करण्याचा हेतू हा त्याचे लक्ष्य पूर्ण करणे हाच असतो. मग यात त्याचे काहीही ध्येय असू शकते आणि त्यासाठी तो म्युच्युअल फड मध्ये गुंतवणूक करत असेल मात्र म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे ध्येय नक्कीच लवकर गाठू शकतात.
आता ही उद्दिष्टे किंवा ध्येय गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असतात. यामध्ये मग एखाद्याला घर बनवायचे असते त्यासाठी तो गुंतवणूक करत असतो तर कधी कधी कार घ्यायला एखादा गुंतवणूक करत असतो. म्युच्युअल फंड मधून तुम्हाला रिस्क कमी असते आणि गरजेला पैसे मिळतात त्यामुळे ध्येय आणि उद्दिष्ट्ये प्राप्तीसाठी तुम्ही म्युच्युअल फंड कडे बघू शकतात.

12. TAX सेव्हिंग

म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ELSS द्वारे तुम्ही TAX मध्ये बचत करू शकतात. ELSS हा टॅक्स वाचविण्याचा एक चांगला मार्ग आहे. याद्वारे गुंतवणूकदार म्युच्युअल फंड च्या कोणत्याही स्कीम मध्ये गुंतवणूक करून टॅक्स वाचवू शकतो.

FAQ

सर्वात चांगला म्युच्युअल फंड कोणता आहे?
=> इक्विटी म्युच्युअल फंड ला सर्वात बेस्ट म्युच्युअल फंड समजले जाते.

म्युच्युअल फंड मध्ये किती रिटर्न मिळतो?
=> म्युच्युअल फंड मध्ये कमीत कमी 10 ते 12 टक्के रिटर्न मिळतोच. हा रिटर्न जास्तीत जास्त कितीही जाऊ शकतो मात्र सध्या जास्तीत जास्त 30 ते 50 टक्के रिटर्न मिळत आहेत.

आज आपण काय शिकलो? | Conclusion

आम्हाला आशा आहे की आपल्याला आज Benefits of Mutual Fund in Marathi समजले असतील. आम्ही आजच्या लेखामधून म्युच्युअल फंड मधून होणारे फायदे व सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला याचा फायदा होईल अशीच आशा आहे.

हे देखील वाचा

Mutual fund for long term investment in Marathi

Share market information in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment