बॅकलिंक काय आहे | What is meaning of backlink in Marathi
What is meaning of backlink in Marathi: जर तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग असेल तर तुम्ही बॅकलिंक हे नाव बऱ्याच वेळा ऐकलं असेल, आणि बॅकलिंक म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. बॅकलिंक ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे जेव्हा तुम्ही SEO शिकत असता किंवा वेबसाईटसाठी SEO करत असता, कारण कोणत्याही वेबसाईटला रँक करण्यासाठी बॅकलिंक्स ह्या महत्त्वाची भूमिका बजावतात.
Backlinks बद्दल नॉलेज नसल्या कारणाने बरेच सारे नवीन ब्लॉगर्स आपल्या वेबसाईटला योग्य प्रकारे सर्च इंजिन मध्ये rank करण्यास अपयशी ठरतात. काही वेळा चुकीच्या किंवा स्पॅम बॅकलिंक बनवल्याने google तुमच्या वेबसाईटला Penalized देखील करते, म्हणजेच तुमची वेबसाईट सर्च रिझल्ट मध्ये दाखवणे बंद करून टाकतो.
What is Backlink in Marathi
नवीन ब्लॉगर्सला बॅकलिंक्स बद्दल थोडेफार नॉलेज असते पण हे थोडं नॉलेज तुमच्या वेबसाईटला गुगल वरून कायमचे गायब करू शकते. तुमची वेबसाईट लाईफ टाईमसाठी Penalized होऊ शकते. कोणत्याही ब्लॉगरला किंवा वेबसाईट ओनरला Backlinks बद्दल संपूर्ण माहिती असणे खूप आवश्यक आहे.
हा आर्टिकल तुम्ही शेवटपर्यंत जरूर वाचा, कारण यामध्ये आम्ही तुम्हाला बॅकलिंक्स बद्दल A to z सर्व माहिती देणार आहोत.
बॅकलिंक काय आहे? । What is backlink in Marathi
जेव्हा एखाद्या वेबसाईटवर दुसऱ्या वेबसाईटची लिंक दिली जाते त्याला बॅकलिंक म्हटले जाते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, तुम्ही तुमच्या वेबसाईटला माझ्या वेबसाईट सोबत लिंक केले तर त्या लिंक ला माझ्या वेबसाईटची बॅकलिंक म्हटलं जाईल. जेव्हा एखादा यूजर तुमच्या वेबसाईटवरून त्या link वर क्लिक करेल तेव्हा तो माझ्या website वर पोहचेल.
बॅकलिंक वेबसाईटसाठी खूप महत्त्वपूर्ण गोष्ट असते.जेवढ्या जास्त बॅकलिंक तुमच्या वेबसाईटला मिळतील, तेवढे तुमच्या वेबसाईटचे SEO strong होते. आणि तुमची वेबसाईट सर्च इंजिनमध्ये रँक करायला लागते.
Backlink meaning in Marathi
जेंव्हा एखाद्या वेबसाईटचा वेब पेज दुसऱ्या वेबसाईटच्या वेब पेज सोबत जोडलेले असते, तेव्हा त्यास बॅकलिंक असे संबोधले जाते. सोप्या शब्दांमध्ये बॅकलिंक हे एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईट मध्ये जाण्याचा मार्ग आहे.
SEO मध्ये बॅकलिंक या खूप निर्णायक भूमिका बजावतात. बॅकलिंक्स ह्या Off page SEO च्या सर्वात महत्वपूर्ण घटक आहेत. आशा करतो की तुम्हालाआता बॅकलिंक काय आहे या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल.
बॅकलिंक चे प्रकार । Types of backlink in Marathi
बॅकलिंक चे मुख्यतः दोन प्रकार पडतात
- No follow Backlinks
- Do follow Backlinks
यामध्ये कन्फ्युज व्हायचे काहीही कारण नाही की Dofollow Backlinks काय आहे? आणि Nofollow Backlinks काय आहे? हे दोन्ही कॉन्सेप्ट खूपच सोपे आहेत. चला तर मग सोप्या पद्धतीत आपण हे समजून घेऊयात.
1) Nofollow Backlinks काय आहे आणि ते कसे काम करते ?
Nofollow link एक अशी लिंक असते, ज्याची काहीही value नसते, म्हणजेच या लिंक वर क्लिक केल्यानंतर एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटवर जाता तर येते पण कोणत्याही Link मध्ये Nofollow टॅग सर्च इंजिन्सला हे दर्शवते की ह्या link ला Ignore केले जावे, जेव्हा सुद्धा सर्च इंजिन्स वेबसाईटमध्ये no follow टॅग असलेल्या links ला Crawl केले जाते तेव्हा त्यास दुर्लक्षित केले जाते.
Nofollow लिंक्स search इंजिनमध्ये रँक वाढवण्यासाठी उपयोगी नसते.
आता याचा अर्थ असा नाही की No follow लिंक्स काहीच कामाची नसते.
Nofollow links मुळे रँकिंग मध्ये कोणताही फरक पडत नाही , पण Dofollow links सोबत Nofollow लिंक्स देणे फार गरजेचे असते, तुमच्या वेबसाईटची हेल्थ चांगली ठेवण्यासाठी हे मदत करते.
डोमेन ऑथॉरिटी (DA), पेज ऑथॉरिटी (PA) स्थिर ठेवण्यासाठी कोणत्याही वेबसाईट मध्ये Dofollow लिंक्स सोबतच Nofollow बॅकलिंक्स देखील गरजेचे असतात.
2) Dofollow Backlink काय आहे आणि ते कसे काम करते?
Dofollow backlink अशी लिंक असते, जी प्रत्येकाला हवी असते.
हो, या लिंक सर्वांना हव्या असतात कारण या लिंक्स खूपच महत्त्वाच्या असतात, त्याचबरोबर सर्च इंजिन ची रँकिंग वाढवण्यासाठी देखील गरजेच्या असतात.
जेव्हा पण कोणत्या वेबसाईटचे रोबोट्स वेबसाईटला Crawl करतात, तेव्हा Dofollow लिंक्स ला Index करण्याची permission मिळते. ह्या लिंक एका वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटला जाण्यासाठी योग्य असतात. त्याचबरोबर google अशा लिंक ला Dofollow tag सोबत Crawl करते, ज्यामुळे तुमच्या वेबसाईटची रँक सर्च इंजिन मध्ये वाढते.
Nofollow लिंक्सपेक्षा Dofollow लिंक्स तुमची Ranking वाढवण्यासाठी उपयोगी ठरते.
Dofollow नेहमी योग्य प्रमाणात आणि High quality वेबसाईट कडून घेतली पाहिजेल. कारण, या लिंक्स जितक्या वेगाने सर्च इंजिनमध्ये तुमची रँकिंग वाढवतात , तितक्याच वेगाने तुमच्या वेबसाइटची रँकिंग कमी देखील करू शकतात. Bad आणि spam बॅकलिंक्स तुमच्या वेबसाईटची रँकिंग कमी करू शकतात किंवा सर्च इंजिन मधून तुमची वेबसाईट penalized होऊ शकते.
Backlinks कसे काम करते? । How Backlinks works in Marathi
कोणत्याही search इंजिन Algorithm मध्ये बॅकलिन्स खूप मोठा आणि महत्त्वाचा रोल प्ले करतात. बॅकलिंक म्हणजे काय हे समजणे खूपच सोपे आहे, चला तर एका उदाहरणावरून आपण हे समजून घेऊ.
असं मानूयात की प्रीतम नावाचा एक नवीन ब्लॉगर आहे आणि त्यानेस स्पोर्ट्स या टॉपिक वर एक इंटरेस्टिंग आर्टिकल त्याच्या वेबसाईटवर लिहिलेले आहे. दुसऱ्या बाजूला असं माना की अंकित नावाचा एक ब्लॉगर आहे ज्याचा ब्लॉग जुना आहे आणि सर्च इंजिन मध्ये चांगल्या प्रकारे रँक झालेला आहे. त्याचबरोबर त्याची सर्च इंजिन ची ऑथॉरिटी प्रीतम पेक्षा जास्त आहे.
अशामध्ये जेव्हा अंकितने त्याच्या ब्लॉगवर आर्टिकल लिहिते वेळी कोणत्या keyword सोबत प्रीतमच्या आर्टिकल ची लिंक दिली तर त्या लिंक ला बॅकलिंक असे मानले जाईल.
प्रीतम च्या आर्टिकलला जी बॅकलिंक मिळालेली आहे ती एक हाय ऑथॉरिटी ब्लॉग वरून मिळालेली आहे आणि त्यामुळे प्रीतमचा ब्लॉग सर्च इंजिन मध्ये रँक करायला लागेल त्याचबरोबर google सुद्धा प्रीतमच्या blog ला Top rank द्यायचा प्रयत्न करेल, कारण ती वेबसाईट एका हाय ऑथॉरिटी ब्लॉग सोबत linked आहे.
याच प्रकारे जेवढी जास्त हाय ऑथॉरिटी असलेल्या वेबसाईट कडून तुम्हाला बॅकलिंक मिळेल तेवढी जास्त तुमच्या वेबसाईटची ऑथॉरिटी वाढेल. जेवढी जास्त तुमच्या वेबसाईटला बॅकलिंक मिळेल तेवढी जास्त तुमच्या वेबसाईटचा SEO स्ट्रॉंग होईल त्याचबरोबर सर्च इंजिन मध्ये तुमची वेबसाईट टॉप रँक करायला लागेल.
Backlinks कशी तयार होते? । How to Make Backlinks in Marathi
नवीन ब्लॉगर च्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी येतो की, Backlinks तयार कशी होते?
वेबसाईटसाठी Backlinks बनवण्यासाठी वेळ आणि मेहनत दोघांची गरज असते, कधीही कोणत्याही शॉर्टकट मेथडने बॅकलिंक बनवू नये. जे ब्लॉगर नवीन असतात त्यांना, ह्या गोष्टीची माहिती नसते की, Backlinks kashi banvavi? आणि Quality backlinks kashi banavli jate?
बरेच नवीन ब्लॉगर्स spam websites वरून backlinks तयार करतात, ज्यामुळे त्यांची वेबसाईट सर्च इंजिन मध्ये कुठेही दिसत नाही. इथे आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या follow करून तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी high quality backlinks बनवू शकता.
- Social media profiles
तुम्हाला तुमच्या वेबसाईटची लिंक वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म जसे की फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर वर submit करायला लागेल, इथून तुम्हाला डायरेक्ट Do follow लिंक मिळेल. त्याचबरोबर या सर्व वेबसाईटची ऑथॉरिटी देखील जास्त असते, यांचा DA (DOMAIN AUTHORITY ) 90 पेक्षा जास्त असतो.
- Guest post
जर तुम्हाला कोणत्या वेबसाईट वरून जर तुमच्या वेबसाईटसाठी do follow बॅकलिंग बनवायची असेल तर हा सर्वात सोपा आणि प्रसिद्ध उपाय आहे. कोणत्याही वेबसाईट ओनरला फ्री मध्ये गेस्ट पोस्ट लिहिण्याची ऑफर देऊन तुम्ही त्या बदल्यात त्या वेबसाईट कडून 1-2 do follow बॅकलिंक घेऊ शकता.
- Comments
या प्रकारच्या बॅकलिंक्स तुम्ही दुसऱ्या वेबसाईटवर कॉमेंट्स करून बनवू शकता. परंतु या Nofollow बॅकलिंकच्या श्रेणीमध्ये येतात, ह्या बॅकलिंक्स बनवणे एवढे गरजेचे नसते, पण Nofollow backlinks देखील तुमच्या वेबसाईट साठी फायदेशीर असतात. आणि म्हणूनच यादेखील तुम्हाला जरूर बनवायला हव्यात.
- Profile websites
बऱ्याचशा अशा वेबसाईट्स असतात जिकडे तुम्ही तुमचे अकाउंट बनवू शकता आणि तुमची इन्फॉर्मेशन लिहू शकता, याचं websites मध्ये तुम्हाला website URL submit करण्याचा देखील ऑप्शन मिळतो. तिकडून तुम्ही do follow बॅकलिंक्स घेऊ शकता.
- Internal backlink
जेव्हा तुम्ही कोणताही आर्टिकल लिहिता त्यावेळेस आपल्या वेबसाईटच्या इतर आर्टिकल्स आणि त्यामध्ये जरूर link करावे आणि दुसऱ्या देखील हाय क्वालिटी वेबसाइट्सच्या पेजेसला आपल्या आर्टिकल मध्ये जरूर लिंक करावे. Internal Backlinks मुळे देखील तुमच्या वेबसाईटची रँकिंग वाढते.
CONCLUSION
बॅकलिंक्स बनवण्याच्या इतरही पद्धती असू शकतात पण आम्ही सांगितलेल्या वरील काही प्रसिद्ध पद्धती आहेत. जर तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमच्या वेबसाईटसाठी तुम्हाला high qualtiy backlinks बनवायचे असतील तर आम्ही तुम्हाला guest post लिहिण्याचे सजेस्ट करू.
तर मित्रांनो आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बघितले की बॅकलिंक काय आहे? ज्यामध्ये आम्ही तुम्हाला बॅकलिंक्स बद्दल सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आशा करतो की वरील लेख तुम्हाला आवडला असेल.
धन्यवाद.
What is Bounce rate in Marathi