What is Bounce rate in Marathi | जाणून घ्या बाउन्स रेट कमी कसा करावा?

What is Bounce rate in Marathi? | जाणून घ्या बाउन्स रेट कमी कसा करावा?

What is Bounce rate in Marathi: Bounce rate गुगलच्या महत्त्वपूर्ण रँकिंग फॅक्टर मधील एक आहे. याद्वारे गुगल कोणत्याही वेब पेजची गुणवत्ता आणि Relevancy बद्दल माहिती मिळवू शकतो. ब्लॉगिंग करते वेळी आपण वेगवेगळ्या SEO Optimization techniques चा वापर करतो. गुगलच्या result pages मध्ये आपली रँकिंग अधिक चांगली व्हावी या उद्देशाने आपण SEO techniques चा वापर करत असतो.

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण एक महत्त्वपूर्ण SEO फॅक्टर ज्याचं नाव Bounce Rate असे आहे याबद्दल, सविस्तर  माहिती जाणून घेणार आहोत. आज आपण जाणून घेऊयात की Bounce rate काय आहे? Bounce rate का वाढतो? आणि Bounce rate कमी कसा करावा? जर तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईटचा बाउन्स रेट खूप जास्त असेल तर मी खाली दिलेल्या टेक्निकचा वापर करून तो कमी करता येऊ शकतो.

Google च्या नजरेत High Bounce Rate म्हणजे low quality content असणारी वेबसाईट. अर्थात याची काही कारणे जरूर आहेत, जसे की..

Google नेहमी User experience लक्षात घेऊन आपल्या SERPs(Search Engine Results Pages) मध्ये वेबसाइट्सची क्रमवारी लावत असतो, त्यामुळे web pages चा Bounce Rate कमी ठेवणे SEO साठी खूप महत्वाचे आहे. या प्रकरणात, जर तुमच्या वेबसाइटचा बाऊन्स रेट जास्त असेल, तर Google सर्च इंजिनकडून ट्रॅफिक ची अपेक्षा करणे व्यर्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया Bounce rate म्हणजे काय?

What is ​Website Bounce Rate in Marathi?

Bounce rate हे गुगल अनालिटिक्स ची एक सर्व्हिस आहे ज्या माध्यमातून आपल्याला वेब पेजवर येणाऱ्या युजरच्या behavior बद्दल माहिती मिळत असते. उदाहरणार्थ , समजा तुम्ही गुगलवर “वेबसाईटचा bounce rate” असे सर्च केले आणि google ने पहिलाच पेजवर आमची वेबसाईट दाखवली, आणि तुम्ही त्याच्यावर क्लिक केले. असं समजा की आम्ही लिहिलेला आर्टिकल तुम्हाला आवडला आणि हा वाचायला तुम्हाला बराच वेळ लागला. जर तुम्ही बराच वेळ हा आर्टिकल वाचत असाल तर आमच्या वेबसाईटचा Bounce rate हा खूप कमी असेल आणि तुम्ही वेबसाईटवर घालवलेल्या वेळेबद्दल एक गूगल ला सिग्नल पाठवला जातो, की हा आर्टिकल युजरला आवडलेला आहे.

अशाप्रकारे जर तुमचा बाऊन्स रेट कमी असेल तर google तुमच्या वेब पेज रॅंकिंगला searched keyword नुसार show करेल. तुमची वेबसाईट Google च्या पहिल्या पेजवर रँक करणे म्हणजेच, जास्त ट्राफिक तुम्ही मिळवू शकता.

याउलट जर युजर्स तुमचे वेब पेज पसंत करत नसतील आणि तुमच्या वेबसाईटवर येऊन लगेच एक्झिट करत असतील तर तुमच्या वेबसाईटचा बाउन्स रेट हा वाढतो. आणि या नंतर google तुमची वेबसाईट रँक करत नाही.

What is ​Website Bounce Rate in Marathi
What is ​Website Bounce Rate in Marathi

Bounce Rate किती असायला हवा?

जेवढा Bounce Rate कमी असेल तेवढे आपल्या वेबसाईटसाठी हिताचे असते. वेगवेगळ्या वेबसाईट नुसार व त्यातील कॉन्टेन्ट क्वालिटीनुसार Bounce Rate हा वेगवेगळा असतो. जर आपण सुरक्षित बाउन्स रेटबद्दल बोलायचं झालं तर 30 टक्क्यांपर्यंत बाउन्स रेट हा सामान्य आणि चांगला मानला जातो. 30 ते 40 टक्क्यांपर्यंतचा बाऊन्स रेट हा Average मानला जातो.

पण 40% पेक्षा जास्त Bounce Rate हा खराब मानला जातो.

वेबसाईटचा Bounce Rate वाढण्याची कारणे

आपली वेबसाईट रँक होण्यासाठी आपण बऱ्याच प्रकारच्या SEO ऑप्टिमायझेशनचा उपयोग करतो. पण बाउन्स रेट वाढण्यामागे हा SEO चा देखील खूप मोठा वाटा असतो. बाउन्स रेट वाढण्याची काही महत्वपूर्ण कारणे खाली दिलेली आहेत.

  1. वेबसाइट लोड होण्याचा वेग कमी असणे किंवा वेबसाइट slow चालणे.
  2. वेबसाइटवर वाचण्यासाठी अधिक pages नसणे.
  3. Content quality खराब असणे, किंवा चुकीचा content प्रोव्हाइड करणे.
  4. अधिक त्रासदायक जाहिराती आणि चुकीचे अंतर्गत दुवे(External Links) असणे.
  5. चुकीच्या कीवर्डवर वेबसाइटची रँक मिळवणे.
  6. वेबसाइटची खराब रचना.
  7. Content reading करताना त्रास होणे, किंवा कॉन्टेन्ट ची रचना चुकीची केलेली असणे.
  8. Content मध्ये आवश्यक असलेल्या गोष्टी हायलाइट न करणे आणि आवश्यक शीर्षक न वापरणे.

इत्यादी कारणांमुळे बाउंस रेट वाढू शकतो.

Bounce Rate कमी कसा करावा?

खाली Bounce Rate कमी करण्यासाठी उपाय दिलेले आहेत.

Content च्या quality मध्ये सुधारणा करणे

कोणत्याही वेबसाईट मध्ये कॉन्टेन्ट हा सर्वात महत्त्वाचा समजला जातो. तुमचा कॉन्टॅक्ट लो क्वालिटी असणे, हा देखील तुमचा बाउन्स रेट वाढण्याचे कारण असू शकतो. जर तुम्ही तुमच्या वेबसाईटसाठी आर्टिकल लिहीत असाल तर युजरला तो आवडला पाहिजे याची खात्री नक्की करा. कोणत्याही युजरला low quality content वाचायला आवडत नाही. Low quality content म्हणजे अशी माहिती जी युजरला समजण्यास कठीण जाते. एकच गोष्ट परत परत सांगून आर्टिकल मोठे करणे, हा देखील low qaulity content चा भाग आहे.

आपल्या content सुधारणा करण्यासाठी तुम्ही सतत keyword चा वापर करणे टाळा. यामुळे User experience खराब होऊ शकतो.

जर तुम्ही एखादा Already पोस्ट झालेला आर्टिकल, थोडासा फेरबदल करून तुमच्या वेबसाईटवर टाकत असाल, आणि सतत keywords वापरून पोस्ट करत असाल, तर असे आर्टिकल्स युजर्स आणि गुगलला देखील आवडत नाहीत.

याउलट जर तुम्ही स्वतः तुमच्या वेबसाईटसाठी आर्टिकल लिहीत असाल, एक असा आर्टिकल ज्याची खरोखरच वाचकांना गरज आहे. असे केल्याने तुमच्या वेबसाईटचा bounce rate कमी होईल. आर्टिकल लिहिते वेळी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. योग्य ठिकाणी Headings, व आवश्यक असेल तिथे Bold, Italic, Underline करायला विसरू नका.

वेबसाइट Loading Speed मध्ये सुधारणा करणे 

वेबसाईटच्या Bounce rate ला कमी करण्यासाठी तुमची वेबसाईट फास्ट लोड होणे आवश्यक आहे. कोणताही यूजर तुमची वेबसाईट लोड होण्यासाठी केवळ एक ते दोन सेकंद वाट पाहतो. पण जर तुमच्या वेबसाईटला लोड होण्यास वेळ लागत असेल तर किमान चार ते पाच सेकंद लागतात. अशा वेळेस युजर तुमचा Content न बघताच वेबसाईट सोडतो. त्यामुळे चांगल्या दर्जाचा Content सुद्धा गुगलच्या नजरेत तो Low कॉलिटी Content म्हणून गणला जातो.

तुमच्या वेबसाईटची loading speed फास्ट करण्यासाठी खाली काही tricks दिल्या आहेत.

  1. Fast Web Hosting चा वापर करा. शक्य असल्यास Cloud Hosting चा वापर करा.
  2. कमीतकमी Javascript चा उपयोग करा.
  3.  WebPage मध्ये उपयोग केल्या जाणाऱ्या HTML, CSS, JavaScript, PHP इत्यादीना Compress करून त्याची Size कमी करा.
  4.  वेबसाइट वर Latest php version चा वापर करावा.
  5.  Image upload करण्यापूर्वी त्याची साईज कमी करून कंप्रेस करा.
  6.  वेबसाईटवर खूप जास्त प्लगिन चा उपयोग करू नका.
  7.  Blog वर खूप जास्त Ads दाखवू नका.
  8.  वेबसाइट चे डिझाईन Clean and Simple ठेवा.
  9.  पोस्ट च्या शेवटी Related Posts चा उपयोग करा.

नेहमी आपल्या आर्टिकल च्या शेवटी काही रिलेटेड आर्टिकल्स चा उपयोग करा. Related Posts ना तुमच्या आर्टिकल च्या शेवटी ठेवल्यामुळे विजिटर्स खूप वेळ तुमच्या वेबसाईट मध्ये गुंतून राहतात. जर ते आर्टिकल्स वाचण्यासारखे असतील तर विजिटर्स त्यावर क्लिक करून देखील ते वाचतील, अशाप्रकारे तुम्ही युजर्स ना तुमच्या वेबसाईटवर वेळ घालवण्यासाठी प्रवृत्त करू शकता.

What is Guest Post in Marathi

Internal Linking चा वापर करा

कोणत्याही वेबसाईटसाठी इंटरनल लिंक खूप गरजेच्या असतात. या प्रक्रियेमध्ये पोस्टशी संबंधित काही अन्य ब्लॉग आर्टिकल्सच्या link add केल्या जातात. असे केल्यामुळे आपल्या वेबसाईटचा Bounce Rate तर कमी होतोच पण SEO देखील सुधारण्यास मदत होते.

Post मध्ये Images चा वापर करावा 

पोस्टमध्ये इमेजेस चा उपयोग करणे SEO साठी फार महत्त्वाचे असते. तुमच्या आर्टिकलशी संबंधित इमेजेस वापरून तुम्ही, वेबसाईटचा Bounce Rate कमी करू शकता. Images च्या माध्यमातून तुम्ही तुमचा टॉपिक users पर्यंत easily पोहचवू शकता.

Post मध्ये छोट्या पॅरेग्राफ चा उपयोग करावा :-

कोणालाही अव्यवस्थित आणि खूप मोठे परिच्छेद वाचायला आवडत नाही, म्हणूनच तुमचा आर्टिकल हा कमी शब्दात आणि छोट्या पॅरेग्राफ मध्ये लिहावा. त्याचबरोबर काही पॅरेग्राफ लिहून झाल्यानंतर Headings चा वापर करावा.

Table of Contents चा वापर करावा

आपल्या आर्टिकलला अधिक आकर्षित बनवण्यासाठी तुम्ही table of contents चा वापर करू शकता. Table ऑफ content मुळे user ला त्या आर्टिकल मध्ये काय वाचायला मिळणार आहे याची कल्पना मिळते. 80% users ना Headline वाचायला आवडते, जर वापरकर्त्याला हेडलाईन आवडली तर तो त्यावर क्लिक करून तुमचा पुढील आर्टिकल नक्की वाचेल. यासाठी तुम्ही table of content प्लगीन चा use करू शकता.

आर्टिकल मध्ये जास्तीत जास्त शब्दांचा वापर करावा

लक्षात ठेवा जेवढा तुम्ही छोटा आर्टिकल लिहाल तेवढ्या कमी वेळात व्हिजिटर्स त्यास वाचून एक्झिट करतील. आणि म्हणूनच कोणत्याही विषयावर आर्टिकल लिहिते वेळी तो कमीत कमी दीड ते दोन हजार शब्दांचा लिहावा.

Google च्या नजरेत असे आर्टिकल्स अप्रतिम मानले जातात. कोणत्याही विषयावर संक्षिप्तपणे लेख लिहिल्यावर, user त्यास लक्षपूर्वक वाचेल आणि वेबसाईटवर अधिक समय व्यतीत करेल.

Conclusion

आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बघितले की Bounce rate काय आहे? (What is Bounce rate in Marathi) त्याचबरोबर बाउन्स रेट कमी करण्यासाठी उपाय. जर तुम्हाला गुगल कडून फ्री मध्ये ऑरगॅनिक ट्राफिक प्राप्त करायचे असेल तर तुमचा बाउन्स रेट कमी असणे अत्यावश्यक आहे.

मित्रांनो वरील आर्टिकल बद्दल जर तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मार्फत नक्की विचारा.

धन्यवाद.

Also read,

How to Increase Blog Traffic in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment