बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, परंतु तुम्हाला माहीत आहे का बिल गेट्स हे पैशाच्या बाबतीतच नाहीत, तर मानवतेच्या बाबतीतही ते खूप श्रीमंत आहेत. बिल गेट्सने यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली होती, ज्यामध्ये बिल गेट्स यांनी आतापर्यंत २६ अब्ज डॉलर्स दान केले आहेत. आजच्या या लेखामध्ये मी बिल गेट्स यांच्या बद्दल काही आश्चर्यकारक माहिती सांगणार आहे.
१. बिल गेट्सचे यांचे संपूर्ण नाव विल्यम हेन्री गेट्स III आहे.
२. केवळ 19 व्या वर्षी बिल गेट्सने यांनी आपला पहिला कॉम्प्यूटर प्रोग्रॅम विकला होता, जो एक शाळेच्या टाइम टेबल चे एक सॉफ्टवेअर होते.
३. जेव्हा बिल गेट्स हायस्कूलमध्ये होते तेव्हा त्यांनी आपल्या शाळेच्या संगणक प्रणालीचा हॅक केले होते.
४. बिल गेट्स यांच्या कडे कोणत्याही विद्यापीठाची पदवी नाही आहे. बिल यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने माइक्रोसॉफ्ट नावाची कंपनी सुरु केली होती, त्यामुळे त्यांनी कॉलेज मध्येच सोडून दिले होते.
५. महाविद्यालयात असताना एकाने त्यांना त्यांचे लक्ष्य काय आहे असे विचारायचे होते तेव्हा बिल गेट्स यांनी त्यांना सांगितले होते की त्यांना ३० वर्षापर्यत एक मिलीनीर बनू इच्छित आहेत आणि खरे तर बिल आपल्या वयाच्या एकतिसाव्या वर्षी मिलीनीर बनले होते.
६. १९८६ मध्ये, बिल यांची मायक्रोसॉफ्ट कंपनी स्टॉक मार्केटमध्ये उतरली आणि १९९२ मध्ये ते अमेरिकेतील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आणि १९९५ मध्ये ते जगातील सर्वात श्रीमंत माणूस ठरले होते.
७. १९७७ मध्ये बिल गेट्स यांना कारागृहात सुद्धा जायला लागले होते. कारण त्यांच्या कडे ड्रायव्हिंग लायसेंस न्हवते आणि ते रेड सिग्नल क्रॉस करताना पकडले गेले होते.
८. १९९४ मध्ये बिल गेट्स यांनी आपली मैत्रीण मेलिंडा फ्रेंच सोबत विवाह केला आणि आता त्यांना ३ मुले आहेत.
९. आश्चर्याची बाब म्हणजे, बिल गेट्स त्यांच्या मुलांना फक्त 10 दशलक्ष डॉलर्स देणार आहेत व त्यांची पूर्ण संपत्ती ७२ दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त आहे
१०. बिल इतके हुशार होते की त्यांनी लहानपणातच एक गेम बनवला होता ज्यामध्ये दोन खेळाडू होते, एक संगणक आणि एक मानव.
११. बिल गेट्सचे यांचे घर ६६ हजार चौरस फुटांपर्यंत पसरले आहे आणि ते बनवण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरले आहे ते अतुलनीय आहे.
१२. बिल गेट्स यांना एक देश म्हणून मानले गेले, तर ते जगातील ३७ व्या क्रमांकाचे श्रीमंत देश ठरेल.
१३. बिल गेट्स दर सेकंद सात हजार रुपये कमावतात.
१४. जर बिल गेट्स यांच्या कडून जमिनीवर 100 डॉलर्स पडले तर जो पर्यंत त्यांना ते उचलतील त्या वेळात ते त्या पेक्षा जास्त पैसे कमवलेले असतील.
१५. जर बिल गेट्स यांनी दररोज 6 दशलक्ष डॉलर्स खर्च केले तर संपूर्ण संपत्ती खर्च करण्यासाठी त्यांना १०० वर्षे लागतील.
१६. २७ जून २००८ रोजी बिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्टच्या अध्यक्षतेतून राजीनामा दिला होता आणि आता ते आता आपला वेळ लोकोपचारामध्ये व्यतीत करतात.
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.