New Business Ideas in Marathi | Home Business ideas in Marathi | 51+ बिझनेस आयडिया

Topics

Top 51+ small scale business ideas in Marathi | कमी खर्चात नवीन बिझनेस (लघु उद्योग) आयडिया (कमी गुंतवणुकीचे बिझनेस)

New Business Ideas in Marathi: कमी खर्चात एखादा नवीन बिझनेस सुरू करण्यासाठी काही आयडिया Laghu Udyog Small Business Ideas in 2024 with low investment in marathi कमी गुंतवणुकीत सुरू होणार बिझनेस

पैसे ही जीवनात खूप महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक व्यक्ती हा जीवनात त्याच्या अशा एका काळातून जात असतो जेव्हा त्याला पैसा कमवावा वाटतो किंवा त्याला पैसे मिळायला लागतात. आजच्या घडीला आपले शिक्षण आणि अभ्यास हा अशा स्तराचा आहे की आपल्या प्रत्येकाच्या मनात काही न काही तरी नवनवीन कल्पना सुरू असतात. आजच्या युवा पिढीच्या डोक्यात काहीतरी नवीन करण्याची जिद्द आपल्याला दिसून येते. परंतु आपले शिक्षण आणि आपल्याकडे असणारी जिद्द या दोन गोष्टी एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी पुरेशा नाहीत. तुम्ही नवीन एखादा व्यवसाय जरी सुरू केला तरी त्याला पुढे सुरू ठेवणे हे कठीण असते.

कमी खर्चातील व्यवसाय (Small Business Ideas in Marathi)

जर एखादा व्यक्ती त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करत असेल तर त्यासाठी त्याला एक चांगली रक्कम गुंतवणूक म्हणून आणि एक प्लॅनिंग असणे गरजेचे असते. आता गुंतवणूक म्हणले की तुमच्यासमोर एक मोठी रक्कम येत असेल मात्र कमीत कमी गुंतवणुकीत देखील आपण आपला एक बिझनेस सुरू करू शकतो.

इथे आम्ही अशाच काही बिझनेस आयडिया विषयी सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून स्वतःचा व्यवसाय करू शकता.

1) रिक्रुटमेंट फर्म (Recruitment Firm Business Ideas in Marathi)

रिक्रुटमेंट फर्म म्हणजे अशी एक एजन्सी आहे जिच्या माध्यमातून युवा वर्गाला त्यांच्याशी निगडित क्षेत्रात जॉब मिळवून दिला जातो. तुम्ही जर अशा प्रकारच्या व्यवसायाविषयी विचार करत असाल तर तुम्हाला एका चांगल्या नेटवर्क ची गरज असते. आजच्या काळात अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी अशा फर्म ची मदत घेतात. त्यातून त्यांना सहज कर्मचारी भेटतात. कंपनी कडून अशा फर्म्स ला कर्मचाऱ्याच्या पगारातील काही टक्के पैसा मिळतो.

2) रिअल इस्टेट कंपनी (Real Estate Company Business Ideas in Marathi)

व्यक्ती जितका जास्त पैसा कमावतो तितका जास्त त्याला कुठे तरी गुंतवणूक करण्याची गरज पडते. प्रॉपर्टी मध्ये गुंतवणूक करणे हे खूप फायद्याचे ठरते. जर एखादा व्यक्ती रिअल इस्टेट कम्पनी मधून एखादी प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्या कंपनीला त्या व्यक्तीकडून प्रॉपर्टीच्या किंमतीच्या काही टक्के रक्कम ही मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एक रिअल इस्टेट कंपनी सुरू करण्यासाठी गुंतवणूक ही खूपच कमी प्रमाणात लागते.

3) ऑनलाइन मार्केटिंग (Online Shopping Portals Business Ideas in Marathi)

ऑनलाइन मार्केटिंग चा अर्थ इथे आपण कोणतीही वस्तू ऑनलाइन विक्री करू शकतो हा होतो. यामध्ये महिलांच्या वापरातील वस्तू पासून ते घरघुती किराणा वैगेरे सर्व काही तुम्ही ऑनलाइन प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून विक्री करू शकतात. यामध्ये तुम्हाला स्टॉक भरून ठेवायची गरज पडत नाही. जेव्हा तुमच्याकडे एखादी ऑर्डर येईल त्यानंतर तुम्ही ती वस्तू लगेच खरेदी करून तिची पुनरविक्री करू शकता. याप्रकारे तुम्हाला एकाच वेळी जास्त गुंतवणूक करण्याची काही गरज नसेल.

4) ऑनलाइन ब्लॉगिंग आणि स्वतःची वेबसाईट बनविणे (Blogging and Website Business Ideas in Marathi)

आजच्या काळात सर्वात चांगला आणि तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल तसे काम करता येईल असा हा एकमेव व्यवसाय आहे. हा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट साठी डोमेन नेम घेण्यासाठी लागणार सर्वात कमी खर्च येतो. जर तुम्हाला होस्टिंग साठी जर पैसे खर्च करायचा नसतील तर तुम्ही गुगल ब्लॉगर या फ्री प्लेटफॉर्मचा वापर करून वेबसाईट सुरू करू शकता. यामध्ये देखील अनेक वेबसाईट साठी डिझाईन उपलब्ध आहेत. या सर्वांचा वापर करून आपण लिहायला सुरु करू शकता. जस जसा तुमचा ब्लॉग प्रसिद्ध होत जाईल तसे तसा तुम्हाला पैसे मिळायला लागतील. वेबसाईट कशी बनवायची याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

5) इव्हेंट मॅनेजमेंट फर्म (Event Management Business Ideas in Marathi)

आजच्या घडीला सर्व लोक इतके जास्त बिझी झालेले आहेत की प्रत्येकाला स्वतःच्या घरातील एखाद्या समारंभाचे प्लॅनिंग देखील करता येत नाही. त्यांना त्यासाठी वेळच नाहीये. घरातील कोणताही समारंभ असेल तर तो चांगल्या प्रकारे प्लॅन व्हायला हवा असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते. इव्हेंट मॅनेजमेंट फर्म ही अशी संस्था असते जी असे समारंभ अगदी सुरळीत आणि प्लॅनिंग सोबत करत असते. या बदल्यात ते काही पैसे घेतात मात्र त्यांच्याकडून तुमच्या कार्यक्रमाचे अगदी व्यवस्थित आयोजन केले जाते त्यामुळे लोक आता कार्यक्रम त्यांना देत असतात. असा बिझनेस तुम्ही सुरू करून चांगल्या प्रकारे कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त पैस्व कमवू शकता.

6) ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (Training Institute Business Ideas in Marathi)

ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारची ट्रेनिंग इतरांना देऊ शकता. तुम्ही स्वतःची इन्स्टिट्यूट सुरू करून त्यात काही ट्रेनर कमिशन किंवा सॅलरी बेसीस वर घेऊन त्यांच्याद्वारे लोकांना ट्रेनिंग देऊ शकता. यासाठी तुम्हाला एक चांगली जागा असणे गरजेचे आहे. याशिवाय तुम्हाला इतर कोणतीही गरज नसेल.

7) ज्वेलरी बनविणे (Jewel Making Business Ideas in Marathi)

आजच्या काळात सोन्याच्या दागिन्यांपेक्षा आर्टीफिशियल दागिने जास्त वापरले जात आहेत. यामध्ये लोकांना दररोज नवनवीन डिझाईन हव्या आहेत. जर तुमच्याकडे अशाच प्रकारच्या काही आयडिया असलेल्या डिझाइन्स असतील तर तुम्ही त्या डिझाईनच्या नवीन ज्वेलरी बनवू शकता. कमीत कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात.

8) महिलांसाठी जिम (Female Gym Business Idea in Marathi)

आजच्या काळात आपण बघितले तर महिलांमध्ये प्रत्येक 2 महिलांच्या मागे एका महिलेचा वजन वाढलेले आहे. त्यामुळे फक्त महिलांसाठी एक स्वतंत्र जिम सुरू करणे ही आयडिया फायदेशीर ठरेल. महिलांसाठी कमी मशीन सोबत तुम्ही जिम सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला गुंतवणूक जास्त लागणार नाही. पुरुषांसाठी असणाऱ्या जिमच्या तुलनेत खूप कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू होऊ शकतो.

9) मोबाईल फूड कोर्ट (Mobile Food Court Business Idea in Marathi)

आजच्या काळात कोणाकडे जास्त वेळ नाहीये. त्यामुळे अनेक लोक एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण करण्याऐवजी घर बसल्या ऑर्डर करून खाणे पसंत करतात. त्यामुळे मोबाईल फूड कोर्ट ही बिझनेस म्हणून सुरू करण्यासाठी एक चांगली आयडिया आहे.

10) वेडिंग प्लॅनर (Wedding Planner Business Idea in Marathi)

वेडिंग प्लॅनर म्हणजे एखाद्याच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेणे होय. यामध्ये तुम्हाला तुम्ही केलेल्या आयोजनाचे पैसे मिळतात. आजच्या काळात सर्व काही मॅनेज करणे कठीण आहे त्यामुळे लोक लग्नासाठी बाहेरून लोकांना ऑर्डर देतात. त्यामुळे आताच्या काळात ही एक चांगली आयडिया आहे.

11) कोचिंग इन्स्टिट्यूट (Coaching Institute Business Idea in Marathi)

ऑनलाइन चा काळ आता सुरू झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही घर बसल्या एक कोचिंग इन्स्टिट्यूट सुरू करू शकता. यामध्ये तुम्हाला सर्व काही ऑनलाइन करायचे असल्याने कोणत्याही प्रकारे जागेची किंवा इन्व्हेस्टमेंट ची गरज नसणार आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात शिक्षित आहात आणि तुम्हाला जे येत असेल त्या विषयी तुम्ही ऑनलाइन शिकवू शकता.

12) मॅट्रीमोनी सर्व्हिस (Matrimony Business Idea in Marathi)

तुम्ही जर एखाद्या सोशल मीडियावर चांगले ऍक्टिव्ह असाल आणि तुम्हाला लोकांशी ओळख करून घेणे आणि लोकांशी ओळख ठेवणे आवडत असेल तर तुम्ही लग्न जुळविण्यासाठी एखादी मॅट्रीमनी सर्व्हिस सुरू करू शकता. तुम्ही यामध्ये वधू वरांचे मिलन केंद्र सुरू करतात आणि दोन लोकांचे लग्न लावून देतात. यासाठी तुम्हाला काही पैसे मिळतात. तुमची या बिझनेस मध्ये गुंतवणूक खूप कमी असते आणि कमाई लाखात होऊ शकते.

13) योगा शिक्षक (Yoga Instructor Business Idea in Marathi)

तुम्हाला जर पार्ट टाईम मध्ये एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही तुमच्यासाठी एक बेस्ट आयडिया आहे. जर तुमच्याकडे याच्याशी निगडित सर्टिफिकेट नाहीये तर मग तुम्ही काही कोर्सेस करून हे सर्टिफिकेट सहज मिळवू शकतात. याद्वारे तुम्ही तुमचा बिझनेस सुरू करू शकतात.

14) इंटेरिअर डिझाईनर (Interior Designer Business Idea in Marathi)

हा देखील एक कोर्स आहे आणि याचे प्रमाणपत्र तुम्ही कधीही मिळवू शकतात. यामध्ये व्यवसायामध्ये तुम्ही एखादा ऑफिस किव्हा घराच इंटेरिअर डिझाईन करून देऊ शकता व त्या मोबदल्यात तुम्हाला पैसे भेटतात.

15) ऑनलाइन किराणा दुकान (Kirana or Grocery Store Business Idea in Marathi)

आज सर्व लोकांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या घराच्या दरवाजा पर्यंत हवी असते. त्यामुळे किराणा स्टोअर सुरू करून घरपोहोच डिलिव्हरी देणे ही एक चांगली बिझनेस आयडिया आहे. यामध्ये तुम्हाला एकदाच सर्व सामान घेऊन ठेवायची गरज नसेल. जशी ऑर्डर येईल तशी तुम्ही मागणी करून पुढे लोकांना विक्री करू शकता.

16) इन्शुरन्स एजन्सी (Insurance Agency Business Idea in Marathi)

आजच्या काळात इन्शुरन्स म्हणजेच विमा ही लोकांची सर्वात मोठी गरज बनलेली आहे. अशा काळात अनेक कंपन्या स्वतःचे काम पुढे नेण्यासाठी लोकांचे इन्शुरन्स करण्यासाठी एजंट ठेवत असतात. तुम्ही अशाच प्रकारे एक एजंट बनून स्वतःची इन्शुरन्स एजन्सी सुरू करू शकता. तुम्हाला यासाठी काहीही गुंतवणूक करायची गरज नाहीये आणि याउलट इन्शुरन्स काढून दिल्यानंतर कंपन्या तुम्हाला काही कमिशन देखील देतील.

17) फेस्टिव्हल गिफ्ट बिझनेस (Festival Business Idea in Marathi)

एखादा सण उत्सव असेल तर मग एखाद्या गिफ्ट शिवाय ते अपूर्णच असतात. अशा काळात तुम्ही सण उत्सवांसाठी गिफ्ट बिजनेस सुरू करू शकतात. तुम्हाला एखादा उत्सव निवडून त्याच्याशी निगडित काहीतरी गिफ्ट शोधायचे आहेत आणि त्यांची विक्री करण्याचा व्यवसाय सुरू करायचा आहे. हे गिफ्ट एकमेकांना देण्यासाठी लोक खरेदी करतील अशी असावीत. तुम्हाला काहीतरी वेगळं गिफ्ट द्यायच्या आयडिया असतील आणि तुम्ही त्या वस्तूंची विक्री केली तर मग तुम्हाला यातून लवकरच खूप जास्त फायदा होऊ शकेल.

18) मनुष्यबळ पुरविणे (Provide Manpower Business Idea in Marathi)

मनुष्यबळ पुरविणे याचा साधा सरळ अर्थ आहे की लोकांना जॉब देणे. किंवा एखाद्या कंपनीला कामगार शोधून देणे. प्रत्येकाला सध्या जॉब हवा आहे आणि जॉब मिळविणे तसे कठीण होत चाललेले आहे. त्यामुळे तुम्ही अशा लोकांना जॉबच्या संधी मिळवून देऊन त्यातून कमिशन बनवू शकता. यासाठी तुम्हाला मोठ्या कंपन्या मध्ये जॉबच्या संधी शोधाव्या लागतील आणि ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींच्या पर्यंत या संधी घेऊन जाव्या लागतील. काहीही गुंतवणूक न करता या व्यवसायातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

19) किराणा दुकान (Grocery Store Business Ideas in Marathi)

एक किराणा दुकान हे एका छोट्या जागेत थोड्या सामानापासून देखील सुरू होऊ शकते. तुम्ही जिथे राहता तिथे जर जवळपास दुकान कमी असतील किंवा बाजारातून सामान आणण्यासाठी तुम्हाला थोडं लांब जावे लागत असेल तर मग तुम्ही तुमच्या घरातच एक किराणा दुकान सुरू करू शकता. कमी गुंतवणूक करून सुरुवात करण्यासाठी ही एक चांगली संधी आहे.

20) आईस्क्रीम पार्लर (Ice Cream Parlour Business Ideas in Marathi)

थंडी असो किंवा उन्हाळा, लोकांना आईस्क्रीम खायला खूप आवडते. जेवणानंतर काही लोकांना आईस्क्रीम खाण्याची सवय असते आणि जर त्यांना ती मिळाली नाही तर ते आइस्क्रीम खाण्यासाठी कितीही दूर जायला तयार असतात. तुम्ही तुमच्या घरातील फ्रीज मध्ये आईस्क्रीम ठेवून घरबसल्या स्वतःचे एक आईस्क्रीम पार्लर सुरू करू शकतात. यामध्ये तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाहीये. हळूहळू तुम्ही तुमचा हा व्यवसाय वाढवू शकतात.

21) झेरॉक्स दुकान (Xerox shop Business Idea in Marathi)

हा कमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त फायदा देणारा व्यवसाय आहे. या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एका फोटोकॉपी म्हणजेच झेरॉक्स मशिनची गरज असेल. यासाठी तुम्हाला काही रक्कम गुंतवणूक करावी लागेल मात्र नंतर तुम्हाला त्याहून अधिक फायदा होऊ शकेल. प्रत्येक दिवशी ऑफिस मध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा मुलांना झेरॉक्स करण्याची गरज भासते. तुम्ही या गोष्टीला एक बिझनेस म्हणून सुरू केले तर तुम्हाला भरपूर फायदा होऊ शकेल.

22) फायनान्शियल प्लॅनिंग सर्व्हिस (Financial Business Idea in Marathi)

अनेक लोक असे असतात ज्यांच्याकडे पैसा तर भरपूर असतो मात्र त्याला योग्य ठिकाणी गुंतवून त्यातून जास्तीत जास्त रिटर्न कसा मिळविता येईल याविषयी त्यांना माहिती नसते. तुमच्याकडे फायनान्स विषयी थोडीफार जरी माहिती असेल तर तुम्ही त्याच्याशी निगडित प्लॅनिंग सर्व्हिस देऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक ही करावी लागत नाही.

23) ब्युटी पार्लर (Beauty Parlour Business Idea in MArathi)

तुमच्या घरात जागा असेल किंवा शेजारी एखादि जागा घेऊ शकत असाल तर तुम्ही ब्युटी पार्लर विषयी थोडेसे ज्ञान घेऊन स्वतःचा ब्युटी पार्लर आणि सलून किंवा स्पा सारखा व्यवसाय सहज सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला हजारो रुपयांची कमाई सहज होऊन जाते.

24) गेम स्टोअर (Game Store Business Idea in Marathi)

आजच्या पिढीतील लहान मुलांना गेम खेळायची किती आवड आहे हे आपल्याला माहीत आहे. घरात कुटुंबातील सदस्य आणि पालक त्यांना जास्त वेळ गेम्स खेळू देत नाहीत. त्यामुळे मुले अशी जागा शोधत असतात जिथे बसून ते आरामात गेम्स खेळू शकतील. तुम्ही तुमच्या परिसरात एखाद्या ठिकाणी असे गेम स्टोअर सुरू करू शकतात. इथे येऊन मुले गेम्स खेळू शकतात. असे स्टोअर्स सुरू करायला तुम्हाला काही गेमिंग डिव्हाईस असायला हवेत. तुम्हाला हे डिव्हाईस भाडे तत्वावर मिळून जातील.

25) कार ड्रायव्हिंग स्कुल (Car Driving School Business Idea in Marathi)

कार चालवायला अनेकांना शिकायचे आहे आणि त्यासाठी त्यांना एका ट्रेनरची गरज असते जो कमी कालावधीत त्यांना योग्य प्रकारे कार चालवायला शिकवू शकेल. जर एखाद्या व्यक्तीला गाडी चालवता येत असेल तर तो त्याची ड्रायव्हिंग स्कुल सुरू करून हजारो रुपये कमवू शकतो. या व्यवसायात तुम्हाला जास्त वेळ देण्याची देखील गरज नसते. एक कार तुम्हाला घ्यावी लागेल. याशिवाय त्या गाडीत ड्रायव्हिंग स्कुल साठी असणारे ब्रेक क्लच सिस्टम असली पाहिजे. तुमच्याकडे कार ड्रायव्हिंग स्कुल चालविण्याचा परवाना देखील असायला हवा.

26) सेकंड हॅन्ड गाड्यांचा व्यवसाय (Old Car Selling Business Idea in Marathi)

लोकांना नवीन कार घेण्याच्या वेळी त्यांची जुनी कार विकायची असते. त्यासाठी ते एका चांगल्या किंमतीत विकत घेणाऱ्या व्यक्तीच्या शोधात असतात. एक चांगला ग्राहक शोधण्यासाठी ते अनेक वेबसाईट ची मदत घेतात मात्र त्यांना योग्य तो खरेदी करणारा मिळत नाही. अशा परिस्थितीत ते एका व्यक्तीच्या शोधात असतात जो त्यांच्या गाडीला एक चांगला ग्राहक मिळवून देऊ शकेल. त्यासाठी तुम्ही एक सेकंड हॅन्ड डीलर म्हणून काम करू शकतात. तुम्ही एखादी जुनी गाडी खरेदी करून तिला जास्त किंमतीत विक्री करून नफा मिळवू शकता किंवा एखाद्याची गाडी विकून देऊन त्यातून कमिशन मिळवू शकता.

27) होम पेंटर (Home Painter Business Idea in Marathi)

आपण नवीन घर बांधले की आपल्याला आपल्या घराला एक चांगला रंग द्यायचा असतो. भिंतींवर नवनवीन डिझाईन बनवायच्या असतात. त्यामुळे जर तुमच्याकडे पेंटिंग विषयी चांगले कौशल्य असेल तर तुम्ही घराघरात जाऊन एक चांगली सर्व्हिस देऊ शकतात. यातून तुम्हाला मुबलक प्रमाणात पैसा मिळेल. आजच्या घडीला अशा कुशल कामगारांची खूप गरज आहे.

28) ऑनलाइन बुक स्टोअर (Online Book Store Business Idea in Marathi)

लोकांना पुस्तके वाचायला आवडतात. त्यामुळे ऑनलाइन काही लोक पुस्तके वाचतात तर काही लोक ऑनलाइन वेबसाइटवरून पुस्तके ऑर्डर करतात. जर तुमचे आधीच एक बुक स्टोअर असेल किंवा नसले तरी देखील एक ऑनलाइन बुक स्टोअर सुरू करून तुम्ही चांगल्या प्रकारे नफा कमवू शकतात. यामध्ये तुम्ही पैसे देऊन ऑनलाइन वाचण्याचा पर्याय दिला तर जास्त पैसे कमवू शकता.

29) फर्निचर दुरुस्ती व्यवसाय (Furniture repair business Idea in Marathi)

तुम्ही एखाद्या जुन्या फर्निचरला नवीन युनिक डिझाईन मध्ये बनवून चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता. जर तुमच्यामध्ये देखील अशी एखादी लपलेली कला आहे तर मग तिला बाहेर आणण्याची वेळ आली आहे. तुम्ही यातून व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हाला जुन्या वस्तू वापरायच्या आहेत त्यामुळे यात जास्त काही खर्च नाहीये. तुमची कला चांगली असेल तर तुम्हाला आपोआप प्रसिद्धी मिळत जाईल. या व्यवसायात सध्याच्या घडीला लाखो रुपये कमविणारे लोक देखील आहेत.

30) एफिलियेट मार्केटिंग (Affiliate Marketing Business Idea in Marathi)

सध्या अनेक ऑनलाइन स्टोअर सुरू झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्या स्टोअर्स पर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे ते स्टोअर चालविणारे अशा लोकांना शोधत असतात जे त्यांच्या व्यवसायाला पुढे घेऊन जाऊ शकतील. इथे तुम्हाला एक रुपया सुद्धा गुंतवणूक करायची गरज नसते. सोशल मीडिया हँडल वरून किंवा वेबसाईट वरून तुम्हाला त्यांच्या प्रोडक्ट विषयी लिंक द्यायची असते. त्यातून एखाद्याने खरेदी केल्यानंतर तुम्हाला त्याचे कमिशन मिळते. यालाच एफिलियेट मार्केटिंग असे म्हणतात.

31) मेणबत्ती आणि अगरबत्ती बनविण्याचा व्यवसाय (Agarbatti Business in Marathi)

जर तुमच्यामध्ये काहीतरी नविन करण्याची धमक असेल आपण अगरबत्ती आणि मेणबत्ती बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. यासाठी काही सामान आवश्यक असते. ते खरेदी करून तुम्ही सहज हा व्यवसाय सुरू करू शकतो. इथे गुंतवणूक कमी असून नफा जास्त मिळतो.

32) घरगुती पापड आणि लोणचे व्यवसाय (Homemade products like papad and pickles)

पापड आणि लोणचे हे आपल्या प्राचीन जीवनाचा भाग आहे. आजही महाराष्ट्रात अनेक असे लोक असतात ज्यांच्या घरात स्वादिष्ट पापड आणि लोणचे बनत असतात. जर तुमच्याकडे देखील ही कला असेल तर तुम्ही पापड आणि लोणचे बनवून लाखोंचा नफा मिळवू शकता.

33) पेपर बॅग बनविण्याचा व्यवसाय (Paper bags Business Idea in Marathi)

आपल्या सर्वांना माहीत आहे की पॉलिथिन बॅग्स आपल्या निसर्गासाठी किती घातक आहेत. त्यामुळे आता सर्व जण पेपर बॅग कडे वळत आहेत. थोडे पैसे देऊन काही मशीन खरेदी करून तुम्ही या व्यवसायाला सुरुवात करू शकतात. या व्यवसायात सर्वात मोठी गोष्ट आहे की यात तुम्हाला जास्त गुंतवणूक लागत नाही आणि नफा देखील खूप चांगला आहे.

34) डेकोरेशनचे सामान बनविणे आणि विक्री (Making and selling decorative items)

घराची सजावट करणे ही आजकालची फॅशन आहे. जुन्या काळात आपल्या घरांची सजावट करण्यासाठी घरीच काम करत असत मात्र आता धावपळीच्या जीवनात सर्व सामान बाजारातून घेतले जाते. तुम्ही जर एखादे जुने सामान डेकोरेशन आयटम मध्ये बदलू शकता तर तुमच्याकडे पैसे कमविण्याच्या अनेक संधी आहेत. यासाठी तुम्हाला गुंतवणूक खूपच कमी लागते आणि कला चांगली असेल तर पैसे भरपूर मिळतात.

35) टेलरिंग शॉप (Tailoring shop business Idea in Marathi)

काही लोक सांगतात की तुमची कला तुम्हाला कधीच उपाशी राहू देत नाही. कपड्यांची कटिंग करून त्यांना एक चांगला आकार देऊन शिवणकाम करण्याची कला तुमच्याकडे असेल तर टेलरिंग शॉप तुम्ही सुरू करू शकता. शिवन काम करण्यासाठी मशीन तुम्हाला 5 ते 7 हजार रुपयांमध्ये मिळून जाईल. तुम्ही यात अनेक गोष्टी वाढवून पुढे व्यवसायाला दिशा देऊ शकतात.

36) द्रोण पत्रावळ्या बनविण्याचा व्यवसाय (Patravali making business Idea in Marathi)

द्रोण पत्रावळ्या मध्ये जेवण घेणे हे आपल्या प्राचीन संस्कृतीचा भाग आहे. आजही लोक याला शुभ मानतात. कोणताही कार्यक्रम असेल तर त्यात जेवणासाठी द्रोण पत्रावळ्या या असतात. त्यामुळे तुम्ही द्रोण पत्रावळ्या बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकतात. यामध्ये तुम्हाला काही कच्चा माल आणि मशीन ची गरज असते. परंतु यात थोडी गुंतवणूक करून लाखो रुपये कमविण्याच्या संधी देखील आहेत.

37) टिफिन सर्व्हिस (Tiffin service Business Idea in Marathi)

खूप सारे ऑफिस आणि पीजी हॉस्टेल असे आहेत ज्यामध्ये लोकांना जेवण बनवायला वेळ मिळत नाही. अशा वेळी तुम्ही त्या ठिकाणी जाऊन टिफिन सर्व्हिस सुरू करू शकता. या व्यवसायात तुम्हाला जास्त काही गुंतवणूक करावी लागत नाही. यात फक्त जेवण तयार करून टिफिन बनवून त्याला ज्याला हवा आहे तिथे पोहोचवायचा असतो. याच्या मोबदल्यात तुम्हाला एक चांगली रक्कम मिळते.

38) मत्स्यपालन (Fish farming home Business Idea in Marathi)

मासे हे निसर्गाची देणं आहेत. तुम्ही घर बसल्या मत्स्यपालन करून आणि त्यांची विक्री करून पैसे कमवू शकतात. या व्यवसायात देखील जास्त काही गुंतवणूक करावी लागत नाही.

39) ज्युटच्या पिशव्या बनवणे (Jute bags business in Marathi)

जुटच्या बॅग्स या वापरायला आणि दिसायला देखील खूप चांगल्या असतात. हळू हळू जुटच्या बॅग्सला बाजारात मागणी वाढत आहे. तुम्ही जर घरी बसल्या काहीतरी करायच्या विचारात असाल तर तुम्ही जुटच्या बॅग्स बनवू शकतात. लघु उद्योगांमधील हा एक सर्वात चांगला व्यवसाय आहे.

40) पॅकेजिंगचा व्यवसाय (Packaging Business in Marathi)

म्हणतात की भेटवस्तूची किमत नाही तर देणाऱ्याच्या भावना बघितल्या जातात! आजकाल बाजारात वेगवेगळ्या प्रकारे पॅकिंग असणाऱ्या वस्तू मिळत आहेत. या पॅकिंग कडे बघूनच लोक आकर्षित होत आहेत. ही काही कलाकारांची हाताची कलाकारी असते जिला बघून आपल्याला चांगले वाटते. जर तुमच्याकडे देखील ही कला असेल तर घरबसल्या तुम्ही हा व्यवसाय थोड्या गुंतवणुकीत सुरू करू शकता.

41) मग प्रिंटिंग (Mug Printing Business in Marathi)

लोकांना कलेची खूप आवड आहे आणि त्यासोबत त्यांचा लगाव देखील आहे. त्यामुळे छोट्या गोष्टींवर असलेली कलाकारी ही अनेकांना आवडते. आजकाल आपण विविध प्रकारचे कप्स आणि मग घरात बघतो ज्यावर अनेक चित्रे असतात. अशी मग प्रिंटिंग तुम्ही शिकलात आणि स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही घर बसल्या हा व्यवसाय सुरू करू शकता. हे काम तुम्ही छोट्या स्तरावर सुरू करून त्याला ऑनलाइन आणि ऑफलाईन मार्केट मध्ये मोठ्या स्तरावर घेऊन जाऊ शकता.

42) मास्क बनवायचा व्यवसाय (Mask Making Business in Marathi)

आज कोरोना काळात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती बनत असेल तर ती म्हणजे मास्क! आता मास्क जर अत्यावश्यक वस्तू बनलेली आहे तर मग प्रत्येकाकडे वेगवेगळे मास्क हे असणारच आहेत. अशात जर एखाद्याला चांगले चांगले मास्क कमी दरात घर बसल्या मिळाले तर कोणाला ते आवडणार नाहीत? तर तुम्ही देखील घर बसल्या कमी खर्चात मास्क बनविण्याचा व्यवसाय सुरू करू शकता. मास्क ची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही मार्केट मध्ये होऊ शकते.

43) पीपीई किट बनविण्याचा व्यवसाय (PPE Kit Making Business in Marathi)

जिथे कोरोना संक्रमणाचा धोका जास्त आहे तिथे प्रत्येकाला पीपीई किट घालून जाण्याची गरज सध्या पडते आहे. भारतात पीपीई किटची मागणी वाढली असल्याने पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळे पीपीई किटचा तुटवडा जाणवत आहे. जर तुम्ही घर बसल्या कमी किंमतीत पीपीई किट बनविण्याचा व्यवसाय जर सुरू करत असाल तर तुम्हाला यातून चांगला नफा नक्कीच मिळेल.

44) ट्रॅव्हलिंग एजंट (Travel Agent Business in Marathi)

फिरायला जायची आवड तर प्रत्येकाला असते मात्र त्याचे नियोजन करताना डोक्याच दही होत हे खरे आहे! जर प्लॅनिंग चांगली नसेल तर संपूर्ण ट्रिप खराब होऊ शकते. त्यामुळे जर तुमच्याकडे फिरण्यासाठी जे काही प्लॅनिंग लागते त्यांच्याविषयी चांगली माहिती असेल तर ट्रॅव्हलिंग एजंट बनून तुम्ही लोकांची मदत करू शकतात. त्यांना चांगले प्लॅन्स बनवून देऊन तुम्ही घर बसल्या एक चांगली रक्कम कमवू शकता.

45) नर्सरी सुरू करा (Nursery business in marathi)

तुम्हाला जर बागकाम करायला आवडत असेल तर तुम्ही विविध प्रकारची झाडे घरात उगवून त्यांची नर्सरी बनवून विक्री करू शकता. यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे बी टाकून त्यांची देखभाल करून त्यांना वाढवू शकता. तुम्ही ही झाडे बाजारात विक्रीसाठी ठेवू शकता.

46) चॉकलेट बनवायचा व्यवसाय (Chocolate making Business in Marathi)

आजच्या काळात चॉकलेटचा वापर हा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध गटापर्यंत सर्वांना चॉकलेट खायला आवडतात. अनेकांना प्रत्येक पदार्थात चोकलेट टाकायला देखील आवडते. तुमच्याकडे जर चॉकलेटचे विविध प्रकार बनवण्यासाठी किंवा चॉकलेटचा वेगवेगळ्या डिश बनविण्यासाठी कला असतील तर तुम्ही हा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात. या उत्पादनांची विक्री ऑनलाइन आणि ऑफलाईन दोन्ही पध्द्तीने होऊ शकते.

47) डेटा एन्ट्री व्यवसाय (Data entry business in Marathi)

डेटा एन्ट्री करण्याचे काम तुम्ही घर बसल्या करू शकतात. यासाठी तुम्हाला मोबाईल फोन किंवा लॅपटॉपची गरज असते. अनेक कंपन्या सध्या विद्यार्थी आणि गृहिणींना घरबसल्या डेटा एन्ट्री करण्याची कामे देत आहेत. डेटा एन्ट्री हे काम करून सध्या तुम्ही महिन्याला हजारो रुपये कमवू शकतात. या व्यवसायात वेळ सोडता इतर काहीही गुंतवावे लागत नाही.

48) युट्युबर बना (Start Youtube channel)

जर तुमच्याकडे काहीतरी नवीन करून दाखवायची आवड असेल तर व्हिडीओ बनवून तुम्ही युट्युबवर टाकू शकता. युट्युब वर चॅनल सुरू करायला कोणत्याही प्रकारे पैसा लागत नाही. जर तुमच्या व्हिडिओ लोकांना आवडत असतील तर लोक तुम्हाला सबस्क्राईब करतील आणि तुमची कमाई देखील चांगली होईल.

49) कूकिंग क्लासेस (Cooking class business in Marathi)

जेवणाची आवड तर सर्वांना असते मात्र जेवण बनविणे हे प्रत्येकाला जमत नाही. अनेकांना जेवण बनवायला आवडते मात्र त्यांना ते चांगल्या प्रकारे बनविता येत नाही. त्यामुळे लोक युट्युब आणि गुगल वर रेसिपी शोधतात. तुम्ही त्यामुळे एक नावाजलेला क्लास सुरू करू शकता. ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन पद्धतीत तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकतात.

50) फ्रांचाईजी घेऊन व्यवसाय करा (Franchisee Business in Marathi)

अशा अनेक कम्पनी आहेत ज्या त्यांचे नाव देऊन त्यांचे प्रोडक्ट विकायला सांगतात. फ्रांचायजी घेण्यासाठी कोणत्याही कंपनीचे नियम आणि अटी पाळून आणि काही पैसे देऊन तुम्ही फ्रांचायजी घेऊ शकता. फ्रांचायजी करून तुम्ही त्यांचे प्रोडक्ट त्यांनी सांगितलेल्या योग्य दरात विकायचे असतात. यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा हा होत असतो.

51) कोल्ड स्टोरेज (Cold Storage Business in Marathi)

कोल्ड स्टोरेजची गरज ही प्रत्येक घरात असते. आपण आपल्या फ्रीज मध्ये काही पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून ठेवत असतो. अनेक गोष्टी एकदा बोलावून त्यांचा साठा करायचा असतो तेव्हाच त्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवणे कधीही योग्यच असते. त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे एखादी छोटीशी जागा असेल तर तिथे कोल्ड स्टोरेज सुरू करून त्याला भाडे तत्वावर देऊ शकतात. यात जास्त गुंतवणूक असते मात्र पैसा देखील तितका जास्त मिळतो.

आता मी मला माहिती असलेल्या काही नवीन कमी गुंतवणुकीत सुरू झालेल्या आणि यशस्वी झालेल्या उद्योगांविषयी सांगणार आहे,

1) जळगाव जिल्ह्यातील 2 मुलांनी जॉब सोडून केळाचे चिप्स बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आणि आता त्यांचे हेच चिप्स भारताबाहेर देखील पाठविले जात आहेत.
२) एकदा एका व्यक्तीने शेतात चंदनाची झाडे लावली. या झाडांना मोठं व्हायायला बराच काळ निघून गेला मात्र आता त्याला त्यातून भरपूर नफा मिळतो आहे.
3) अनेकांनी घरातून अगरबत्ती आणि मेणबत्ती बनवायला सुरुवात केली होती आणि आता ते प्रत्येक जण एक यशस्वी स्तरावर काम करत आहेत.
4) काही दिवसांपूर्वी एका माणसाने घरातून झाडे विकायला सुरुवात केली होती. आता त्याची जिल्ह्यातील सर्वात मोठी नर्सरी आहे.
5) शेतीमध्ये सतत होणाऱ्या नुकसानीला उपाय म्हणून एकाने फुल शेती केली. यातून त्याला वर्षातील चारही महिने फायदा होत आहे.

Other Low Investment Business Ideas

 • वाहन सेवा केंद्र (Vehicle Service Center)
 • जलतरण प्रशिक्षक (Swimming instructor)
 • क्रीडा प्रशिक्षक (Sport Coaching)
 • डांस क्लासेस Business ( Dance Classes Business Idea In Marathi )
 • जूस शॉप (Juice Shop Business in Marathi)
 • खेळण्यांचे दुकान (Toy Shop Business in Marathi)
 • डेअरी आणि मिठाईचे दुकान (Dairy and Sweets Shop Business in Marathi)
 • कंप्यूटर ट्रेनर (Computer Trainer)
 • सिक्यूरिटी एजेंसी (Security Agency)
 • फोटोग्राफर (Photographer)
 • ई-बुक लेखक (E-book Author)
 • फैशन डिजाइनर (Fashion Designer Business in Marathi)
 • कपड़े धुवून प्रेस करून देण्याचा बिझनेस ( Washing and ironing business ideas In Marathi)
 • डी जे सेवा ( DJ Service business in marathi)
 • डिजिटल मार्केटिंग ( Digital Marketing Business In Marathi)
 • ट्रेडिंग बिजनेस ( Trading Business idea in Marathi)
 • चिप्स मेकिंग बिझनेस ( Chips Making Business Idea In Marathi)

FAQ

प्रश्न: सर्वात यशस्वी छोटा व्यवसाय कोणता आहे?
उत्तर: जो देखील व्यवसाय एका योजनाबद्ध साच्यात केला जातो तो सर्वात यशस्वी होऊ शकतो.

प्रश्न: कमीत कमी गुंतवणुकीत छोटा व्यवसाय कसा सुरू करता येतो?
उत्तर: तुमच्याकडे गुंतवणूक करायला कमी रक्कम असेल तरी देखील असे अनेक उद्योग आहेत जे तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाईन कसेही सुरू करून एक चांगला नफा मिळवू शकतात.

प्रश्न: सुरुवात करण्यासाठी सर्वात चांगला व्यवसाय कोणता आहे?
जर तुम्ही पहिल्यांदा व्यवसाय सुरू करत असाल तर सेवा देणारे व्यवसाय हे सर्वात सोपा उपाय आहे. एक सेवा व्यवसाय हा कोणत्याही प्रकारचा असू शकतो परंतु यासाठी तुम्हाला काही कौशल्य असणे गरजेचे असते.

प्रश्न: घरातून सुरुवात करता येतील असे कमी गुंतवणुकीत सुरू होणार व्यवसाय कोणते आहेत?
उत्तर: घरात सुरू करता येणार व्यवसाय हे तुमच्या कौशल्यावर अवलंबून आहेत. तुम्ही ज्या गोष्टीत तरबेज आहात त्याचा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकता.

प्रश्न: कमीत कमी रक्कमेत सुरू करता येणारा सर्वात चांगला व्यवसाय कोणता आहे?
उत्तर: तुम्हाला ज्या व्यवसायात सर्वात जास्त आवड आहे तो व्यवसाय तुमच्यासाठी सर्वात चांगला व्यवसाय आहे. कारण हा व्यवसाय करत असताना तुम्ही अगदी मनापासून आणि इमानदारीने करत असतात. यामध्ये तुमची गुंतवणूक ही कधीच कमी किंवा जास्त नसते.

प्रश्न: कमी खर्चात ऑनलाइन कोणता व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो?
उत्तर: ऑनलाइन तुम्ही ब्लॉगिंग, डेटा एन्ट्री, वेबसाईट डिझाईन, एफिलियेट मार्केटिंग, युट्युब चॅनल, ड्रॉप शिपिंग, रिकृटमेंट फर्म यासारखे व्यवसाय सुरू करू शकता.

प्रश्न: 5 सर्वाधिक नफा देणारे व्यवसाय कोणते?
उत्तर: प्रत्येक व्यवसाय हा लाभ मिळवून देणारा असतो त्यामुळे त्यातून नफा किती मिळतो हे त्याला चालविणाऱ्याच्या हातात असते. त्यामुळे तुम्ही एक चांगल्या प्रकारे योजना बनवून एक नफा देणारा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

प्रश्न: कोणता व्यवसाय सर्वात सुरक्षित आहे?
उत्तर: सर्वाधिक सुरक्षित व्यवसाय हे सेवा व्यवसाय असतात कारण यात नुकसान होण्याची शक्यता खूप कमी असते.

प्रश्न: पैसे कमविण्यासाठी सर्वात चांगला व्यवसाय कोणता आहे?
उत्तर: सर्व प्रकारच्या व्यवसायांमधून पैसा कमविला जाऊ शकतो. ज्या व्यवसायातून जास्त कमाई होते त्याला चांगला व्यवसाय म्हणता येऊ शकते. प्रत्येक व्यवसाय हा त्याच्या ठिकाणी उत्तमच असतो.

प्रश्न: भविष्यासाठी सर्वात चांगला व्यवसाय कोणता आहे?
उत्तर: भविष्यासाठी सर्वात चांगला व्यवसाय तो असतो ज्यामध्ये पुढे येऊन गरजा असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला याविषयी माहिती शोधून मग व्यवसायाला सुरुवात करायची असते.

Conclusion

तर मित्रांनो तुम्हाला New business ideas in marathi या लेखामधून नवीन नवीन small scale business ideas in marathi जाणून घायला मदत झाली असेल.

हि Business ideas list in marathi तुमच्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा, जेणे करून त्यांना देखील त्यांचा नवीन व्यवसाय सुरु करण्यास मदत होईल.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “New Business Ideas in Marathi | Home Business ideas in Marathi | 51+ बिझनेस आयडिया”

Leave a Comment