आजच्या या लेखामध्ये आम्ही पाठ करायला अगदी सोपे आणि छोटे, असे लग्नात तसेच लग्नानंतरही घेता येणारे मस्त comedy ukhane in Marathi सांगणार आहोत.
Are you looking for Marathi Funny Ukhane then you are in the right place. Remember at least one ‘Funny ukhana’ from the following list for your next Marathi tradition.
लग्नात मागितला हुंडा एक खोक्का
….. रावांचे नाव घेते ….. कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोक्का!
आला आला उन्हाळा। संगे घामाचा ह्या धारा …
….. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा
खोक्यात खोका टिवी चा खोका,
….. माझी मांजर आणि मी तिचा बोका
कौरव-पांडव यांच्यातील युध्दात अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी,
…… राव माझे आहेत फार निस्वार्थी
गोड करंजी सपक शेवाई ……
होते समजूतदार म्हणून …… करून घेतले जावई
बागेत बाग राणीचा बाग…
अन् रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग!
चांदीच्या ताटात फणसाचे गरे
….. राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे
आंब्यात आंबा हापुस आंबा
अन आमची……. म्हणजे जगदंबा
अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका,
नाव घ्यायला सांगू नका मी आहे कुमारीका
सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय,
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?
नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा
….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा
महादेवाच्या पिंडीवर बटाट्याची फोड् …..
रावांना डोळे मारण्याची लई खोड्
नाव घ्या नाव घ्या करु नका गजर
रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर
निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट
….. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास
जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा
मुंबई ते पुणे १५० कि.मी. आहे अंतर,
….. हयांचं नाव घेते, घास भरवते नंतर
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..
रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी
पाव शेर रवा पाव शेर खवा
….. चे नाव घेते हजार रुपये ठेवा.
चांदीच्या ताटात मुठभर गहू
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ
ह्या दाराच कुत्र त्या दारी भुंकत
….. ला पाहून माझ डोक दुखत.
नुकताच सचिन आलाय सेंचुरी मारून…..
अन बाबऊरावांचं नाव घेते चार गडी राखून!!!
नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद
…… राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात
मारुतीच्या देवळाला सोन्याचा कळस,
….. च नाव घ्यायला मला नाही आळस्.
ट्राफिक सिग्नल तोडला म्हणून भरला १०० रु दंड
….. रावांना भरवते Ice-cream चा घास सांगा आहे कि नाही थंड?
शनिवार-रविवार सुट्टी चा वीकेंड
….. चे नाव घेते….. आमच्या प्रेमाला नाही कधी एंड…..
श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.
स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल
….. राव एकदम ब्यूटिफुल
नव रत्नांनी सजला अकबराचा दरबार,
….. बाई लक्षात ठेवा, अब कि बार मोदी सरकार…..!!
पुढे जाते वासरू, मागून येते गाय
….. ला आवडते नेहमी दुधावारची साय
पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
….. ची व माझी जडली प्रिती
साखरेचे पोते सुई ने उसवले,
….. ने मला पावडर लाऊन फसवले
हळद असते पिवळी, कुंकु असते लाल
….. रावांची मिळाली साथ झाले जीवन खुशहाल
सचिनच्या ब्याटवर चेंडु टाकतो वाकून
….. चे नाव घेतो सगळ्यांचा मान राखुन
पुण्यात बालगंधर्वला नाटक लागलय ‘मोरुची मावशी’,
….. चे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी
सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे,
….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे
परातीत परात चांदीचा परात,
…. राव हागले दारात, जाऊ कशी घरात
प्रसन्न वदनाने आले रविराज
….. ने चालविला संसारात स्नेहचा सांज
तांदुळ निवडत बसले होते दारात
ते पादले दारात आणि वास आला घरात
कपात दुध दुधावर साय
….. च नाव घेते ….. ची माय
काचेच्या ग्लासात कोकम सरबत
….रावां शिवाय मला नाही करमत
Acer च्या लॅपटॉपला Dell ची बॅटरी
….. ला लागली ५०००० ची लॉटरी
होळी रे होळी ….. पुरणाची पोळी …..
…….. च्या पोटात बंदुकीची गोळी …
हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर
….. रावांची लग्न केले कारण आली लहर केला कहर
ईन मीन साडे तीन । ईन मीन साडे तीन
…. माझा राजा आणि मी झाले त्याची QUEEN!!
केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी
तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत
….. राव आहेत खूप हौशी.
गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
…. माझी बायको आहे मोठी लुच्ची
नागाला पाजत होते दूध आणि साखर
….. रावांना आवडते फ़क़्त जॉनी वॉकर
पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा मात
….. रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात…
मंगळाच्या राशीला राहू केतू चे ग्रहण
…. रावांचे नाव घेते या घराची मी आहे सुग्रण
चंदनी पानात मुग्ध कळी हसली
….. रावांच्या प्रेमात मी नकळत फसली
टीप टीप बरसा पानी पानी ने आग लगायी
….. रावांशी लग्न करण्याची लागली आहे भलतीच घाई
डासामुळे होतो डेंगू आणि मलेरिया
….. रावांना पहिल्यांदा बघताच झाला मला लवेरिया
द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान
…. चे नाव घेते राखते तुमचा मान
धनत्रयोदशीला करतात धनाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा
Acer फाईव्ह प्लस फोर इज इक्वल टु नाइन
….. इज माइन
गोव्याहून आणले काजू
गनपतरावांच्या थोबाडित द्यायला मी कशाला लाजु
कपात कप बशीत बशी
…. माझी सोडुन बाकी सर्व म्हशी
जीवन आहे एक अनमोल ठेवा,
….. राव आणतात नेहमी सुकामेवा.
अंगणात पेरले पोतभर गहू
लिस्ट आहे मोठी, कुणा-कुणाचे नाव घेऊ
नाही नाही म्हणता झाल्या भरपुर चुका,
….. चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका
इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय,
….. घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!
केळीचे पान टर टर फाटत …..
….. रावाच नाव घेताना कस कस वाटत
काचेच्या ग्लासात गुलाबी सरबत
….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत
एक बाटली दोन ग्लास,
माझी बायको फर्स्ट क्लास
नीलवर्ण आकाशातून पडती पावसाची सरी
….. चे नाव घेतो ….. च्या घरी
कॉपी करा
भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
….. च्या जीवावर करते मी मजा
नवग्रह मंडळात शनीच आहे वर्चस्व
….. आहे माझे जीवन सर्वस्व
….. रावांनी लग्नात उडवल्या हजारांच्या नोटा
कारण त्यांचा बाप आहे मोठा ….. होऊ दे तोटा
Facebook वर ओळख झाली Whatsapp वर प्रेम जुळले
….. राव आहेत खरच बिनकामी हे लग्न झाल्या नंतरच कळले
आघाडीत बिघाडी युतीत चाललये कुस्ती
….. रावांची कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहे वस्ती
आज आहे शनिवार उद्या येईल रविवार
….. रावांशी करते संसार, घडवू सुखाचा परिवार
Marathi Ukhane is the very familiar term in Maharashtra State. This is one of the marriage tradition i.e. ‘Ukhane’ takes place in All part of Maharashtra. In this tradition bride or Groom introduces her Spouse by taking his/her name in some poetic Marathi language.
If you have any other unique “Marathi Ukhane”, please submit to us with via Comment Section. We would like to share those best ukhane in our ukhane lekh(Articles) with your name