Marathi Ukhane for Female | Griha pravesh Ukhane | गृहप्रवेश उखाणे

लग्नानंतर गृहप्रवेश करताना सासरच्या मंडळींवर इम्प्रेशन पडायचे असेल तर हे गृहप्रवेश करतानाचे बेस्ट मराठी उखाणे नक्की लक्षात ठेवा.

⇒ जमले आहेत सगळे, ….. च्या दारात…
….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

⇒ सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,
…… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.

⇒ रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट

⇒ हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात
……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात

⇒ लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…
….. च नाव घेते, वाजवून __च्या घराची बेल

⇒ जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज…
….. च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज

⇒ माहेरी साठवले, मायेचे मोती…
….. च नाव घेऊन, जोडते नवी नाती

⇒ ….. ची लेक झाली, ….. ची सून…
….. च नाव घेते, गृहप्रवेश करून !

⇒ नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…
….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात

⇒ नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…
….. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.

⇒ हंसराज पंक्षी दिसतात हौशी,
……….रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी

⇒ हिरव्या शालुला जरिचे काठ
…..चे नाव घेते, सोडा माझी वाट

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
….. नाव घेते सोडा माझी वाट

गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,
….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर

गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट
………. नाव घेते सोडा माझी वाट

माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा
…राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी मनिषा

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप
………. रावां समवेत ओलांडते माप

माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले,
म्हणून …….. रावांची मी सौभाग्यवाती झाले

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले
………. चं नाव घ्यायला ………. अडवले

उंबरठयावरचं माप पायांनी लोटते
………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.