Modern Marathi ukhane for female | आधुनिक उखाणे | Modern ukhane in Marathi

Modern Marathi ukhane for female | आधुनिक उखाणे | Modern ukhane in Marathi

Modern Marathi ukhane for female: लग्न म्हटले कि आपल्या मराठी संस्कृतीमध्ये इतर तयारीसोबत उखाण्यांची(Marathi ukhane) सुद्धा तयारी करायला लागते. लग्नामध्ये नवऱ्याने आणि नावरीने एकमेकांचे उखाण्यात नाव घेणे ही परंपरा खूप जुनी आहे. आणि या उखाण्यांची मज्जाच वेगळी असते.

या साठीच आम्ही या लेखामध्ये काही Modern Marathi Ukhane घेऊन आलो आहोत. तर लग्नाच्या तयारीसोबत या पोस्ट मधील लेटेस्ट Latest Marathi ukhane सुद्धा नक्की एकदा वाचून जा.

तुम्हाला तर का या पोस्ट मधील Marathi Ukhane आवडले तर तुमच्या मैत्रिणींसोबत हि पोस्ट नक्की शेअर करा.

Modern marathi ukhane for bride / आधुनिक उखाणे

Modern marathi ukhane for bride
Modern marathi ukhane for bride

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring …
आता माझ्या जीवनाचं, ____च्याच हातात Steering

खेळत होतो PUBG , आला ब्लू झोन…
___चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले…
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण…
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण

सन ने केला दावा
संसाराच्या प्रवासात ——– रावांचा साथ हवा

यु.एस मधील कंपनीत असा झाला बोलबाला,
पहिल्याच ट्रायलला ——- रावांचा प्रोग्राम पूर्ण झाला

सॉफ्टवेअर हार्डवेअर शिवाय कॉम्पुटर होत नाही,
—— रावांशिवाय कशात इनट्रेस्ट लागत नाही

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क
——हिच्याशी लग्न करून मी घेतलीये मोठी रिस्क

पहिली सोनी, दुसरी मोनी, तिसरी जानी
सोडल्या तिघीजणी नी झालो ….चा धनी

पॅरिसचा आयफेल टॉवर केवढा आहे टॉल
—— रावांच्या बायकोचे आहेत गोरे गोरे गाल

मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकुन
आणि ……. रावना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून

y=mx+c हे गणितातील स्ट्रेट लाईन चे इक्वेशन
—– रावांच्या आगमनाने वाढले माझे इव्याल्यूएशन ( evaluation)

इंग्लिश मध्ये चंद्राला म्हणतात मून
——- रावांच नाव घेते —— सून

वन, टू, थ्री
—— रावांचे नाव घेते, मला करा फ्री

—- राव आणि माझा संसार होईल सुखद
जेंव्हा मी चिरेन भाजी आणि ते लावतील कूकर

चंदेरी चोळीला सोनेरी बटन
—— रावांना आवडते तंदुरी चिकन

Modern marathi ukhane for bride / नव्या पिढीचे बेस्ट मॉडर्न मराठी उखाणे

Best Modern Marathi Ukhane for Young Generation
Best Modern Marathi Ukhane for Young Generation

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी..
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

माझ्या __ चा चेहरा, आहे खूपच हसरा…
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे, क्षणामध्ये विसरा

बटाट्याच्या भाजीत घातला, एकदम Tasty मसाला…
___च नाव माहितेय तरी, मला विचारता कशाला?

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफूल…
__ माझी आहे, खरंच कित्ती ब्युटीफुल!

रोज ___म्हणून, सारखी नावाने हाक मारतेस…
मग उखाणा घेताना ___, कशाला गं खोटे खोटे लाजतेस?

Facebook वर ओळख झाली, आणि WhatsApp वर प्रेम जुळले…
___ आहे कित्ती बिनकामी, हे लग्नानंतर कळले

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर…
___आहे, माझ्या Life चा Server

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग …
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

माझं नाव घेताना __करते Blush…
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते…
__च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून…
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

आजघर माजघर, माजघराला नाही दार
——– रावांच्या घराला मात्र विंडोज 10

ओरेकल असो किंव्हा असो कुठलाही डाटाबेस
सगळेच हॅन्डल करतात ——– रावांची वेगळीच केस

जावा साठी सनचा आधार कशाला हवा,
——- रावांच्या घरात मिळाल्या दोन प्रेमळ जावा

तर मित्रांनो तुम्हाला हे आमचे उखाणे कसे वाटले, कंमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. उखाणे आवडले तर Facebook आणि Whastapp द्वारे तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा.

जर तुमच्या कडे सुद्धा काही नवीन modern ukhane marathi असतील तर कंमेंट मध्ये नक्की टाका आम्ही तुम्ही दिलेले marathi ukhane for female आमच्या वेबसाईट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

आणि सर्वात महत्वाचे लग्नाला जाण्याआधी modern marathi ukhane for bride यातील एक तर उखाणा नक्की लक्षात ठेवा.


हे देखील वाचा

छान छान मराठी उखाणे

गमतीदार मराठी उखाणे

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

1 thought on “Modern Marathi ukhane for female | आधुनिक उखाणे | Modern ukhane in Marathi”

Leave a Comment