इसरो- ISRO (Indian Space Research Organisation ) हि संस्था कौतुक करण्यासारखी आहे. या संस्थेने असे अनेक कौतुकास्पद कार्य केले आहे की जगामध्ये अनेक देश असा विचार करत असतील की भारतासारख्या विकसशील देशासाठी हे असंभव आहे. आज मी तुम्हाला भारताची अंतराळ संस्था इसरो बद्दल खूप काही महात्चाची माहिती सांगणार आहे.
१) इसरो चा पूर्ण अर्थ “भारतीय अंतराळ संशोधन संस्था” असा आहे. त्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे. याचे अंतराळ विभागाद्वारे नियंत्रण केले जाते आणि या संस्थेचा अहवाल थेट भारताच्या पंतप्रधानांना पाठवला जातो. इसरोची भारतातील एकूण १३ केंद्रे आहेत.
२) इसरो ची स्थापना १९६९ साली विक्रम साराभाई यांनी स्वातंत्र दिनाच्या दिवशी केली. त्यांना भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक मानले जाते.
३) भारत, अमेरिका, रशिया, फ्रांस, जपान, चीन यासह भारत जगातील ६ देशांपैकी एक देश आहे ज्यात जमिनीवर उपग्रह तयार आणि लॉन्च करण्याची क्षमता आहे.
४) भारतातून ८६ उपग्रह प्रक्षेपित करण्यासह इसरोने २१ वेगवेगळ्या देशांमधून ७९ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.
५) इसरो चा अर्थ संकल्प केंद्र सरकारच्या एकूण खर्चापैकी ०.३४% आणि जीडीपीच्या ०.०८% आहे. हा काही जास्त खर्च नाही आहे.
६) इसरो चा गेल्या चाळीस वर्षांचा खर्च नासाच्या एका वर्षाचा निम्मा खर्च आहे. तसेच नासाची इंटरनेट गती ९.१ GB आहे आणि इस्त्रोची इंटरनेटची गती २ GB आहे.
७) पाकिस्तानामध्ये देखील SUPARCO नावाची अंतराळ एजन्सी आहे. ही एजेंसी १९६१ साली उभारण्यात आली होती आणि इसरोची एजेंसी १९६९ साली उभारण्यात आली. इसरो ने आजपर्यंत ८६ उपग्रह प्रक्षेपित केले आहेत तर SUPARCO ने केवळ दोन उपग्रह आणी तेसुद्धा विदेशांच्या मदतीने प्रक्षेपित केले आहेत.
८) भारताच्या पहिल्या रॉकेट लॉंचर दरम्यान भारतीय शास्त्रज्ञ तिरुवंतपुरम रोज बसमधून यायचे आणि दुपारचे जेवण रेल्वे स्टेशनवर करायचे. त्या काळी रॉकेटचे काही भाग सायकलवरून सुद्धा आणले गेले होते.
९) आर्यभट, हे पहिले उपग्रह १९ एप्रिल १९७५ रोजी रशियाच्या मदतीने अंतराळामध्ये प्रक्षेपित केले गेले होते.
१०) १९८१ मध्ये, संसाधनांच्या अभावामुळे apple उपग्रहाला बैलगाड्यांमधून नेण्यात आले होते.
११) SLV ३ हा भारताचा पहिला स्वदेशी उपग्रह होता आणि या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम होते.
१२) ANTRIX हे इसरोचे व्यवसायिक विभाग आहे जे आपले अंतराळ तंत्रज्ञान इतर देशांकडे प्रसारित करते. ANTRIX 4 संचालक मंडळामध्ये रतन टाटा आणि जमशेद गोदरेज हे देशातील दोन मोठे उद्योगपती आहेत.
१३) इसरो मध्ये जगातील कोणत्याही इतर संघटनेपेक्षा सर्वोच्च single scientist आहेत कारण त्यांनी कधीही लग्न केले नाही आणि आपले संपूर्ण जीवन संस्थेला समर्पित केले आहे.
१४) २००८-०९ मधे इसरोने चंद्रयान-१ लॉंच केले होते आणि ३५० कोटी अर्थसंकल्प सादर केला होता म्हणजे नासाच्या तुलनेत आठ ते नऊ पट कमी. या प्रकल्पाद्वारे चंद्रावर पाणी शोधले गेले होते.
१५) भारत(इसरो ) हा एकमेव देश आहे ज्याने मंगळापर्यंत पोहोचण्याचा पहिला प्रयत्न केला. अमेरिका पाच वेळा, सोवियेत संघ आठ वेळा आणि चीन व रशिया देश पहिल्या प्रयत्नातच आयशस्वी ठरले होते.
१६) इसरोचे मंगळ प्रकल्प हे आजपर्यंतचे सर्वांत स्वस्त प्रकल्प आहे. केवळ ४५० कोटी म्हणजे प्रतिकिलोमीटर १२ रुपये, जे रिक्षा भाड्याच्या समान आहे. आपले मंगळ मिशन हे अनेक हॉलीवुड चित्रपटांपेक्षा देखील स्वस्त आहे.
१७) जेव्हा अनेक देश नेव्हिगेशनच्या उद्देशासाठी अमेरिकेच्या जीपीएसवर अवलंबून होते तेव्हा इसरोने यशस्वीरीत्या नेव्हिगेशन उपग्रह लॉन्च केला होते.
१८) आपण इसरो कडून उपग्रह डाटा विकतही घेऊ शकता. जसे की एचडी चित्र इ. गरज असल्यास आपण या संधीचा फायदा घेऊ शकता.
१९) आपल्याला असे वाटत असेल की इसरो ही एक लहान संस्था आहे. परंतु इसरोने गेल्या वर्षी १४ बिलियन रुपये कमावले होते.