जेफ बेझोसची यांची यशोगाथा | Jeff Bezos Biography in Marathi
Jeff Bezos information in Marathi: मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन शॉपिंग साईट Amazon. com चे फाउंडर जेफ बेजोस यांच्याविषयी.
जेफ यांनी अमेझॉन ची स्थापना करून लोकांच्या खरेदी करण्याच्या पध्द्तीत अमुलाग्र बदल घडवून आणले. तुम्हाला जे काही पाहिजे ते तुम्ही ऑनलाइन मिळवू शकता आणि ऑर्डर करून ते सामान तुमच्या दरवाज्यावर उपलब्ध असते व हे सर्व सामान मार्केटच्या किंमती पेक्षा स्वस्त मिळते. जेफ यांचा हाच विचार त्यांना या स्तरावर घेऊन आला आहे की आजच्या काळात त्यांचे नाव जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत घेतले जाते.
मित्रांनो जेफ बेजोस आज जरी अरबोचे मालक असले तरी देखील त्यांनी त्यांच्या जीवनात खूप साऱ्या समस्यांचा सामना केला होता. बेजोस यांचा जन्म हा एका नाबालिक आईच्या पोटी झाला होता. 18 महिन्याचे असताना त्यांचे वडील त्यांना आश्रय न देता सोडून गेले. पुढे जाऊन सावत्र वडिलांच्या छत्रछायेत त्यांनी शिक्षण घेतले. त्यांनी त्यांचे जीवन हे बरेच त्यांच्या आजोबांकडे व्यतीत केले. एक चांगली नोकरी सोडून ते ऑनलाइन बिझनेस मध्ये आले. चला तर मित्रांनो बेजोस यांच्या या चढ उतार असलेल्या जीवनाविषयी जाणून घेऊयात.
Early Life of Jeff Bezos in Marathi
जेफ बेजोस यांचा जन्म 12 जानेवारी 1964 रोजी अमेरिकेच्या न्यू मेक्सिको मध्ये झाला होता. जेव्हा त्यांचा जन्म झाला होता तेव्हा त्यांची आई जॅकलिन या माध्यमिक शिक्षण घेत होत्या. जॅकलिन यांचे वय केवळ 17 वर्ष होते. त्यांच्या वडिलांचे नाव जॉर्ज गेन्स होते. मात्र 18 महिन्याचे असताना त्यांचे वडील त्यांना व त्यांच्या आईला सोडून गेले. त्यानंतर काही वर्षे त्यांच्या आईने त्यांना एकटीने सांभाळले.
जेफ जेव्हा 4 वर्षाचे झाले तेव्हा जॅकलिन यांनी मिगुयल बेजोस यांच्या समवेत विवाह केला. त्यानंतर जेफ त्यांचे आडनाव बेजोस लिहायला लागले. लग्नानंतर त्यांचा संपूर्ण परिवार हा ह्युस्टन येथे आला. मिग्यूअल तिथे एक इंजिनियर म्हणून काम करत होते.
जेफ यांच्या मध्ये सुरुवातीपासून नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. ते त्यांच्या खेळणी खोलून वेगवेगळे करत व त्यांना पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असत. खरं तर त्यांना हे जाणून घ्यायचे असे की कोणतीही गोष्ट काम कशी करते आहे. ते सुरुवाती पासून त्यांच्या वयाच्या मुलांपेक्षा खूप वेगळे होते. जेफ यांनी रिव्हर ऑक्स एलिमेंट्री स्कूल मधून सुरुवातीचे शिक्षण घेतले. त्यांनी त्यांच्या आयुष्यातीलसुट्टीचे दिवस या आजोबांकडे व्यतीत केले.
Qualification of Jeff Bezos in Marathi
त्यांनी सुरुवातीपासून स्वतःला टेक्नॉलॉजि मध्ये प्रुफ केले. लहानपणी आपल्या भावा बहिणी पासून आपल्या खोलीच्या सुरक्षेसाठी त्यांनी एक इलेक्ट्रिक अलार्म देखील बनवला होता. पुढे जाऊन त्यांचा परिवार हा फ्लोरिडा मधील मियामी इथे शिफ्ट झाला. इथे जेफ ने पोलमेटो हायस्कूल मध्ये शिक्षण सुरू केले. पॉलमेटो मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडा चे सायन्स ट्रेनिंग प्रोग्रॅम मध्ये भाग देखील घेतला. जिथे त्यांना 1982 मध्ये सिल्व्हर नाईट पुरस्काराने सन्मानित केले गेले.
जेफ हे कायम हुशार विद्यार्थ्यांमध्येगणले जात असे. शाळेच्या दिवसात त्यांचे लक्ष हे त्यांच्या पुस्तकांतच असे. परंतु ही गोष्ट त्यांच्या आई वडिलांसाठी काळजीचे कारण बनले होते. त्यासाठी त्यांनी जेफ यांना फुटबॉल शिकवायला सुरुवात केली. पुढे जाऊन जेफ यांनी प्रिंस्टन युनिव्हर्सिटी मधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि कॉम्प्युटर सायन्स मध्ये बॅचलर ऑफ सायन्स ची डिग्री मिळवली.
Bill Gates Biography in Marathi | बिल गेट्सचे प्रेरणादायक चरित्र
Career of Jeff Bezos in Marathi
1986 मध्ये graduate झाल्यानंतर बेजोस यांनी कॉम्प्युटर सायन्स च्या क्षेत्रात वॉल स्ट्रीट मध्ये काम केले. यांच्या नंतर त्यांनी फेटल नावाच्या कंपनीत देखील त्यांनी काम केले. खूप कंपनी मध्ये काम केल्यानंतर त्यांनी विचार केला की ते दुसऱ्याचे काम कधी पर्यंत करणार? यासाठी त्यांनी स्वतःचा काही बिझनेस सुरू करण्याचे ठरवले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील खूप साऱ्या शहरांची सफर केली. यात त्यांनी लोकांच्या गरजा जवळून जाणून घेतल्या.
त्यांच्या या प्रवासात त्यांना समजले की इंटरनेट ची डिमांड खूप जास्त वेगाने वाढत आहे. त्यामुळे या क्षेत्रात जर आपला व्यवसाय सुरू केला तर यश मिळणारच आहे. 1994 मध्ये त्यांनी त्यांची एक चांगली नोकरी सोडली. त्यांनी त्यांच्या घराच्या गॅरेज मधून ऑनलाइन बिझनेस कडे आपले पहिले पाऊल ठेवले. इथे त्यांनी पुस्तके विकण्यापासून सुरुवात केली.
मित्रांनो जेफ यांनी पुस्तके ऑनलाइन विकण्याचा यासाठी देखील विचार केला असेल कारण त्यांना पुस्तकांची खूप जास्त आवड होती. त्यांनी 3 कॉम्प्युटर आणि काही कामगारांना घेऊन कंपनीची सुरुवात केली. जेफ यांच्या आई वडिलांनि देखील त्यांच्या परीने जेफ यांची पूर्ण मदत केली. त्यांना जेफ यांचा हा व्यवसाय जास्त काही समजत नव्हता, कारण ते तोपर्यंत इंटरनेट विषयी जास्त काही जाणून नव्हते. परंतु त्यांना जेफ वर पूर्ण विश्वास होता.
How Jeff Bezos started Amazon.com in Marathi
जेफ यांनी त्यांच्या कंपनीचे नाव सर्वात अगोदर CADABRA ठेवले. पुढे काहीमहिन्यानंतर ते बदलून Relentless.com केले. हे नाव देखील त्यांच्या मित्रांना आवडत नव्हते. त्यामुळे 1995 मध्ये शेवट त्यांनी त्यांच्या कंपनीचे नाव Amazon.com असे ठेवले. हे नाव अमेरिकेच्या एका नदीच्या नावावर आधारित होते.
बिजनेस सुरू केल्यानंतर 2 महिन्यात अमेझॉन ने 45 हुन अधिक देशांमध्ये आपले पुस्तके विकली. त्यांच्या प्रत्येक आठवड्याची विक्री ही जवळपास 20,000 अमेरिकन डॉलर्स बनली. इथून पुढे नंतर कधीच जेफ आणि त्यांची कंपनी अमेझॉन ने मागे वळून बघितले नाही.
पुढे जाऊन अमेझॉनवर वेबसाईटवर असंख्य वस्तू टाकल्या गेल्या. अशीच अमेझॉन जगातील सर्वात मोठी ऑनलाइन शॉपिंग साईट बनली. याच दरम्यान कंपनीच्या यशात एक दिवस नोव्हेंबर 2007 मध्ये आला. तेव्हा अमेझॉन ने अमेझॉन ई बुक किंडल रीडर बाजारात आणले. याच्या माध्यमातून पुस्तके लगेच डाउनलोड करून वाचता येत होती. या डिव्हाईस मुळे कंपनीला खूप जास्त फायदा झाला. यामुळे किंडल प्रोडक्ट्स ची विक्री वाढली आणि त्या फॉरमॅट मध्ये वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांचीही विक्री वाढली.
ग्राहकांसाठी हे खूप जास्त सुविधा देणारे उपकरण होते. कारण आता वाचकांना पुस्तक हातात येण्यापर्यंत वाट बघावी लागत नव्हती, मनात असलेले पुस्तक मिनिटात त्यांच्या पर्यंत पोहोचत होते.
जेफ यांच्या पारिवारिक आयुष्याविषयी बोलले तर त्यांनी 1993 मध्ये मॅकेंझी यांच्याशी विवाह केला. त्यांना 3 मुले आहेत. याशिवाय त्यांनी एक मुलीला ही दत्तक घेतले आहे.
मित्रांनो प्रत्येक वर्षी अमेझॉन जेफ आणि त्यांच्या फॅमिली च्या सुरक्षिततेवर 13 करोड रुपये खर्च करतात. तरीही जेफ यांची पत्नी चारही मुलांना शाळेत सोडल्यानंतर स्वतः जेफ यांना ऑफिसला कारने सोडतात. जेफ देखील त्यांची पत्नी आणि मुलांना पूर्ण वेळ देतात.
मित्रांनो मला आशा आहे Jeff Bezos information in Marathi या लेखातून तुम्हाला जेफ बेझोस यांच्या बद्दल जाणून घायला मदत झाली असेल आणि हा लेख वाचून तुम्हाला Motivation मिळाले असेल.
Jeff Bezos Biography in Marathi वरचा आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
हे देखील वाचा
Akshay Kumar Biography Marathi | अक्षय कुमार यांच्या बद्दल माहिती
Jack ma biography in Marathi | जॅक मा यांच्या बद्दल माहिती