क्रिकेटर रोहित शर्माचे जीवन चरित्र । Rohit Sharma Biography in Marathi
Rohit Sharma Biography in Marathi: क्रिकेटर रोहित शर्मा यांचे जीवन चरित्र ( जीवनी, रेकॉर्ड लिस्ट, करियर, आयपीएल मैच, परिवार ) (Rohit sharma biography in Marathi, Record , Award, Career, Wife, Age, Caste)
रोहित शर्मा म्हणचे भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्वाचा खेळाडू आहे. जगात उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीत रोहित शर्माचे नाव येते. त्यांचे पूर्ण नाव रोहित गुरुनाथ शर्मा आहे. सध्या रोहित शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या वनडे, टी 20 आणि कसोटी क्रिकेट मध्ये सलामी फलंदाज म्हणून ओळख कायम ठेवली आहे. कसोटी क्रिकेट मध्ये त्यांची जागा कधी खाली होती पण उत्कृष्ट प्रदर्शन करत त्यांनी सलामी ची जागा गाठली. अंबानी समूहाच्या मुंबई इंडियन्स संघाचे रोहित हे कप्तान आहेत. रोहित हे एकमात्र असे खेळाडू आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यांमध्ये 2 द्विशतक झळकावले आहेत.
रोहित शर्मा परिचय | About Rohit Sharma in Marathi
पूर्ण नाव (Full Name) : रोहित गुरुनाथ शर्मा
टोपण नाव (Nickname) : हिटमॅन, रो-हिट, शाना
जन्म दिनांक (Birth Date) : 30 एप्रिल 1987
वय (Age) : 33 वर्षे
जन्म स्थळ (Born Place) : बनसोड , नागपूर
घर (Home) : नागपूर
वडील (Father) : गुरुनाथ शर्मा
आई (Mother) : पूर्णिमा शर्मा
भाऊ (Brother) : विशाल शर्मा (छोटा भाऊ)
पत्नी (Wife) : रितिका
लग्नाची तारीख (Marriage Date) : 13 डिसेंबर 2015
मुलगी (Daughter) : समायरा
धर्म (Religion) : हिंदू
जात (Caste) : ब्राम्हण
रोल (Role) : क्रिकेटर
बॅटिंग शैली (Batting Style) : राईट हँड बॅट्समन
जर्सी नंबर (Jersey Number) : 45
उंची (Height) : 173 सेमी
वजन (Weight) : 72 किलो
संपत्ती (Net Worth) : 227 करोड
कोच / मेंटर (Coach) : दिनेश लाड
रोहित शर्मा यांचा जन्म हा 30 एप्रिल 1987 रोजी झाला. त्यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे ट्रान्सपोर्ट फर्म हाऊस मध्ये कार्यरत होते तर आईचे नाव पूर्णिमा शर्मा आहे. सुरुवातीच्या काळात रोहित शर्मा यांच्या परिवाराला पोटापाण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पैशाच्या अभावी रोहित शर्मा यांचे लहानपण हे त्यांच्या आजोबांच्या कडे गेले. ते त्यांच्या आई वडिलांना भेटायला कधी कधी जात असे. रोहित यांना एक भाऊ देखील आहे. लहानपणा पासूनच रोहित क्रिकेटच्या साठी आकर्षित झालेले होते. पुढे जाऊन त्यांच्या काकांनी त्यांना क्रिकेट कॅम्प मध्ये भरती केले. रोहितमधील प्रतिभा आणि क्षमता लक्षात घेता त्यांचे कोच दिनेश लाड यांनी त्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचे विद्यालय बदलून घेतले. रोहित ने त्याच्या करियर ची सुरुवात ही एक गोलंदाज म्हणून केली होती. त्यांच्या मधील बॅटिंग ची प्रतिभा देखील जस जसा वेळ जात गेला तस तशी पुढे येत गेली. एका शाळेतील खेळाला जाण्याऱ्या सामन्यामध्ये त्यांनी शतक झळकावले.
Sandeep Maheshwari Biography in Marathi
खेळाडू च्या रुपात रोहितचे करियर | Rohit’s Career as a Player in Marathi
रोहित शर्मा यांच्या बॅटिंग ने अनेक कोचेस प्रभावित होते. याच्याच मुळे 2005 साली झालेल्या देवधर ट्रॉफी मध्ये सेंट्रल झोनच्या विरुद्ध पश्चिम क्षेत्रात त्यांची निवड झाली. परंतु त्या सामन्यात ते काही खास प्रदर्शन करू शकले नाही. त्यानंतर त्यांनी उत्तर संघाच्या विरोधात खेळताना नाबाद 142 रन केले. या पारी नंतर त्यांची चर्चा व्हायला लागली आणि संभावित 30 खेळाडूंच्या यादीत जे चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार आहेत तिथे त्यांचे नाव आले. असाच त्यांची निवड ही एनकेपी साळवे ट्रॉफी मध्ये देखील झाले. सततच्या चांगल्या प्रदर्शनामुळे त्यांना 2006 मध्ये न्यूझीलंड विरोधात होणाऱ्या मॅच साठी इंडिया ए संघाचे सदस्यत्व मिळाले. त्याच वर्षी त्यांना रणजी ट्रॉफी खेळण्याची देखील संधी मिळते. सुरुवातीच्या असफल कारकिर्दीत त्यांनी पुढे जाऊन गुजरात आणि बंगालच्या विरोधात सलग द्विशतक आणि अर्धशतक केले. यामुळे पुन्हा एकदा निवड संघाला त्यांची दखल घ्यावी लागली. त्यांच्या कायम निरंतर चांगल्या प्रदर्शनामुळे त्यांना मुंबई रणजी संघाचे कर्णधार पद दिले गेले.
घरेलू क्रिकेट सामन्यांमध्ये निरंतर चांगल्या प्रदर्शनामुळे निवड समितीने त्यांना भारत विरुद्ध आयर्लंड या सामन्यासाठी खेळण्याची संधी दिली. बेलफास्ट मध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितला बॅटिंगची संधी मिळाली नाही. सप्टेंबर 2007 मध्ये एका टी 20 सामन्यात रोहितने दक्षिण आफ्रिकेच्या धारदार गोलंदाजी समोर 50 रन बनवले. याच सामन्यात त्यांनी क्षेत्ररक्षण देखील उत्तम केले. त्यांच्या या प्रदर्शनामुळे भारतीय संघाला सेमी फायनल खेळण्याची संधी मिळाली.
त्यानंतर पाकिस्तान विरोधात देखील रोहितने एक चांगली खेळी केली. वनडे मध्ये रोहितचा चांगला खेळ हा ऑस्ट्रेलिया मध्ये पाकिस्तान विरोधात बघायला मिळाला. इथूनच त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये ओळख निर्माण करायला सुरुवात केली. मध्ये काळात नवीन खेळाडू आल्यानंतर रोहितला संघाच्या बाहेर रहावे लागले. रणजी ट्रॉफी 2009 मध्ये त्यांनी त्रिशतक केले आणि पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष स्वतःकडे खेचले. बांगलादेश विरोधी सामान्यांच्या मालिकेसाठी त्यांची निवड झाली मात्र त्यांना त्यात चांगले खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याच दरम्यान कसोटी संघासाठी देखील त्यांची निवड झाली परंतु प्रॅक्टिस करत असताना जखमी असल्या कारणाने त्यांना त्यातून बाहेर पडावे लागले. त्यांचे दुर्भाग्य , इतर कारणे आणि नवीन खेळाडूंचे चांगले प्रदर्शन यामुळे त्यांना खेळापासून दूर राहावे लागले. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्यांना 2011 वर्ल्ड कप पासून देखील दूर रहावे लागले.
रोहित शर्मा यांचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट करियर | Rohit’s International Career in Marathi
विश्वचशका नंतर सर्व जुन्या सिनियर खेळाडूंना आराम देण्यात आला. सुरेश रैना याच्या नेतृत्वात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहितची निवड झाली. त्या संपूर्ण सिरीज मध्ये रोहित ने कायम चांगले प्रदर्शन केले आणि त्या सिरीज मध्ये रोहितच्या सतत चांगल्या खेळी मुळे त्याला मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड देखील मिळाला. त्यानंतर त्यांचा चांगला फॉर्म सुरू झाला. पुढे भारतात होणाऱ्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सिरीज साठी त्यांची मॅन ऑफ द सिरीज म्हणून पुन्हा निवड झाली.
भारतीय संघात सचिन आणि सेहवाग या जोडीच्या गेल्यानंतर सलामी फलंदाजांची खूप समस्या होती. 2013 मध्ये शिखर धवनच्या सोबत रोहित शर्मा यांना ओपनर म्हणून पाठवले गेले. त्या वेळी ही जोडी खूप चांगली चालली. रोहितचा फॉर्म हा कायम प्रमाणे चांगला राहिला. पुढे ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या मालिकेत रोहितने द्विशतक झळकावले. यात त्याने 16 षटकार मारून एक वर्ल्ड रेकॉर्ड देखील केला. भारतीय महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांच्या शेवटच्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा यांनी कोलकाता मध्ये शानदार 177 रणांची खेळी केली होती. सौरभ गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन यांच्यानंतर रोहित शर्मा हे तिसरे भारतीय खेळाडू बनले ज्यांनी पहिल्या दोन्ही टेस्ट मध्ये शतक केले होते. पुढील वर्षी लगेच श्रीलंकेच्या विरोधात खेळत असताना कोलकाता मध्ये रोहितने जगातील असा रेकॉर्ड स्वतःच्या नावावर केला ज्याचा विचारही कोणी करू शकत नव्हते.
रोहितने या सामन्यात वनडे मध्ये 250 रानांचा शिखर गाठण्याचा रेकॉर नावावर केला. 264 रन बनवून रोहित शर्मा यांनी वनडे मध्ये सर्वात जास्त धावा नावावर करण्याचा रेकॉर्ड केला. टी 20 मध्ये 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळत असताना रोहित शर्मा यांनी शतक देखील केले. या प्रमाणे ते क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅट मध्ये शतक करणारे दुसरे खेळाडू बनले.
रोहित शर्मा यांचे आयपीएल करियर हे खूप चांगले राहिले आहे. त्यांनी आयपीएल ची सुरुवात डेक्कन चार्जर्स या संघाच्या सोबत केली होती. त्या संघाच्या अयशस्वी पणाला न जुमानता रोहित खेळत होते, त्यांची प्रशंसा लोकांनी खूप केली. पुढे त्यांना मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतले. आता ते मुंबई इंडियन्स संघाचे कप्तान आहेत. 2015 मध्ये शक्तिशाली चेन्नई सुपर किंग्स ला हरवत रोहितने मुंबई इंडियन्स ला आयपीएलची पहिली ट्रॉफी मिळवून दिली. 2015 पर्यंत रोहितने 32.55 च्या सरासरीने 3385 रन बनवले आहेत. ही गोष्ट प्रशंसेसाठी योग्य आहे.
रोहित शर्मा वयक्तिक जीवन | Personal Life information in Marathi
सोशल मीडियावर अचानक रितिका सोबत फोटो टाकून रोहितने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. पुढे 2015 साली रोहितचा रितिका सजदेह सोबत विवाह देखील झाला. आता या दोघांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचा जन्म 30 डिसेंबर 2018 रोजी झाला, जेव्हा रोहित शर्मा भारतीय टीमसोबत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. रोहित आपल्या मुलीला भेटण्यासाठी एका आठवड्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारतात परतला. त्यांच्या मुलीचे नाव समायरा शर्मा असून ती आता दोन वर्षांची आहे.
रोहित शर्मा पुरस्कार (Rohit’s awards information in Marathi)
- रोहित शर्माला भारत सरकार द्वारे 2015 साली अर्जुन पुरस्कार देखील मिळाला. हा पुरस्कार भारत सरकार द्वारा खेळात उत्कृष्ट अशी काही कामगिरी केल्यास सन्मानित करण्यासाठी देण्यात येतो.
- रोहित शर्मा यांना वनडे क्रिकेट मध्ये 2 द्विशतक झळकवण्यासाठी त्यांना ESPN द्वारा 2013 आणि 2014 साठी सर्वोत्कृष्ट वनडे फलंदाज म्हणून गौरव करण्यात आलेला आहे.
- रोहित शर्मा यांनी दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात टी 20 सामन्यांमध्ये झळकवलेल्या शतकामुळे त्यांना 2015 साठीचा सर्वोत्कृष्ट टी 20 फलंदाजाचा पुरस्कार मिळाला होता.
- ICC क्रिकेट विश्वचषक 2019 मध्ये सर्वाधिक धावा केल्याबद्दल गोल्डन बॅट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- रोहित शर्माला 2020 मध्ये देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोहित शर्मा आयपीएल मॅच | Rohit’s IPL career in Marathi
रोहित शर्मा हे आता आयपीएलचा सर्वोत्तम प्रसिद्ध खेळांडूनच्या यादीत येतात. रोहित 2013 पासून आयपीएल संघ मुंबई इंडियन्स चे कर्णधार आहेत. यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने 4 वेळा आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. रोहित आयपीएल सोबत 2007 साली जोडले गेले होते. या वेळी मुंबई इंडियन्स ने रोहितला 15 करोड रुपये देऊन खरेदी केले आहे. रोहित ने मुंबई संघाला चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकून दिली आहे.
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQ
प्रश्न १- रोहित शर्माचा जन्म कधी आणि कुठे झाला?
=> रोहित शर्माचा जन्म 30 एप्रिल 1987 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे झाला.
प्रश्न 2- रोहित शर्माच्या मुलीचे नाव काय आहे?
=> समायरा शर्मा
प्रश्न 3- रोहित शर्माच्या पत्नीचे नाव काय आहे?
=> रितिका सजदेह
प्रश्न 4- रोहित शर्माचे वय किती आहे?
=> ३४ वर्षे (डिसेंबर २०२१ पर्यंत)
प्रश्न 5- रोहित शर्माची एकूण किती शतके आहेत?
=> ८ ऑगस्ट २०२१ पर्यंत, रोहित शर्माने एकूण ४१ शतके (८ कसोटी, २९ एकदिवसीय, ४ टी२०) झळकावली आहेत.
प्रश्न 6- रोहित शर्माच्या नावावर किती द्विशतके आहेत?
=> रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके आहेत.
निष्कर्ष | Conclusion
आशा आहे की तुम्हाला Rohit Sharma biography in Marathi वर आमचा हा लेख आवडला असेल. शेवटपर्यंत हा लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.
Rohit Sharma Information in Marathi वरचा आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा.
हे देखील वाचा
Marriage anniversary wishes in marathi