भारतातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस | National and international days information in Marathi

National and international days information in Marathi

भारतात सण उत्सवांच्या सोबतीला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. आपल्या भारत देशात सर्व धर्माचे लोक हे गुण्यागोविंदाने एकत्र नांदतात. प्रत्येक धर्माचा व्यक्ती हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवस हे संपूर्ण निष्ठेने आणि आत्मियतेने साजरे करत असतात. हे सर्व दिवस साजरे करण्यामागचा उद्देश हाच असतो की लोकांच्या मध्ये त्या दिवासविषयी जागरूकता निर्माण करणे. दिवस साजरे करून भारतीय लोकांमध्ये सद्भावना निर्माण करणे हा देखील मुख्य उद्देश असतो. या अशा कार्यक्रमांमधून समाजाला पुनरुज्जीवन देण्याचे कार्य घडत असते.

भारत देश हा अनेक संस्कृती आणि उत्सवांनी परिपूर्ण असा देश आहे. आपल्या देशात साजरे केले जाणारे वेगवेगळे सण-उत्सव हे शेतीसोबत, धर्मसोबत अथवा एखाद्या सामाजिक मुद्द्याशी निगडित असतात. हे सर्व उत्सव खूप आनंदात साजरे केले जातात. सण-उत्सवांच्या काळात भारतात एक वेगळीच ऊर्जा असलेले वातावरण असते. आपल्या देशात उत्सवांच्या सोबतीला राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय दिवस हे तितक्याच आनंदी वातावरणात साजरे होतात. हे कार्यक्रम फक्त राष्ट्रीय आणि सरकारी स्तरावरच नाही तर संपूर्ण भारतात प्रत्येक कुटुंबात साजरे केले जातात.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम किंवा कालावधी हे सामाजिक विषयांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि समाजाला विकसित बनवण्यासाठी कार्य करत असतात. असे म्हणले जाते की भारतीय व्यक्तींना जितके महत्व त्यांच्या धार्मिक सण उत्सवांचे आहे तितकेच महत्व ते या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दिवसाला देतात. भारतीय संस्कृती ही सामाजिक कार्यक्रमांना तितकेच जास्त महत्व हे देत असते. भारतात केंद्र स्तरावर होणाऱ्या सर्व कार्यक्रमांना संपूर्ण भारतभरात एकजुटीने आणि एकतेने साजरे केले जाते. दिवस साजरे करून आपल्या सर्वांच्या आत त्या सामाजिक मुद्द्याविषयी एक प्रकारे जागरूकता निर्माण होत असते.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला या दिवसांविषयी प्रश्न विचारलेले असतात. या दिवसांच्या विषयी माहिती मिळवून तुम्ही तुमचे जनरल नॉलेजमध्ये देखील भर टाकू शकता. आम्ही या सर्व दिवसांच्या विषयी माहिती अगदी सरळ आणि सोप्प्या भाषेत देण्याचा प्रयत्न केला आहे. या दिवसाच्या अनुषंगाने त्याच्याशी निगडित असणाऱ्या सर्व मुद्द्यांविषयी माहिती देखील दिली आहे.

आमच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या या माहितीचा उपयोग तुम्ही कशाही प्रकारे करू शकता. याशिवाय आमच्या वेबसाईटवर अनेक इतर विषयांवर माहिती आहे ती देखील तुम्ही वाचू शकता.

 

दिवस दिनांक
प्रवासी भारतीय दिवस 09 जानेवारी
राष्ट्रीय युवा दिन 12 जानेवारी
रस्ता सुरक्षा सप्ताह 11-17 जानेवारी
सेना दिवस 15 जानेवारी
राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी
सुभाषचंद्र भोस जयंती 23 जानेवारी
प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी
शहिद दिवस 30 जानेवारी
जागतिक कॅन्सर दिवस 4 फेब्रुवारी
जागतिक रेडिओ दिवस 13 फेब्रुवारी
व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी
जागतिक सामाजिक न्याय दिवस 20 फेब्रुवारी
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी
संत रविदास जयंती 27 फेब्रुवारी
राष्ट्रीय विज्ञान दिवस 28 फेब्रुवारी
जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च
राष्ट्रीय सुरक्षा दिवस 4 मार्च
जागतिक महिला दिन 8 मार्च
आयुध निर्मानी दिवस(Ordnance Factory Day) 18 मार्च
आंतरराष्ट्रीय वन दिवस 21 मार्च
विश्व जल दिवस 22 मार्च
शहीद दिवस 23 मार्च
जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल
जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल
आंबेडकर जयंती 14 एप्रिल
आंतरराष्ट्रीय पृथ्वी दिवस 22 एप्रिल
इंग्रजी भाषा दिवस 23 एप्रिल
विश्व पुस्तक दिवस 23 एप्रिल
जागतिक मलेरिया दिवस 25 एप्रिल
जागतिक कामगार दिन 1 मे
जागतिक पत्रकार स्वातंत्र्यता दिवस 3 मे
मातृ दिन 9 मे
राष्ट्रीय औद्योगिक दिन 11 मे
जागतिक कुटुंब दिन 15 मे
आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस 22 मे
जागतिक तंबाखूविरोधी दिन 31 मे
वैश्विक पालक दिन 1 जून
जागतिक पर्यावरण दिन 5 जून
जागतिक बालहक्क रक्षक दिन 6 जून
जागतिक महासागर दिन 8 जून
जागतिक दृष्टीदान दिन 10 जून
जागतिक बालकामगार विरोधी दिन 12 जून
जागतिक रक्तदाता दिन 14 जून
जागतिक जेष्ठ नागरिक छळ जागृती दिन 15 जून
जागतिक वाळवंटीकरण विरोधी दिन 17 जून
आंतरराष्ट्रीय लैंगिक हिंसाचार विरोधी दिन 19 जून
आंतरराष्ट्रीय निर्वासित दिन 20 जून
आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून
आंतरराष्ट्रीय विधवा दिवस 23 जून
जागतिक वृक्ष दिन 23 जून
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जून
राष्ट्रीय डॉक्टर दिन 1 जुलै
जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै
जागतिक युवक कौशल्य दिन 15 जुलै
नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस 18 जुलै
आंतरराष्ट्रीय युवक दिन 12 ऑगस्ट
आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस 13 ऑगस्ट
स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट
जागतिक फोटोग्राफी दिवस 19 ऑगस्ट
जागतिक मानवता दिन 19 ऑगस्ट
जागतिक आण्विक चाचणी विरोधी दिवस 29 ऑगस्ट
राष्ट्रीय खेळ दिवस 29 ऑगस्ट
राष्ट्रीय पोषण सप्ताह 1 ते 7 सप्टेंबर
शिक्षक दिन 5 सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 8 सप्टेंबर
हिंदी दिन 14 सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन 15 सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय ओझोन थर संरक्षण दिवस 16 सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय शांती दिन 21 सप्टेंबर
जागतिक पर्यटन दिवस 27 सप्टेंबर
जागतिक वृद्ध दिन 1 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन 2 ऑक्टोबर
गांधी जयंती 2 ऑक्टोबर
जागतिक आवास दिन 3 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय पशुधन दिवस 4 ऑक्टोबर
जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर
जागतिक डाक दिन 9 ऑक्टोबर
जागतिक मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय कुमारी दिन 11 ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय दृष्टी दिवस 14 ऑक्टोबर(2रा गुरुवार)
आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिवस 15 ऑक्टोबर
जागतिक अन्न दिवस 16 ऑक्टोबर
जागतिक गरिबी निर्मुलन दिवस 17 ऑक्टोबर
संयुक्त राष्ट्र दिवस 24 ऑक्टोबर
जागतिक शहर दिन 31 ऑक्टोबर
जागतिक त्सुनामी जागृती दिवस 5 नोव्हेंबर
जागतिक विज्ञान दिन 10 नोव्हेंबर
जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर
जागतिक सहिष्णुता दिवस 16 नोव्हेंबर
जागतिक तत्वज्ञान दिवस 17 नोव्हेंबर
विश्व बालक दिन 20 नोव्हेंबर
जागतिक दूरदर्शन दिवस 21 नोव्हेंबर
आंतरराष्ट्रीय महिला अत्याचार निर्मूलन दिवस 25 नोव्हेंबर
संविधान दिन 26 नोव्हेंबर
जागतिक एड्स दिवस 1 डिसेंबर
जागतिक गुलामगिरी विरोधी दिन 2 डिसेंबर
राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस 2 डिसेंबर
संगणक साक्षरता दिन 2 डिसेंबर
जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर
जागतिक माती दिवस 5 डिसेंबर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर
अखिल भारतीय हस्तकला सप्ताह 8 ते 14 सप्टेंबर
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन 9 डिसेंबर
मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर
आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस 11डिसेंबर
आंतरराष्ट्रीय स्थलांतरीत दिवस 18 डिसेंबर
राष्ट्रीय गणित दिवस 22 डिसेंबर
आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस 20 डिसेंबर
राष्ट्रीय शेतकरी दिवस 23 डिसेंबर

Leave a Comment