Information about Blood in Marathi | रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती

एखाद्याला रक्त कमी असते तर कोणीतरी रक्तदान करीत असते …जोपर्यंत आपण जगतो तोपर्यंत आपला आपल्या रक्ताशी संबंध असतो. जवळजवळ प्रत्येक माणसाने स्वतःच्या डोळयाने आपल्या शरीरातून वाहणारे रक्त पाहिले असेल परंतु याबद्दलची माहिती फार थोड्या लोकांना असते. आज मी तुम्हाला रक्ताविषयी काही मनोरंजक माहिती आणि गोष्टी सांगणार आहोत.

१) रक्ताचे पहिले हस्तांतरण १६६७ मध्ये दोन कुत्र्यांच्या मध्ये करण्यात आले होते.

२) जगातील पहिली रक्तपेढी १९३७ साली बांधली गेली.

३) रक्ताच्या एका थेंबामध्ये १o,ooo पांढऱ्या पेशी आणि २,५o,ooo प्लेटलेट असतात.

४) आपल्या शरीरातील ७o% रक्त लाल रक्तपेशींमधील असणारे हिमोग्लोबिन असते, ४% स्नायूंचे प्रथिन मायऑलोग्लोबिन मधे आढळते, २५% रक्त यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा आणि मूत्रपिंडामधे आढळते आणि उर्वरित 1% रक्त प्लाजमाच्या लिक्विड अपूर्णांकात आणि पेशींमधील एन्झाईम्स मध्ये असते.

५) दर ३ सेकंदाला, भारतातील एका व्यक्तीला रक्ताची आवश्यकता भासते. दररोज ४o,ooo युनिट रक्ताची आवश्यकता भासते. 3 पैकी 1 व्यक्तीला कधी न कधी जीवनात रक्ताची आवश्यकता असते.

६) आपल्या नसांमधील रक्त दर तासाला ४oo किलोमीटर वेगाने धावते आणि संपूर्ण दिवस जवळ जवळ ९,६oo किमी अंतर निर्धारित करते.

७) जर आपल्या हृदयाने शरीरातून रक्त बाहेर पंप केले तर ते ३० फूट उंचीवर बाउन्स होऊ शकते..

८) जर अगदीच गरज भासल्यास रक्तपेशीच्या जागी नारळाचे पाणी शरीरात घालता येते.

९) मानवांचे फक्त ४ प्रकारचे रक्तगट असतात (O, A, B, AB), पण गायींमध्ये सुमारे ८oo, कुत्र्यांमध्ये १३ प्रकारचे आणि मांजरीमध्ये ११ प्रकारचे रक्तगट आढळतात.

१०) केवळ मादी डास रक्त शोषून घेते, नर डास शाकाहारी असतात ते केवळ मधुर पातळ पेय पितात. मादी डास तिच्या वजनाच्या तुलनेत ३ पट अधिक रक्त पिऊ शकते.

११) तुम्हाला असे वाटत असेल की मच्छर आपले फक्त थोडेच रक्त शोषून घेते परंतु तुमचे संर्पूण रक्त १२ दशलक्ष मच्छर शोषून घेऊ शकतात. मच्छराला “ओ” गटाचे रक्त चोखणे आवडते.

१२) एका नवजात शिशुत फक्त 1 कप (२५o मि.ली.) रक्त असते आणि एका तरुणात सुमारे ५ लिटर रक्त असते याचा अर्थ शरीराच्या एकूण ७% वजन इतके रक्त आपल्या शरीरात असते.

१३) मृत्यूनंतर, शरीराचा जो भाग धरतीच्या अगदी जवळ असेल, रक्त प्रवाह त्याच अवयवाच्या बाजूने होतो आणि मग तिथे रक्त गोठून जाते, असे कदाचित गुरुत्वाकर्षणामुळे होत असेल.

१४) गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाही.

१५) आपल्या शरीरात जवळ जवळ o.२ मिग्रॅ सोने असते आणि याची सर्वाधिक मात्रा रक्तामध्ये आढळते. ४o,ooo लोकांच्या रक्तातून ८ ग्राम सोने काढले जाऊ शकते.

१६) जपानमध्ये रक्त गटाच्या माध्यमातून माणसांचे व्यक्तिमत्व जाणून घेतात.

१७) जेम्स हॅरिसन नावाच्या व्यक्तीने मागील ६० वर्षांत १,ooo वेळा रक्तदान केले आहे आणि २० दशलक्ष लोकांचे जीव वाचवले आहेत.

१८) बोरोरो ब्राझीलचे एक आदिवासी गट आहे . आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या गटातल्या सर्व लोकांचे “ओ” रक्तगट आहे.

१९) जवळजवळ प्रत्येकाचे रक्त लाल असते, परंतु कोळी आणि गोगलगाय मध्ये रक्त हलक्या निळ्या रंगाचे असते.

२o) एचपी प्रिंटरची ब्लॅक शाई रक्तापेक्षा जास्ती खर्चिक आहे.

२१) स्वीडिश मध्ये रक्त दान केल्यानंतर त्या व्यक्तीला, तोपर्यंत “धन्यवाद” मेसेज दिला जातो जोपर्यंत त्याच्या रक्ताने कोणाची मदत होत नाही.

२२) एकाच वेळी लघवी आणि रक्तदान करणे अशक्य आहे.

२३) बर्याचदा जेव्हा आपण आकाशाकडे बघतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर पांढरे ठिपके दिसतात प्रत्यक्षात हे आपल्या पांढऱ्या रक्त पेशी असतात.

२४) संपूर्ण शरीरातील अंतर तय करण्यासाठी रक्तातील पेशींना केवळ 30 सेकंद लागतात. रक्त २o सेकंदात १,१२,ooo किलोमीटरचे अंतर पार करू शकते.

२५) खेकड्याचे रक्त हे पृथ्वीवरील एकमेव असे पदार्थ आहे ज्याचा वापर इ्रग्समध्यें सापडलेल्या दूषित पदार्थांची चाचणी करण्यासाठी केला जातो.

२६) जर सर्व रक्तवाहिन्या एकत्र केल्या तर त्या दोनदा पृथ्वीला पूर्णपणे वेढा घालू शकतात.

२७) आतापर्यंत कृत्रिम रक्ताची निर्मिती करता आली नाही. ही फक्त देवाची भेट आहे.

२८) लाल रक्त पेशी: हे ऑक्सिजनसह चालते आणि कार्बन डाय ऑक्साइडला काढून टाकते.

२९) पांढरे रक्त पेशी: हे शरीरातील जीवाणू आणि व्हायरसपासून रक्षण करते.

३०) प्लाझ्माः शरीरातील प्रथिने घेऊन चालते व हे रक्त घोटण्यापासून रक्षण करते.

३१) प्लेटलेट: हे रक्त घोटविण्यात मदत करते व प्लेटलेटमुळेच दुखापत झाल्यावर काही वेळाने रक्तस्राव थांबतो.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment