What is Social Media in Marathi | Advantages and Disadvantages of Social Media in Marathi

What is Social Media in Marathi? सोशल मीडियाचे फायदे आणि तोटे

What is Social Media in Marathi: आपण ज्याप्रमाणे आपल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेत वावरत असताना आपला एक समूह बनवत असतो ते आपले एक नेटवर्क असते. अशाच प्रकारे आपण एकमेकांना न भेटता किंवा समोर न येता इंटरनेट वरील काही Social Communication माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधतो आपला एक समूह तयार करतो, एकमेकांसोबत जोडले जातो जे सर्व या सोशल मिडिया मुळेच शक्य आहे.

Network म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेलच. नेटवर्क म्हणजे एकमेकाशी जोडले जाणे. सध्या आपण बघितले तर Facebook, Instagram, Twitter यासारखे अनेक सोशल नेटवर्क प्लॅटफॉर्म बाजारात आहेत आणि ते जणू काही आपल्या जीवनाचा भाग बनलेले आहे. अरे महत्वाचे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे whatsapp तर राहिलेच! आजकाल लोक समोर कमी बोलतात आणि ऑनलाइन ऑनलाइन जास्त बोलतात असे गंमतीने म्हणले जाते आणि याला सोशल मीडिया जबाबदार आहे.

आज आपण याच सोशल मीडिया विषयी माहिती जाणून घेणार आहोत. यात सोशल मीडिया काय आहे आणि याचे अनेक फायदे आहेत परंतु यातून होणारे नुकसान देखील खूप आहेत. या सर्व गोष्टी आज आपण जाणून घेऊयात…

Social Media काय आहे – What is Social Media in Marathi

Social शब्दाचा अर्थच होतो सामाजिक. Social Media म्हणजे असे प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून आपण समाजाशी जोडले जातो. यामध्ये इंटरनेट हे मुख्य माध्यम असते. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपल्या ओळखीच्या व्यक्तींशी आणि अनोळखी व्यक्तींशी देखील जोडलेले असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री होते. काही लोक याचा वापर हा शैक्षणीक आणि व्यावसायिक कामांसाठी देखील करतात.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घडलेली घटना या नेटवर्क वर टाकतो किंवा आपल्याला बघायला मिळतात. आपल्याला ते आवडले तर आपण त्याला लाईक करतो आणि इतरांना माहिती पोहोचावी असे वाटत असेल तर शेअर देखील करतो. सोशल मीडियाने आपल्या सामान्य माणसाला देखील व्यक्त होण्यासाठी एक माध्यम उपलब्ध करून दिलेले आहे.

सोशल मीडियाच्या विभाजन

सोशल मीडियाला मुख्यतः आपण त्यांच्या वापराच्या आणि सुरक्षेच्या कारणापासून वेगळे केलेले आहेत.

  • Internal Social Media (ISN)
  • External Social Media (ESM)

Internal Social Media (ISN)

Internal Social Media आपण शक्यतो कमी वापरत असतो कारण हे जास्तीत जास्त privacy related सोशल नेटवर्क आहेत आणि यांचा वापर हा तसा खूप कमी होत असतो. आत तुमच्या शाळेचे ग्रुप असतील म्हणजे whatsapp किंवा facebook नाही तर Teams सारख्या apps वर तुमची एक community बनवलेली असते. त्यावर तुम्हाला जॉईन होण्यासाठी invitation गरजेचे असते किंवा त्यांनी तुम्हाला त्यांच्या community मध्ये जॉईन करून घेणे गरजेचे असते.

असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फार कमी आहेत. हॅकिंग कम्युनिटी, सीक्रेट कम्युनिटी हे याचे काही उदाहरण आहेत.

External Social Media (ESM)

आपण जे वापरतो ते ESM मध्ये येते. यात सर्व काही गोष्टी पब्लिक असतात त्यामुळे याला वापर सर्व लोक करू शकतात. ही देखील एक community असते परंतु यात कोणीही जॉईन होत असल्याने यावरील माहिती ही सर्वदूर पसरते. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यासारखे सर्व प्लॅटफॉर्म जे आपण दैनंदिन जीवनात माहिती, फोटो, व्हिडीओ शेअर करण्यासाठी वापरत असतो हे ESM मध्ये येतात. यामध्ये तुमचे अकाउंट हे ओपन तर असतेच परंतु तुम्ही तुमचे अकाउंट हे प्रायव्हेट करू शकता. यामुळे एखाद्याला तुम्ही शेअर केलेली माहिती समोरचा व्यक्ती जोपर्यंत तुम्ही त्याला जोडत नाही तोपर्यंत बघू शकत नाही.

सोशल मीडियाचे फायदे | Advantages of Social Media in Marathi

  1. सध्या आपल्यापैकी जवळपास सर्वच लोक हे सोशल मीडियाचा वापर हा करत असतात आणि त्यामुळे जर आपल्याला आपली जाहिरात करायची असेल तर आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सहज करू शकतो. आपल्याला ही जाहिरात करत असताना एक रुपया देखील खर्च येत नसल्याने आपण आपला व्यवसाय सहज वाढवू शकतो.
  2. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही मिनिटांपूर्वी घडलेली घटना ही संपूर्ण जगभरात लगेच पोहोचू शकते.
  3. सोशल मीडियावर आपण व्यक्त होऊ शकतो. सामान्य माणसाला त्याचे विचात स्पष्ट करण्याचे हे एक महत्वाचे माध्यम आहे. या माध्यमांवर आपले मत व्यक्त करत असताना फक्त इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची आपण खबरदारी घ्यायला हवी.
  4. आधीच्या काळात आपल्याला मित्रांशी बोलायचे असेल किंवा एखादा नातेवाईक परदेशात रहात असेल तर त्याच्याशी संवाद साधण्यासाठी मोबाईल वरून कॉल करणे हा मार्ग होता परंतु यात आपले खूप पैसे जात असत. परंतु त्याकाळात सुद्धा सोशल मीडियाने यावर उपाय देऊन अनेकांची मदत केली होती. आजही आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या दूरच्या नातेवाईकांशी सहज संपर्क करू शकतो.
  5. सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त मेसेज नव्हे तर आपण ऑडिओ, व्हिडीओ किंवा फोटो आणि आता डॉक्युमेंट सुद्धा पाठवू शकतो.
  6. सध्याच्या काळात राजकीय पक्ष देखील त्यांचे कॅम्पेन ऑनलाइन चालवतात आणि त्याचा त्यांना फायदा देखील होतो.
  7. सोशल मीडियावर युवा वर्ग जास्त प्रमाणात असल्याने ते सर्व वेगवेगळ्या प्रांतातील असतील तरी देखील एका कारणाने एकत्र येऊन काहीतरी समाजासाठी हिताचे काम करू शकतात.
  8. शिक्षणाच्या दृष्टीकोनातून देखील यावर अनेक माध्यमातून आपण शिक्षणासाठी उपयोगी साहित्य किंवा माहिती टाकू शकतो.
  9. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता विक्रीसाठी देखील एक ऑप्शन ऍड करत आहेत. याचा फायदा घेऊन आपण आपले प्रोडक्ट्स हे इतरांना सहज विकू शकतो. यावर तुम्हाला ग्राहक शोधायची गरज नसते. याउलट ग्राहक विक्रेत्याला इथे शोधत येत असतो.

सोशल मीडियाचे तोटे | Disadvantages of Social Media in Marathi

सोशल मीडिया वापरून तुम्हाला विरंगुळा देखील मिळत असेल आणि अनेक फायदे देखील होत असतील परंतु ज्या गोष्टीचे फायदे असतात त्याचे थोडेफार नुकसान / तोटे देखील असतातच.

  1. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे सर्व सामाजिक आहेत आणि त्यामुळे इथे तुमची माहिती, तुमच्याविषयी गुप्त असायला हवी अशी काही माहिती जगाच्या समोर येऊ शकते. आपण बऱ्याचदा ऐकले असेल की फेसबुक हॅक होऊन त्याचा डेटा आपल्याला डार्क वेब वर बघायला मिळवतोय किंवा हाच डेटा एखादी कंपनी वापरते.
  2. तुम्ही कितीही खाते प्रायव्हेट केले तरी देखील सोशल मीडियावर तुमची प्रोफाइल असेल तर त्यांच्यातील सर्व काही माहिती एखादा unauthorized व्यक्ती काहीतरी करून मिळवू शकतो.
  3. मुलांच्या हातात आता मोबाईल आले आहेत आणि ते या सोशल मीडियावर खूप जास्त म्हणजे गरजेपेक्षा जास्त वेळ देत आहेत. याचा परिणाम म्हणजे त्यांना सोशल मीडिया म्हणजे विश्व असे वाटायला लागते.
  4. सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट असतात आणि सामान्य नागरिक ज्यांना जास्त काही समजत नाही असे लोक या फेक अकाउंट ला बळी पडतात.
  5. काही लोक तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याकडे आकर्षित करतात आणि तुम्हाला यातून आर्थिक नुकसान देखील होई शकते.
  6. सोशल मीडियावर तुम्हाला लुटण्यासाठी अनेक ठग बसलेले आहेत. ते योग्य तो शिकार निवडून त्याच्या खात्यातून पैसे काढण्यासारखे चुकीचे काम करतात.
  7. सोशल मीडिया वर अनेक आपत्तीजनक संदेश, व्हिडीओ आणि फोटो असतात. यातून समाजात चुकीचे वातावरण निर्माण होण्यास हातभार लागतो.

सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी | Tips to Follow while using Social Media

  1. अनोळखी व्यक्तीसोबत आपली महत्वाची माहिती शेअर करू नका. कोणालाही आपले फोटो किंवा व्हिडीओ देऊ नका.
  2. आपली प्रोफाइल ही पब्लिक असेल आणि त्यावर फोटो असतील तर तिला प्रायव्हेट करा. जेणेकरून तुम्ही टाकलेले फोटो किमवा व्हिडीओ यांचा गैरवापर होणार नाही.
  3. ऑनलाइन व्यवहार करत असाल तर त्या व्यक्तीविषयी संपूर्ण माहिती घ्या. सोशल मीडियावर भेटलेल्या व्यक्तीवर समोर भेटल्याशिवाय ऑनलाइन व्यवहार करणे टाळा.
  4. फेक अकाउंट पासून सावध रहा.
  5. हनी ट्रॅप पासून देखील सावधगिरी बाळगा. आपली महत्वाची माहिती काढून घेण्यासाठी सध्या हनी ट्रॅप प्रकरण वाढलेले आहेत.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment