100% यशस्वी मुलाखतीसाठी टिप्स । Interview Tips and Tricks in Marathi

Interview Tips and Tricks in Marathi | 100% यशस्वी मुलाखतीसाठी टिप्स

Interview Tips and Tricks in Marathi: प्रत्येक मनुष्याचे स्वप्न असते की त्याला एक चांगली नोकरी मिळाली पाहिजे, जिथे एक चांगला अनुभव असेल आणि चांगला पगार आणि मोबदला देखील मिळू शकेल. हे स्वप्न तर सर्वांचे असते परंतू यासाठी आपल्याला एक चांगल्या प्रकारे मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू द्यावा लागेल. एक यशस्वी जीवनात इंटरव्यु मध्ये पास होण्यासाठी आपल्यात ती क्षमता आणि आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. ज्यामुळे तुम्ही तुनच्या स्वप्नांच्या कंपनीमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला या सर्व गोष्टी मिळू शकतील.

एक चांगला इंटरव्यु म्हणजेच मुलाखत प्रत्येक व्यक्ती देऊ शकत नाही. त्यासाठी काही खास गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकला तर मुलाखती मध्ये तुम्ही हमखास निवडले जाल.

चला तर मग इंटरव्यु सोप्पा बनवण्यासाठी आज आपण काही सोप्प्या पर्यायांविषयी – Interview Tips and Tricks in Marathi. ज्यामुळे तुम्ही स्वतःला इंटरव्यु साठी तयार करू शकता.

100% बेस्ट इंटरव्यु टिप्स – Interview Tips and Tricks Marathi

कंपनी विषयी माहिती

मुलाखतीला जाण्याअगोदर तुम्ही एक गोष्ट नक्की तपासून पहा की तुम्हाला त्या कंपणीविषयी महत्वाची मूलभूत माहिती आहे का? जसे काही कंपनी कधी बनली, संस्थापक कोण आहेत, कंपनी काय निर्माण करते आहे आणि कंपनीची ग्रोथ कशी आहे! या सर्व गोष्टी तुम्हाला इंटरनेटवर मिळून जातील, त्याची तुम्हाला तयार करायची आहे. खूप वेळा इंटरव्यु घेणारा व्यक्ती हा तुम्हाला या सर्व गोष्टी विचारत असतो, त्याला जाणून घ्यायचे असते की तुम्ही ज्या कंपनीत काम करणार आहात त्याची तुम्हाला किती माहिती आहे. त्यामुळे तुम्ही ही माहिती गोळा करा जेणेकरून इतरांपेक्षा तुमची जागा ही मजबूत बनेल.

कपड्यावर जास्त लक्ष द्या

आपल्याला सर्वांना माहीत असते की इंटरव्यु साठी चांगले कपडे आपण घातले पाहिजे. परंतु आपल्याला हे शक्य होत नाही कारण त्यावेळी योग्य निवड करणे जमत नाही. तुम्ही अशा वेळी फिट कपडे घातले पाहिजे, ते जास्त सैल पण नको आणि जास्त घट्ट देखील नको. याशिवाय कपडे हे नॉर्मल असावे आणि फॉर्मल असावे. लाल, पिवळा , हिरवा म्हणजे यासारखे जे तीव्र रंग आहेत ते परिधान करणे टाळावे. तुमचे बूट हे पोलिश केलेले असावेत, टाय चमकदार असावी आणि कपडे व्यवस्थित परिधान केलेले असावे. या सर्व गोष्टींमुळे खूप जास्त फरक पडतो.

पाणी प्या

मुलाखतीच्या वेळी पाण्याने भरलेल्या बॉटल मधून एक घोट पाणी देखील तुमची खूप जास्त मदत करून जाते. कारण ज्यावेळी तुम्हाला जास्त बोलायचे असते आणि तुम्ही खूप काळजीत असता तेव्हा तुमचे ओठ हे खूप लवकर कोरडे पडतात. याचा परिणाम आपल्या मानसिकतेवर होतो आणि पुढे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही देऊ शकत नाही.

आत येण्याची आणि बसण्याची परवानगी

बऱ्याचदा असे लक्षात येते की जेव्हा तूमचे नाव पुकारले जाते तेव्हा तुम्ही अचानक त्या खोलीत घुसतात. परंतु हे चुकीचे आहे, तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला बोलावले आहे मग तुम्ही जाऊ शकता, तर तसे नाही. तुम्ही आत जात असताना अगोदर त्यांची परवानगी घ्या आणि मगच आत जा. याशिवाय तुम्ही दिलेल्या खुर्चीवर तेव्हाच बसा जेव्हा ते तुम्हाला बसण्यासाठी सांगतील. बसण्याच्या वेळी तुम्ही त्यांचे आभार देखील मानले पाहिजे, याचा देखील खूप जास्त प्रभाव पडतो.

आत्मविश्वास

मुलाखतीला जात असताना सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे आत्मविश्वास! तुमच्या हावभाव वरून आणि डोळ्यांमधून त्या गोष्टी स्पष्टपणे कळत असतात. जेव्हा तुम्ही बसत असता तेव्हा असे जाणवू देऊ नका की तुम्ही घाबरलेले आहात. तुम्ही लडखडता आहात किंवा तुम्हाला कम्फर्ट भेटत नाही हे समोरच्याला कळू देऊ नका. तुमच्या आतील आत्मविश्वास हाच तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या नोकरीकडे घेऊन जाणार आहे त्यामुळे तो कायम ठेवा.

बॉडी लँग्वेज

तुम्हाला तुमच्या बॉडी लँग्वेज म्हणजेच शरीराच्या हालचालीकडे लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे आहे. ओळख करून देत असताना संपूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्याशी हस्तांदोलन केले पाहिजे. असे करत असताना तुम्हाला तुमच्या शरीराच्या हालचालींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ओळख करून देत असताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून तो करावा, त्यावेळी इतरत्र इकडे तिकडे बघू नये. तुमचे खांदे हे समोरच्या व्यक्तीकडे असले पाहिजे. आपले खांदे हे शरीरापासून वेगळे दिसले पाहिजे आणि चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल देखील असली पाहिजे. यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला लवकर आकर्षित करू शकता आणि त्यामुळे तुम्हालाही कम्फर्ट फील होईल.

काही तज्ज्ञांच्या मते जवळपास 50% आपले मत हे आपल्या बॉडी लँग्वेज मधून समोरच्या व्यक्तीला समजत असते. त्यामुळे इंटरव्यु देण्यापूर्वी काही दिवस त्याची तयारी करणे गरजेचे असते.

वेळ घ्या

मुलाखतीच्या वेळी तुम्हाला तुमचा पूर्ण वेळ हा वापरायचा आहे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लगेच देण्या अगोदर एकदा विचार नक्की केला पाहिजे. उत्तर देताना काही सेकंद विचार करणे ही नकारात्मक गोष्ट नाहीये तर ती तुमच्या अचूक उत्तर देण्याची क्षमता आहे. त्यामुळे होईल असे की तुम्ही तुमचे उत्तर देताना अधिक आत्मविश्वासाने देऊ शकाल आणि तुमच्या उत्तरावर तुमचे नियंत्रण असेल.

गरजेपेक्षा जास्त बोलू नये

जेव्हा मुलाखत घेणार एखादा प्रश्न तुमच्या माहिती असलेल्या गोष्टीविषयी विचारत असतो तेव्हा तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर देऊन पुढे पुन्हा जास्त माहिती देत असतात. असे करू नका, कारण तो व्यक्ती फक्त तीच गोष्ट सत्य ऐकण्यासाठी उत्सुक असतो, त्याला तुमच्या इतर बोलण्यात आणि माहितीत काहीच रुची नसते. त्यामुळे जितके गरजेचे आवश्यक आहे तितकेच बोला, जास्त बोलू नका!

रिज्युम/CV बनवताना लक्ष द्या

बऱ्याच वेळा मुलाखत देणारा व्यक्ती हा कोणाचा तरी रिज्युम कॉपी करत असतो आणि त्यात अशा काही गोष्टी देखील टाकतो ज्या त्याने कधी केलेल्याच नसतात. जेव्हा मुलाखत घेणारा त्यासंदर्भात काही प्रश्न विचारतो तेव्हा मग आपण काहीच उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे तुमचा रिज्युम तुम्ही स्वतः बनवा, तो वाचा, त्यात कशाचा अर्थ काय आहे हे देखील समजून घ्या.

यात विशेषतः तुमचे ध्येय आणि आवड याविषयी थोडी माहिती तुम्ही ठेवा. याशिवाय प्रत्येकवेळी रिज्युमच्या तीन प्रति घेऊन जात जा. बऱ्याच वेळा इंटरव्यु घेणारे तीन लोक असतात आणि त्यांना एका रिज्युम मधून तुमचा इंटरव्यु घेणे थोडे कठीण जाऊ शकते. त्यामुळे तुम्ही तीन प्रति सोबत ठेवल्या तर त्याने त्यांना सोप्पे होईल आणि याचा त्यांना आणि परिणामतः तुम्हाला फायदा होईल.

सॅलरी विषयी

जर तुमची निवड झाली असेल आणि मोबदल्याविषयी म्हणजेच पगाराविषयी ते बोलत असतील तर तिथे कमी जास्त बोलू नका. मुलाखतीला जाण्याअगोदरच तुम्हाला किती पैसे पाहिजे आहेत हे ठरवून जा आणि मग एकदाच तिथे बोला. बऱ्याच वेळा मुलाखत घेणारा हा जास्त देण्याचा विचार करत असतो आणि तुम्ही कमी बोलून जात तेव्हा तुमचेच नुकसान होते.

मुलाखत ही देखील एक कला आहे ज्यात तुम्हाला निपुण व्हावे लागेल. अशा वेळी आपण मनात एक गोष्ट ठेवली पाहिजे ती म्हणजे तुम्ही मुलाखत द्यायला नाही तर चर्चा करायला आला आहात. ही चर्चा करत असताना तुम्हाला ती योग्य पद्धतीने करायची आहे आणि मग निघून जायचे आहे. हे जर तुम्ही केले तर तुमच्या मनात असलेली भीती लगेच नष्ट होईल आणि तुमची मुलाखत ही यशस्वी असेल.

तर मित्रांनो Interview Tips and Tricks in Marathi वर आमचा हा लेख तुम्हाला कसा वाटला कंमेंट करून नक्की सांगा. Interview Tips in Marathi या लेखाबद्दल तुमच्या काही शंका असतील तर कंमेंट करून सांगा आम्ही तुमच्या शंकांचं लवकरात लवकर निरसन करू.

हे देखील वाचा

Jack ma biography in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

2 thoughts on “100% यशस्वी मुलाखतीसाठी टिप्स । Interview Tips and Tricks in Marathi”

Leave a Comment