Online Gas Booking Information in Marathi | HP, Indane, Bharat गॅस बुक कसे करावे?

Online Gas Booking कशी करावी । HP, Indane, Bharat गॅस बुक कसे करावे?

Online Gas Booking Information in Marathi: आम्हाला देखील माहिती आहे की तुम्हाला ऑनलाइन गॅस कसा बुक करावा? याविषयी जाणून घ्यायचे आहे आणि या लेखाच्या माध्यमातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत देखील होणार आहे. आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही कशा प्रकारे ऑनलाइन गॅस बुकिंग करू शकता.

चला तर मग विलंब न करता सुरू करूयात, Online Gas Cylinder Booking विषयी माहिती.

ऑनलाइन गॅस बुक कसा करतात (एचपी, इंडेन, भारत गॅस)?

आता तुम्ही LPG cylinder ची बुकिंग घर बसल्या काहीही त्रास न घेता फक्त ऑनलाइन काही क्लिक करून करू शकता. सर्व Gas Provider जसे की Indane Gas, HP Gas आणि Bharat Gas यांचे स्वतःचे Online LPG Booking Services आहेत. या सर्व्हिसेस ऑनलाइन असून यावर जाऊन वापरकर्ता ऑनलाइन खाते उघडून apply देखील करू शकतो.

इथे खाली मी काही स्टेप्स सांगत आहे ज्यांना फॉलो करून तुम्ही LPG Cylinder सहज घरबसल्या मिळवू शकता.

  1. सर्वात आधी या तीन Gas Providers पैकी एखाद्या गॅस प्रोव्हाईडर च्या साईटला जाऊन रजिस्टर करायचे आहे. हे रजिस्ट्रेशन त्यांच्या ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा होऊ शकते. त्यांनंतरच तुम्ही Online Cylinder Booking करू शकता.
  2. Account बनविल्यानंतर त्यात सर्वात आधी Login करावे लागेल.
  3. एकदा login झाल्यानंतर तुमच्या समोर Account विषयी सर्व माहिती येईल.
  4. त्यांनतर तुमच्या समोर अनेक option येतील. यातून तुम्हाला अनेक सेवांचा फायदा घेता येईल.
  5. जर तुम्हाला Gas Booking करायची असेल तर मग सर्वात वर दिसणारा Order/ Track your Refill हा ऑपशन निवडायचा आहे.
  6. या पर्यायाला निवडल्यानंतर Payment चा ऑप्शन येईल. इथे तुम्ही ऑनलाइन आणि Cash on Delivery वापरू शकता.
  7. एकदा Payment Option निवडल्यानंतर तुमच्या समोर एक स्क्रीन येईल. इथे तुमच्या Distributer चे नाव, Delivery Date, Email, PAN number आणि फोन नंबर असेल.
  8. असे करून तुम्ही गॅस बुकिंग कोणत्याही गॅस सर्व्हिस कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन करू शकता.

Online Gas Booking करण्यासाठी PAN CARD तुमच्या गॅस अकाउंट सोबत जोडलेला असणे गरजेचे आहे. नाहीतर तुमची ऑनलाइन बुकिंग होऊ शकत नाही.

Online Gas Booking करण्याचे फायदे काय आहेत?

चला तर मग आता जाणून घेऊयात Online Gas Booking चे काय Benefits आहेत.

  • यासाठी कोणत्याही प्रकारे Additional Charges देण्याची गरज नाही.
  • एलपीजी बुकिंगसाठी आणि रिफिल करण्यासाठी ही एक सुरक्षित आणि सोयीस्कर मेथड आहे.
  • अशा प्रकारे गॅस बुकिंग केल्यानंतर गॅस एजन्सी मध्ये जाण्याची गरज पडत नाही. Distributors सोबत सतत आपल्या ऑर्डरची स्थिती जाणून घ्यावी लागत नाही.
  • Refill करण्यासाठी तुम्ही कधी सुद्धा आणि कुठून सुद्धा करू शकता.
  • यात payment करण्याची मेथड देखील खूप सोपी असते.
  • यासोबत तुम्ही Delivery ची ट्रॅकिंग देखील ऑनलाइन करू शकता.

 

गॅस सिलेंडर आपण कोण कोणत्या माध्यमातून ऑनलाइन बुक करू शकतो?

मोबाईल नंबर रजिस्टर करून, गॅस बुकिंग नंबर वर कॉल करून, मोबाईल अँप च्या माध्यमातून, मेसेज पाठवून, इत्यादी माध्यमातून गॅस सिलेंडर भरण्यासाठी तुम्ही बुकिंग करू शकता.

 

जर आपल्याला मोबाईल अँपच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करायचा असेल तर आपल्याला काय करावे लागेल?

मोबाईल अँप वरून गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी सर्वात आधी त्या गॅस कंपनीचे अँप डाउनलोड करा. नंतर अँप मध्ये रजिस्ट्रेशन करा. सर्व माहिती दिल्यानंतर आणि कागदपत्रांची सत्यता पडताळणी झाल्यानंतर तुम्ही अँप वापरू शकता. अधिक माहिती आर्टिकल मध्ये दिलेली आहे. उपभोक्ता दिलेल्या लेखाच्या माध्यमातून सहज गॅस सिलेंडर ऑनलाइन बुक करू शकतात.

 

आज आपण काय शिकलो?

आम्हाला पूर्ण खात्री आहे की आम्ही तुम्हाला सर्वांना ऑनलाइन गॅस बुकिंग कशी करायची याविषयी सर्व माहिती दिली आहे. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला HP, INDANE आणि BHARAT GAS ची बुकिंग कशी करतात याविषयी समजले असेल.

तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत Facebook आणि Whatsapp वर शेअर नक्की करा.

 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

3 thoughts on “Online Gas Booking Information in Marathi | HP, Indane, Bharat गॅस बुक कसे करावे?”

Leave a Comment