Information About Gujarat in Marathi | गुजरातशी संबंधित काही मनोरंजक माहिती
गुजरातचा गरबा केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. पण गुजरातला केवळ गरबा साठीच ओळखले जात नाही, तर येथे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गुजरातला संपूर्ण जगामध्ये एक वेगळे ओळख करून देतात. तर मग आपण जाणून घेऊया गुजरातशी संबंधित काही मनोरंजक तथ्ये!!
१) ऐतिहासिक काळापासूनच गुजरात एक समृद्ध राज्य आहे, म्हणूनच ब्रिटिशांनी भारतातील पहिला कारखाना म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी गुजरात राज्यातील सुरत शहरात स्थापित केली.
२) जगातील सर्वात मोठे जहाज तोडण्याचे यार्ड गुजरात मध्ये स्थित आहे. हे यार्ड भावनगर शहराचा “अलंग” मध्ये स्थित आहे.
३) जगातील एक तृतीयांश हिरे गुजरातच्या सुरत शहरात पॉलिश होतात.
४) गुजरातमधील गांधीनगर शहर हे आशियातील सर्वात हिरवेगार शहर मानले जाते.
५) दूध उत्पादनात गुजरात राज्याचे सर्वोच्च स्थान आहे. अमूल आनंद मिल्क डेरी आशियातील सर्वात मोठी दूध डेरी आहे.
६) गुजरातमध्ये नवरात्री उत्सवादरम्यान खेळलेला दांडिया आणि गरबा सर्व जगभर प्रसिद्ध आहे.
७) एशियाटिक टायगर केवळ गुजरात मध्ये आढळतो. हा प्राणी पतन अभयारण्यामध्ये संरक्षित आहे.
८) गुजरात हा शब्द संस्कृत “गुर्जर राष्ट्र” या शब्दापासून निघालेला आहे.
९) आपल्या देशातील सर्वाधिक बंदर गुजरात राज्यात आहे
१०) भारतातील स्वच्छ राज्यांच्या यादीत गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावर आहे चंदीगड दुसर्या क्रमांकावर मध्यप्रदेश आहे.
११) गुजरात हे भारतातील एकमेव असे राज्य आहे जेथे २२०० किलोमीटर लांब गॅस पाइपलाइन विस्तारित करण्यात आली आहे.
१२) गुजरात हे जगातील तिसरे सर्वात जलद गतीने विकसित करणारे राज्य आहे. २०१० मध्ये जगातील प्रसिद्ध नियतकालिक फोर्ब्सने ने हे उघड केले होते.
१३) गुजरात मधील समृद्धीमुळे या राज्याला पश्चिमेकडील रत्न म्हणतात.
१४) गुजरात राज्यातील कच्छ जिल्हा हा भारतातील सर्व राज्यांमध्ये सर्वात मोठा जिल्हा आहे.
१५) ऐतिहासिक तत्त्वांनुसार गुजरात मध्ये असलेले लोथल हे आपल्या देशातील पहिले बंदर शहर आहे.
१६) गुजराती लोक त्यांच्या व्यवसाय कौशल्यामुळे ओळखले जातात.
१७) कृष्णा आणि सुदामा यांच्यातील मैत्रीचे वर्णन हिंदुधर्मांतील ग्रंथांमध्ये करण्यात आले आहे. श्रीकृष्णाचे जन्म स्थान द्वारका आहे आणि सुदामा चे जन्मस्थान पोरबंदर आहे. हे दोन्ही शहर गुजरात राज्याच्या सीमे खाली येतात.
१८) ऋग्वेदा अनुसार एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग “सोमनाथ” गुजरात राज्याच्या वेरवाल शहराजवळ स्थित आहे.
१९) आशियातील सर्वात उच्च दर्जाच्या व्यवस्थापन संस्थापैकी काही संस्था गुजरात राज्याच्या अहमदाबाद शहरामध्ये स्थित आहे.
२०) जगामध्ये गुजराती बोलणारे सुमारे ५९ दशलक्ष लोक आहेत आणि या अर्थाने गुजराती भाषा जगामध्ये २६ व्या क्रमांकावर आहे.
२१) गुजरात मध्ये फायबर ऑप्टिकल केबल चे नेटवर्क सुमारे ५९ हजार किलोमीटर पर्यंत पसरलेले आहे. हा नेटवर्क सर्वात जास्त नेट स्पीड सह उत्तम बैंडविड्थ प्रदान करतो .
२२) भारतातील सर्व राज्यांपेक्षा गुजरात मध्ये जास्त साखर वापरली जाते याचे मुख्य कारण म्हणजे गुजरात मधील गोड पदार्थ आहे.
२३) जगातील सर्वात मोठी तेल रिफायनरी गुजरात राज्याच्या जामनगर शहराजवळ आहे. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची आहे.
२४) गुजरातमध्ये कापूस उत्पादन होते. आपल्या देशातील एक तृतीयांश कापूस गुजरात राज्यातून येतो.
२५) गुजरात हे भारताचे प्रमुख पेट्रोकेमिकल केंद्र आहे. आपल्या देशातील एकूण पेट्रोकेमिकल उत्पादनापैकी ६०% पेट्रोकेमिकल उत्पादन गुजरात मधून येते.
२६) गुजरातमध्ये एकूण १७ विमानतळ आहेत जे भारतातील विमानतळांच्या संख्येवर आधारित सर्वोच्च आहे.
२७) गुजरात राज्य, महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, उद्योगपती धीरुबाई अंबानी, जमशेदजी टाटा या अशा महान व्यक्तींचे जन्मस्थान आहे.
२८) गुजरात चा समुद्रकिनारा १६०० किलोमीटर लांब आहे. हि किनारपट्टी भारताच्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा अधिक लांब आहे.