जर आपण डिस्कवरी चैनल पहात असाल तर आपल्याला बेयर ग्रिल्स यांच्या बद्दल तर नक्कीच माहिती असेल. नावाने नव्हे परंतु फोटो पाहिल्यानंतर एक अरबहून जास्त लोक बेयर ग्रिल्स ह्यांना ओळखत असतील. तर जाणून घेऊया बेयर ग्रिल्स बदल अशा काही गोष्टीं जे त्यांना सुपर ह्यूमन म्हणून सिद्ध करतात.
१) बेयर ग्रिल्स यांचे खरे नाव “एडवर्ड मायकल ग्रींस” आहे. हे नाव बालपणात त्यांच्या बहिणीने त्यांना दिले होते.
२) बेयर २००६ – २०११ सालात युकेमधील टीव्ही मालिका, “Man Vs. Wild” यातून प्रसिद्ध झाले.
३) “Man Vs. Wild” या मलिकचे वास्तविक नाव “Born survivor – Bear Grylls ” असे होते.
४) वयाच्या चौथ्या वर्षा पर्यंत बेयरचे पालनपोषण आयरलैंड मध्ये झाले.
५) बेयर ग्रिल्स यांनी कराटेमध्ये ‘ब्लाक बेल्ट’ जिंकलेला आहे.
६) बेयर ग्रिल्स क्रिश्चन धर्माचे आहेत आणि त्यांचा देवावर खुप विश्वास व श्रद्धा आहे.
७) शाळा संपल्यानंतर बेयर ग्रिल्स यांना भारतीय सैन्यामध्ये जायचे होते.
८) बेयर ग्रिल्स यांना तीन मुले आहेत.
९) बेयर यांनी ब्रिटिश विशेष हवाई सेवा (21 SAS) यामध्ये तीन वर्षासाठी सेवा केली आहे.
१०) १९९८ साला मध्ये जेव्हा ते केवळ तेवीस वर्षाचे होते. त्यावेळी त्यांच्या पाठीचा कणा 3 ठिकाणांतून तुटलेला असूनही माउंट एव्हरेस्टवर सगळ्यात कमी वयात चढणारे पहिले होते. यासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवली आहे.
११) माउंट एव्हरेस्टवर चढण्याच्या एक वर्षा अगोदर उंचीवरून उडी मारताना त्यांच्या पॅरॅशूट मध्ये भोक झालेला ज्यामुळे ते खाली पडले आणि त्यांच्या पाठीतील कणा तीन जागी तुटला.
१२) बेयर ग्रिल्स अशा अनेक ठिकाणी पहिले पोहचले आहेत जिकडे आजपर्यंत कोणीही मनुष्य पोहोचलेला नाही.
१३) बेयर ग्रिल्स यांना गिटार आणि पियानो वाजवायला आवडते.
१४) बेयर ग्रिल्स यांनी २००२ मध्ये लंडन विद्यापीठातून हिस्पॅनिक अभ्यासक्रमांमध्ये पदवी प्राप्त केली आहे.
१५) बेयर ग्रिल्स यांनी ७६०० मीटर उंचीवर हॉट एअर बलून च्या खाली डिनर करण्याचे विश्वविक्रम बनवलेले आहे.
१६) गेल्या वर्षी त्यांच्या जीवन चरित्राचा पुस्तकाला चीनमध्ये प्रभावी पुस्तक यासाठी सर्वाधिक मत मिळालेले.
१७) तुम्हाला माहित आहे का? बेयर ग्रिल्स आपल्या कुटुंबावर इतक प्रेम करतात की शूटिंगला जाताना ते आपल्या कुटुंबाचा फोटो आपल्या बुटांमध्ये घालून जातात.
१८) बेयर ग्रिल्स कार्यक्रम संपल्याबरोबरच घरी जाऊन पोटातील कीटक मारण्याचे औषध खातात.
१९) बेयर ग्रिल्स यांनी आपल्या स्व:ताचे मूत्र आणि मेलेल्या प्राण्यांच्या हृदय देखील खाल्ले आहे.
२०) बेयर ग्रिल्स यांनी आज पर्यंतची सर्वात घाणेरडी वस्तू म्हणजे शेळ्यांचे कच्चे अंडकोश खाल्ले आहे.