How to start blogging using mobile in Marathi | मोबाईल वापरून ब्लॉगिंग कशी करतात?

मोबाईल वापरून ब्लॉगिंग कशी करतात? | How to start blogging using mobile in Marathi

ब्लॉगिंग विषयी आपल्याला माहिती असतेच परंतु प्रॉब्लेम हा असतो की आपल्याकडे ब्लॉगिंग करण्यासाठी कॉम्प्युटर नसतो आणि मग आता प्रश्न समोर उभा राहतो की मोबाईल वापरून ब्लॉगिंग करता येते का?

तर उत्तर हो आहे. परंतू आता ही ब्लॉगिंग मोबाईल वरून कशी करायची? थोड्याफार अडचणी या मोबाईल वरून ब्लॉगिंग करताना येत असतात त्यांचे देखील उत्तर आज आपण बघणार आहोत. कारण आम्ही देखील सुरुवात करताना मोबाईल ब्लॉगिंग वरूनच केली होती त्यामुळे त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यांचे उत्तर आमच्या अनुभवातुन तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.

फक्त लॅपटॉप किंवा मोबाईल नाही हा प्रॉब्लेम नसतो तर काही लोक कॉम्प्युटर समोर बसून आर्टिकल लिहायला कंटाळा करतात त्यामुळे त्यांच्यासाठी देखील मोबाईल वरून ब्लॉगिंग कशी केली जाते हा विषय महत्वाचा असेल.

मोबाईल वरून ब्लॉगिंग करावी का? Can I start blogging from smartphone / Mobile?

तुमच्या मनात देखील हा प्रश्न असेलच! कारण आपल्याला अशी शंका येत असते की आपण मोबाईल किंवा स्मार्टफोन वापरून एक चांगला आणि well optimized ब्लॉग बनवू शकतो का? हो तुम्ही सर्व काही मोबाईल वरून कर्ज शकता.

 

काही लोक सांगतात की सुरुवातीला तुमच्याकडे ब्लॉग सेटअप करत असताना कॉम्प्युटर हवा असतो. काही प्रमाणात ही गोष्ट खरी आहे परंतु जर नसेलच कॉम्प्युटर तरी देखील तुम्ही हे सर्व काम देखील मोबाईल वरून पूर्ण करू शकता. त्यामुळे तुमच्या मनातील शंकेचे आता पूर्णपणे निरसन झाले असेल. मोबाईल वरून तुम्ही ब्लॉगिंग ही करू शकता आणि पुर्णपणे ब्लॉगिंग मोबाईल वरून होऊ शकते.

 

ब्लॉगिंग सुरू करताना कोणता प्लॅटफॉर्म वापरावा?

ब्लॉगिंग ला सुरुवात करत असताना आपल्यासमोर दोन मुख्य पर्याय आहेत. WordPress आणि Blogger! या दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला apps देखील देतात ज्याच्या माध्यमातून तुम्ही पोस्ट लिहू शकता, ईडीट करू शकता आणि पब्लिश देखील करू शकता.

Blogger आणि wordpress यामध्ये काय फरक आहे ही गोष्ट कदाचित सर्वांना माहीत नसेल. यापैकी कोणता प्लॅटफॉर्म तुम्ही निवडावा याविषयी तुम्हाला Blogger Vs WordPress : कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म निवडावा? इथे माहिती वाचायला मिळेल.

सुरुवातीच्या सर्व सेटअप जसे अकाउंट बनवणे, theme टाकणे, होस्टिंग खरेदी करून डोमेन नेम सोबत त्याची जोडणी करणे हे सर्व काम तुम्ही Google Chrome, Firefox यासारख्या ब्राउझर च्या माध्यमातून पूर्ण करू शकता. एखाद्या ठिकाणी जर अडचण येत असेल तर तुम्ही मोबाईल वर त्या वेबसाईटचा डेस्कटॉप view देखील बघू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या ब्राउझर मध्ये Desktop Mode किंवा Turn on Desktop Mode हा पर्याय शोधून त्याला चालू करायचे आहे.

 

ब्लॉगिंगसाठी मोबाईल ऍप्स – Apps for Blogging Through Website

 तुम्ही जो कोणता प्लॅटफॉर्म ब्लॉगिंग साठी निवडाल त्यानुसार तुम्हाला तुमच्या मोबाईल साठी app डाउनलोड करायचे आहे. तुम्ही ब्राउझर मधून देखील पोस्ट टाकणे हे काम करू शकता परंतु app च्या माध्यमातून हे अधिक सोपे आणि सोयीस्कर होत आहे.

Google Blogger

गुगल कडून Blogger  हे मोबाईल app उपलब्ध आहे. या app च्या माध्यमातून तुम्ही नवीन पोस्ट लिहू शकता त्यासोबत जुन्या पोस्ट मध्ये बदल देखील करू शकता. पोस्ट मध्ये तुम्हाला इथे सर्व बदल करायच्या संधी मिळतात त्यामुळे मोबाईल वरून तुम्ही डेस्कटॉप सारखे सर्व फिचर अनुभवू शकता.

Google Blogger हे app देखील आहे आणि ब्लॉगर तुम्ही एखाद्या ब्राउझर वर देखील वापरू शकता. Blogger हा प्लॅटफॉर्म फ्री असल्याने यामध्ये जास्तीत जास्त लोक आपले ब्लॉग्स हे बनवत असतात परंतु तुम्हाला स्वतःकडे जास्त कंट्रोल हवा असेल आणि काम अधिक सोपे करायचे असेल तर तुम्ही WordPress कडे जातात.

WordPress

वर्डप्रेस देखील तुम्ही मोबाईल app च्या माध्यमातून वापरू शकता. यात देखील ब्लॉगर प्रमाणे पोस्ट टाकणे, त्यात बदल करणे, पब्लिश करणे, द्राफ्ट ठेवणे या सर्व गोष्टी सहज करू शकतो. WordPress या प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला प्लगीन मिळतात आणि हे प्लगीन तुमचे काम अधिक सोपे करतात.

WordPress हा प्लॅटफॉर्म तुम्ही मोबाईल app किंवा मोबाईल ब्राउझर वर देखील वापरू शकता. यामध्ये तुमच्या हातात बऱ्याच जास्त गोष्टी असल्याने काम अधिक सोपे होते आणि त्यामुळेच हा प्लॅटफॉर्म एकदा ब्लॉगिंग क्षेत्रात सेट झाल्यानंतर वापरला जातो.

 

मोबाईल ब्लॉगिंग चे फायदे आणि नुकसान

कुठल्याही गोष्टीचे फायदे आणि नुकसान हे दोन्ही असतात. मोबाईल वरून ब्लॉगिंग केल्याचे फायदे आणि तोटे म्हणजे नुकसान बघुयात,

मोबाईल ब्लॉगिंगचे फायदे -Advantages of Mobile Blogging

1. आपल्याला या माध्यमातून पोर्टेबिलिटी मिळते म्हणजे आपण कुठेही असो, फक्त मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन जर आपल्याकडे असेल तर आपण ब्लॉगिंग करू शकतो.

2. यातून तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी आणि सत्कारणी लावतात. मोकळ्या वेळेत बसलेले असताना मोबाईल ब्लॉगिंग करून तुम्ही तुमच्या ज्ञानात तर भर घालतात परंतु तो वेळ देखील वाया जाऊ देत नाही.

3. आपल्या वेबसाईटवर काही चूक झाली असेल आणि बदल करायचा असेल तर तुम्ही ती गोष्ट सहज कुठूनही करू शकता.

4. मोबाईल वर आपला टायपींग स्पीड चांगला असतो अंक याचा फायदा आपल्याला लेख लिहिताना कंटाळा न येण्यासाठी होतो कारण आपले काम लवकर होते.

 

मोबाईल ब्लॉगिंगचे तोटे – Disadvantages of Mobile Blogging

1. मोबाईल ब्लॉगिंग खूप जास्त अवघड जाऊ शकते कारण स्क्रीन खूप छोटी असते व त्यात सर्व काही खूप छोटे झाल्याने वापरताना अडचणी येतात.

2. मोबाईल वरून ब्लॉगिंग विषयी सर्वच कामे करता येतात परंतु सुरुवात करणाऱ्यांसाठी हे अवघड जाते.

3. जर तुम्ही होस्टिंग आणि WordPress वापरत असाल तर मोबाईल वरून FTP मध्ये लॉगिन करू शकत नाही. केले तरी त्यात खूप अडचणी येतात ज्यांना एखादा सुरुवात करत असेल तर सहज हँडल करू शकत नाही.

4. यात तुम्ही जास्त वेगाने टायपिंग जरी करू शकत असला तरी देखील आर्टिकल मध्ये काही बदल करायचे असेल तर त्यामध्ये भरपूर अडचणी या येऊ शकतात.

5. ब्लॉगिंग साठी लागणारे इतर टूल्स इथे वापरणे कठीण जाते.

6. काही फीचर्स हे मोबाईल ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला कमी बघायला मिळतात. यात हे फीचर्स जास्त परफॉर्मन्स आणि well optimized फॉरमॅट असावा म्हणून कमी केलेले असतात. तुम्ही ब्राउझर वर जर वापरले तर मात्र तुम्हाला सर्व फीचर्स बघायला मिळतात.

 

मोबाईल ब्लॉगिंग साठी टिप्स

मोबाईल वापरून ब्लॉगिंग करत असताना तुम्ही मोबाईल शक्यतो जास्त मोठ्या स्क्रीन चा वापरला तर तुम्हाला अधिक जास्त मोठी स्क्रीन मिळेल आणि वापरायला मदत होईल. जर तुमच्याकडे मोबाईल मध्ये क्रोम ब्राउझर असेल तर त्याचा वापर शक्यतो करावा जेणेकरून तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरायला जास्त सोपे जाईल.

प्रत्येक वेळी आर्टिकल लिहिल्यानंतर तुम्ही ते मोबाईल मधील ब्राउझर मध्ये जाऊन डेस्कटॉप मोड आणि नॉर्मल मोड मध्ये नक्की बघत जा कारण तुम्हाला यातून समजेल की डेस्कटॉप वर एखाद्याला तुम्ही लिहिलेले आर्टिकल कसे दिसेल आणि तेच आर्टिकल मोबाईल वर कसे दिसेल.

FAQ

फ्री मध्ये मोबाईल ब्लॉगिंग करता येते का?

हो, Blogger हा प्लॅटफॉर्म वापरून तुम्ही मोबाईल वरून देखील फ्री ब्लॉगिंग करू शकता.

फक्त मोबाईल वापरून ब्लॉगिंग करता येते का?

हो, थोड्याफार अडचणी येतील परंतु जर तुम्ही करण्यासाठी इच्छूक असाल तर मोबाईल वापरून ब्लॉगिंग देखील करू शकता.

मोबाईल ब्लॉगिंगसाठी कोणते प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत?

Google Blogger आणि WordPress हे मोबाईल ब्लॉगिंग साठी दोन बेस्ट प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment