Dasara Wishes in Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Dasara Message in Marathi 2024

Dasara Wishes in Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Dasara message in Marathi 2024

Dasara Wishes in Marathi: भारतात दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा नवरात्र 15 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर दरम्यान असून, दसरा 23 ऑक्टोबर रोजी साजरा होणार आहे. दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो आणि या दिवशी ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

दसऱ्याच्या आनंदाच्या निमित्ताने लोक एक-दोन आठवडे आधीच एकमेकांना अभिनंदनाचे मेसेज पाठवू लागतात. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्रियजनांना दसऱ्याचे सुंदर संदेश पाठवायचे असतील Dasara Message in Marathi या लेखातील दिलेले मेसेज पाठवू शकता.

Happy Dussehra Wishes In Marathi | दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

Happy Dussehra Wishes In Marathi
Happy Dussehra Wishes In Marathi

आपट्याची पाने!☘️, झेंडुची फुले,
घेवूनी आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी..
दसरा सणानिमित्त आपणास व
आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!☘️

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत
दसरा साजरा करूया..
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

उत्सव आला विजयाचा,
दिवस सोनं लुटण्याचा,
नवं जुनं विसरून सारे,
फक्त आनंद वाटण्याचा,
तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
☘️विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

पहाट झाली दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास
☘️विजयादशमी दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा !☘️

Telegram ला जॉईन व्हा!

तोरणं बांधू दारी,
घालू रांगोळी अंगणी,
करू उधळण सोन्याची,
जपू नाती मना मनांची..
विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Dussehra Messages In Marathi | हॅपी दसरा शुभेच्छा संदेश मराठी

Happy Dussehra Messages In Marathi
Happy Dussehra Messages In Marathi

दसरा!
या दिवशी म्हणे सोनं वाटतात..
एवढा मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न..
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच..
सदैव असेच रहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे..
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा..
केवळ सोन्यासारख्या लोकांना..
हॅप्पी दसरा!

आपट्याची पानं त्याला ह्रदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा होकार,
तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून
विजया दशमीच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!
तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे, आनंदाचे,
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो..
☘️Happy Dasara..!☘️

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा…
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..!

विजय झाला अज्ञानावर ज्ञानाचा, द्वेषावर प्रेमाचा,
दसरा उत्सव आहे श्रीरामांच्या पराक्रमाचा..!
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🙏शुभ दसरा✨

Happy Dussehra Status In Marathi | दसरा स्टेटस मराठी

Happy Dussehra Status In Marathi
Happy Dussehra Status In Marathi

सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
मुहूर्त एक
सण दसऱ्याचा..
☘️☘️Happy Dasara..!☘️☘️

आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनि दान..
शुभ दसरा..!

वैर जुने विसरा,
आला उत्सव दसरा..
भेटा प्रेमाने शत्रूला,
ठेवा चेहरा हसरा..!

VijayaDashami Wishes In Marathi | विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

VijayaDashami Wishes In Marathi
VijayaDashami Wishes In Marathi

सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!☘️

दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी,
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

झाली असेल चूक तरी
या निमिनत्ताने आता ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस
साजरा करु यंदाचा हा दसरा! दसऱ्याच्या शुभेच्छा.☘️☘️

Dussehra Quotes In Marathi | दसऱ्याच्या शुभेच्छा☘️

Dussehra Quotes In Marathi
Dussehra Quotes In Marathi

देऊ-घेऊ सोनं-चांदी
आज एकमेकांस स्वचेच्छा
सदैव मिळावं यश उदंड
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️

वाईटाचा होतो विनाश
रावणाप्रमाणेच होईल तुमच्या दुःखाचाही नाश
आला आहे दसऱ्याचा सण
दसरा शुभेच्छा तुम्हाला आणि कुटुंबाला

दसऱ्याच्या तुम्हाला आणि संपूर्ण कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा
प्रत्येक मार्गावर व्हा विजयी, हीच आहे देव चरणी प्रार्थना

शांतता आणि सत्याच्या या देशात
आता वाईटाला संपवायचं आहे
दहशती रावणाचं दहन करून
पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे
शुभ दसरा शुभ विजयादशमी

त्याग केला सर्व इच्छांचा
काहीतरी वेगळं करण्यासाठी
रामाने गमावलं खूप काही
श्रीराम बनवण्यासाठी

दसऱ्याचा सण आणि सुवर्णाचे दान
सुर्वण म्हणून आपटयाा पानाचा मान,
झेंडुच्या फुलांनाही महत्व फार
त्याच्या तोरणांनी सजले प्रत्येकाचे दार…
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️

कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं काळ्या मातीमध्ये मिळतं.
☘️दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️

परक्यांना ही आपलसं करतील असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा!☘️

दसरा शुभेच्छा मेसेज | Dasara Wishes In Marathi Shubhechha

Dasara Wishes In Marathi Shubhechha
Dasara Wishes In Marathi Shubhechha

चांदीच्या वाटीत आहे बदामाचा शिरा!!
आपुलकीच्या साखरेचा स्वाद करा!!
तुमचा चेहरा आहेत हसरा!!
उद्या सकाळी खूप गडबड,
म्हणून तुम्हाला आताच म्हणतो, शुभ दसरा!!

झेंडूची फुले केशरी,
वळणा वळणाचं तोरण दारी,
गेरुचा रंग करडा तपकिरी,
आनंदे अंगणी रांगोळी नाचरी,
कृतकृत्याचा कलश रुपेरी,
विजयादशमीची रीत न्यारी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️☘️

आला आला दसरा, टेन्शन सारे विसरा
चेहरा हसरा ठेवून सगळ्यांना द्या दसऱ्याच्या शुभेच्छा!
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन
आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा..
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात
दसरा आहे आज करु तो आनंदात, दसरा शुभेच्छा.

आज आहे दसरा शुभेच्छा दिन
ज्या दिवशी रामचंद्राने केला रावणाचा वध
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.☘️☘️

दसरा शुभेच्छापत्रे मराठी  | Dasara greetings in marathi

जसा रामाने केला रावणाचा वध
त्याप्रमाणेच तुम्हीही आपल्यातील वाईटाचा करा वध
शुभ दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी☘️

दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा
प्रभू श्रीराम करो तुमच्या घरावर सुखाची बरसात
आमच्या शुभ दसरा शुभेच्छा करा स्वीकार

समृद्धीचे दारी तोरण
आनंदाचा हा हसरा सण
सोने लुटून हे शिलंगण
हर्षाने उजळू द्या अंगण
सर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!☘️

दसऱ्या चे मराठी एस एम एस | Happy Dasara SMS in Marathi

Happy Dasara SMS in Marathi
Happy Dasara SMS in Marathi

दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा
चैतन्यास संजीवनी लाभोनी
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा
☘️विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

☘️विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या
सगळ्या सीमा पार करुन
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

Dussehra wishes in marathi status for whatsapp

झेंडुची तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊद्या घरी
पूर्ण होऊद्या तुमच्या सर्व इच्छा
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
‘विजयादशमी’ आणि ‘दसरा’ उत्सवाच्या
सर्व मित्र परिवाराला मन:पूर्वक शुभेच्छा!☘️

दसरा म्हणजे सीमोल्लंघन
मनातील अंधाराचे उच्चाटन
सोने देऊन करतो शुभचिंतन
समृद्ध व्हावे तुमचे जीवन…
-प्रसन्न, माधुरी, अमृता

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे झेप घेऊ या
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

सत्याचा असत्यावर विजय अधोरेखित
करणारा सण दसरा
विजयादशमीच्या मनस्वी शुभेच्छा!☘️

उत्सव आला विजयाचा
दिवस सोने लुटण्याचा..
नवे जुने विसरुन सारे,
फक्त आनंद वाटण्याचा

आपट्याची पानं जणू सोनं बनून
सोनेरी स्वप्नांचं प्रतिक होऊ दे
आकाश झेप घेण्याचं ध्येय तुझं
यशांच्या सिमा ओलांडून जाऊ दे

Dasara Marathi Banner | Dasara images in Marathi 2024

Dasara Marathi Banner
Dasara Marathi Banner

दारी झेंडूची फुले,
हाती आपट्याची पाने
या वर्षात लुटूयात
सद्विचारांचे सोने!
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छ!☘️

निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात नांदो सुख-शांती समाधान
☘️दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!☘️

सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या
शुभदिनी अधिक दृढ करायचे!

स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा
आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीला
आज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ
सण करुया साजरा
विजयादशमीच्या शुभेच्छा!☘️

अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार
दसरा शुभेच्छा, शुभ विजयादशमी

रावणाप्रमाणे होवो मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो मनात सदा वास
☘️हॅपी दसरा☘️

रात्रीनंतर दिवस उगवला…
पहाट हसतच जागी झाली…
ऊन सावली खेळ निरंतर
सांगत सांगत धावत आली…
सुख- दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे साऱ्यांनी..
हसत जागा अन हसत राहा तुम्ही
सांगून गेली स्पर्शानी…

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | Dasryachya Hardik Shubhecha

Dasryachya Hardik Shubhecha
Dasryachya Hardik Shubhecha

सदैव गुणगुणत राहिले की,
त्याचे आपोआप गाणे होते,
जसे दसऱ्याच्या दिवशी
आपट्याचे सोने होते

आपट्याच्या सोन्यावरुन
एक गोष्ट आपल्याला कळते|
प्रयत्नात सातत्य असेल तर
संधी आपोआप मिळते
-सूर्यकांत डोळस, बीड

त्रिभुवन भुवनी
पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु
न बोलवे काही
विजयादशमीच्या शुभेच्छा!

तांबडं फुटलं,
उगवला दिन,
सोन्यानी सजला,
दसऱ्याचा दिन!

दसरा हे विजयाचे प्रतीक आहे,
असेच आपल्या जीवनात येणाऱ्या
प्रत्येक संकटावरती आपण नेहमी,
विजय मिळवावा..
दसऱ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!☘️☘️

शब्दांना सूर लाभता
शब्दांचेही गाणे होते!
विजयादशमीच्या परीस्पर्शाने
आपट्याचेही सोने होते!!
-सूर्यकांत डोळस

☘️मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी सोनियाचे पान…
सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’
तुम्हाला सर्वांना शुभ दसरा!☘️

दसरा कविता मराठी | Dasara captions in Marathi

झेंडूची फूल
दारावरी डूल
भाताची रोप
शेतात डोल
आपट्याची पान
म्हनत्यात सोन
तांबड फुटल
उगवला दिन
सोन्यानी सजला
दसर्‍याचा दिन
दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा☘️

मराठी अस्मितेची मराठी शान
“मराठी परंपरेचा मराठी मान ”
आज सोन्यासारख्या दिवस घेऊन येईल
आयुष्या तुमच्या सुख आणि समृध्दी
☘️“शुभ दसरा”☘️

रात्री नंतर दिवस उगवला….
पहाट हसतच जागी झाली…..
ऊन सावली खेळ निरंतर….
सांगत सांगत धावत आली…
सुख-दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे सार्‍यांनी…
हसत जगा अन् हसत रहा तुम्ही
सांगूनी गेली स्पर्शानी…
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा☘️☘️

☘️हिंदू संस्कृती आपली,
हिंदुत्वा आपली शान,
सोने लुटुनी साजरा करू,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
दसराच्या हार्दिक शुभेच्छा.☘️

मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा आवडल्या असतील, कृपया तुमच्या मित्रांसह देखील या लेखातील Dasara Wishes in Marathi शेअर करा.

आणि मराठी वारसा टीम तर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Motivational Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment