New Modern Ukhane In Marathi Part 2 | आधुनिक उखाणे भाग २ | Latest Marathi Ukhane

आजच्या काळात खूप साऱ्या स्त्रिया या स्वावलंबी झाल्या आहेत, त्या स्वकष्टाने आपल्या साथीदाराला ह्या ना त्या कारणाने मदत करत असतात. अश्या mordern स्त्रियांचे हे काही Morden Marathi Ukhane .

हे Latest New Ukhane तुम्हाला नक्की आवडतील.
New Latest Best Ukhane in Marathi for Lagn, Festival, haladikunku, pooja and many other functions.

_च नाव घेताना होते मी Blush,
Life मधले Tensions सारे, होणार आता Flush

स्मार्ट Couple करते, कामांची वाटणी…
मी करते इडल्या आणि, —— राव वाटतात चटणी

शॉपिंगला जायला, तयार होते मी झट्कन …
__चे नाव घेते, तुमच्यासाठी पटकन

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले
घरच्यांनी बघितले आणि __शी लग्न लगेच जोडले

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी
__मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी

एका हातात पर्स, दुसऱ्या हातात रुमाल
__सोबत असताना, कशाला हवा हमाल

मंथ एन्ड आला की, भरपूर वाढते काम
ऑफिस मध्ये बॉस आणि घरी __ कटकट करते जाम

मंथ एन्ड आला की, Work Load ने जीव होतो हैराण
__सोबत वेळ न मिळाल्याने, Life होते वैराण

Royal च्या बुलेट वर __ दिसतो एकदम फिट,
बोलू दे लोकांना, आपण आपले जाऊ डबल सीट

पोळीचे नकाशे बनवणं, ही __ची कला,
त्यानेही बनवल्या गोल तर, भाव कोण देणार मला?

ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
__तू मला, सुपरवूमन वाटतेस

उडालाय जणू काही, आयुष्यातील रंग
__ माझी नेहमी, Whatsapp मध्ये दंग

कधीही फोन केलात तरी, लाईन लागेल व्यस्त
_च्या प्रेमात, मी बुडलोय जबरदस्त

लग्न झालं की नाव घेणं, हा जणू कायदा
तुमची होते करमणूक, पण आमचा काय फायदा?

यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली
__ आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून
__शी तासंतास गप्पा मारतो, अनलिमिटेड प्लॅन टाकून

दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते
__च्या एका स्माईल ने दिवसभराचे टेन्शन पळते

इस्त्री केल्यावर कॉलर राहते एकदम ताठ
माझ्या__चे केस सिल्की, बाकी सगळ्यांचे राठ

तिची नि माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफूल
__ माझी आहे खरंच कित्ती ब्युटीफुल!

माझ्या __ चा चेहरा आहे खूपच हसरा
टेन्शन प्रॉब्लेम्स सगळे क्षणामध्ये विसरा

मिळून काम केल्यावर कामं होतात लवकर
मी चिरते भाजी आणि __ लावतो कुकर

Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.