Benefits of eating Almonds in Marathi | बदाम खाण्याचे उपयोग आणि लाभ

आजच्या या ‘Health Tips in Marathi’ च्या पोस्ट मध्ये मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Benefits of eating Almonds in Marathi.

बदामाचे आरोग्यसाठी अनेक फायदे आहेत. यामध्ये प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे असतात. बदाम कोलेस्टेरॉल कमी करते आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाचा प्रतिबंध करण्यास मदत करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा बदाम खूप चांगले असतात.

१. रोज सकाळी उठल्यावर भिजवलेले बदाम खाल्ल्याने खूप आजारांपासून वाचता येते. बदाम सकाळी रोज दुधासोबत खाल्ले पाहिजेत.

२. बदाम नियमितपणे खाल्ल्याने मेमरी वाढते.

३. बदाम हृदयरोगापासून दूर राहण्यास आपल्याला मदत करतो.

४. बदाम खाल्ल्याने रक्तदाब(ब्लड प्रेशर) नियंत्रित करण्यास आपल्याला मदत होते.

५. गर्भवती महिलांसाठी देखील बदाम अतिशय फायदेशीर आहे, बदाम खाल्ल्याने सुदृढ बाळ जन्माला येते.

६. बदाम शरीराची ऊर्जेची क्षमता वाढवतो आणि त्यास अधिक सक्रिय ठेवण्यास मदत करतो.

७. बदामांमध्ये प्रथिने आणि लोह भरपूर प्रणाम असते, ज्याचा आपल्या शरीराला भरपूर फायदा होतो.

८. बदाम कोलेस्ट्रॉल आणि ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत करतो .

९. बदाम शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवतो त्यामुळॆ त्याच्या साठी खूप फायदेमंद आहे ज्यांना नेहमीच ताप आणि सर्दी होत असते.

१०. ज्याचं पोट नेहमी खराब असते त्यांनी जर रोज २-३ बदाम खाल्ले तर त्याच पोट चांगले राहू शकते.

 Benefits of eating Almonds in Marathi
Benefits of eating Almonds in Marathi

बदामाच्या तेलाचे फायदे | Benefits of Badam in Marathi

१) जर डोळ्यांखाली काळे डाग असतील तर बदामाचे तेल प्रभावी सिद्ध होऊ शकते. झोपण्यापूर्वी एक महिन्यासाठी डोळ्यांखाली तेल लावा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

२) जर हिवाळ्यात त्वचा कोरडी पडली तर बदामाचे तेल लावल्यास कोरड्या त्वचेची समस्या दूर होऊ शकते. तसेच तुमची त्वचा ग्लो व्हायला सुरवात होईल.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment