Fruits to avoid by diabetic patients in Marathi | मधुमेहाच्या पेशंटने हि फळे खाणे टाळले पाहिजेत

Fruits to avoid by diabetic patients
Fruits to avoid by diabetic patients

जर आपल्याला मधुमेह असेल तर आपण काही फळ खाण्याचे टाळले पाहिजे. जर आपल्या घरात कोणी मधुमेहाचा रोगी असेल तर त्याला आपण बाजारात मिळणारी काही फळे खाण्या पासून रोखले पाहिजे. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे ज्यात रोगी हळू हळू मृत्युच्या वेढ्यात जातो. या आजाराला सायलेंट किलर देखील म्हणतात आणि हा आजार रक्तातील शुगर ( साखरेचे ) चे प्रमाण वाढल्याने होतो. आपल्या देशात मधुमेह हा आजार खूप वेगाने पसरत आहे तसेच हा आजार अनुवांशिक देखील आहे.

जर आपल्याला मधुमेह असेल आणि आपल्याला या आजारापासून वाचायचे असेल तर आपल्या खाण्या पिण्याच्या सवई बदला, कारण जवळ जवळ प्रत्येक आजार हा आपल्या खाण्या पिण्याच्या अनियमित सवई मुळे होतो. यासाठी आपल्या दिनचर्येत थोडासा बदल करावा आणि खाण्या पिण्यावर लक्ष द्यावे. शरीरातील स्वादुपिंडामुळे इन्सुलिन तयार होते जे रक्तातील ग्लुकोसचे (शुगर) चे प्रमाण कमी करते. इन्सुलिनचे कमी प्रमाण किंवा अनुउपस्थिती तसेच शरीराची इन्सुलिन योग्य न वापरण्याच्या क्षमतेमुळे मधुमेह होतो. मधुमेह दोन प्रकारच्या लेवल वर होतो, टाईप १ या प्रकारात स्वादुपिंडचा बीटा पेशी जे इंसुलिन उत्पादनासाठी जबाबदार असतात त्या पूर्ण पणे नष्ट होतात ज्यामुळे शरीरात इन्सुलिन बनत नाही. पूर्ण जगात या प्रकारचे रोगी फक्त १० % आहेत. टाईप २ यामध्ये मधुमेह ग्रस्त रोग्यांचा रक्तातील शुगर चा स्थर खूप जास्त वाढतो ज्याला नियंत्रित करणे खूप कठीण असते. अशा प्रकारच्या रोग्यांची संख्या जास्त आहे.

मधुमेहाच्या पेशंटने खालिल फळे खाणे टाळले पाहिजेत.

केळा: केळ्यामध्ये १२ ग्राम साखर असते याच प्रमाणे मध्यम आकाराच्या केळ्यात जवळ जवळ ३० ग्राम साखर आणि carbohydrate असतात, यामुळे आपल्या रक्तातील शुगर चे प्रमाण वाढू शकते. आणि मधुमेहाच्या पेशंटला आराम मिळण्याच्या ऐवजी त्रास जास्त वाढेल.

कलिंगड: कलिंगड हा इतर फळांच्या तुलनेत जास्त गोड नसतो कारण १०० ग्राम कलिंगडा मध्ये फक्त ६ ग्राम साखर असते. कलिंगडाच्या आकारात फरक असतो एका कलिंगडा मध्ये ५० ग्राम साखर असते. कलिंगड जर कमी मात्रेत खाल्ला तर त्याचे नुकसान होत नाही.

आंबा: मधुमेहात आंबा खाणे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो. १०० ग्राम आंब्यात १४ ग्राम साखर असते एवढेच नाही एका आंब्यात ३० ते ५० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहात आंबा खाणे धोकादायक ठरू शकते.

अननस: अननस एक आंबट फळ आहे, पण हा देखील आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतो कारण याच्यात १०० ग्राम अननसा मध्ये १० ग्राम साखर असते. म्हणून मधुमेहाच्या पेशंटने अननस खाणे टाळावे.

द्राक्ष: द्राक्ष हि आंबट व गोड असतात पण १०० ग्राम द्राक्षा मध्ये १६ ग्राम साखर असते म्हणून मधुमेहाच्या रोग्याने द्राक्ष खाऊ नये.

नासपती: १०० ग्राम नासपती मध्ये १० ग्राम साखर असते. याच्यात पाणी आणि पोषक तत्व चांगल्या मात्रेत असतात पण यामध्ये साखरेची मात्रा जास्त असते म्ह्णून मधुमेहात नासपती खाऊ नये.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here