10 Best Summer Fruits in Marathi | उन्हाळ्यात कोणती फळे खाल्ली पाहिजेत

मित्रानो तुम्हाला जाणवत असेलच उन्हाळा खूप वेगाने वाढत आहे. आणि म्हणूनच ह्या दिवसात आपल्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर अश्या काही गोष्टी खाल्या पाहीजेत जे आपल्या तना मना ला गारव्याचा अनुभव देतील. उन्हाळ्यात मिळणारी फळे प्रत्येकाने खाल्लीच पाहिजेत कारण यात खूप पौष्टिक तत्व असतात. ह्या फळांच्या सेवनाने शरीराला लागणारी पोषक तत्वे मिळतात त्याच बरोबर उन्हाच्या त्रासामुळे होणारया आजारांपासून तुमचा बचाव देखील करतात.

उन्हाळ्यात आपल्या फ्रीज मध्ये एक असा फळ जरूर ठेवा ज्यामध्ये खूप जास्त पाणी असेल उदा. टरबूज किंव्हा कलिंगड. कारण जर आपण कुठून बाहेरून घरी आला असाल तर हि फळे कापून खाल्याने आपल्या शरीराला थंडावा जाणवेल. तर मग चला पाहूया आणखी काही अशी फळे जी उन्हाळ्यामध्ये जास्त करून खाल्ली जातात.

१) कलिंगड / Watermelon Benefits in Marathi

कलिंगडामध्ये अधिक प्रमाणात पाणी असते जो आपल्याला उन्हाळ्यात हाइड्रेट ठेवतो म्हणजेच शरीरातील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवतो ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासत नाही. कलिंगड खाल्याने आपली त्वचा सूर्यकिरण व उन्हामुळे होणार्या नुकसानापासून देखील वाचते. कलिंगडामध्ये साधारण पणे ९५% पाणी असते म्हणून कालीगंड उन्हाळ्यात जास्तीत जास्त खावा.

watermelon Marathi varsa

2) संत्री / Orange Benefits in Marathi

उन्हाळ्यात येणाऱ्या घामामुळे शरीरातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे आपल्याला थकवा जाणवतो. संत्री खाल्याने हि पोटॅशियमची कमतरता भरून निघते. त्यामुळे त्वरित आरामासाठी संत्र्याचे सेवन करावे.

orange1 Marathi varsa

३) द्राक्ष / Grapes Benefits in Marathi

अनेक पोषक तत्वांनी संपूर्ण असलेली द्राक्ष खाल्यान्ने, आपली तहान व भूक दोन्ही मिटवल्या जाऊ शकतात.

grape1 Marathi varsa

४) अननस / Pineapple Benfits in Marathi

उन्हाळ्यात अननस खाल्याने शरीरातील fats आणि प्रोटीन्स सहज पणे पचले जाते. तसेच शरीरातील गर्मिला नियंत्रित ठेवण्यास देखील अननस मदत करतो.

pineapple1 Marathi varsa

५) आंबा / Mango benfits in Marathi

आंबा हा फळांचा राजा असून त्यामध्ये खूप प्रमाणत आयन असते. आणि आंबे हे खास करून फक्त उन्हाळ्यातच उपलब्ध असतात तसेच आंबे सगळ्यांनाच आवडत असल्यामुळे हे फळ जास्त प्रमाणात उन्हाळ्यात खाल्ले जाते. जे आपल्या शरीराला थंड ठेवण्यासाठी मदत करते

mango1 Marathi varsa

 हे देखील वाचा: उष्मघातापासून सावधान
 हे देखील वाचा: अश्वगंधा चे फायदे व नुकसान

६) स्ट्रॉबेरी / Strawberry Benfits in Marathi

बऱ्याचदा उन्हाळ्यात आपल्याला लघवीला त्रास जाणवतो, जे कडक उन्हाच्या प्रभावामुळे होते. स्ट्रॉबेरीच्या सेवनाने हा त्रास कमी होण्यास खूप मदत होते.

straberry1 Marathi varsa

७) लिंबू / Lemon Benefits in Marathi

घरामध्ये नेहमी उपलब्ध असलेले फळ म्हणजे लिंबू. लिंबू मध्ये खुप प्रमाणत विटामिन्स असतात त्यामुळे हे पाणी व साखरेच्या मिश्रणात मिसळवून त्यात थोडे मीठ टाकून प्यावे. आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर होईल तसेच आपल्याला उर्जा मिळेल .

lemon1 Marathi varsa

८) पेरू / Guava Benefits in Marathi

पेरू हे सोडीयम आणि fats फ्री असतात. तसेच यात विटामिन्स C जास्त प्रमाणत उपलब्ध असतात जे आपल्याला खोकला, ताप, जुलाब यांसारख्या आजारापासून दूर ठेवण्यास मदत करतात.

gauva1 Marathi varsa

९) खरबूज

उन्हाळ्यात अगदी सहज आणि स्वस्त मिळणारे फळ म्हणजे खरबूज जे पाण्याने समृद्ध आणि गोड असते. नेहमी गोड वास येणारा खरबूज खरेदी करून खावा.

kharbuj1 Marathi varsa

१०) नारळपाणी / Coconut water benfits in Marathi

जर आपल्याला भूक किंव्हा तहान लागली असेल तर आपण याचे सेवन करू शकता. त्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स व इलेक्ट्रोलाईट असतात जे आपल्या शरीलाला हाइड्रेट ठेवतात.

coconut1 Marathi varsa

तर मग हि काही फळे आहेत जी उन्हाळ्यात सहजपणे बाजारात मिळतात आणि जी खाल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो आणि आपण तंदुरुस्त राहतो. मग आजच घेऊन या यातील काही फळे.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment