The right way to brush your teeth | दातांना ब्रश करण्याच्या योग्य पद्धती

बऱ्याच वेळा काही लोक विचारतात कि दातांना ब्रश करण्याच्या पद्धती असतात का? आपल्याला कशा पद्धतीने ब्रश करायला हवे? चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने कोणत्या समस्या उद्भवतात… जसे दात ठिक पद्धतीने साफ न होणे, दातांचे हलणे, दात दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दात किडणे इत्यादी समस्या होतात. कदाचित आपल्याला योग्य पद्धतीने ब्रश करण्याची माहित नसेल. दात आपल्या व्यक्तिमत्वाचे एक महत्वपूर्ण अंग आहेत. आपण जशी आपल्या शरीराची साफ सफाई करतो त्याच प्रकारे आपल्या दातांची देखभाल करणे अत्यावश्यक आहे.

ब्रश करण्याच्या पद्धती

चुकीच्या पद्धतीने ब्रश केल्याने दात तर स्वच्छ होत नाहीत पण आपल्या दातांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. आपण लहान पणा पासून एकाच पद्धतीने दात साफ करत आलो आहोत, ते म्हणजेच horizontal (आडवे ) दात साफ करत आलो आहोत. या पद्धतीने हिरड्यांना व दातांना नुकसान पोचू शकतो. दातांना योग्य पद्धतीने ब्रश करण्याची पद्धत ४५ डिग्री ने ब्रश करणे. नेहमी ब्रश दातांवर गोलाकार पद्धतीने फिरवून दात घासावेत, दात घासताना ब्रश कधीही तिरपा पकडू नये, कारण हे आपल्या दातांसाठी व हिरड्यांसाठी हानिकारक ठरू शकते, असे केल्याने आपल्या हिरड्यांमधून रक्त येऊ शकतो आणि दात पण योग्य रीतीने साफ होणार नाहीत.

म्हणून आपल्याला दात घासताना लक्षात ठेवले पाहिजे कि ब्रश आणि दातांच्या मध्ये ४५ डिग्री चा angle असावा तरच आपले दात योग्य पद्धतीने साफ होतील. ब्रश करण्याच्या बाबतीत आपल्याला कदाचित काही गोष्टी माहित नसतील. उदा. ब्रश कसा करायचा आणि कितीवेळ करायचा. कमी वेळ दात घासल्याने दात नीट साफ होत नाहीत आणि दातातील कचरा तसाच राहतो. सकाळी आणि रात्री झोपण्याच्या आधी दिवसातून दोन वेळा तीन मिनिटांसाठी ब्रश करा. आणि असे केल्याने आपले दात स्वच्छ तर राहतातच आणि मजबूत देखील होतात आणि किडत नाहीत. टूथब्रश हा नेहमी मऊ नायलॉन च्या धाग्यांचा घ्यावा. कडक ब्रश वापरल्याने हिरड्यांना नुकसान पोचतो. ब्रश खराब झाला असेल तर तो बदलून नवीन ब्रश घ्यावा. दात घासण्यासाठी fluoride युक्त टूथपेस्ट चा वापर करावा. याने दात स्वच्छ तर होतात ते मजबूत देखील होतात.

बाजारातून ब्रश घेताना नेहमी लक्षात ठेवा कि ब्रश हा जास्त कडक नसावा तो मऊ नायलॉन च्या धाग्यांचा असावा. टूथपेस्ट हि नेहमी चांगली घ्यावी. ब्रश करताना दात हे सगळी कडून साफ करावेत, आतल्या बाजूने साफ करावेत, दाढा देखील साफ कराव्यात. यामुळे आपले दात साफ राहतील आणि आपले दात जास्त काळासाठी मजबूत राहतील व आपल्या तोंडातून दुर्गंधी देखील येणार नाही. दात साफ करून झाले कि आपली जीभ देखील साफ करावी यासाठी आपल्या ब्रश च्या पाठीमागे असलेल्या टंग क्लिनर चा वापर करावा.

दात साफ करता वेळी दातांवर अधिक दबाव टाकू नका यामुळे हिरड्यांना नुकसान पोचेल, ब्रश करून झाल्यावर २ – ३ वेळा गुरळी करावी ज्यामुळे आपले तोंड स्वच्छ होईल, जेवल्यानंतर लगेच दात घासू नये कमीत कमी अर्ध्या तासांनी दात घासावेत. दात घासून झाल्यावर आपला ब्रश स्वच्छ धुउन ठेवावा. या काही दातांना ब्रश करण्याच्या पद्धती आहेत.

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment