Benefits of Aloe Vera in Marathi | डोक्यातील कोंड्यापासून बचाव करण्यासाठी कोरफडचे नैसर्गिक उपाय

डोक्यातील कोंडा, डोक्याच्या त्वचेला होणारा एक प्रकारचा संसर्ग आहे ज्याच्यामुळे केसांचे नुकसान होऊन केस कमजोर होऊन गळायला लागतात. जर डेंड्रफचा वेळेस उपचार केला नाही तर केस गळण्याची समस्या गंभीर होऊ शकते.
If you are tired of dry hairs and dandruff problems, then here are some Home remedies for dandruff In Marathi. Here we gave information about Use of Aloe Vera for Hairs In Marathi. Also the benefits of aloe vera gel for dandruff in Marathi. With use of aloe vera treatments you will get strong and silky hairs.

कोंडा होण्याचे कारण, डोक्यात केसाच्या मुळांवर मृत त्वचेचा साठा आहे. ही मृत त्वचा एखाद्या कवचच्या स्वरुपात साठून राहते आणि त्याच्यामुळे डोक्याच्या त्वचेला हानी होते कारण ही डेड स्किन डोक्याच्या त्वचेपासून निघणाऱ्या तेलात मिसळते आणि मग वाळून त्वेचेवरून सूटी होवून खाली पड़ते.

डोक्याच्या कोंड्यामुळे अनेक प्रकारच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात जसं की कोंड्यामुळे खाज सुटणे, शरीराच्या त्वचेवर पुरळ किंवा मुरुम येणे, मानेवर खाज होणे आणि डोळे लाल होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

कोरफड (Aloe Vera gel) जेलचे फायदे: डोक्यातील कोंड्यासाठी उपाय

Aloe Vera चे ताजे जेल डंड्रफच्या घरच्या उपायांसाठी एक वरदान आहे (dandruff चा घरगुती इलाज). जर आपणाकडे कोरफड (एलोवेरा) ही वनस्पती घरी असल्यास आपण सहजपणे एलोवेराचे ताजे जेल मिळवू शकता. यासाठी, कोरफडची पानं तोडून चमच्याने त्याचा रस काढावा व हाताने मिक्स करून डोक्याच्या त्वचेवर हा रस मसाज करावा. 30 मिनिटे हा रस केसांवर ठेवून मग केस कोमट पाण्याने स्वरछ धुवावे. असं केल्याने केसांना पोषण तर मिळतेच परंतु केसांतील आर्द्रतेचा अंश देखील नियंत्रणात राहतो.

Aloe Vera gel benefits in marathi
Aloe Vera gel benefits in Marathi

डोक्याच्या कोंड्यासाठी नैसर्गिक उपचार

1) एलोव्हेरासह टी ट्री ऑइल (Aloe Vera and Tea Tree Oil for dandruff)

कोरफड व टी ट्री ऑइल एकत्र करून केसांमध्ये लावण्याने डोक्यातील कोंडा हटवण्यासाठी मदत मिळते. जर आपल्या डोक्यातील कर्कश कोंड्याचा त्रास संपतच नसेल तर कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे लावण्याने डैंड्रफच्या समस्येवर हमखास इलाज होतो. टी ट्री ऑईलमध्ये ऍन्टिबायोटिक गुणधर्म असतात, जे जीवाणूंचा नाश करण्यास मदत करतात. हे मिश्रण त्वतेचे संक्रमण प्रतिबंध देखील करते. कोरफड व टी ट्री ऑइल एकत्रितपणे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे.

Aloe Vera and Tea Tree Oil for dandruff in marathi
Aloe Vera and Tea Tree Oil for dandruff in Marathi

2) कडूलिंबाचे तेल व कोरफड यांचा कोंड्यासाठी आयुर्वेदीक उपाय(Neem Oil and Aloe Vera for dandruff)

आपणाला आधीच माहित असेल की कडुनिंब आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. कडूलिबाच्या तेलामध्ये ऍन्टी-बॅक्टेरियल आणि ऍन्टी-फंगल गुणधर्म असतात ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे त्वचा संबंधित संसर्ग टाळता येतात. डोक्यातील कोंडा काढून टाकण्यासाठी घरच्या उपचारांमधे कडूलिंबाचे तेल फार फायदेशीर आहे. तीन चमचे एलोवेराचे जेल आणि 10 ते 15 थेंब कडूलिंबाचे तेल एकत्र करून यांचे मिश्रण तयार करावे. हे केसांच्या मुळांमध्ये मसाज करून रात्रभर ठेवावे आणि सकाळी उठून केस पाण्याने स्वच्छ धुवावे. केस साफ करण्यासाठी कुठल्याही सौम्य शॅम्पूचा वापर करावा.

Neem Oil and Aloe Vera for dandruff in marathi
Neem Oil and Aloe Vera for dandruff in Marathi

3) दही, ऑलिव्ह ऑईल व कोरफड यांचा कोंड्यासाठी उपाय (Aloe Vera, Yogurt and Olive Oil for hairs)

दही डोक्याच्या त्वचेला मॉइश्चराईझ करते.२-४ टीस्पून एलोवेराचे ताजे जेल किंवा रस आणि १ चमचा ऑलिव्ह ऑइल (किंवा नारळ तेल) १ कप दहीमध्ये मिक्स करावे. हे मिश्रण केसांचे पॅक म्हणून टाळू आणि केसांवर लावा. ते ३० ते ४० मिनिट सोडून द्या आणि मग केस पाणी आणि शैम्पूसह धुवा. ही प्रक्रिया नियमितपणे करा. यामुळे डैंड्रफ कमी होईल.

Aloe Vera, Yogurt and Olive Oil for hairs in marathi
Aloe Vera, Yogurt and Olive Oil for hairs in Marathi

मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment