marathivarsa.com

प्रसिद्ध मराठी म्हणी | Marathi mhani with meaning


प्रसिद्ध मराठी म्हणीमराठीत बऱ्याच अशा म्हणी आहेत कि ज्या काळाच्या ओघात विसरून चाललेल्या आहेत. या लेखात मी मला माहीत असलेल्या सर्व मराठी म्हणी वाचकांसाठी उपलब्ध करत आहे. तुम्हालाही जर एखादी म्हण माहीत असेल व ती इथे दिलेली नसेल तर कृपया comment मध्ये नोंदवा.


⇒ अग अग म्हशी, मला कुठे नेशी?
"स्वतःला हवी असलेली गोष्ट, जी दुसर्याच्या आग्रहामुळे करावी लागत आहे असे दाखवणे."


⇒ आळी मिळी गुपचिळी
"आपले गुपित किंवा रहस्य उघडकीस येऊ नये म्हणून गप्प बसणे."


⇒ अग माझे बायले, सारे तुला बाह्यले
"बायकोच्या म्हणण्याप्रमाणे वागला, तिला कितीही दिले ,तरी ती ती काय समाधानी राहत नाही."


⇒ संगोसंगी वडाला वांगी
"एखादी विशिष्ट गोष्ट एकाने दुसरयाला , दुसरयाने तिसरयाला सांगताना शेवटी मूळ गोष्ट बाजूला राहून तिसरेच काहीतरी निर्माण होणे."


⇒ अंगापेक्षा बोंगा जड
"आहे त्या परिस्थिती पेक्षा जास्त मोठेपणाने मिरवणे."


⇒ एकाने गाय मारली म्हणून दुसरयाने वासरू मारू नये
"समोरच्या माणसाने आपल्याशी बेजबाबदार वर्तन केल्यास आपणही त्याचेच अनुकरण करू नये."⇒ अंगाला सुटली खाज, हाताला नाही लाज.
"गरजवंताला अक्कल नसते."


⇒ अति शहाणा त्याचा बैल रिकामा
"अति शहाणपणा दाखवायला गेल्यास कुठलेही काम व्यवस्थित होत नाही ..शेवटी नुकसानच होते ."


⇒ अंथरूण पाहून पाय पसरावेत
"स्वतः च्या आमदनीच्या प्रमाणात खर्च करावा"


⇒ अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं
"भविष्याचा विचार न करता काम करत रहाणे"


⇒ आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे
माणसाला आपल्या सर्व गोष्टी चांगल्या वाटतात पण दुसऱ्याच्या गोष्टीत त्याला दोष दिसतात.


⇒ गुरूची विद्या गुरूस फळली - भोंवली
"लोकांस फसविण्याची युक्ति ज्याला शिकविली त्यानेंच याला ( शिकविणाराला ) फसविलें."


⇒ कोरड्याबरोबर ओले जळते
अपराध्याबरोबर निरपराध्यानाही दोष दिला जातो.


⇒ आपलेच दात अन आपलेच ओठ
दोषी ठरविणारे आपणच अन ज्यांना दोषी ठरविले तेही आपलेच.


⇒ टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही
कष्ट घेतल्या शिवाय मोठेपणा मिळत नाही.


⇒ डोगंर पोखरून उंदीर काढणे
कष्टाच्या मानाने अगदीच अल्प मोबदला मिळणे.


⇒ ढवल्या शेजारी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला
संगतीने दुसऱ्यातील गुण येण्याऐवजी दुर्गुण मात्र घेतले जातात.


⇒ तण खाई धन
क्षुल्लक गोष्टी पुढे घात करतात.


⇒ तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणे
आलेल्या संधीचा फायदा घेणे.


⇒ तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले
जास्त फायद्याची आशा धरल्याने थोडासा होणारा फायदाही जातो अन शेवटी नुकसान मात्र होते.


1 2 3 4 5 6 7 8 9 10

You May Also Like

Add a Comment