If you Looking for Doctor and Patient Marathi Jokes then you have come to the right website. In this article we have shared all 100+ Doctor and Patient Jokes in Marathi.
डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की तिला कोणताच
आजार झालेला नसून फक्त विश्रांतीची गरज आहे.
त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.
डॉक्टर म्हणाले, तिलादेखील विश्रांतीची गरज आहे.
डॉक्टर: (चिमणरावांना) मी माझ्या देखण्या नर्सला कामावरून काढून टाकले आहे.
चिमणराव: का हो, तिने असा काय गुन्हा केला?
डॉक्टर: अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना
ऐकले की तिच्या गोड स्मिताने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.
डॉक्टर चिमणरावांना विचारतात- तुमच्या सिगारेटचा पाईप एवढा लांब कसा काय?
चिमणराव: अहो, डॉक्टर तुम्हीच नाही का मला तंबाखूपासून
दोन हात दूर राहण्याचा वेळोवेळी सल्ला देता, हे विसरला काय?
डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन सांगतात,
‘सुरज, तुझ्या मुलीला आम्ही वाचवू शकलो नाही.
हे ऐकताच तो माणूस १०० मजली इमारतीवरून खाली उडी मारतो. ५०व्या मजल्याजवळ
येताच तो माणूस विचार करतो की, ‘मला तर मुलगीच नाही.’
जेंव्हा तो २५ व्या मजल्यापाशी येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘माझे तर अजून लग्नच झाले नाही.’ आणि जेंव्हा तो १० व्या मजल्याजवळ
येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की, ‘मी सुरज नसून नीरज आहे. ‘
भारतातून एक पंडित अमेरिकेत जातो.
तिथे त्याला हृदयविकाराचा झटका येतो.
नागरिक पटकन अम्ब्युलंस बोलावतात आणि त्याला त्यात घालतात.
पंडितजी मात्र देवावर श्रद्धा ठेवून ओरडू लागतात, “हरी ओम, हरी ओम !!!”
अम्ब्युलंसमधला कंपाऊंडर मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी त्यांच्या घरी घेऊन जातो.
पंडितजी: अरे मूर्खांनो, मला इथे हृदयविकाराचा झटका आला आहे
आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये नेण्याचं सोडून घरी का आणलंत?
कंपाऊंडर: तुम्हीच तर ओरडत होतात, “Hurry Home, Hurry Home.”
डॉक्टर: “बोला काय त्रास आहे?”
पेशंट: “झोप खूप येते…नेहमी झोपतच असते मी.”
डॉक्टर: “कोणता मोबाईल वापरता आपण..?”
पेशंट: “Nokia 1100!”
डॉक्टर: “एक स्मार्ट फोन लिहून देतो, त्यात Jio sim टाकून
Facebook, Whatsaap आणि काही games install करा, सगळं ठीक होईल..!”
पेशंट: डॉक्टर… जेव्हा मी झोपतो तेव्हा माझ्या स्वप्नात येऊन माकडं फुटबॉल खेळतात…
डॉक्टर: हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा…
पेशंट: उद्या पासून खातो साहेब … आज त्यांची फायनल मॅच आहे
डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत …..
डॉक्टर तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.
पत्नी: किती वेळा देऊ.
डॉक्टर: देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात.
विठू: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये..…..
विठू: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर
डॉक्टर: मग फेविकोल पन आन…. फुकट चिटकवुन देतो!…. रताळ्या!!!
डॉक्टरांनी पेशन्टला विचारले
” तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात?”
पेशन्ट: ” आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात,
ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात
म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा.”
डॉक्टर डिग्री विकुन पंढ़रीच्या वारीला गेले.
मुलगी: डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर: मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.
मुलगी: पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला.
डॉक्टर: आपण कोणता साबण वापरता?
गण्या: पाडुरंगाचा लींबाचा साबण
डॉक्टर: कोणती पेस्ट वापरता ?
गण्या: पाडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर: शॅम्पू ?
गण्या: पाडुरंगाचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर: हेयर ऑईल ?
गण्या: पाडुरंगाच आवळ्याच तेल…
डॉक्टर: हे पाडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे ?
गण्या: नाही…….पाडुरंग माझा रूम पार्टनर आहे.
संता: डाक्टर साहब मैं चश्मा लगाकर
पढ़ तो सकूंगा ना?
.
.
डाक्टर: हाँ हाँ बिल्कुल।
.
.
संता: थैन्क यू डाक्टर साहब आपने
अनपढ़ आदमी की जिंदगी
बना दी।
डॉक्टर साहब खुद के अस्पताल
में भर्ती !!
पेशंटला ब्लड द्यायचं असलं की एकही नातेवाईक फिरकत नाही.
पण डॉक्टर ला मारायचं असलं की एवढे कुठून पैदा होतात तेच कळत नाही.
नानासाहेब आपल्या बायकोला घेऊन दात काढायला डॉक्टर कडे गेले.
नानासाहेब,”डॉक्टर, दाता काढायला किती खर्च येतो हो ?”
डॉक्टर,”एक दात काढायला साधारण १००० रुपये लागतात.”
नानासाहेब,”एक हजार जरा जास्तच वाटतात.”
डॉक्टर,”होय ऍनेस्थेशिया द्यायचे ५०० व दात काढायचे ५०० होतात.”
नानासाहेब,”अजुन कमी होतात का बघाना ?”
डॉक्टर,”ऍनेस्थेशिया न देता माझा एक विद्यार्थी हातोडिच्या सहायाने २०० रुपयात दात पाडुन देतो, चालेल ?”
नानासाहेब बायकोकडे हात दाखवून,”हिचे दात काढायचे होते.”
डॉक्टर: तुम्हाला माहिती आहे का सिगारेट एका प्रकारे स्लो पॉईजन चे काम करते.
चंदू काका: अहो डॉक्टर साहेब, मला कुठे मारायची घाई आहे!!
लेडी डॉक्टर: काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या
क्लिनिक समोर उभे राहून स्रियांना का बघत असता?
चंदू काका: अहो तुम्हीच तिथे लिहले आहे स्रियांना बघण्याची वेळ ९.३० ते ११.३०
नंदू: तुम्ही तर माझे हृदय चोरलेत डॉक्टर I love you!
लेडी डॉक्टर: अहो, चुकलात तुम्ही, आम्ही तर तुमची किडनी चोरली आहे.
पेशेंट एका ऑपेरेशन नंतर
पेशेंट: डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना!
उत्तर मिळाले
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे!!
एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले व म्हणाले,
गृहस्थ: माझ्या मुलाने चावी गिळली आहे.
डॉक्टर : त्याने चावी गिळून किती वेळ झाला?
गृहस्थ: दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर: काय? दहा दिवस …इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?
गृहस्थ: इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, आजच हरवली.
डॉक्टर: तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण: डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना?
एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत पण तो टॉयफाईडने मेला.
डॉक्टर: नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात.
डॉक्टर: सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे
रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.
पेशंट: डॉक्टर मला एक कागद व पेन देता का?
डॉक्टर: कागद व पेन कशासाठी?
पेशंट: यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.
मोलकरिण: बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले….
.
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस डाँक्टरला बोलाव..
.
.
.
मोलकरिण: आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब..
.
.
.
मी त्याला All Out पाजले.
पेशंट: डॉक्टरसाहेब, माझ्या अंगाला ना खूप खाज सुटते. काहीतरी औषध द्या.
डॉक्टर एक चिठ्ठी लिहून देतात.
डॉक्टर: हे घ्या, यावरच्या गोळ्या नियमित घ्या.
पेशंट: पण यामुळे माझ्या अंगाची खाज नक्की जाईल ना?
डॉक्टर: (रागावून) नाही, तुमच्या हाताच्या बोटांची नखं वाढवण्यासाठी दिलीत ही औषधं.
डॉक्टरांकडे एकजण येतो आणि आपला पाय दुखत असल्याचे सांगतो.
डॉक्टर त्याचा पाय बघतात तर तो निळा पडल्याच दिसतं.
डॉक्टर: अरे भाऊ, विष पसरलेलं दिसतंय. पाय कापावा लागेल.
डॉक्टर त्याचा पाय काढतात आणि त्याजागी नकली पाय लावतात.
त्या तरुणाचा नकली पायपण निळा पडतो. तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो.
डॉक्टर पाय पाहतात आणि म्हणतात, “अरेच्चा, आता कुठे खरा आजार माझ्या लक्षात आला.
तुझी जीन्स आहे ना, तिचा रंग जातो आहे.”
एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.
तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.
नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय.
एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते. तो दवाखान्यात जातो.
माणूस: डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?
डॉक्टर: हो येतात की. कशाला घालायचे आहेत?
माणूस: ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.
बाई : डॉक्टरसाहेब, तुम्ही माझं वजन कमी व्हावं म्हणून
दिलेल्या ह्या गोळ्या मी दिवसातून किती वेळा घ्यायच्या?
डॉक्टर : ५० वेळा.
बाई : (घाबरून) ५० वेळा ? अहो, वेड-बिड लागलंय की काय तुम्हाला? तुम्ही डॉक्टरच आहात ना?
डॉक्टर : खायच्या नाही हो. ह्या गोळ्या तुम्ही फक्त ५० वेळा जमिनीवर टाकायच्या
आणि उचलायच्या, झीरो फिगरसाठी हेच करावं लागतं.
एक आजोबा डॉक्टरकडे जातात.
त्यांना दिसायचं कमी झाल्याने त्यांना डोळे तपासायचे असतात.
डॉक्टर डोळे तपासतात आणि त्यांना नवीन चष्मा देतात.
आजोबा: डॉक्टर, ह्या चष्म्याने मला पुर्णपणे स्पष्ट दिसेल ना?
डॉक्टर: हो, हो, नक्कीच. अगदी रोज सकाळी पेपरही तुम्हाला वाचता येईल.
आजोबा: अरे वा !!! कमाल आहे या चष्म्याची.
मी अडाणी भोपळा, तरीही यातून पाहिल्यावर मला आपोआप वाचता येईल म्हणजे…वा, वा, वा !!!
एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो. नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते. रुग्ण: अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला.
नर्स: काय तहान लागली आहे का?
रुग्ण: (वैतागून) नाही…गळा लिकेज आहे का ते बघायचंय.
पेशंट: डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…
डॉक्टर: काय ?
पेशंट: जेवणानंतर भूक लागत नाही, सकाळी उठल्यावर झोप लागत नाही, काम केल्यावर थकवा येतो…! काय करू?
डॉक्टर: रोज रात्री उन्हात बसा…
डॉक्टर: कस येण केलं??
झंप्या: तब्येत ठीक न्हवती ओ….छातीत दुखत होत….
डॉक्टर: दारू पिता का??
झंप्या: हो.. पण १ च पेग बनवा….
डॉक्टर : तुझे तीन दात कसे तुटले?
रुग्ण: बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.
डॉक्टर: मग खायला नकार द्यायचा होता.
रुग्ण: तेच तर केले होते.
डॉक्टर एका वेड्याला : हे काय आहे..?
.
.
वेडा : हे मी 500 पानांच पुस्तक लिहल आहे ..
.
.
डॉक्टर : पण तु 500 पानांवर लिहलस काय .. ?
.
.
वेडा : मी पहील्या पानावर लिहल आहे …१ राजा घोडा घेऊन जंगलाकडे गेला
.
.
आणि शेवटच्या पानावर लिहल आहे
“राजा जंगलात पोहचला ..” . .
डॉक्टर : अरे मग 498 पानांवर काय लिहल .. ?? . . .. . . . . .
वेडा : tigdik tigdik tigdik tigdik tigdik tigdik.
सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न:
मुलगी: माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
डॉक्टरचा सल्ला: दाराची कडी.
पेंशट: खुप पातळ संडासला होतय.
डाँक्टर: किती पातळ.
पेंशट: खुपच पातळ.
डाँक्टर: तरी साधारण किती पातळ.
पेंशट: इतके पातळ की तुम्हाला चुळ भरता येईल.
पेंशट: डाँक्टर मला वात आहे..
.
.
.
.
.
.
डाँक्टर: मग पेटव की.
डॉक्टर: हे बघा , तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे..
एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा..
गंपू: डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो.
डॉक्टर: किती वेळ खेळता?
गंपू: जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत..
डॉक्टर (इंजिनीअरिंग च्या विद्यार्थ्याला): तुमची १ किडनी फेल झाली आहे.
विद्यार्थी आधी खूप खूप रडला…., मग डोळे पुसत बोलला.
.
.
.
.
RECHECKING मध्ये निघेल का??”