Bhikari jokes in Marathi | भिकारी जोक्स इन मराठी | Beggar Funny Jokes in Marathi

भिकारी: साहेब २० रुपये द्या ना, चहा प्यायचा आहे.

गंपू: काय रे, चहा तर दहा रुपयांना मिळतो.

भिकारी: साहेब गर्लफ्रेंडला पण प्यायचाय ना.

गंपू: अरे वा, भिकाऱ्याने गर्लफ्रेंड पण बनवलीय.

भिकारी: नाही साहेब, गर्लफ्रेंडनेच भिकारी बनवलंय.


 एक मुलगी बागेत बाकड्यावर येवून बसली….

एक भिकारी तेथे आला आणि म्हणाला…

भिकारी: डार्लिंग

मुलगी: बेशरम! तुझी हिम्मत कशी झाली मला डार्लिंग म्हणायची ??

भिकारी: मग तु माझ्या बेडवर काय करत आहेस..


 भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला !

ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब एखादा रुपया तरी द्या.

ठमाकाकू : उद्या ये.
.
.
.
भिकारी: च्यायला,उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!


 एक भिकारी रस्त्यावर बसलेला होता आणि एक मुलगी त्याला पैसे देताना

भिकारी: ओळखलं का?
मुलगी: नाही ?????

भिकारी: आपण फेसबुकवर चाट करत होतो
आणि मिनी तुला प्रपोस मारलेला आणि तू हां बोलीस.
मुलगी: तो मुलगा तू आहेस तू तर भिकारी आहेस.

शिक: फेसबुकवर BF शोधू नये


 अपमानाचा कळस…………….

भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक
बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते.
.
.
.
एक भिकारी आला,
प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि आटो मध्ये निघून गेला.


एक माणूस रस्त्याने चाललेल्या भिकार्‍याला थांबवत विचारतो,

“का रे, भीक का मागतोस? ही खूप वाईट गोष्ट आहे.” भिकारी: साहेब, तुम्ही कधी भीक मागितली आहे का?

माणूस: नाही. का?

भिकारी: मग तुम्हाला कसं माहीत की ही वाईट गोष्ट आहे ते?


 एक भिकारी एका पुणेकराकडे भीक मागायला येतो.
भिकारी भलताच प्रामाणिक असतो.

भिकारी: साहेब, आपल्या शेजार्‍याने मला पोटभर जेवू घातलंय.
तुम्हीही काहीतरी खाऊ घाला ना.

पुणेकर: हा घे, हाजमोला.


भिकारी: साहेब, १ रुपया द्या ना. फक्त १ च रुपया.

साहेब: ए, माझी लायकी बघून तरी माग. १ रुपया काय मागतोस

भिकारी: १० रुपये द्या साहेब. १० रुपये द्या.

साहेब: अबे, जरा तुझी लायकी बघून माग की.


भिकारी: हे सुंदरी, या आंधळ्याला १ रुपया दे ना.
उपाशी आहे दोन दिवसांपासून.

नवरा: देऊन टाक गं.

बायको: असं कसं देऊन टाक? पैसे काय झाडाला लागतात?
आणि हे लोकं फक्त आंधळा असल्याची नाटकं करतात, माहितीये?

नवरा: नाही गं, ज्याअर्थी तो तुला सुंदरी म्हणाला;
त्याअर्थी तो नक्कीच आंधळा आहे. देऊन टाक.


एक भिकारी अगदी व्यावसायिकरित्या भीक मागत होता.

तो रेल्वेस्टेशनच्या बाहेर एक कटोरा घेऊन आणि एक बोर्ड लावून बसलेला होता.

त्या बोर्डवर लिहिले होते, “मी दिलेला शब्द पाळतो.
कृपया मला जमेल तेवढी भीक द्यावी नाहीतर मी पुढच्या
निवडणुकीत माझ्या सहकारी बांधवांसोबत कॉंग्रेसला मतदान करीन.”


 भिकारी (बाईला): मैडम 5-10 रुपये असतील तर द्या !!

.
.
.
बाई : लाज नाही वाटत??,
एवढा स्मार्ट , सुंदर, हैंडसम तरुण असुन भिक मागतोस ??
.
.
.
भिकारी (खुश होउन): ठीक आहे, मग kissss द्या


 एका ट्राफीक सिग्नल वर
एका भिकाऱ्या ला पाहुन मानुस
बोलला…” तुला कुठ तरी पाहील आहे…

भिकारी खुप हसला…..
.
.
.
खुप हसला….
.
.
.
..आणि म्हणाला” साहेब….आपण फेसबुक वर फ्रेंड आहोत..


 मल्लिका शेरावत एका चित्रपटाच्या शूटिंगला जात असते.

तेवढ्यात एक भिकारी येऊन म्हणतो,
“बहेनजी, १० रुपया दे दो इस गरीब को। भुखा हूं दो दिन से।”

मल्लिका: ये लो। (असं म्हणून ती त्याच्या हातात १०० रुपयांची नोट टेकवते.)

सचिव: अहो मॅडम, तो फक्त दहा रुपयेच मागत होता. त्याला १०० ची नोट का दिली?

मल्लिका: कारण, आज मला पहिल्यांदा कुणीतरी बहीण म्हणलं.


 भिकारी : साहेब, काही खायला द्या ना!

गंपू : अजून स्वयंपाक झाला नाही.

भिकारी : हा माझा नंबर घ्या… स्वयंपाक झाला की मिस्ड कॉल द्या, मी येतो!


रविवारी मंडईतून घरी निघालेल्या आजोबांना कोपऱ्यावर एका भिकाऱ्याने गाठले.

भिकारी: “साहेब, एक रुपया द्या. तीन दिवस काही खाल्लं नाही…”

आजोबा: (खोचकपणे) “तीन दिवस उपाशी आहेस, मग एक रुपया घेऊन काय करणार..?”

भिकारी: (तितक्याच खोचकपणे) “वजन करून बघीन… तीन दिवसांत किती कमी झालंय ते !”

प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो


एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.

तेवढ्यात त्याला पाटी दिसली.

त्यावर लिहिलं होतं , ‘जेवणाची उत्तम सोय’ जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .

एकावर लिहिलं होतं ‘शाकाहारी’तर दुसर्यावर ‘मांसाहारी’तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.

आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , ‘भारतीय बैठक’
तर उजवीकडे , ‘डायनिंग टेबल’

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती ‘रोख’

तर दुसर्यावर ‘उधार’.
तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.

वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.
तो अचंबीत झाला.
त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,

‘फुकट्या’, मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच आहे……….हॉटेल नाही.


एक भिकारी करोडीमल यांच्याकडे भीक मागतो.

भिकारी: शेटजी …. मला एक रुपया तरी द्या ना!!

करोडीमल: चांगला धडधाकडं दिसतोस ….. काही काम का नाही करत ..

भिकारी: मी तुमच्याकडे पैसे मागितले सल्ला नाही


एक भिकारी देवाला म्हणतो …
हे देवा मला खाण्यासाठी असे काही तरी दे जे …
खाल्यावर सुद्धा संपले नाही पाहिजे.

देव: हे घे पूर्ण एक चिंगम


 भिकारी(दाराबाहेर उभं राहून ): ओ बाई, या गरिबाला खायला द्या कि काहीतरी.

ठमाकाकू: थांब दोन मिनिटं … आत्ता आणते.

भिकारी: अरे बापरे ….. नूडल्स आणते कि काय …पळा


Leave a Comment

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.