Boyfriend and Girlfriend Marathi Jokes | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend Girlfriend Marathi vinod

Boyfriend and Girlfriend Marathi Jokes | बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी विनोद | Boyfriend Girlfriend Marathi vinod

If you Looking for Boyfriend and Girlfriend Marathi Jokes in Marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Boyfriend and Girlfriend Jokes in Marathi.

मुलगा: तु एकदम माझ्या बायकोसारखी दिसतेस.
मुलगी: ओह्ह…काय नाव तुझ्या बायकोचं?

मुलगा: माझं अजुन लग्न नाही झालेलं.

तात्पर्य: नवीन पद्धतीन प्रपोज करायला शिका..


अनिल व अनिलची गर्लफ्रेंड एकाच प्लेट मध्ये शेवपुरी खात होते…

अनिल तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो…

अनिलची गर्लफ्रेंड लाजून म्हणाली “असा काय पहातोयस रे?”

अनिल: थोड थोड खा ना भिकारे


मुलगा: कुठे आहेस ??
मुलगी: mom dad सोबत डिनर करत आहेत हॉटेल मधे,घरी पोहोचल्यावर बोलते.

तु कुठं आहे ?
मुलगा: तु ज्या भंडार्यात जेवत आहेस ना,
तिथं तुझ्या मागच्या पंगतीत, मी भात वाढत आहे… भात लागला तर सांग.


बॉयफ्रेंड: हाय डार्लिंग.. कुठे आहेस?
गर्लफ्रेंड: अरे पुण्याला आलीये.. फिनिक्स मॉल मध्ये
एक ब्लू जिन्स पाहिली आहे २००० ची, घेते आता मस्त आहे,

तू कुठे आहेस?

बॉयफ्रेंड: मी इथं इस्लामपुरात गांधी चौकात तुझ्या मागे उभा आहे,

आता अर्धा तास भांडून सुद्धा तो दूकानदार ती 200 ची जिन्स 150 ला देत नसेल तर,
त्याला माझे नाव सांग… मित्र आहे तो आपला…


मुलगा: I LOVE YOU
मुलगी: नाही मी दुसर्यावर प्रेम करते.

मुलगा फुल नाराज होतो आणि अचानक काही वेळान जोरात पळु लागतो.
मुलगी विचारते काय झाल रे???

मुलगा: थांब तुझ्या आईला जाउन सांगतो………
मुलगी: इकड ये कुत्र्या…….I LOVE YOU TOO


मी तीला 3-4 वेळा फोन केला पण
तिने उचलला नाही.

नंतर तिला एकच MESSAGE केला
“Balance” आला का?

500 ला 500 full talk time
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.

“चुकीला माफी नाही”


मुलीच्या लग्नात , तिचा x – bf, येतो.
सगळ्यांनी त्याला विचारले. कि नवरदेव तू आहेस का ..

मुलगा: नाही मी तर semi–final लाच out झालो.
आता final बघयला आलोय…


तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
तिच्या प्रेमात झालो होतो पूर्ण वेडा ….
.
.
.
.
एक दिवस ती आली आणि म्हणाली,
“दादा मला मुलगा झाला हा घे पेडा


मंग्या: अरे दिनू तू तुझ लग्न मोडलस…. का???
दिनू: हो रे तिला कोणी बॉय फ्रेंड नव्हता म्हणून

मंग्या: मग काय …किती चांगल होत …
.
.
.
.
.
.
.
दिनू : अरे जी कोणाचीच झाली नाही ती माझी काय होणार…..


गर्लफ्रेण्ड: आपण कुठे चाललोय?
बॉयफ्रेण्ड: लाँग ड्राइव्हवर!

गर्लफ्रेण्ड: (लाडात येऊन) मग आधी का नाही सांगितलंस?
बॉयफ्रेण्ड: मला पण आत्ताच कळलं की, ब्रेक फेल झालेत!


मुलगी: हिप्नोटाइज करने म्हणजे काय रे?

मुलगा: एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रनात करुन,
त्याच्याकडून पाहिजे ते काम करुन घेणे…

मुलगी: चल खोटारडा कुठला.
याला तर “बॉयफ्रेन्ड” म्हणतात.


गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली.
पोरगा:(खुश होउन)Thank u

पोरगी: my pleasure !!
पोरगा: OH !!!!! My 1 bullet, 1 swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस


बॉय: ऐ… क्या बोलती तू
गर्ल: ऐ.. क्या मई बोलू

बॉय: सुन
गर्ल: सुना
बॉय: चूना हाय का चूना ?


मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे…
मुलगी: आणि दुपारी?

मुलगा: १ ते ४ आराम….
मी पुण्याचा आहे ना!!!!!


एकदा २ प्रेम करण्यार्या जोडप्यानी आत्महत्या करण्याचे ठरवले.

मुलाने आधी उडी मारली.
मुलीने डोळे बंद केले आणी मागे सरकली.

मुलाने हवेत पॅराशुट उघडले आणी उडत वर आला.
आणी म्हणला मला माहीत होत शेंबडे तु उडी नाही मारणार.

म्हणुन त्या दिवसापासुन ladies first हा नियम बनवण्यात आला.


Boyfriend: मी तुझ्या रोज रोजच्या मागण्यांनी
तंग आणि कफल्लक होऊन आत्महत्या करतोय..

Girlfriend: बस करना रडवशील आता,,
१ चांगला पांढरा शुभ्र ड्रेस घेऊन दे…. १०व्या ला काय घालू..!


मुलगी: तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस…???
मुलगा: मी तुझे आवडीचे चॉकलेट खातो…

आणि तू काय करतेस…???
मुलगी: मी “माणिकचंद” च्या २ पुड्या खाते


एका अंधारी रात्री सुनसान सड़क एक
मुलगा आणि मुलगी दोघेही बाइक नि जात होते मुलाने बाइक थांबवली…..

मुलीला उतरवले तिचा हात पकडला… मुलगी लाजली…..

मुलगा बोलला: चल धक्का मार,पेट्रोल संपलाय…..


ती मला म्हणाली
जिना सिर्फ मेरे लिये.
जिना सिर्फ मेरे लिये.

मी म्हणालो : बर, मी लिफ्ट ने जातो


गर्लफ्रेंड असावी तर अगदी टूथ ब्रश सारखी

कारण आपला टूथ ब्रश दुसरा कोणी वापरू शकत नाही


मुलगी-आज मी तुला राखी बांधणार.
मुलगा- नाही.

मुलगी- का?
मुलगा- मी उद्या तुला मंगळसुत्र बांधायला आलो तर बांधुन घेशील का?


मुलगी बरोबर असेल तर हॉटेल बिल
मुलगी लांब असेल तर मोबाईल बिल
मुलगी नाही भेटली तर दारू बिल
म्हणून सांगतो प्रेम करू नका म्हणजे येणार नाही बिल….


मुलगी (लाजुन): हे प्रेम म्हणजे काय?

मुलगा: प्रेमाच नातं २ व्यक्ति मध्ये तेच आहे जे सिमेँट आणि वाळुमध्ये पाण्याच आहे…

For Example,
मुलगा = सिमेँट
मुलगी = वाळु
प्रेम = पाणि
आता सिमेँट आणि वाळु एकञ केल तर ते मजबुत नाय होणार, परँतु,

त्यात जर पाणि मिसळवलं तर त्यांना कुणिच दुर करू शकत नाय.
.
.
.
.
.
.
मुलगी (हसत हसत): माकडा, तु तोँडावरुनच “मिस्ञी ” वाटतो…


मुलगा:मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझ्याशी लग्न करशील??

मुलगी :काहीतरी नवीन स्टाईल ने प्रोपोस कर !
.
.
.
वाना बी माय छम्मक छल्लो ओ ओ ओउ …………


मुलगा आणि मुलगी चाटिंग करत असतात…..

मुलगा: hmm (मुद्दाम)
मुलगी: hmmmm…

मुलगा: hmmmmmmmm…
मुलगी: hmmmmmmmmmmmmmm mmmmmmmmmmmmm.. ….

मुलगा: इतका मोठा hmmm करतेस………म्हैस आहेस काय???


माझी girlfriend चहा छान करते…
.
.
.
.
.
त्याला चव येत नाही ती भेसळीमुळे…!!!!


प्रेयसी- राजा, झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे
मला आज फार मानहानी सहन करावी लागली.

प्रियकर, राणी, का बरं. काय झालं?

प्रेयसी- अरे, मी आज रात्री झोपेत चालता चालता समुद्र किनार्‍यावर जाऊन पोहोचले
आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली.

प्रियकर- अगं, मग काय झालं. नाईट गाऊन तर घातला होतास ना.

प्रेयसी- नाही ना. म्हणून तर एवढी लाज वाटली.


प्रेयसी: वचन दे की तू दुसर्‍या कोणा मुलीवर प्रेम करणार नाहिस !!

प्रियकर: वचन देणे शक्य नाही !!

प्रेयसी: म्हणजे दुसरी कोणी तरी आहे !!

प्रियकर: हो ।।।। तुझ्या सारखिच दिसेल ती,
तुझ्या पेक्षा छोटी असेल ती ।।।।।।।।।। तुला आई mhanel ती !!!


प्रेयसी: प्रेमात निराश झालेल्या व्यक्तीला आत्मह्त्येपासून वाचविण्याचा उपाय काय?

प्रियकर – एकच उपाय आहे, लग्नाचा.

प्रेयसी-आणि लग्नापासून बचाव करायचा असेल तर….

प्रियकर- मग आत्महत्या करायची.


प्रेयसी: (प्रेमाने) चल ना रे,
मस्त पैकी एका महागड्या ठिकाणी जाउन येउत.

प्रियकर: चल, पंपावर जाउन येउ.


प्रियकर: प्रिये, मी असतांना तूला कोणाचीही भिती बाळगायची गरज नाही.

प्रियसी: इतका धाडशी आहेस तू.

प्रियकर: नाही नाही प्रिये, मी पळून जाण्यात पटाईत आहे,
असंच काही झालं तर मी पळत जाऊन पोलिसांना घेउन येईल.


प्रियकर (प्रेयसीला): “दुनिया भुलाई मैने तेरे लिये”
… “जन्नत सजाई मैने तेरे लिये”

.
पर तुमने क्या किया मेरे लिये?
.
.
.
प्रेयसी : “मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिये”


प्रपोज करण्याची नवीन पद्धत.

मिकू: तुझं नाव गूगल आहे का?
चिंकी: नाही ..का?
.
.
.
मिकू: मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं..


पोरीला इम्प्रेस करायचा नवीन फंडा….

मुलगी: चल एखादा गेम खेळूया..
गोट्या: चालेल…पण लपंडाव सोडून…

मुलगी: का रे?
गोट्या: कारण तुझ्यासारखी मुलगी शोधून सापडणार नाही ….


जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.

.
जरा लक्ष द्या बरका..!
.
जेव्हा GF ला BF ची आठवण येते.. तेव्हा ती त्याला Poke करते.
.
.
.
.
आणि जेव्हा त्यांच्या breakup होतो, तेव्हा त्याला ती block करते…!


चंपू मैत्रिणीला फोन करतो.

चंपू: तुझी फार आठवण येत होती, म्हटलं, फोन करुया!

मैत्रीण: अरे राजा, आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की.

चंपू: अरे! परत तुलाच फोन लागला होय? सॉरी हं.


गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन…

बॉयफ्रेण्ड: का?

गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन,
आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन !!


गर्लफ्रेंडने त्ताकीद दिली कि… शुद्ध मराठीतच प्रपोज करायचा

कमळाचं फुल घेऊन लगेच झंप्या म्हणाला ….
” हे सुंदरी हा कमलद्रोण मज हस्ति ग्रहण करून मी पूसतो
की तुजिया मनोमुकुरी उभासलेला तो राजकुमार मजरुपाने
या भूतलावर अवतीर्ण जाहला आहे असे तुजला प्रतीत होत
असल्यास तुजिया मुखाद्वारे होकारार्थी चित्कार येवू दे…”
.
.
.
गर्लफ्रेण्डच्या तोंडी एकच शब्द ” आवरा ….”


गर्लफ्रेंड आणि ईश्वरात..फरक फक्त एवढाचं आहे.

एकीची आठवण खुप त्रास देते,

आणि दुस-याची त्रास झाल्यावर आठवण येते…


एकदा एक प्रियकर प्रेयसीच्या वडिलांकडे गेला.
घाबरत घाबरत त्यांना तो म्हणाला, ‘मला काहीही नकोय.
फक्त तुमच्या मुलीचा हात हवाय.’

मुलीचा बाप म्हणाला,

‘ हे बघ. नुसता हात मिळणार नाही. पाहिजेच असेल तर आख्खी मुलगी माग.


प्रियकर :- च्यायला आज तर गोट्या कपाळात गेल्या माझ्या…

प्रियसी : म्हणजे ?
प्रियकर (थोडासा घाबरून) :- म्हणजे पेपरकठीण होता…
.
.
.
.

प्रियसी :- अच्छा..!! मग माझ्या पण कपाळात गेल्या


मुलगी: दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..

मुलगा: किती काळजी करतेस माझी डीअर…
.
.
दुसरा एक मुलगा: मित्रा, दारू पिऊन गाडी नको चालवूस,
एक्सिडट होतात..

मुलगा: बापाला शिकवतोस काय रे तू आता????


BoyFriend & GirlFriend दोघे ही खुप हसत होते,
अचानक GirlFriend ने चेहरा लपवला

BoyFriend:- काय झाले?
GirlFriend :- काहीच नाही.
BoyFriend:- सांग ना?
GirlFriend :- काहीच नाही ना?
BoyFriend :- सांग ना प्लीज?
GirlFriend :- अरे हसता हसता

शेंबुड आला…


मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो
मुलगाः मग तुझ्या आईने पकडलं तर
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने सेव केला आहे
.
.
.
तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर….


मोबाईल मध्ये balance नाहि आहे रे
तु फ़ोन कर ना……… प्लीजजजजजज….

2 किवा 3 वेळा सारखा Miss Call
देणार म्हणजे आपण समजून जायचे
की आपल्याला Call करायचा आहे…..

आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार…
ए मला तेवढी mp3 दे ना write करून
pleeeeeease !!! .

आणि महत्वाचं म्हणजे ….आपलं
काम झालं कि लगेच त्यांची आई
येणार चल चल bye आई आली ..


रम्याला वाटलं LOL म्हणजे ” Lots Of Love “….

तर त्याने त्याच्या प्रियसीला SMS पाठवला,

माझ्या आयुष्यात मी फक्त तुलाच प्रेम करतो…..LOL”…!!!


मुलगी: तुझे माझ्यावर प्रेम आहे ना?
मुलगा: हो गं ! पण तू असे का विचारतेस एकदम ?

मुलगी: मला नाही वाटत असं.
मुलगा: अगं पण !असे का बोलतेस?
कालच तर आपण फ़िरायला गेलेलो,पिक्चर बघितला तेव्हा तर ठीक होतीस.हे काय मधेच ?

मुलगी: तुझे नक्की माझ्यावर प्रेम आहे ?
मुलगा: अर्थातच !

मुलगी: नक्की ?
मुलगा: अगं हो !
मुलगी: मग काल रात्री मी फ़ेसबुकवर
जे स्टेटस टाकलेले त्याला ‘लाईक’ का नाही केलेस ? 😛 😀


मुलगी: आई बाबा बाहेर जानार आहे.
संध्याकाळी येतिल.

घरी ये ना काहि तरी क्रेझी करु.
मुलगा: पळ तुझ्या मायला मागच्या वर्षी असच
सांगून दिवाळीची साफसफाई करवुन घेतलिस


जो मुलगा रात्रभर आपल्या गर्लफ्रेंड साठी जागतो.

तोच मुलगा सांगू शकतो की..

सर्वात चांगला बॅटरी बॅकअप वाला मोबाईल कोणता आहे ते…


काही मुलांचा Common Sense Zero असतो!!

. . कसा? . . . . . .

Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U”

आता पल्लवी तीथ का उपटायला येणार आहे… का


मुलगी: माझ्या वडिलांनी सांगितलंय की यावर्षी नापास झालीस

तर तुझं रिक्षावाल्यासोबत लग्न लावून देणार आहे..…

मुलगा: थोडा धीर धर, माझ्या पण वडिलांनी मला सांगितलंय
की यावर्षी नापास झालास तर तुला रिक्षा घेऊन देणार आहे


घोर अपमान..

जेव्हा वर्गातली सर्वात सुंदर मुलगी तुमच्या घरी येते,

आणि तुमची आज्जी म्हणते… “बस पोरी, त्यो हागायला गेलाय”


प्रियकर: प्रिये, तु कधीच डोळ्यांत पाणी साठवु नकोस.

प्रेमिका: (लाजत) का रे…?

प्रियकर: कारण साठलेल्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात.


Bank मधून मुलीला फोन आला..
तुम्हाला credit card पाहीजे का???
.
.
.
.
मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे..


प्रियकर: प्रिये तुझी आठवण
आली,की तुझा फोटो समोर घेऊन
तुला बघत राहतो.
.
.
.
प्रियसी- मग माझ्या आवाजाची आठवण
आली तर काय करतोस ?
.
.
.
.
प्रियकर: मग काय एखाद्या कुत्रिला दगड मारतो


BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..

GF: अय्यां… खरंच.. का रे?

BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे…


प्रियकर: तू माझ्याशी लग्न करशील का..?
प्रेयसी: नाही.

प्रियकर: का..?
प्रेयसी: माझ्या घरचे होकार नाही देणार.

…प्रियकर: कोण कोण आहे तुझ्या घरी..?
प्रेयसी : एक नवरा आणि दोन मुले… :O


आयटम: जानू, तू मला चांदण्यात फिरायला ने ना
पक्क्या दुसरया दिवशी रॉकेट घेऊन आला,

आयटम: जानू, रॉकेट कशाला आणलस?
पक्क्या: (वैतागून)तुला चांदण्यात फिरायचंय ना,
ह्यावर बस, मी वात पेटवतो, एकटीच ये फिरून…..


प्रियकर: प्रिये तू आता फार बदलली आहेस.
प्रेयसी: का रे..? तुला अस का वाटत…?

प्रियकर: आजकाल मी तुझ चुंबन घेत असताना तू डोळे नाही बंद करत.
प्रेयसी: मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्स मधून १०० रुपये गायब होते.


प्रियकर: प्रिये माझ तुझ्यावर अगदी मना पासून प्रेम आहे.
प्रेयसी: Sorry पण माझ प्रेम ‘महेश’ वर आहे. त्याने कालच BMW विकत घेतली आहे….!

प्रियकर: अरे रे मी उगाचच काल ५० किलो कांदे विकत आणले….. 🙁
प्रेयसी: अरे ‘शोन्या…..’ मी तर मजा करत होते माझ प्रेम तर फक्त आणि फक्त तुझ्यावरच आहे.


प्रेयसी तिच्या प्रियकराला: आपण लपा-छपी खेळू.

तू मला शोधल्यावर तू मला शॉपिंग ला घेऊन जयचे….

प्रियकर: जर मी शोधू शकलो नाही तर????

प्रियसी: जानू…. असे नको ना म्हणू…..
.
.
मी इथेच,दरवाज्याच्या मागे लपते…


प्रेम हे ऐक असं जंगल आहे
कि ज्या जंगलात ऐका शूर वाघाची

ऐका मोहक डोळ्यांचा सुंदर हरणीकडून शिकार केली जाते


प्रियकर: प्रिये, सांग ना मी तुझ्यासाठी काय करू?

प्रेयसी – काय करशील?
प्रियकर – तू सांगशील ते करीन!

प्रेयसी – मग आधी नोकरी कर.
प्रियकर – का?

प्रेयसी – म्हणजे एकदाचं लग्न तरी करता येईल!


गर्लफ्रेण्ड: व्हॅलेंटाइन डेला मला काय गिफ्ट देशील?

बॉयफ्रेण्ड: काय हवंय तुला?
गर्लफ्रेण्ड: मला रिंग देशील?

बॉयफ्रेण्ड: हात्तिच्या! त्यात काय? देईनना!
मोबाइलवर देऊ की लॅण्डलाइनवर?


मुलगी तिच्या बॉयफ्रेंड ला: आज माझ्या घरी कोणीच
नाही, ये ना माझ्या घरी.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड: तूच माझ्या घरी ये आज….. माझ्या घरी सर्व जमलेले आहेत….
तुझं मन लागेल इथे 😛 😛

तात्पर्य: प्रत्येक मुलगा “हुशार” नसतो…….
काहीजण “मंद” पण असतात.


मुलीचे ह्रदय हे पाण्या सारखे असतेँ.
आणि मुलाचे ह्रदय हे मोबाईल सारखे असते.
.
.
.
.
.
.
मोबाईल पाण्यात टाका किँवा पाणी मोबाईल मध्ये
टाका वाट तर मोबाईल ची लागते…


प्रेमी आणि प्रेमिका हॉटेलात जातात
प्रेमी: काय घेणार?

प्रेमिका: (लाडात येउन) तू घेशील तेच..
प्रेमी: ठीक आहे, वेटर, दोन मिसळ-पाव आणि दोन चहा आण
प्रेमिका: (परत लाडात येउन) वेटर, मला पण दोन मिसळ-पाव आणि दोन चहा !!..


गर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय ?
आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेँड- मग ?? बंद होतं का ब्युटी पार्लर?


प्रियकर: जान, मी तुझे नाव हातावर लिहू की मनावर.

प्रेयसी: इकडे-तिकडे कुठेही लिहू नकोस, मनापासून माझ्यावर प्रेम करत
असशील तर सरळ सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर कर.


मुलगी तिच्या बॉयफ्रेंडला म्हणते…

गर्लफ्रेंड: काल माझ्या पप्पाने मला तुझ्या बाईकवरून जाताना पाहिले…
बॉयफ्रेंड: तर मग… ?

गर्लफ्रेंड: मग काय…
त्यांनी मला ऑटो साठी दिलेले पैसे रात्री परत घेतले !!!


मुलगी: असा काय बघतोयस माझ्याकडे,
तुला बहिण वगेरे नाही का ?

झंप्या: आहे ना ,म्हून तर बघतोय..
मुलगी: का ??

झंप्या: कारण ती म्हणते, गोरी गोरी पण फुलासारखी छान,
झंप्या मला एक वाहिनी आण.


पप्पू आणी प्रेयसी दोघे झेड ब्रिज वर बसलेले असतात.

प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम दिसतो रे…

पप्पू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून नाही आलोय..!

प्रेयसी: गप् ए शेंबड्या…मी तर पिवून आलेय ना….!

पप्पू शॉक …प्रियासी रॉक …


मुलगा: ओठ तुझे सुर माझे, गीत एक गाऊ का…

मुलगी : गाल तुझे हाथ माझे, कानाखाली देऊ का?


मुलांचे हृदय एका पवित्र मंदिरासारखे असते ……….
.
.
.
म्हणून जर मुलाने , ” आय लव यु ” म्हंटले …………..
.
.
.
.
कि मुली लगेच “चप्पल” काढतात.


बंटी , बबली बरोबर बागेत बसले होते, समोर एक कुत्रा, कुत्रीचा किस घेत होता….
.
.
बंटी (लाडात येऊन): जानू, तू रागावणार नसशील तर मी पण…..

.
.
बबली : ठीक आहे,
माझी हरकत नाही, पण कुत्री चावणार नाही ह्याची काळजी घे……


Boyfriend: पेट्रोल आणि मुलींमध्ये काय समानता आहे???

.
.
.
.
जेंव्हा त्यांना समजते कि आपणल्याला त्यांची खूप गरज आहे,
तेंव्हा झटकन त्यांचा भाव वाढतो.


भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात… 90% मुली यामध्ये बिझी असतात…
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस….
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु…..
जानू आय लव यु… जीव घ्या आता त्या जानू चा…..


एकदा ‘ती’ त्याला म्हणाली,

या जगात वजन, अंतर, वेग हे मोजायला एकके आहेत.
जसं आपण वजन किलो ग्रॅम मध्ये मोजतो आणि अंतर किलो मीटर मध्ये………पण…..

प्रेम
… … …
विश्वास,
मैत्री,
जिव्हाळा,
सुख,
दुःख

हे मोजायला एकके मात्र नसतात……..असं का???

त्याने क्षणभर विचार केला,

तिचा हात हातात घेत……….तिच्या डोळ्यात खोलवर बघत तो म्हणाला,

“हे बघ,

तुला पकवायचं असेल तर घरी जा….


प्रियकर आपल्या प्रेयसीचा सेल चोरून पाहतो कि
तिने आपला नंबर कसा सेव केला आहे…

जान………जानू…………. की स्वीटहार्ट………

यासाठी तो call करतो आणि GF च्या सेल वर

पाहतो ….. Murga No. 5 Callig…….


गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय करशील?

बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक
त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात लिहिते

“मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे”
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक
नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका!


एक मुलगा मुलीला त्रास देत होता….
.
.
.
.
मुलगा: चलती हे कया!!
.
मुलगी: कुठे??
.
.
.
मुलगा: तू फक्त सांग…कुठे पण जाऊ.
.
मुलगी: शॉपिंगला.
.
.
.
मुलगा: आई शप्पत ताई…मी तर मस्करी करत होतो


मुलगी: hii काय करतोयस??

प्रसाद : काय नाही flipkart वर shopping करत आहे.

मुलगी : आरे मी पण आत्ता flipkart वर आहे मला request पाठव ना.

कोवळ्या वयात heart attack आला हो पोराला !


मुलगा: तुझं माझ्यावर प्रेम आहे का…??

मुलगी: हो.., मी तुझ्यासाठी काहिपण करु शकते..!

मुलगा: खरंच..??
मुलगी: हो स्वीटु

मुलगा: चल मग 29 चा पाढा म्हणुन दाखव पटकन…!!!


जिओ सिम मुळे सगळे रेकाॅर्ड तुटत आहे…!
.
.
.
.
आज सकाळीच एक मुलगी बोल्ली तु फोन ठेव मी करते कॉल…!


मुलगा: Hii
मुलगी: Hii
मुलगा: 143
मुलगी: 399
मुलगा: 399 हे काय हाय..??
मुलगी: जिओ चा रिचार्ज करना
मुलगा: ब्लॉक

मला गायछाप खायला पैसे नाय तिचे कोण नखरे पुरवणार.


काल रस्त्यावर बऱ्याच पोरी एका मुलाला लय मारत होत्या…….

तिथं जाऊन एका मुलीला विचारल…तर ती म्हणाली…….

.
.
.
याच स्टेटस वाचा……
कपावर कप,
सात कप,
त्यावर ठेवली बशी…
माझी “पिल्लू” ✔ सोडून
बाकीच्या सगळ्या म्हशी.


गर्लफ्रेंडचा शेवटचा मेसेज

चल bye, वऱ्हाड आलं


झोपा भावानों..

जिने दिवसभर Message नाय केला,

ती आता कोणत Love letter पाठवणार आहे.


आज खूप दिवसांनी तिचा फोन आला. . . . . . . .
मी काही विचारायच्या आधीच तिनं विचारलं. ..
“तू सध्या काय करतोस … ?”
मीही भोळेपणानं सांगुन टाकलं…
“मुलांचा अभ्यास घेतो.
किराणा, दळण, भाजी आणतो. बायकोची बोलणीही खातो आणि नोकरी ही करतो. “

हे ऐकून ती खूप भावूक झाली, अन् म्हणाली. ……
.
.
“तुलाच हो म्हणायला हवं होतं रे”


लफडे करा पण एवढेही करू नका…. की…

लग्नासाठी पोरगी पहायला गेल्यावर पोरगी म्हणेल की…
.
.
.
.
आयो … हा तर.. माझ्या मैत्रीणीचा छावा आहे


परीक्षा हॉल मध्ये मुलगी मुलाकडे बघत असते

मुलगा: माझ्याकडे बघू नकोस……

मुलगी: का?

मुलगा: जवा बघतेस तू माझ्याकडं मला नापास झाल्यासारखं वाटतंय….


खतरनाक प्रपोज: मी तुझ्यावर प्रेम करतो..

तुझं आहे का माझ्यावर प्रेम..???

मुलगी: नाही….

मग तुझ्या मैत्रीणीला विचारून बघ तिचं असेल थोड


फोन वरून संभाषण
मुलगा: whatsapp Download
कर ना??
.
.
मुलगी: कस करतात??
.
.
मुलगा: play store मधे जा आनि तिथून कर ना..
.
.
मुलगी: आमच्या गल्लीत Play Store नाहिय रे..
“अविनाश जनरल स्टोर” आहे तिथून करू का??
.
मुलगा: जाउदे तू भांडी घास


मुलगी: माझ्या सोन्या झोपला का?..
मुलगा:हो

मुलगी:मग रिप्लाय कसा केलास?
मुलगा:मी सोन्याचा बाप बोलतोय, सुनबाई झोपा आता
पोलिस भरती जवळ आली आहे पोराची


मुलगी – हाय… तुझी आठवण येतेय.
.
.
.
.
मुलगा – अजून माझा पगार झाला नाही.
.
.
.
मुलगी: अच्छा चल बाय..बाबा आलेत माझे.


प्रत्येक मुलीचे दोन प्रॉब्लेम असतात..

१) नालायक बघ कसा बघतोय…

आणि दुसरा

२) नालायक बघत पण नाहीये

आता त्या बिचाऱ्या नालायकाने करावं तरी काय ???


मुलगा: Hii, मी नवीन samsung j2 घेतला.
मुलगी – wow, कोणत्या कंपनीचा आहे?
.
.
.
.
मुलगा: जा तू घरी जा
Honda कंपनी चा आहे, petrol वर चालतो
अडानी कुठली…..


या जगात तीन प्रकारचे लोक असतात
1: फेकू
2: महा फेकू
3: तु नाही जेवली तर मी सुद्धा नाही जेवणार….
नुसती फेकाफेकी….. पिल्लू संघटना…


भारतातील अर्ध्या मुलींचा 1 GB Data तर,
.
.
.
.
नुसतं Hmmm लिहिन्यातच ✍ संपत असेल !!


एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीव्हा घेउन गेरेज मधे जाते.

गाडी चेक केल्यावर
मॅकेनिक: मॅडम, बॅटरी बदलावी लागेल
मुलगी: ठीक आहे
मेकॅनिक: exide ची बसवू का ?

मुलगी: (बराच विचार केल्यावर ) नको .. दोन्ही साइड ची बसवा.
मेकॅनिक- ही Activa घे आणि एक साईडनं घरी जा…

बोर्डात ९५% मार्क होते म्हणे


मुलींना मेक अप धुण्याआधी
त्यांचा अंतरात्मा नक्कीच विचारत असेल…

Are you sure, you want to restore factory settings?


मुलगी: hii काय करतोयस??

आमच गण्यापण परश्या सारख प्रपोज मारायला गेल
आणि बारक्या पोराकड लवलेटर दिल पोरग परत येऊन गण्याला म्हणाल
गणु दादा
.
गणु दादा
.
सुमी दिदी म्हणाली
.
सुमी दीदी म्हणाली
.
चालू हाय दुसरीकड इसकटल की सांगते..


मुलगी : तु काय काम करतोस?

मुलगा : Actually i was Working for Times of India in Mumbai….
पण नुकताच job सोडलाय

मुलगी : का ?
.
.
.
.
मुलगा : कोण एवढ्या थंडीत पेपर टाकायला जाणार!


मुलींचा नाद लय बेकार मित्रा……

बर झाल आपण सिगंल आहोत राव………….
.
.
.
.
.
.
.
असे म्हणनारे पोर Arjit Singh चे गाणे लागल
की कोपर्‍यात जाऊन ढसाढसा रडतात

“अखिल भारतीय मेरे किसमत मे तू नही शायद संघटना”


मुलगा: Happy Birthday
मुलगी: Thanks

मुलगा: B.P कधी देनार
मुलगी: पेन ड्राईव्ह तर दे

मुलगा: अगं कुत्रे BP म्हणजे Birthday Party
मुलगी शांत जाग्यावर Block
नेहमीच मुले चुकीची नसतात!!!!


तुमची गर्लफ्रेंड तुम्हाला चांगले चांगले मेसेज करते.
.
.
.
ते बघुन तुम्ही खुश होऊ नका ..
तीला कोणी पाठवले त्याचा तपास करा
नारायण …….नारायण…


मुलाने प्रपोस केल,मुलीने नाकारल.

मुलगा 30 दिवस तिच्या घराजवळुन फेरी मारतो,
30व्या दिवशी
……..मुलगी-i love u
.
.

मुलगा: चल नीघ, तुझी शेजारची पटवली..


कॉलेज मध्ये असतांना एक मुलगी म्हणाली होती की,

“जगात आई वडीलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नसतं “

मी म्हणालो: “चल मग आपण दोघं आई वडील बनूयात “

बोलणंच बंद केलं हो टवळीनं.


मुलगी: माझे ह्रुदय म्हंणजे माझा मोबाइल आहे
आणि तू त्यातले सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस…
मुलगा: राणी एक विचारु…?

मुलगी: हो विचार ना…
मुलगा: मोबाइल डबल सिमचा तर नाही ना !


ती बोलली माझ्यासारखी दुसरी तुला भेटणार नाही

मी तिचं नाव लिहून फेसबुक वर सर्च केलं,
तिच्यासारख्या ५६ सापडल्या
पोरींची कमी नाही राव. लय सापडत्यात हुडकल्यावर.

“आली हुक्की दिली बुक्की”


पोरगी पोरग्याला: “तुझी स्माइल काय गजब हायं..
दात कशे चमकुन रायले बे इतके…?

पोरगं लाजून…

“माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!”


जी मुलगी शाळेत आपल्याशी बोलत नव्हती ती …….
आज FB वर frind request पाठवते आणी Comment मध्ये बोलते
LooKing _handsm
शाळेमध्ये काय डोळे फुटले होते का ग
.
.
.
झिप्रे
राग नाही येत का मग माणसाला


आजकाल त्या मुली पण बॉयफ्रेँड सोबत पिक्चर

बघायला मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जातात..

ज्या कधी काळी आमच्या घरात फर्शीवर बसुन शक्तिमान बघायच्या


Kiss झाल्यावर

Girl: मला चकर येत आहे

Boy: बग माझ्या प्रेमा ची नशा कसली आहे

Girl: बस कर कुत्र्या प्रेमा ची नशा नाही तुज्या तोंडातली,
*गाय छाप* खाल्ली मी


खोकला जात नसेल तर
.
.
ग्रर्लफेण्ड च्या ओठांना मध लावुन किस्स करा….
.
.
.
गुलाब जामुन चा स्वाद पण लागेल आणि खोकला पण जाईल..
.

डॉ.. ईमरान हाशमी स्त्री विशषेज्ञ


माझ्यावर प्रेम करायची तुझी लायकी नाही….
असं बोलनाऱ्या मुली.
.
.
.

एक शॉम्पुची पुडी चार दिवस पिळून-पिळून लावतात


एकदा BOYFRIEND आणि GIRLFRIEND फिरायला जातात,
फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते,
मुलाला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल अन
तिच्याकडे बघत असतो.
.
.
.
.
मुलगी: बघु पण नको दिवाळीचा ड्रेस आहे माझा..


Girlfriend आणि Police ह्यात समान काय आहे…..?
.
.
.
.
विचार करा
.
.
.
विचार करा
.
.
.
दोघ पण पैसे खातात अन सोडुन देतात


गर्लफ्रेण्ड : माझा चिंडुकला,
.
.
माझा पिंडुकला,
.
.
.
माझा शोनुला…
.
.
माझ्याशी लग्न करशील ना पिल्ल्या?

बॉयफ्रेण्ड : अग ए…तू मला प्रपोज करतेयस की दत्तक घेतेयस?


बंड्या: माझी गर्लफ्रेंड मला सोडून गेली.
तिने तिच्या नव्या बॉयफ्रेंड बरोबर काढलेले फोटो पाठवले माझ्या मोबाईलवर!!
पप्पू: अरे रे रे! खूप वाईट झाले. मग तू काय केलेस?

बंड्या: मी ते फोटो तिच्या बाबांच्या नंबरवर पाठवले

चूकिला माफी नाही…


मुलगी: अरे ऐक ना, मी तुला खुप पसंत करते.मुलगा
मुलगा: ..

मुलगी: आइ लव यु, मी तुझ्यावर खुप प्रेम करते
मुलगा: ..

मुलगी: kiss de na.
मुलगी: कुत्र्या बोलत का नाहीस तू
मुलगा: तुझ्या प्रेमाच्या भानगडीत
माझी Vimal थुंकु का झिपरे…


काही पोरांमध्ये सुपर पावर शक्ती असते..

Online असलेल्या पोरीला Hi असा मेसेज केला कि
ती लगेचं Offline जाते…


मुलगा: अग काल न तू माझ्या स्वप्नात आली होतीस
मुलगी : वा काय होत स्वप्न

मुलगा : तू आणि मी दोघेच कुठे तरी लांब प्रवासाला निघालो आहोत
मुलगी : हा पुढे

मुलगा : आणि अचानक आपल्या बस ला अपघात होतो
मुलगी : बापरे मग काय होत

मुलगा :त्या अपघातात आपण दोघेच वाचतो
आणि तू उठून काय तरी शोधत असतेस

मुलगी : मी तुला शोधत असते ना. बरोबर ना ?
मुलगा : नाही ग

मुलगा : तू बस कंडक्टर ला शोधत असतेस….तिकिटाचे उरलेले २ रुपये घेण्यासाठी..


नाग बोला नागिन से: मेरा दिल तेरे प्यार में अंधा है……
.
.
.
.
.
नागिन बोली: मेरा ख्याल छोड़ दे बेटा, मेरा बॉयफ्रेण्ड एनाकोंडा है…!!!


पैसे वाला माणूस: आज माझ्या जवळ
14 कार
18 दूकान
4 बंगले आहेत ..

तुझ्याकडे काय आहे .. ??

गरीब :” माझ्या कडे एक मुलगा आहे
ज्याची गर्लफ्रेंड तुझी मुलगी आहे..


पप्या: तुम्ही मुली एकापेक्षा जास्त बॉयफ्रेंड का बनवतात ??
.
.
.
.
पोरगी: कारण एकट्या पोरावर महागाईचा ताण पडु नये म्हणुन..


गण्या : माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवीय.

सेल्सगर्ल : अंगठीवर काय नाव टाकू..???
गण्या : नाव नको. “फक्त तुझ्याचसाठी” लिहा.

सेल्सगर्ल : वॉव! किती रोमँटिक…!!!!

गण्या : त्यात काय रोमँटिक?
“गर्लफ्रेंड” बदलली तर अंगठी परत कामी येईल ना…


ती वेडी म्हणते​
.
​माझ्यासाठी मित्रांना सोडुन दे​
.
.
“आता तिला कोण सांगणार
.
.
मित्र सोडले तर *लग्नात काय हिचा बाप नाचणार*
​”दोस्ती शिवाय मस्ती नाय”


चम्या: आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात…

चिंगी: कसं काय?

चम्या: एकदा टाचणीवर बसून बघ!!


मुलगा: मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?

मुलगी: मी पण १८
वर्षाची आहे …:-)

मुलगा: चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ….:-)
मुलगी – कुठे …?????
.
.
.
.
मुलगा: मतदान करायला ग ….

विचार बदला .. देश बदलेल …


गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंड ला फोन लावते…

गर्लफ्रेंड : जानू….कुठे आहेस रे??

बॉयफ्रेंड : मी बँकेत आहे शोना….

गर्लफ्रेंड : अरे मग येताना २०,००० रुपये घेऊन ये ना….
मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे

बॉयफ्रेंड : अगं मी ब्लड- बँकेत आहे …..
रक्त पिणार का रक्त…??


 

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment