पुणेरी विनोद | Puneri Jokes in Marathi


If you Looking for Puneri Jokes Marathi Jokes in marathi then you have come to the right website. In this article we have shared all 150+ Puneri Jokes Jokes in Marathi.

पुणेरी राँग नंबर

अः देशपांडे आहेत का?
बः (चिडून) पावनखिंड लढवायला गेलेत. काही निरोप?

अः त्यांना म्हणाव, महाराज गडावर पोचले.
मेलात तरी चालेल!

पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन:

"अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना,
चितळे उघडले आहेत का.?"

पाहुणा : अहो Camp ला जायला कुठली बस पकडू?

पुणेरी : २० Number ची पकडा.
पाहुणा : आणि ती नाही मिळाली तर?

पुणेरी : १० - १० च्या २ पकडा.

स्थळ : पुणे

एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!!
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...?

मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली,
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.

पुणेरी एकदम तिखट....

भन्नाट पुणेरी

बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय.
तुलापण भूक लागली असेल ना?

बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...

पुणेरी स्पेशल

चिंटूः बाबा मला ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबाः घरात फणस आणलाय तो संपव आधी...

"गायीच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत हे
जरी खरे मानले,
तरी येता- जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये,

तिला गुदगुल्या होतात.."

अस्सल पुणेरी

सदाशिव पेठेतली एक लायब्ररी
सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का ?

ग्रंथपाल: (सभासदाकडे रोखून पहात ) पुस्तक परत कोण आणून देणार ?

पुणेरी बँकेतला किस्सा

ग्राहक: “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”

कारकून:” ३ दिवसांनी”
ग्राहक: “”अहो बँक समोरच तर आहे….
फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”

कारकून: “अहो ती प्रोसिजर आहे….
समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील
कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??”

स्थळ: (पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.)

पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
.
....
.

पेशंट: (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर..??

स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.

जोशीकाका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?

तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!

जोशीकाका: मग तुम्हाला का इतका आनंद झालाये?

तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीये !

पुणेरी boyfriend

मुलगा: I'll climb the tallest mountain, swim the deepest sea,
walk on fire just for you.
मुलगी: wow किती romantic...!
तू मला आत्ता भेटायला येशील का?

मुलगा: आत्ता लगेच नको, पाऊस पडतोय, आई ओरडेल...!

एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला,

" थांबा मी चहा घेऊन आलो..."

. १० मिनीटांनी,
" चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया...!"

एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,

तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...

मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो....!!

पुणेरी: ओ दुकानदार, केळी कशी दिली राव?

दुकानदार : एक रुपयाला एक
पुणेरी : काय तरी काय. साठ पैशाला देता का बोला....

दुकानदार : अहो साठ पैशात तर त्याचं साल फक्त येईल.
पुणेरी : ठीक आहे. मग हे चाळीस पैसे घ्या आणि मला सालीशिवायचं केळं द्या पाहू.

एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी..

"इथे तुम्हाला - तुमच्या मेहुणीपेक्षा गोड ...
आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील....."


Search For : Marathi jokes, jokes in marathi, funny jokes in marathi, marathi chutkule, bhau kadam jokes, whatsapp marathi status, puneri jokes, facebook marathi jokes, 2019, marathi jokes app, marathi chavat jokes

1 2 3

You May Also Like