Husband and Wife Marathi Jokes | Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको मराठी विनोद

Husband and Wife Marathi Jokes | Navra Bayko Jokes | नवरा आणि बायको मराठी विनोद

Husband Wife Jokes in Marathi: इथे तुम्हाला Husband Wife वर Marathi Jokes चा विशाल भंडार वाचायला भेटेल. येथे दिलेले सर्वच विनोद खूप मजेदार आहेत आणि ते वाचून तुम्हाला खूप हसू येईल. भारतातील पती पत्नीवर वर विनोद सर्वांनाच आवडतात.

इथे आम्ही Husband Wife Marathi Jokes चा खूप मोठा मस्त कलेक्शन तयार केलेला आहे, हे पती पत्नी विनोद तुम्ही तुमच्या मित्रांसोबत Whatsapp आणि Facebook वर शेअर करू शकता. खाली आम्ही Wife Husband Marathi Jokes सोबतच Marathi Jokes Images पण दिलेले आहेत, जे तुम्ही तुमच्या मोबाईल वर डाउनलोड करू शकता. जर का तुम्हाला Teacher & Students Marathi Jokes तसेच Puneri Jokes in Marathi वाचायचे असतील तर तुम्ही या लिंक वर जाऊन वाचू शकता.

नवरा बायको मराठी विनोद | Husband wife Marathi jokes

Navra Bayko jokes in Marathi
Navra Bayko jokes in Marathi

शेवटी आज आई बोललीच,
“बाळा बायको कमी शिकलेली असली तरी चालेल,पण….
.
.
.
.
…Facebook , Whats app वापरणारी नको…आपल्या घरी कामं पण असतात…”

लग्नाच्या 18 वर्षानंतर…
.
बायको – माला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
.
.
बायको – थँक्स.
.
नवरा – फक्त थँक्स?
.
.
बायको लाजून – इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
.
.
.
नवरा – फालतूपणा करू नकोस! अर्धा – अर्धा कर! नाय तर एका बुक्कीत दात पाडीन..


नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते.

जेवण झाल्यावर नवरा उठला आणि त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली

केला ना इज्जतीचा कचरा ….

आपण आपल्या घरी नाही आहोत. बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत..


नवरा : कुठे गेली होतीस?

बायको : रक्तदान करायला

नवरा : हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं..


Navra Bayko jokes in Marathi
Navra Bayko jokes in Marathi

हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून हळूच विचारतात

डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?

तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते तर महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके

तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका.. ‘


बायको: तुम्ही मला कधी सोनं, हिरे किवा मोती का नाहीं देत हो?

नवरा तिला जमिनीवर ची माती उचलुन देतो

बायको (रागात): हे काय..?

नवरा : मेरे देश की धरती, सोना उगले, उगले हिरे मोती।।

नवरा गेल्या तीन दिवसांपासुन उपाशी आहे.


13 वर्ष केस चालली तरी पण कोर्टाला कळले नाही
की सलमान दारु प्याला होता की नाही.

आणि आमच्या बायका…

नुसतं phone वर hello म्हटलं की,
कमी प्या आणि लवकर या घरी ….असं म्हणतात..


एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,

बायको: काय आहे?

नवरा: या २ वायरांपैकी एक धर जरा..

बायको: हं धरली,

नवरा: काही जाणवलं का?

बायको: नाही,

नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या वायरमध्ये आहे….सोड आता..


नवरा: आज जेवायला काय बनवतेस?

बायको: आमरस, चपाती, वरण, शेवग्याची आमटी, वांग्याचे भरीत,
आळुच्या वड्या, मेथीची भाजी, कांदा भजी, कोशिंबीर, खोब-याची चटणी आणि मसाला ताक.

नवरा: चटणी भाकर वाढ पण असं मोदीसारखं गंडवू नको..


नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल तु खुश मी पण खुश…

नवरा: 20 रुपयांची लागली आहे, हे घे 10 रूपये आणि चल निघ…


Navra Bayko Marathi jokes
Navra Bayko Marathi jokes

या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय…

बायका नेहमी म्हणतात की “पुरुष मूर्ख आहेत”….

.
.
.
पण बायका हेदेखील म्हणतात की,

“आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही”…


बायको: अहो रोज जाताना साडय़ांचं दुकान लागतं.
खूप छान छान साडय़ा लावलेत बाहेर, घेऊया ना आपण दोन चार?

नवरा: काही पण काय ?

त्या वाइन शॉपमध्ये किती छान छान बाटल्य़ा लावलेल्या दिसतात….

मी म्हणतो का कधी…


बायका आपल्या मोबाईलवरुन त्यांच्या आईशी / बहीणीशी एक एक तास बोलतात

आणि शेवटी म्हणतात ..
.
.
.
.
“चल ठेवते आता ..उद्या निवांत बोलु”

पोटात गोळाच येतो राव..


Navra Bayko Marathi Jokes | Husband and Wife Jokes in Marathi

Navra Bayko status in Marathi
Navra Bayko status in Marathi

सुखी कुटुंब

एका घरातून नेहमी नवरा-बायकोचे खिदळत असल्याचे आवाज येत असतात.

शेजारी: तुम्ही किती सुखी कुटुंब आहात. सतत हसत-खेळत असतात.

नवरा: तसं काही नाही हो काका…ती नेहमी मला भांडी फेकून मारते.
लागलं की ती जोरात हसते. नाही लागलं तर मी हसतो..


पुरुष हा लग्नाआधी वाघ असतो आणि लग्नानंतरही

वाघच असतो,

फक्त …

लग्नानंतर दुर्गादेवी त्या #वाघावर बसलेली असते …


एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच

जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती… तेवढ्यात…
नवरा: अगं हे काय करतेस?बायको:- अहो दसरा आहे ना आज!

म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..

नवरा फरार…..


Wife ने एक बोर्ड देखा:

बनारसी साड़ी 10/-
नायलॉन 8/-
कॉटन 5/-
Wife खुश हो के अपने हस्बैंड से: मुझे 500 रू. दो, मैं 50 साड़ी खरीदूंगी
.
.
Husband: अरी ओ बीरबल की माँ, press करने वाले की दुकान है वो।


बायको: (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय
जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?

नवरा: आलो आलो आलो आलोच
(पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)

बायको: अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय.
नीट रगडून धुवा. मला स्वंयपाकाचं काम आहे मी जाते.

Moral: *Mutual Fund Investments are subject to market risks,
please read scheme related documents carefully, before investing.


बायकोवर खूप प्रेम करा

तिला आनंदी ठेवा

तिची प्रत्येक…
मागणी पुरवा तिच्या आयुष्यात तिला इतकं जपा की . . .
शेजारीण म्हणाली पाहिजे जरा घाईच केली मी.


बायकांची सरकारला विनंती :

मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair and lovely ला जरा मनावर घ्यावे,

6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही.

एक वैतागलेली काळी परी


बायकोला गजरे हवे होते…

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत….

Yetana 5 Gajre gheun ya…

तो येतांना 5 गाजरं घेऊन आला…

उपाशी झोपला काय चुकल बिच्याऱ्याच ..??

म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा.


Hasband wife jokes in Marathi
Hasband wife jokes in Marathi

उठा उठा दिवाळी आली.

नवर्‍याचा पगार संपवणयाची वेळ झाली.


नवरा: (कौतुकानेसांगतोय) लहानपणी आषाढीला शाळेत
मला नेहमी विठोबा चा रोल देत असत…

बायको: बाकी सर्व मूलं गोरी असतील…


प्रेम विवाह केलेल्यांना एक सुचना

आज भाऊबिजला प्रिन्स दादा येणार त्यामुळे चार मित्रांना घरी बोलावून घ्या


बायको: सकाळी मी झोपेत असताना

माझा अंगावर पाणी का ओतले.

नवरा (चिङुन): तुझ्या बापानी सांगितले होते की माझी पोरगी फुलासारखी आहे…

कोमेजुन देउ नका …


बायको: (फोनवर) अहो, दिवाळी संपली. मला न्यायला या की..

नवरा- तुझा आवाजच ईना गं..इकडं रेंज नाही. ठेव फोन.

(फोन स्वीचऑफ)


बायको : लग्नानंतर तुमचं आता प्रेमच राहीलं नाही माझ्यावर.

नवरा : परिक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करतं का येडे?


भावनिक पोस्ट…..
.
.
.
बायको घरी नसली की घर खायला उठत..

आणी

मग घाबरलेला जीव प्यायला बसतो….


नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच पहाण्यात गुंग झाला होता.

तेवढ्यात

बायको नविन ड्रेस घालुन आली अन् म्हणाली,

“मी कशी दिसते!”…………….

नवरा उडी मारत जोरात बोंबलला

“छक्का!!!!”

बिचारा 6 दिवस उपाशी होता.


बायको: माझ्या आईचं ऐकलं असतं
आणि तुम्हाला नकार दिला असता ना, तर सुखी झाले असते.

नवरा: काय सांगतेस … तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला?

बायको: हो

नवरा: अरे देवा … आणि मी त्या माऊलीला आतापर्यंत वाईट समजत होतो.


बायको माहेराहून परत आली.

नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.

बायको विचारते, “असे काय हसताय?”

नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.”


बायको: तुम्हाला कधी पासुन हि वाईट सवय लागली?

नवरा: कोणती.
बायको: लॉटरी खेळण्याची….

नवरा: पण आपल्या गावात
तर लॉटरी सेन्टर नाहीय.

बायको- खबरदार!खोटे बोलु नका,
मी आताच तुमच्या खिशातून गुलाबी रंगाच तिकीट फाडून फेकले…

नवरा: झिप्परे, ती 2000 ची नोट होती.


बायकांना सर्वात जास्त रिस्पेक्ट

तिच्या कपाटातील साड्या देतात

कपाट उघडले की सरळ पायावर पडतात.


विवाहित महिलांचं सर्वात खोटं वाक्य

ह्यांना विचारायला पाहिजे
विवाहित पुरुषांचं सर्वात खोटं वाक्य

तिला काय विचारायचं?


बायको (फोनवर): अहो, मी आता खरेदीला बाजारात आलेय. तुम्हाला काही हवंय का?

नवरा: हो…. मला माझ्या आयुष्याचा अर्थ हवा आहे.
जीवनाचे सार्थक म्हणजे काय ते हवंय. आत्म्याची शांती हवीय.
मला माझे अस्तित्व शोधायचे आहे!

बायको (शांतपणे): बरं बरं … कुठली आणू?

किंगफिशर का फोस्टर?

नवरा: टुबर्ग आण टुबर्ग.


एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता.

Air Hostess जवळ आली आणि तिने विचारले:
“Sir, would you like to take Tea together?”

नवरा “Yes” म्हटला आणि बायको कडे बघुन बोलला,
.
.
.
.
.
“ऊठ….
तिला बसू दे..”


बायको रडताना पण एवढी Cute दिसते की…

कळतच नाही हीला शांत करू का अजून एक बुक्की मारू?

-एक प्रेमळ नवरा…!!!


सर्वात फास्ट पुनर्जन्म

बायको: कुठे मेलात.

नवरा: आलो आलो.


लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत
झालेला बदल..
:
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ
झाला तुम्ही काही खाल्लपण नाहीये
.
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
.
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..
जेंव्हा तुमची इच्छा असेल तेंव्हा खा
.
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे,
स्वतःच्या हाताने घ्या
.पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…
बाहेरच काही खाऊन घ्या
.
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…
आत्ताच तर नाष्टा हादडला…..


मित्र बिस्कीटा प्रमाणे असतात. —“हक से मांगो”
.
.
.
गर्लफ्रेंड कोल्ड्रींक सारखी असते.—-” ये दिल मांगे मोर”
.
.
.
बायको औषधासारखी असते.— “बस एक ही काफी है.”


Navra Bayko jokes in Marathi
Navra Bayko jokes in Marathi

गुरुजी मुलांवर खुश झाले…

गुरुजी: “मुलांनो जखमेवर मीठ चोळणे” याचं उदाहरण सांगा..

मुलं: पेट्रोल पंपावर मोदींचा हसता फोटो बघणे

गुरुजी: शाब्बास मुलांनो …


आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद

आणि

गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका


बायको : काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?

नवरा : बहिणीशी

बायको : अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?

नवरा : अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय. ‘


पती: (पत्नीला) मला आवडत नसताना
तुला कुत्रा घरी आणण्याची एवढी हौस का आहे, तेच मला कळत नाही.

पत्नी: (पतीला) तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यावर
माझ्या मागे पुढे करणारे कुणीतरी असावे म्हणून.


पत्नी: लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत.

पती: ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला .

पत्नी: माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून
तुम्हाला इतका आनंद झाला…..?


Navra Bayko Hilarious Comedy Vinod | Navra bayko Vinod

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता.

चंदू: तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन.

चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं,
‘अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?’


नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.

बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?

नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.


बायको: साबूदाणा वडा बनवू का तुम्हाला..?

नवरा: नको मी माणूसच ठीक आहे..

आली मोठी जादूगरीण


भयंकर जोक

नवरा: (खूप संतापून) फोन का नाही उचलला?
.
.
.
.
.
.
.
.
बायको: (चिडून) मी रिंगटोनवर नाचत होते…


आज सहजच बायकोचा जुना शाळा सोडल्याचा दाखला पाहीला….

त्यातील एक टिपणी वाचून गहिवरून आले.
.
.
.
.
.
.
.
“आज्ञाधारक”

डोळ्यात पाणीच आले राव..


बायको: (लाजत) अहो मला सांगा ना; मी तुम्हाला किती आवडते?

नवरा: खुप खुप खुप आवडते ग…
बायको: असं नाही खुप खुप म्हणजे किती सांगा ना प्लिज प्लिज..
.
.
.
.
.
.
.
नवरा: म्हणजे इतकी आवडते कि असं वाटतं तुझ्यासारख्या 5-6 बायका अजून कराव्यात…

बायकोने डोक फुटुस्तर हाणला..


नवरा बायकोला:
ना कजरे कि धार

ना मोतियोके हार

ना कोई किया सिंगार

फिर भी कितनी सुंदर हो
.
.
.
.
.
बायको : सरळ सरळ सांगा ना मेकअप साठी पैसे नाही आहेत म्हणून..


बायको: नाश्ट्याला मध देउ का?

नवरा:नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेल खात नाही !

बायको: मग अंडी देऊ का?


एका बायकोच आपल्या नवऱ्यासाठी स्टेटस….

.
.
माझा तुमच्यावर खुप विश्वास आहे,

पण लक्षात ठेवा माझा विश्वास आणि तुमची हाडे
एकदाच मोड़तील..


जोशी: माझी बायको फार रागीट आहे.
छोटया छोट्या गोष्टीवर चिडत असते.

कुलकर्णी: माझी बायको पण फार रागीट होती.पण आता शांत झालीय.

जोशी: कसे काय ? काय केलं तू ?

कुलकर्णी: काही नाही. मी एकदा म्हटलं, म्हातारपण आलं की बायका अशी चिडचिड करतातच.

तेव्हापासून ती रागवायचं विसरूनच गेली….


लहानपणी ची अफवा…_

बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
..
जाम घाबरायचो तेंव्हा…
.
.
.
आता वाटतय, दगड मारला असता तर बरे झाले असते..


लग्न झालेल्यांसाठी एक प्रश्न….
उत्तर फक्त ” *हो*” किंवा” *नाही*” मध्ये
द्यावे..

आता तुमच्या बायकोने तुम्हांला मारणे बंद केले आहे का???


ही तर फक्त आपल्या बायकोचीच नाटके असतात राव…

“तुमचा हा दोस्त वाईट आहे…!
तुमचा तो दोस्तच बरोबर नाही…!!”

आपल्याला तर तिच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा….!!


नवरा बायकोच भांडण होत

बायको : मी चालले घर सोडून तुम्ही एकटेच रहा

नवरा : मी चाललो देवळात

बायको : मी परत येणार नाही तुम्ही कितीही नवस केले तरी

नवरा : अग वेडे मी नवस फेडायला चाललो


पती फोनवर बायकोला विचारतो: जेवायला काय बनवले आहे?

पत्नी फोनवर चिडून सांगते: विष!
.
.
.
.
पती :- जेवून झोप मला यायला उशीर होणार आहे .


हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर

बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.

नवरा: लग्न करू नको रे बाबा!!!


अरे, तुझी बायको खुप ओरडायची तुला, एवढी शांत कशी झाली ती?

मी एक आईडिया केली..

क़ाय?

मी तिला गुटका खायला शिकविले.. ‘


बायकोला थोबाडीत मारुन नवरा म्हणाला,—

“पुरूष तिलाच मारतो जिच्यावर तो प्रेम करतो”…….

बायकोने २ थोबाडीत, ४ लाथा, आणि १५-२० लाटण्याचे
फटके मारुन म्हणाली, “तुम्ही काय समजता,की माझं
तुमच्यावर प्रेम नाही?…….


पुरूष हा लग्नानंतर देखील विद्यार्थीच असतो.

बायकोला वाटतं की….
आई आणि बहिणी शिकवतायं.

तर….
आई आणि बहिणींना वाटतं की बायको शिकवतेय.


नवरा-बायको दोघे हातात हात घालुन समुद्राकाठी फिरत होते..

…अचानक पणे बायकोने नवऱ्याला विचारलं तुम्ही माझ्यावर कधी पर्यंत प्रेम करणार हो ?

नवर्‍याने त्याच्या डोळयातील एक अश्रुचा थेंब काढुन समुद्राच्या पाण्यात टाकला….
आणि म्हणाला हा अश्रूचा थेंब जो पर्यंत तु शोधुन काढत नाही तो पर्यंत …

..हे पाहुन बिचाऱ्या समूद्राला पण रडू आलं आणि तो बोलला

कुठुन शिकता रे एवढं बायकोला चुना लावायला?


गण्या: तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?

बंड्या: “गुगल!”

गण्या: का रे?

बंड्या: आयला एक प्रश्न विचारला की “हजार” उत्तरं देते..!


समस्त स्त्री जातीला पडलेला एक गहन प्रश्न …

पुरुष तर कधीच उपवास करत नाहीत

.
.
.
.
तरीही त्यांना आपल्या सारख्या चांगल्या बायका कश्या मिळतात?


बायको: जिथे असाल तिथेच थांबा. कुठेही बाहेर पडू नका.
पावसामुळे परीस्थिती खूप बेकार आहे. काळजी वाटते.
सांगितलेल ऐका यावेळी तरी!

नवरा: बरं, बरं!

बायको: बरं, नक्की कुठे आहात तुम्ही आता?

नवरा: माझ्या जुन्या मैत्रिणीच्या घरी. अचानक भेटली. तिने चहाला बोलवलं.

एकदम सन्नाटा

दुसऱ्या सेकंदाला बायको: जसा असशील तसा निघ आणि घरी ये ताबडतोब.
पावसाची कारण मला सांगु नकोस, समजलं ना.


बायको: बंदूक घेऊन दारात का थांबलात.

नवरा: वाघाची शिकार करायला चाललो.

बायको: मग थांबलात का?

नवरा: बाहेर कुत्रा उभा आहे तो गेला की जातो.


पती: तू तर म्हणाली होतीस रात्रीच्या जेवणात दोन options आहेत म्हणून,
इथं तर एकच भाजी दिसतेय . . .

पत्नी: ( शांतपणे options दोनच आहेत…

1.खायचं असेल तर खा,
2.नाहीतर बोंबलत जा !!!


अचानक बायकोने आपल्या नवऱ्याला “बोटाने” इशारा केला. आणि बोलाऊन घेतले..

.
.
नवरा- काय झालं का बोलावलस??

बायको- काम तसं काही खास नाही, मी फक्त ह्या “बोटात” किती Power
आहे ते तपासत होते…


गावठी बायको…

नवरा आपल्या बायको ला घेवून हॉटेलमधे जातो.

नवरा: काय खाणार तू…?

बायको : काय पण चालेल…

नवरा: वेटर, अरे एक मेनूकार्ड आण रे…

बायको: अहो दोन मागवा ना, मी पण तेच खाणार…!


बायको: जास्त पिऊ नका लवकर घरी या.

नवरा: तुला कसं कळालं मी प्यायला आलोय ते.

बायको: किचन मधून एक ग्लास चोरीला गेलाय म्हणून..

“प्लास्टिक बंदी..”


आईला 21 वर्ष लागतात मुलाला जेनटल बनवायला आणि

.
.
.
.
बायकोला 21 मिनिट लागतात नवऱ्याला मेंटल बनवायला.


पति-पत्नी एका गच्च गर्दी असलेल्या बस मधून प्रवास करत होते…

योगायोगाने पतीसमोर एक सुंदर स्त्री असते व ते तिला चिटकुन् उभे असतात,
स्वाभाविकपणे हे पाहून पत्नी फार जळत असते !

अचानकपणे ती सूंदर बाई फिरली व तिने पतिदेवाच्या कानाखाली एक जोरदार चपराक लावली!
“लाज नाही वाटत परस्त्रीला चिमटी काढायला!”

बसमधुन उतरल्यावर

पति: खरेच मी नाही ग चिमटा काढला..

पत्नी: अर्थपूर्ण नजरेने पाहत हसत बोलली
“आणखी चिटका ??? चिमटा मीच काढला होता “

बोला पत्नीधर्माचा विजय असो!!


नवरा: अग कुठे चाललीस तू?

बायको: दिसत नाही काय ? आंघोळीला चाललीय ते !

नवरा: अग पण मोबाईल घेऊन ?

बायको: मग, बादली भरेपर्यंत काय करू ……………


मोबाईल विकत घेतल्या वर आणि
लग्न केल्यावर माणसाला एकाच गोष्टीचा राग येतो
.
.
.
थोड अजुन थांबलो असतो तर चांगलं मॉडेल मिळालं असतं…


😆😆😆😆😆😆😆 ती म्हणाली प्रेमात प्रत्येकाने ताजमहाल बनवायची काही गरज नाही,

रोज भांडी घासली आणि कपडे धुतले तरी खुप झालं…….!
(Anniversary special)


पती सोफ्यावर आडवा पडला होता.

पत्नीने त्याच्या डोक्यात दंडुका मारला.

पती: का मारलीस यार !

पत्नी: तुमच्या खिशात एक चिठ्ठी सापडली .तिच्यावर रेशमा असे लिहिले होते.

पती: अगं ती रेसची घोडी आहे. कालच्या रविवारी मी रेस खेळायला गेलो होतो ना!

पत्नी: सॉरी.

चार दिवसांनंतर पती घरी येताच त्याच्या डोक्यात पुन्हा दंडुका बसला.

पती: आता का मारलीस ?

पत्नी: घोडीचा फोन आला होता.


Husband wife jokes for whatsapp in Marathi
सासुबाई: नवर्या मुलाला विचारतात..

वर्हाडी एवढे आनंदात वेडयासारखे का नाचू राहिलेत?
.
.
.
नवरदेव- कारण त्यांना सांगितल आहे कि..
हुंड्याच्या पैस्यातून सगळ्यांची उधारी दिली जाईल..


नवरा: हिप्नोटाइज करणं म्हणजे काय?

बायको: म्हणजे एखाद्याला आपल्या कंट्रोल मध्ये ठेवून
आपल्याला हवी ती कामं करून घ्यायची.

नवरा: चल खोटारडी..त्याला तर लग्न म्हणतात. ‘


बायको ने विचारलं: ​”मी कशी दिसते ओ

मी म्हणालो: ​श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे….​!

​तांब्या​ फेकुन मारलं ना राव….


पती आणि पत्नी सोफ्यावर बसून कलिंगडाचे काप खात TV पाहत असतात.
पत्नीच्या एका हातात अर्थातच मोबाईल असतो.

पतीचा मोबाईल किचनमध्ये चार्जिंगला लावलेला असतो.
एवढ्यात किचनमधून smsचा टोन ऐकू येतो, म्हणून पती किचनमध्ये जातो आणि मेसेज वाचतो.

बायकोचा मेसेज असतो: “किचनमधून परत येताना मीठ घेऊन या!” 😃


बायको बराच वेळा पासुन बाथरुम मधुन बाहेर आली नाही

म्हणुन सहज दरवाजा वाजवला …….

आतुन मोठ्याने आवाज आला ……

“आहे …..आहे….तुमची श्रीदेवी अजुन जिवंत आहे ……..


रात्री २ वाजता बायकोचा मोबाईल वाजला.

नवरा गडबडीत उठला.
बायकोचा मोबाईल बघितला तर मेसेज होता, “ब्युटीफुल”

नवऱ्याने रागाने बायकोला उठवुन विचारले,
“तुला ईतक्या रात्री ब्युटीफुलचा मेसेज कोणी पाठवलाय?”

बायको पण चक्रावली आता ४० च्या वयात ब्युटीफुल कोण म्हणणार आपल्याला??

जेव्हा तिने मोबाईल हातात घेतला तेव्हा नवऱ्याला ओरडुन म्हणाली,
“चष्मा लावून मोबाईल उचलत जावा “बॅटरी फुल” लिहिले आहे.”


बायको सोबत काल झालेल्या शाब्दीक चकमकी नंतर असं वाटतं
की एक भारतरत्न अशा बायकांसाठी पण असलं पाहिजे.

ज्या 300 शब्द प्रति मिनिटं बोलल्या नंतर म्हणतात की
– माझं तोंड उघडायला नका लावू.


लग्नाच्या पुजेवेळी

नवरा : गुरुजी पत्नीला माझ्या डावीकडे बसवायच की उजवीकडे?

गुरूजी : बघ जमतय तस कर, नंतर ती तुझ्या डोक्यावरच बसणार आहे


बायकांनी नवऱ्यासाठी करवा चौथचे व्रत करण्याऐवजी

मौनव्रत केल्यास पती २५ वर्ष जास्त जगू शकतो .


बायको: मला बोलायचीही इच्छा नाही,
तुम्ही माझा वाढदिवस पुन्हा विसरला… असं होतंच कसं?

नवरा: तुझा वाढदिवस मी लक्षात ठेवावा असं वाटतच कसं तुला?
तुझे वय वाढलंय असं वाटतच नाही.

बायको: खरंच?

नवरा: (मनात) टायमावर डायलॉग आठवला, नाहीतर काही खरं नव्हतं आज. ‘


पत्नी : जर मी अचानक मारून गेली तर तुम्ही दुसरे लग्न कराल का?

पती : नो डार्लिंग, तसा तर मी स्वप्नातही विचार करू शकत नाही.

पत्नी : का नाही का? तुमच्या चांगल्या वाईट क्षणांमध्ये तुमची सुख दुःखात साथ देणारी कोणी तरी हवी ना.
प्लिज मी मेल्यावर तुम्ही दुसरे लग्न करा, तुम्हाला माझी शपथ डार्लिंग.

पती : ओह, मेल्यानंतर पण माझी एवढी काळजी??
पत्नी : तर प्रॉमिस, तुम्ही दुसरे लग्न कराल ना?

पती : ओके बाबा, पण फक्त तू शपथ घातलीस म्हणून तुझ्यासाठी दुसरे लग्न कारेन.
पत्नी : तुम्ही तुमच्या नवीन पत्नीला या घरात ठेवाल ना?

पती : हो, पण मी तिला तुझी रूम नाही देणार वापरायला.
पत्नी : तिला आपली कार चालवायला द्याल ना?

पती : नो, नेव्हर, त्या कारमध्ये आपल्या दोघांच्या प्रेमळ आठवणी आहेत.
तुझी आठवण म्हणून मी कायम माझ्याजवळ ठेवील ती कार. तिला नवीन कार घेऊन देईल
पत्नी : आणि माझे दागिने?
पती : ते मी कसे देईल तिला? त्यात तुझ्या आठवणी आहेत ना. मी तिला नवीन दागिने बनवून देईन.
पत्नी : आणि तिने माझ्या चप्पल वापरल्या तर?
पती : नाही वापरू शकणार ती. तिच्या पायाची साईज ७ आहे आणि तुझ्या पायाची ९.

भयाण शांतता….. (चप्पल तुटेपर्यंत हाणला नवऱ्याला)


एकदा नवरा बायको हातात हात घालून बागेत फिरत असतात.

तिकडून एक वात्रट मुलगा येतो आणि म्हणतो,
“काका काल वाली जास्तच मस्त होती”.

नवरा आता चार दिवसांपासून भुकेला त्या मुलाला शोधतोय


बायको: माझं लग्न जर एखाद्या राक्षसाशी झालं असतं ना
तरी मी आयुष्याला एवढी कंटाळले नसते जेवढी तुझ्याबरोबर कंटाळलेय

नवरा: अगं वेडी, रक्ताच्या नात्यांमध्ये कुठे लग्नं होतात काय?


एकदा एका राजाने बायकोचे ऐकणारे आणि न ऐकणारे पुरुष पाहायचे ठरवले.

ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रंग करायला सांगितले.
सर्व पुरुष बायकोचे ऐकणारे याच रांगेत उभे होते.
फक्त एकच पुरुष न ऐकणारे अशा रांगेत उभा होता.

राजा म्हणाला: वा तू एकटाच बायकोच न ऐकणारा खरा पुरुष आहे.

त्यावर पुरुष म्हणाला: नाही, मला बायकोनेच येथे उभे राहायला सांगितले आहे.


काल रात्री उशिरा घरी पोहोचलो.
बराच वेळ बेल वाजवली पण बायकोने काही दर उघडलं नाही.
शेवटी आख्खी रात्र रस्त्यावर काढली.

मित्र: मग सकाळी तिच्यावर चिडलास की नाही?

नाही रे, सकाळी उठल्यावर लक्षात आलं की बायको माहेरी गेलीय
आणि चावी माझ्या खिश्यातच आहे.

तात्पर्य: कमी प्या रे


नवरा: माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय,
ताबडतोब अँब्युलन्स ला फोन लाव.

बायको: हो लावते, तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा.

नवरा: राहू दे, थोडं बरं वाटतंय आता.


नवरा: हल्ली तुझे उपवास नसतात का?
लग्नाआधी बरेच करायचीस ना?

बायको: हो ना. सोळा सोमवार करून तुमच्याशी लग्न झालं
आणि माझा विश्वासच उडाला उपवासांवरचा.


बायको: तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, रंकाळा, गणपतीपुळे
कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा. आणि आता कुठेच नाही नेत.

नवरा: निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का तू?


बायको: काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय.
का एवढा उशीर झाला घरी यायला?

नवरा: स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहे ना तो पाहत होतो

बायको: मग आणली का नाही एखादी ?

नवरा: नेसलेल्या होत्या ना!!


नवीन लग्न झालेलं जोडपं भाजी आणायला जातं.

भाजीवाला विचारतो: मैडम खूप शिकलेल्या आहेत वाटतं.

नवरा (खुश होऊन): हो इंजिनियर आहे ती, तुम्हाला कसं कळलं?

भाजीवाला: त्यांनी पिशवीमध्ये खाली टोमॅटो
आणि वरती कलिंगड ठेवलाय म्हणून अंदाज बांधला.


पेट्रोल पंपावर पहिले प्रत्येकजण आपल्या बायकोला
पेट्रोल पंपाच्या बाहेर उतरवून पेट्रोल भरायला जात होता.

मी खूप विचार केला असे का?

नंतर तिथला बोर्ड पहिला आणि खूप हसलो राव
… लिहिलं होतं, “आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवाव्यात”


तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल तर अविवाहित असताना बदला.

लग्नानंतर तुम्ही टीव्ही चे चैनल पण बदलू शकत नाही.


गणपतीला दोन बायका असतात रिद्धी आणि सिद्धी

सामान्य माणसाला एकच बायको असते आणि ती पण जिद्दी


एक बाई कपडे धुताना दुसरीला

तू वापरतेस तोच साबण मीही वापरते
पण तुझ्या नवऱ्याचे कपडे एवढे स्वच्छ कसे?

दुसरी: आगं, मी कपडे धुताना त्यात माझा नवरा आहे
असे समजून धोपटते … म्हणून


माणूस: केस बारीक कापा

कटिंग वाला: किती बारीक कापू ?

माणूस: बायकोच्या हातात येणार नाही इतके


बायको : पाहुणे येणार आहेत, घरी फक्त डाळच आहे.

नवरा : तू एक काम कर, किचन मध्ये एक भांडं पाड,
मग म्हण “अरे देवा, पुलाव सांडला” नंतर,
दुसरं भांडं पाड आणि म्हण “अगं बाई,
बिरयाणी सांडली” मग,
मी पाहुण्यांना सांगीन आज डाळ भात खाऊ….

पाहुणे येतात…
किचन मधून भांडं पडल्याचा आवाज येतो…

नवरा “काय झालं???”
बायको : आईच्या गावात….डाळच पडली


बायको: तुम्ही आपल्या शेजारनी ला “आय लव यु” तर नाही न म्हटलं?

नवरा: नाही तर … का? काय झालं ?

बायको: ती कालपर्यंत मला “वहिनी” म्हणत होती,
आज अचानक “ताई” म्हणतेय!!


पत्नी: पूरा दिन क्रिकेट, क्रिकेट ..!!
मैं घर छोड़ कर जा रही हूँ …

पति: (कोमेन्टरी के अंदाज़ में)
पहलीबार कदमों का बेहतरीन इस्तेमाल!


*बायकांचे ११ प्रकार*

१. *आळशी बायको*
स्वत: जाऊन चहा बनवा आणि माझ्यासाठी आणा.

२. *धमकवणारी बायको*
कान खोलून ऐकून घ्या या घरात मी राहीन किंवा तुमची आई राहील.

३. *इतिहासाची आवड असलेली बायको*
सर्व जाणून आहे मी तुमचं खानदान कसं आहे ते.

४. *भविष्य-वाचक बायको*
पुढल्या सात जन्मांपर्यंत माझ्या सारखी बायको मिळणे शक्य नाही.

५. *गोंधळलेली बायको*
तूम्ही माणूस आहात की पायजमा

६. *स्वार्थी बायको*
ही माझी साडी माझ्या आईने माझ्यासाठी दिली आहे.
तुमच्या बहिणांना मटकवण्यासाठी नाही.

७. *शंकाळू बायको*
फोनवर कोणाशी बोलत होता इतक्या वेळेपासून?

८. *अर्थशास्त्रज्ञ बायको*
कोणता खजिना जमा केलेला आहे जे रोज-रोज चिकन खाऊ घालू?

९. *धार्मिक बायको*
देवाचे आभार माना जी माझ्यासारखी बायको पदरात पडली.

१०. *निराश बायको*
माझ्या नशीबात हेच फुटकं भांड लिहिलेलं होतं का?

आणि शेवटी ☆☆☆☆☆

११. *टिकाऊ बायको*
मी होते म्हणून टिकले दूसरी कोणी असती तर आतापर्यंत पळून गेली असती.

यातून तुमची कोणती आहे? तपासून घ्या!!


पति: काल तू मला झोपेत शिव्या देत होतीस..

पत्नी: तूमचा काही तरी गैरसमज झालेला दीसतोय.

पती: कसला गैरसमज ?

पत्नी: हाच की मी झोपेत होते म्हणुन…


बायको: अहो सकाळी सकाळी बाहेर पडताना देवाला नमस्कार तरी करत जा.
कामं चांगली होतात.*

नवरा: काहीही चांगलं होत नाही.

लग्नाच्या दिवशी बाहेर पडताना घरातील सर्व देवांना नमस्कार केला.
काय झालं.


नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते

आज पासून तू मला आई म्हणायचं
आणि सासर्यांना बाबा म्हणायचं

संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो, तेव्हा ती म्हणते…

आई….. दादा आला!


सुखी राहायच असेल तर आतला आवाज ऐका
…….
………
आतला आवाज म्हणजे
.
.
.
किचन च्या आतला आवाज

*”अहो ऐकल का”*


बायको आपल्यावर खुपच प्रेम करते असे वाटत असेल तर,

जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात पुसून पहा…

तुमचा सगळा गैरसमज दूर होईल…!!


डिलिवरी च्या वेळेस …

बायको – देवा, मुलगा होऊ दे ….
नवरा – देवा, मुलगी होऊ दे प्लीज

देव – माकडांनो गप्पा बसा , नाही तर असा आयटम बनवेल,
कि तुम्ही दोघपण रडत बसाल, आणि तो टाळी वाजवेल.


बायको: माझ्यासाठी वाघाची शिकार करा,
मला वाघाचे कातडे आपल्या घरात लावायचे आहे….

नवरा: अगं हे कसे शक्य आहे, दुसरे एखादे सोपे काम सांग

बायको: ठीक आहे,
तुमच्या मोबाईल मधले व्हाटसप चे मेसेजेस दाखवा….

नवरा: वाघ साधा हवा की पांढरा?


एकदा देवाने माणसाची स्मरणशक्तीच पुसून टाकली
आणि माणसाला विचारले,”काही आठवते का?”

माणूस: हो, फक्त बायकोचे नाव.

देव हसला अन म्हणाला,
सगळा फॉरमॅट केला पण वायरस गेला नाही


बायको: देवा, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे.

नवरा: अरे वा, इतका आवडतो मी तुला?

बायको: तसे नाही हो, एवढं ट्रेनिंग दिलेलं वाया नाही का जाणार?
नवीन माणसाला परत कोण शिकवणार?


एक नवरा साधूकडे जातो

नवरा: बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर बायकोचा चेहरा चादरीच्या आतून
तेजाने चमकत असतो, कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात,काय करू?

साधू: आरे password टाक मोबाईलला तुझ्या,
येड्या तुझा मोबाईल चेक करते ती………..!!!


सर्वात छोटा जोक

नवरा: मला कविता आवडते
बायको: मलापण विनोद आवडतो


पक्क्याच बायकोबरोबर भांडण चाललं होते….

बायको (वैतागून): तुमच्या डोक्यात ना नुसतं शेण भरलय……

पक्क्या: अच्छा, आता मला कळले की तू इतका वेळ माझे डोके का खाते आहेस ते… ‘


पत्नी: ऐकलं का? पेपरमध्ये बातमी आली आहे.
की एका नवऱ्याने आपल्या पत्नीला विकलं?

पती – अरे वा, कितीला?
पत्नी – एका सायकलसाठी त्याने असं केलं.

तुम्ही तर अस नाही ना करणार
पती – मी इतका मूर्ख थोडी आहे. तुझ्या बदल्यात तर मी कार घेईन


बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते.
नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो.

नवरा: याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?

बायको: ते काय आहे ना, केसर संपलं आहे
म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.

ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम”

(नवऱ्याने विमल सोडली)


बायको: आहो, माझ्याकडे तोंड करून झोपा, मला भीती वाटते.

नवरा: हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल?


बायको: आहो मी एक रुपयाचे तीन कांदे आणले.

नवरा: कसे काय?
बायको: एक मी विकत घेतला आणि दुसरा पळवून आणला.

नवरा: मग तिसरा?
बायको: तिसरा त्याने फेकून मारला


नवरा: अग ऐकतेस का, मला जर नगरसेवक केलं तर मी
अख्ख शहर बदलून टाकीन, मला जर मुख्यमंत्री केलं तर महाराष्ट्र
बदलून टाकीन आणि पंतप्रधान केलं तर पूर्ण देश बदलून टाकीन. बायको: तुम्हाला कोणी चावलं की काय?
लय बडबडताय. हे बदलीन, ते बदलीन… दारू कमी प्या…
लुंगी समजून माझा परकर घातलाय तो बदला आधी.


बायको: आकाशात चांदणी बघून म्हणते,
“अशी कोणती चीज आहे जी तुम्ही रोज बघू शकता पण आणू शकत नाही?”

नवरा: शेजारीण …. बायकोने घरात नेऊन लई चोपला.


बायकांनी भरलेल्या एका बसचा अपघात होतो.
सगळ्यांचा त्यात मृत्यू होतो. सगळे नवरे जवळपास एक आठवडा रडत होते.
गण्या मात्र २ आठवडे होऊन गेले तरी अजुन रडतच होता.

मित्रांनी खूप खूपच खोदून-खोदून विचारल्यावर कारण कळलं…..
त्याच्या बायकोची बस चुकली होती


बायको : कशी दिसते मी?

नवरा : एकदम Piyanka Chopra सारखी दिसतेस
बायको : खरंच? DON वली कि KRISH वाली?

नवरा : BURFI वाली
मग काय, बायको ने धुतला MARY KOM बनून


एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.

channel वर म्हैस दिसते…
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक

बायको: Aiyya…
सासूबाई


बायको:माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा.

नवरा: बरं… पण वचन दे, माझी
मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…


बायको: मी ड्राइवरला नौकरी वरुन काढित आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे…

नवरा: Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना…


नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको:एकटीच आली असेल

नवरा: हो तुला कस माहीत?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता…


बायको: माझी एक अट आहे,
नवरा : काय?

बायको: तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा: माझी पण एक अट आहे,

बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे…


बायको : आहो ऐकले का?
नवरा : काय?

बायको : या वर्षी हळदी कुंकूला मी बायकांना काय देऊ?
नवरा: माझा नंबर दे

लय धुतला बायकोने त्याला


भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग

पीत नाहीत ग ते, मित्रच नालायक आहेत त्यांचे.

पण तिला काय माहित की आपला गंगाधरच शक्तिमान आहे.


तर मित्रांनो तुम्हाला हे Husband wife Marathi jokes, navra bayko funny Marathi vinod कसे वाटले वाटले हे कंमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की सांगा जर का तुमच्या कडे सुद्धा असेच काही नवीन Navra bayko funny status असतील तर आमच्या अधिकृत ई-मेल आयडी [email protected] वर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Navra bayko marathi jokes आमच्या वेबसाइट मार्फे हजारो लोकांपर्यंत पोचवायचा प्रयन्त करू.

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित म्हात्रे असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment