Best Marathi Vinod | बेस्ट मराठी विनोद – Best Marathi Jokes Collection
If you Looking for the Best Marathi Vinod in Marathi then you have come to the right website. In this article, we have shared all 500+ Best Marathi Vinod in Marathi.
दुकानदार: आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..
.
.
.
.
बंड्या: नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय..
आई: कोणाचा फोन होता रे?
मी: मित्राचा होता आई
आई: लाज वाटते का जरा तरी,
इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला
“लयच कि बेक्कार वाटलं राव”
2019 मधील सर्वात मोठा प्रश्न…
.
.
.
.
सोनु पोरग आहे की पोरगी?
संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
.
.
.
.
का? ते निरमा लावतात का?
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत रोज डी पी बदला..
.
.
.
.
नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे!!
लक्षात ठेवा, चार-चौघात
जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच
मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ
असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच
होतो कि
.
.
.
तुमचा नेट पँक संपलाय..
जगामध्ये फक्त २फास्ट नेटवर्क आहेत..
एक इमेल आणि दुसरा फिमेल ..
एका मिनीटात ईकडची गोष्ट तीकडं
एक मुलगा हरवला …
म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.
तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.
पण आता तो मुलगा 6 महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण
रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो….
Open Challenge
हिंम्मत असेल तर.
.
.
.
.
“आधार कार्ड” वरचा फोटो DP म्हणुन ठेऊन दाखवा.
एक मुलगी शिकली की घरच्या 2 माणसांना शिकविते
.
.
.
.
पण तीच मुलगी कॉलेजात 4 मुलांना नापास करते त्याच काय?
केजरीवाल का प्रधानमंत्री मोदी पर नया आरोप
.
.
.
.
2000 के नोट को बीच से मोड़ने
पर गांधीजी को साँस लेने में दिक्कत हो रही है.
कधी कधी ह्या विचारमुळे माझं लय डोकं खराब होत कि,
.
.
.
.
वेस्ट इंडिज मधल्या लोकांच्या आधार कार्डची झेरॉक्स कशी येत असेल…
जेव्हा मुलगी पळुन जायची धमकी देते तेव्हा आई बाबांनी काय करावं?
तीच टक्कल करावं!
.
.
५-६ महीने पळुन काय घरातुन बाहेर पण पडणार नाही……….
.
.
.
टकली……..
वेळ एक सारखीच राहत नाही, सगळ्यांची वेळ बदलत असते…
.
.
जे कपडे इंग्रज गवर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते…
.
.
.
.
आज तेच कपडे BAND वाले घालतात..
वाजीव रे धताड़ तताड़ धताड़ तताड़..
एका आजोबांच्या डोक्यावर फक्त ८ केस..आजोबा सलुन मध्ये जाऊन खुर्चीत बसले
दुकानदाराने विचारले मोजु की कापु?
आजोबा म्हणाले कलर कर …कलर….
एकदा, बाबुराव एका डॉन वर चोरीची केस करतो,
नंतर डॉनचे गुंड बाबूरावच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,
“”केस मागे घे नाहीतर…..””
.
.
.
.
*बाबुराव* घाबरुन खिशातून कंगवा काढतो,
आणि केस मागे घेतो..
गुंडानी अरबी समुद्रात अंघोळ करुन शुद्धी करुन घेतली….
तेरी ज़ुल्फों ने हर तरफ हंगामा कर रखा है ए सनम ….
.
.
कधी आमटित, कधी भाजीत, कधी चपातीत तर कधी भातात..
#लोचा झाला ना राव
ती #पास झाली पण तिची #मैत्रीण आपली सेटिंग
लावता लावता #नापास झाली#
आम्ही पण लहानपणी विराट कोहली सारखे सुंदर होतो,
.
.
.
.
पण म्हशीला वैरण आणून आणून आमचा पार ख्रिस गेल झालाय…
एक वैतागलेला मुलगा……
शेजारी: किती टक्के मिळाले रे तुला?
.
.
.
.
पोरगं: (नाना पाटेकर स्टाईल मध्ये).
*लो ….आ गये मेरी मौत का तमाशा देखने*
Dear Customer,
Your Ac XXXXXXXX6529 is credited with INR15,00,000.00 on
08 JUNE, 2019. Info RTGS-141210633491-BLACKMONEY DISTRIBUTION
By- Modi ,BJP. Your Net Available Balance is INR15,01146.00 कधी येईल राव असला messege लईई वाट बघतोय
आज सारख्या उचक्या आणि ठसके लागतायत…
(किती जणी आठवणी काढत प्रदक्षिणा घालतील ते देवालाच माहीत)
सकाळी सकाळी बायको चा हसरा चेहरा बघा दिवस मस्त जातो-
महात्मा फुले. .
.
.
.
मग बायको कुणाची पण असो- निळू फुले
पहिला दोन लोक भांडण करायची तर तिसरा सोडवायचा…!
:
:
:
:
आता तिसरा विडीयो काढतो…
मी काय म्हणतो…
मी 5 रुपयांचे टॉकटाइम लोन घेतल होत…
म्हंजि मग ते पण माफ़ होणार का???
नाय आपल् असच एक शंका
जनावरांच्या दवाखान्यात एक वेगळीच गम्मत असते
पेशंटचे नाव म्हणून जनावरांच्या मालकाचे नाव लिहितात
व त्याचे समोर जनावरांना झालेल्या आजाराचे नाव लिहिलेले असते.
परवा असेच दवाखान्यात गेलो असता रजिस्टर वर लिहिलेले दिसले
नाव: शामराव पाटी
आजार: गाभण राहत नाही..
जिन्दगी में काम ऐसा करो कि अगली बार लोग कहे
.
.
.
.
राहुदे मी करतो…
कोलगेट: क्या आपके टुथपेस्ट मे नमक है?
पुणेकर: “नाही मी वरतुन टाकुन घेतो ..(चवीनुसार)”
कोलगेट वाल्याने स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतल्या.
नमस्कार मंडळी?….
कसे आहात सगळे?? मजेत ना ??
….आणि आपला नेहमीच आपुलकिचा प्रश्न..
कामावर जाताय ना सगळे..जायलाच पाहिजे..
नाहीतर पोरगी कोन देणार?
भारतातील सर्वात मोठी अफवा
.
.
.
.
गाव सोड तुझी प्रगती होईल.
याच नादात आमचे सर्व मित्र पुण्यात गेले..
ज़िन्दगी में एक बात हमेशा याद रखना दोस्त,,
.
.
.
.
पंगतीत मीठ वाढणारा परत येत नाही….
आज पुन्हा जेवताना उचकी लागली
आणि ठसका लागला ……
आईनी कडा कडा बोटं मोडली अन् म्हणाली,
भवान्या जेवू पण देत नाहीत लेकराला…
मुंबईकर मुलगी: Excuse me
सातारकर मुलगी: सरकता का please
विदर्भकर मुलगी: सरकून राहिला का
सांगलीकर मुलगी: सरकता का जरा
कोल्हापूरकर मुलगी: सरक ना भावा, आणि सगळ्यात Top
. . . . सोलापूरकर मुलगी: ए बधीर सरक ना, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे काय??
खुप त्रास होतो मनाला… 🙁
जेव्हा आपण,
.
.
.
मोबाईल Charging ला लावतो
आणि आर्ध्या तासानंतर कळतं कि बटन चालु करायचं विसरलो आहे…!!
सोलापूरातील माणूस सूर्याकडे पाहत,
आता काय घरात ऱ्हायला येतो का बे…