Power of Focus in Marathi | एकाग्रता कशी वाढवावी

एकाग्रता कशी वाढवावी | Power of Focus in Marathi

जर तुमच्याकडे Focus आणि Consistency या दोन गोष्टी असतील तर या जगात अशी कोणतीच गोष्ट नाहीये जी तुम्ही करू शकत नाहीत.

आपण कोणतेही नवे काम सुरू करण्याअगोदर खूप जास्त उत्सुक असतो आणि दिवस रात्र ते काम करण्यासाठी आपण तयार असतो. पण हे किती दिवस टिकते? 10 दिवस, 15 दिवस, आणि जास्तीत जास्त एक महिना! हा प्रॉब्लेम जर तुम्हाला कधी आला असेल तर हा विडिओ पूर्ण बघा कारण या सम्यसेचे Complete Solution मी तुम्हाला या विडिओ मध्ये सांगणार आहे.

मित्रांनो हि जी माणसाची human tendency आहे की आपण जुने ध्येय पूर्ण न करता खूप वेळ नवीन ध्येय शोधत असतो. त्यांचा विचार करायला लागतो आणि त्याच्या मागे धावायला देखील लागतो. याचा परिणाम असा होतो की आपण कोणतेच ध्येय पूर्ण करू शकत नाही. या वेळी आपली प्रोग्रेस होते नाही तर फक्त मानसिक तणाव जास्त वाढतो.

या सवयीमुळे आपण आपला वेळ, पैसे आणि उर्जा सगळे काही गमावून बसतो. पण तुम्ही कधी याचा विचार केला आहे का की आपण असे का करतो? याच्या मागचे कारण काय आहे?

पहिली गोष्ट तर ही आहे की आपण अपेक्षा खूप ठेवत असतो. जिमला जायला लागलो तर एका महिन्यात हिरो सारखी बोडी बनवून दाखवू, आज हे काम सुरू केले आहे तर 10 दिवसात पैसे यायला सुरुवात व्हायला पाहिजे, आणि असे बरेच काही… आणि एक एक दिवस पुढे जात असतो आणि तरी देखील तुम्ही बॉडी बनवू नाही शकलात किंवा पैसे कमवू नाही शकलात तर त्या कामातून तुमचे लक्ष आणि सातत्य हे कमी होऊन जाते. आणि साहजिकच गोष्ट आहे की आपण त्या कामात गिव्ह अप करून देतो.

मित्रांनो यातून पहिली ही शिकवण मिळते की, वेळ द्यायला शिका! कोणतीही गोष्ट 10 दिवसात शक्य होणार नाही, जितकं मोठं तुमचं ध्येय असेल तितकेच ते पूर्ण करायला वेळ देखील घेतील.

मी तुम्हाला एका युट्युबरची Story सांगते, त्याने त्याचा चॅनल सुरू केला. काही दिवस व्हिडिओज टाकल्या, चॅनेल थोडा मोठा झाला पण त्याला हवे तसे आउटपुट मिळत नव्हते म्हणून त्याने व्हिडिओज अपलोड करणे सोडून दिले व त्यामुळे त्याच्या चॅनेल ची growth पूर्ण थांबली. मग त्याने काही काळाने पुन्हा चॅनल वर व्हिडिओज अपलोड करायला सुरू केल्या, ते हि पूर्ण लक्ष केंद्रित करून आणि त्यात सातत्य ठेऊन आणि आज एका वर्षामध्येच त्याचे 10 लाखांहून अधिक सबस्क्राईबर आहेत. त्याने एकच गोष्ट केली ते म्हणजे Focus आणि Consistency! या काळात तो ज्या कंपनी मध्ये काम करत होता त्याच्या व्हाईस प्रेसिडेंट पेक्षाही जास्त त्याची युट्युबवरून कमाई होऊ लागली!

सांगायचं हेच आहे की यश हे एका दिवसात मिळत नाही पण एक दिवशी नक्की मिळते. फक्त तुम्हाला लक्ष केंद्रित करून आणि सातत्याने काम करत राहायचे आहे. लक्ष केंद्रित करणे आणि सातत्य हे समजून सांगण्यासाठी काही तथ्य तुमच्यासमोर मांडत आहोत,

मित्रांनो जर आज बिल गेट्स ने सर्व कामे बंद करून प्रत्येक दिवशी 7 करोड रुपये खर्च करायला सुरुवात केली तर त्यांना त्यांचा सर्व पैसा खर्च करायला 220 वर्षे लागतील. काय मोठी उपलब्धी आहे ना? पण तुम्हाला माहीत आहे का हे सर्व उभे करण्यासाठी या माणसाने किती कष्ट केले आहेत? एक गोष्ट यांच्याविषयी अशी देखील सांगितले जाते की हा माणूस जेव्हा मेहनत करत होता तेव्हा त्यांचा वेळ वाया जाऊ नये म्हणून रात्रीच बूट घालून झोपत असे. ऐकून नक्कीच हसू येईल बऱ्याच लोकांना, वाटेल की 5 मिनिट तर लागतात बूट घालायला, परंतु या 5 मिनिटांची किंमत त्यांना कळाली होती त्यामुळे आज ते या स्तरावर आहेत.

अशाच सवयी स्टीव्ह जॉब्स यांना देखील होत्या. त्यामुळेच हा माणूस जगातील सर्वात मोठी कंपनी ऍपल उभी करू शकला. आपण आपल्या दिवसातील बराच टाईम हा अशा गोष्टींकडे केंद्रित करत असतो की जे आपल्याला आपल्या ध्येयापासून बाजूला करत असतात.

तसेच आम्ही तुम्हाला ९० वयाच्या एका जवान तरुणाची गोष्ट सांगणार आहोत. यांची नेट वर्थ आहे 87 बिलियन डॉलर्स! हो मित्रांनो मी ज्यांच्या बद्दल बोलत आहे ते आहेत Warren Buffet. आज ९० व्या वयात देखील हा माणूस दिवसातील 5 तास हे बिझनेस मॅगझीन किव्हा इतर बुक्स वाचण्यासाठी देतो. ही गोष्ट ते आज करत नाहीये, ही गोष्ट तेव्हापासून ते करताय जेव्हा ते 15 ते 20 वर्षे वयाचे होते. सांगायचं हेच की जवळपास ७०-७५ वर्षांच्या सातत्याने ते हे काम करत आहेत, आणि त्यामुळेच ते आज या स्तरावर पोचले आहेत.

मोठमोठ्या कंपन्या ज्या आज खूप जास्त प्रमाणात रेव्हेन्यू बनवत आहेत त्यांना या स्तरावर पोहोचण्यासाठी खूप वर्षांचे सातत्य लागले आहे ! डिजनी कंपनीला 90 वर्षे लागली 50 मिलियन डॉलर्स रेव्हेन्यू बनवण्यासाठी! तर सॅमसंग ला 63 वर्षे वास आयबीएम ला 60 वर्षे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी लागली. असे खूप सारी उदाहरण आहेत.

मित्रानो कुठलीही गोष्ट मिळवता येऊ शकते, कुठलेही स्वप्न पूर्ण केले जाऊ शकते फक्त त्यासाठी गरज असते ती म्हणजे तुम्हाला लक्षकेंद्रित करून आणि सातत्याने काम करण्याची. तेव्हाच तुम्ही त्या ध्येयापर्यंत अथवा स्वप्नापर्यंत पोहोचू शकता.

हे देखील वाचा

TIME Management tips in Marathi

Habits of highly successful people in Marathi

नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोहित असून, लहानपणापासून च मला वाचण्याची आवड होती त्यामुळे मला लिहायला देखील आवडते. म्हणूनच च मी रिकाम्या वेळेचा सुदुपयोग म्हणून मराठी वारसा हा मराठी वाचकांसाठी चा ब्लॉग सुरु केला आहे. या ब्लॉग वर तुम्हाला Online Earning, ब्लॉगिंग सोबत खूप साऱ्या मराठी विषयांवर लेख वाचायला भेटतील.

Leave a Comment