आयुष्यात सर्व काही मिळवण्याची इच्छा कोणाची नसते, सर्वांच्या पुढे असण्याची इच्छा कोणाची नसते? पैसे कोणाला नको आहेत? स्वताचे नाव असणे कोणाला आवडनार नाही?
परंतु आज आमची अशी इच्छा आहे की तुमचे नाव सर्वात शेवटला असावे. त्या लिस्ट मध्ये ज्या लिस्ट चे नाव आहे हार मानणारे लोक.
आज आता मी १०० लोकांना बोललो कि उद्या पासून सकाळी 4 वाजता उठायचे आहे आणि त्यासाठी यातील 100 लोक तयार देखील होतील परंतु पुढच्या दिवशी फक्त 80 लोक सकाळी उठतील. त्याच्या पुढील दिवशी 80 पैकी फक्त 50 लोकच सकाळी लवकर उठतील आणि तिसऱ्या दिवशी काय होणार तर 50 पैकी फक्त 20 लोक लवकर उठतील, चौथ्या दिवशी 10 उठतील, 5व्या दिवशी 5 जण उठतील तर 6 व्या दिवशी फक्त दोन लोक पहाटे उठतील परंतु 100 पैकी जो 1 असेल तो हे कार्य कधी थांबवणार नाही.
आणि मित्रांनो तो १ व्यक्ती फक्त हेच टार्गेट नाही तर त्याच्या आयुष्यातील कोणतेही टार्गेट जसे कि त्याला आय ए एस बनायचे असेल, सिंगर बनायचे असेल, ऍक्टर बनायचे असेल, डॉक्टर बनायचे असेल, किंवा त्याच्या आयुष्यात त्याला जे काही करायचे असेल तर तो व्यक्ती हार मानणाऱ्यांच्या लिस्ट मध्ये सर्वात शेवटी राहतो. मित्रांनो ज्याला संपूर्ण जग सर्वात शेवटी समजते तो सर्वात शेवटी नसून तो जगातील 1% वेगळ्या लोकांपैकी एक असतो. आणि त्याच मुळे त्याला आयुष्यात ते सर्व मिळते जे त्या बाकी 99% लोकांना कधी मिळत नाही.
ज्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी 99% लोक स्वप्न बघताय ना तेच ध्येय हे 1% लोक प्राप्त करतात, ज्यांनी 99% त्यांच्या सुखांचा त्याग केलेला होता. मित्रांनो 100% perfect कोणीच नसतो! परंतु तुमच्या filed मध्ये perfect बनण्याचा प्रयत्न हा 100% zalach पाहिजे.
आणि मित्रांनो काही लोक तर त्या 1% च्या देखील 1% मध्ये असतात म्हणजे लाखातm करोडात kivha पूर्ण विश्वात निवडक असतात. परंतु त्यांची सुरुवात ही त्याच लिस्ट मधून होते जी आम्ही सुरुवातीला तुम्हाला सांगितली आहे.
जीवनात सगळं सोडायची हिंमत करा परंतु माझ्या मित्रा हिंमत सोडण्याची हिंमत करू नका. जीवनात कोणत्याही पराभवाला हसत हसत स्वीकारा परंतु हिंमत हरू नका. जर तुम्हाला जगातील 1% लोकांमध्ये यायचे असेल तर त्या मनस्थितीतुन बाहेर पडा ज्यात तुमच्या जवळपास असणारे 99% लोक अडकलेले आहेत. ते 99% लोक हाच विचार करतात की जे काम तुम्ही करत आहात त्याने काहीच फरक पडत नाही. परंतु मी सांगतो भावा, फरक पडतो!
जो दगड नदीमध्ये पडतो ना तो एका महिन्यात गुळगुळीत होत नाही! कित्येक वर्षे लागतात त्याला गुळगुळीत ह्वायला इथे तर आपण तर एक मनुष्य आहोत, आणि माणसाच्या आयुष्यात ते आकार द्यायचे काम त्याच दिवशी सुरू होईल जेव्हा तुम्ही त्या हार मानणाऱ्या लोकांच्या यादीत सगळ्यात शेवटी असाल.
जे काम मी इतक्या दिवसांपासून करतो आहे, त्याला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि त्या साठी काहीही झाले तरी मी हार मानणार नाही. जिद्दी होऊन जा तुम्हाला जे करायचे आहे ते जगाला करून दाखवा.
ज्या लोकांनी हार मानली नाही ना त्या 1% मधील 1% लोकांसाठी हे जग टाळ्या वाजवत असते. आजच निश्चित करा की देशात आपल्या नावासोबत, आपल्या गावाच्या नावासोबत जगात देखील मला आपल्या देशाचे नाव मोठे करायचे आहे.