मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।
– संत तुकाराम
खरा ज्ञानी लोकांना तारतो.
– संत तुकाराम
दुर्जनांचा मान मुळीच ठेऊ नये. उलट पद्धतशीरपणे अवमान करावा.
– संत तुकाराम
ठेविले अनंती तैसेचि राहावे । चित्ती असुद्या समाधान.
– संत तुकाराम
असाध्य ते साध्य करिता सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ।।
– संत तुकाराम
लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
– संत तुकाराम
बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।।
– संत तुकाराम
धर्माच्या नावाखाली अधर्म चालु असतो.
– संत तुकाराम
प्रस्थापित पढिक विद्वान हे ज्ञानाचे आंधळे भारवाहक आहेत.
– संत तुकाराम
सत्य आणि असत्याचा शोध घेणाऱ्यांनी आपल्या मनाचा कौल मानावा.
– संत तुकाराम
बहुमत चुकीचे असल्यास कधीही स्वीकारू नये.
– संत तुकाराम
जया अंगी मोठेपण तया यातना कठीण.
– संत तुकाराम
सुख पाहता जवापाडे । दुःख पर्वताएवढे ।।
– संत तुकाराम
दया, क्षमा, शांती । तेथे देवाची वस्ती ।।
– संत तुकाराम
चांगले मित्र हेच भाग्याचं लक्षण.
– संत तुकाराम
शुध्द बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।
– संत तुकाराम
साधु-संत येती घरा । तोचि दिवाळी दसरा ।
– संत तुकाराम
जे जाणुनबुजून चुकत असतील त्यांची फजिती करा.
– संत तुकाराम
अनाथ अपंगाची सेवा करा.
– संत तुकाराम
माणसाने थोडातरी परोपकार करावा.
– संत तुकाराम
आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला करावी लागत नाही.
– संत तुकाराम
तुम्ही मुलाबाळांसाठी खुप काही करता. पण गोरगरिबांसाठी देखील तसच करत चला.
– संत तुकाराम
“अज्ञानाच्या पोटी, अवघीच फजिती “
– संत तुकाराम
मित्रोंना तुम्हाला हा मराठी वारसा चा लेख जर आवडला असेल तर आम्हाला Facebook वर Like आणि share नक्की करा. या वरील लेखात जर तुम्हाला काही चुकीचे वाटत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला त्याची माहिती द्या आम्ही हा लेख अपडेट करत राहू.