मनात नेहमी जिंकण्याची अशा असावी.
कारण नशीब बदलो न बदलो….
पण वेळ नक्कीच बदलते.
चांगला स्वभाव हा गणितातल्या शुन्यासारखा असतो.
ज्याच्या सोबत असतो त्याची किंमत नेहमीच जास्त असते.
कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा.
खुप ससे येतील आडवे बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.
फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात ….
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते.
निराशावादी प्रत्येक संधी मध्ये अडचण पाहतो;
तर आशावादी प्रत्येक अडचणी मध्ये संधी पाहतो.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे.
ज्या गोष्टीला “लोक” म्हणतात कि हे तुला कधीच जमणार नाही.
आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात
त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल…
मन शांत ठेऊन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल…..!
आवाज हा नेहमी चिल्लरचाच होतो नोटांचा नाही.
म्हणून तुमची किंमत वाढली कि शांत रहा.
जी माणसं रागावतात ती नेहमी खरी असतात.
कारण खोटारड्यांना मी नेहमीच हसतांना पाहिले आहे.
“कोणत्याही व्यक्तीला आपली secrets सांगू नका.
कारण जर तुम्ही तुमची secrets…Secret ठेवू शकत नसाल
तर ज्या व्यक्तीला तुम्ही आपली secrets सांगताय ती secret ठेवेल कशावरून ….”
“मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं.
कोणत्या रस्त्याने गेलं कि शॉर्टकट पडतो, इतकच मार्गदर्शन करता येतं.
मुक्कामाचं ठिकाण प्रवाशाने पसंद करायचं असतं”
“स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत.
इतरांना एकतर ते खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं .
ज्याने- त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.”
“स्वताचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन
म्हणजे समोरच्यावर टीका करणे”
“होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं”
अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
असत्य बोलणे हे तलवारीने केलेल्या जखमे प्रमाणे असते.
जखम भरून येते, परंतु त्याची खुण कायम राहते
आधी विचार करा, मग कृती करा.
आपण एखाद्या व्यक्तीच्या जास्त आहारी गेलो
कि त्या व्यक्तीला आपली किंमत राहत नाही.
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते
तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला
,
कधी ना कधी हरावच लागतं… आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही…
परंतु त्यासाठी प्रत्येकाला,
कधी न कधी मरावच लागत…
एकदा वेळ निघून गेली की सर्व
काही बिघडून जाते असे म्हणतात..पण
कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…
भरलेला खिसा माणसाला “दुनिया” दाखवतो …
अन रिकामा खिसा याच दुनियेतली “माणसं” दाखवतो..
ज्याला शंभर किलो धान्याचं पोतं उचलता येतं,
त्याला ते विकत घेता येत नाही आणि
ज्याला विकत घेता येतं त्याला उचलता येत नाही.
आपल्याला जे जे पाहिजे, ते ते सर्व मिळाले असते
तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती…
माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो..
प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीने निसर्गाची
‘एकमेव अप्रतीम कलाकृती’ असतो..
सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते
कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही….
तुमची प्रतिष्ठा तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल
तर चारित्र्यवान माणसांच्या सहवासात रहा.
वाईट माणसांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहणं श्रेयस्कर.
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात
ते फक्त आपले निर्णय.
काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं
“बारशाला घरातले आणि इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात…”
“सार काही विसरून आता वेड्या सारख जगायच,
डोळे असून सुद्धा आंधळ्या सारख पहायच,
खोट का होईना पण हसत हसत मरायच…”
“भाषा हे जर एक सुमन असेल तर,
व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”
अगदी सरळमार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे.
हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते.
आयुष्यात काही शिकायचं असेल तर ते पाण्याकडून ‘शिकावं’
वाटेतला खड्डा टाळून नाही तर ते नेहमी भरून जाव.
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत
त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो.
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडीच्या खेळाप्रमाणे असतात,
तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला लागतात.
आळशी माणुस शुभ दिवसाची वाट बघत असतो
आणि जो कष्ट करतो त्याच्यासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो.
आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसत,
अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं.
इंग्लिश हि फक्त भाषा आहे
कोणाची बुद्धिमत्ता मोजण्याचे साधन नाही.
उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,
झोपून स्वप्न पाहत राहा … किंवा उठुन स्वप्नांचा पाठलाग करा…
पर्याय आपणच निवडायचा असतो.
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं
एक चांगली व्यक्ती बना
पण ते सिद्ध करण्यासाठी वेळ वाया घालवू नका.
एखाद्याची संपत्ती चटकन डोळ्यात भरते,
पण त्यामागचे कष्ट, त्याग आपल्याला दिसत नाहीत.
कधी पण तुम्हाला दुखावणार्या व्यक्तीसाठी रडत बसू नका,
एक स्मित हास्य द्या आणि दुखावणार्या व्यक्तीला सांगा,” धन्यवाद,
तुम्ही मला एक संधी दिली जो मला अमाप सुख देउ शकेल असा व्यक्ती शोधण्याची..!!
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात,
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.
खोट्या विचारापेक्षा स्पष्ट नकार नेहमी चांगला असतो.
या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे
कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.
दुसऱ्याला आपली गरज असते तेव्हा आपण बिझी आहोत
हे म्हणण सोपं असतं पण आपल्याला कुणाची गरज असते
तेव्हा त्यानं बिझी आहे असं उत्तर दिलं तर मात्र फार त्रास होतो.
जे चांगले आहेत ते साथ देतील
व जे वाईट असतील ते अनुभव देतील…….!!
पाण्यापेक्षा “तहान” किती आहे याला जास्त किंमत असते..
मृत्यू पेक्षा “श्वासाला” जास्त किंमत असते
समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते.
जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे आवडतं ते करा, कदाचित उद्या,
तुमच आवडतं जगाची “आवड” बनेल. .!!!
“कोणतीही व्यक्ती चांगली किवा वाईट नसते …
फरक इतकाच असतो कि …
ती व्यक्ती आपल्या मनाप्रमाणे वागत नाही”
“होकार नाकारायला आणि नकार स्वीकारायला
सिहांच काळीज लागतं”
“कल्पनेच्या जगात सत्याची ठेच लागली
कि माणूस वास्तवतेच्या जगात येऊन पडतो “
“आयुष्यात ‘मनस्ताप’ टाळायचा असेल
तर कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका.”
सगळे वार परतवता येतात पण अहंकारावर झालेला वार परतवता येत नाही.
आणि पचवताही येत नाही
गावी गेल्यानंतर कोणालाही सल्ला किवा कोणत्याही
‘TOPIC’ मध्ये आपल मत मांडायचा भानगडीत पडू नका ..
कारण कोणीतरी मध्ये बोलताच
‘शिटीत जावून चार बुकं शिकलास म्हजे जास्त अक्कल येते अस नाय !!’
आयुष्यात बऱ्याच वेळा आपण ..ज्या गोष्टी लक्ष्यात ठेवायच्या आहेत
त्या विसरून जातो आणि ज्या गोष्टी विसरून जायच्या आहेत त्या लक्ष्यात ठेवतो.
आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते.
एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते.
मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.
भ्याड माणसांचा कळप आपोआप तयार होतो.
“आयुष्यात ‘पैसा’ म्हणजे सर्वकाही नाही”
असं म्हणण्यापूर्वी पुरेसा ‘पैसा’ कमवा
मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली,
की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.
देखणेपणावर जाऊ नका.
सौंदर्याला कोमेजण्याचा शाप असतो.
या विश्वाविषयक सर्वात अनाकलनीय गोष्ट हि आहे
कि हे विश्व काही प्रमाणात का होईना पण आकलनीय आहे.
1 thought on “Philosophy Quotes in Marathi | तत्त्वज्ञान मराठी सुविचार | Philosophy Marathi Suvichar”